केळापुर-आर्णी विधान सभा मतदार संघ महाविकास आघाडी कडुन शिवसेना उबाठा लढणार -आदिवासी नेते अंकीत नैताम यांची उमेदवारी साठी राष्ट्रीय प्रवक्ते किशोर तिवारी यांचे साकडे
दिनांक -९ ऑक्टोबर २०२४
महाराष्ट्राची विधान सभेची निवडणुकीची तारखा घोषीत होण्याची व आचारसंहिता लागू होण्याची वेळ आली असता महाविकास आघाडीमध्ये मेरीटवर पक्ष भेदाभेद न करता नवीन परीवाद बाजूला ठेऊन युवा नवीन भूमीपुत्र चेहरा देण्याच्या भूमिकेचे शिवसेना उबाठा चे राष्ट्रीय प्रवक्ते किशोर तिवारी यांनी स्वागत केले असुन पांढरकवडा ह्या आदिवासी बहुल केळापुर -आर्णी विधान सभा मतदार संघावर शिवसेना उबाठा चा दावा ठोकला असुन हि जागा शिवसेनेला महाविकास आघाडीने सोडावी व पांढरकवडा येथील स्थानीय व्यक्तीलाच उमेदवारी द्यावी यासाठी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना साकडे टाकले आहे व महाविकास आघाडीचे प्रमुख नेते शरदचंद्र पवार व काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांच्याशी सुद्धा आपला दावा कसा मजबूत आहे हे समजावून सांगणार असल्याचे किशोर तिवारी यांनी आज सांगीतले . मागील २५ वर्षापासून सतत आदिवासी व शेतकऱ्यांसाठी आंदोलन करणारे अत्यंत गरीब मात्र सतत समाजसेवा करणारे युवा आदिवासी कार्यकर्ते अंकित नैताम यांना भूमिपुत्र उमेदवार शिवसेना उबाठा उभे करणार आहे .
"हा मतदार संघ आदिवासींसाठी राखीव असुन सतत आयात केलेले भाजपचे नाकर्ते लोकप्रतिनिधी निवडून आल्यामुळे वणी राळेगाव सह केळापूर भागातील आदिवासी व कापूस उत्पादक शेतकरी प्रचंड अडचणीत आले आहेत व आपल्या हक्काच्या जमिनीशी नाळ जुडलेल्या प्रामाणिक कार्यकर्त्याला यावेळी संधी देण्याचा व मस्तवाल पोटभरू तसेच परीवारवादाला सोडुन आमदार निवडण्याच्या आग्रहाचा आदर महाविकास आघाडीने करावा यासाठी किशोर तिवारी पाठपुरावा करीत असुन अंकित नैताम यांनी सुद्धा आपला जनसंपर्क सुरु केला आहे
यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी मतदारसंघ आर्णी केळापूर मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर २००४ काँग्रेस पराभूत झाली आहे त्यानंतर २०१४ मध्ये काँग्रेस पराभूत झाली व 20१९ मध्ये काँग्रेस पराभूत झाली या ठिकाणी भाजपचा उमेदवार विजय प्राप्त होत आहे २०१४ मध्ये शिवसेनेचे उमेदवार यांनी ३१०००मतदान घेतले आहे अंकित नैताम एक आदिवासी कुटुंबातील वयाच्या दहा वर्षापासून किशोर तिवारी राष्ट्रीय प्रवक्ते शिवसेना यांच्या सोबत आहेत व आहे मी पांढरकवडा नगर परिषदेत सन २००७ मध्ये सार्वत्रिक निवडणुकीमध्ये विजयप्राप्त करुन नगरपरिषदेच्या आरोग्य सभापती या पदावर कार्यरतहोते
सन २०१२ मध्ये नगरपरिषदेत नामनिर्देशित सदस्य म्हणून अंकीत नैताम यांनी नियुक्ती करण्यात आली होती. यवतमाळ जिल्हा भारतीय जनता पार्टी जिल्हा सरचिटणीस आदिवासी आघाडी या पदावर कार्यरत होते तसेच यवतमाळ जिल्हा ट्रायबल फोरम या संघटनेचा जिल्हा उपाध्यक्ष म्हणून कार्य करीत असुन तसेच ते युवा टायगर फोर्स सयोजक या पदावर कार्यरत आहे आदिवासी भागातील सामाजिक संस्था म्हणून क्रांतिवीर बिरसा मुंडा शैक्षणिक ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून केळापूर तालुक्यातील शेतकरी आदिवासी विधवांना शिलाई मशीनचे प्रशिक्षण कोरोना काळामध्ये अन्नाची किट वाटप सात हजार कुटुंबांना घरपोच वाटप केला आहे तसेच गरीब कुटुंबातील महिलांना दिवाळीत भाऊबीजेच्या निमित्त साडी वाटप कार्यक्रम आयोजित केला होता रक्षाबंधन ना बहिणींना टिफिन डबे चा कार्यक्रम आयोजित करून वाटप केला आहे आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलींचे विवाह संस्थेच्या माध्यमातून सुरू आहे कार्यक्रम सुरू असतात
अंकित नैताम एक सामाजिक कार्यकर्ता .
मी विविध विषयावर आंदोलन करीत असून शेतकऱ्यांना, आदिवासींना न्याय मिळवून देण्याकरिता माझं सामाजिक काम सतत सुरू असतात. आणि मी एक गरीब कुटुंबातील आदिवासी कार्यकर्ता आहे यांना यावेळी शिवसेना उबाठा कडुन संधी मिळावी यासाठी किशोर तिवारी यांनी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे साकडे टाकले आहे .
=================================================
No comments:
Post a Comment