Friday, February 18, 2022

"शिवसेना नेते संजय राउत यांचे गंभीर आरोपावर भाजपा नेत्यांचा भ्रामक खुलासा म्हणजे शुद्ध धूळ फेक ! "-किशोर तिवारी

"शिवसेना नेते संजय राउत यांचे गंभीर आरोपावर भाजपा नेत्यांचा भ्रामक खुलासा म्हणजे शुद्ध धूळ फेक ! "-किशोर तिवारी

नागपूर, दि. १८/०२/२०२२,

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या गंभीर आरोपावर भाजपचे नेते आता अकलेचे तारे तोडत आहेत की महा आयटीवर फक्त ३५६ कोटीचा खर्च झाला असताना २५ हजार कोटीचा महा घोटाळा कसा ? भाजपा नेत्यांचा हा बुद्धी भेद म्हणजे जनतेच्या डोळ्यात चक्क धूळ फेक होय ", अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते आणि राज्य सरकार च्या शेतकरी मिशन चे अध्यक्ष (राज्य मंत्री दर्जा) श्री. किशोर तिवारी यांनी व्यक्त केली आहे.
भाजपा नेत्यांना उद्देशून केलेल्या ट्विट आणि पोस्ट मध्ये किशोर तिवारी यांनी खरपूस समाचार घेत अनेक यक्ष प्रश्न उपस्थित करीत म्हंटले आहे की *"अरे, अति चाणक्य बाबांनो, महा आयटी अंतर्गत "महा टेंडर" ही एकिकृत खरेदी/कंत्राट वाटण्याचे ऑनलाइन पोर्टल राबवून ३ लाख पेक्षा जास्त मुल्याच्या सर्व निविदा "महा टेंडर" पोर्टलवर अनिवार्य करून २०१६ ते २०१९ चे चार वर्षात ५ लाख कोटी मूल्यांचे टेंडर कुणी म्यानेज केले ? रेती घाट पासून ते हेलिकॉप्टर खरेदी पर्यंत सर्व टेंडर मॅनेज करणारे कोण होते ? जल संपदा विभाग, आरोग्य विभाग, बांधकाम विभाग, समृद्धी महामार्ग, परिवहन महामंडळ, शेतकरी कर्ज माफी, समाज कल्याण तसेच आदिवासी विभाग खरेदी, आदी सर्व "ऑन लाईन टेंडर" चे बॅक इंड मधून रेट लीक करून आपल्या मर्जीतील ठेकेदारांना चढ्या किमतीत ठेके कसे दिलेत ? कमी किमतीत काम करण्यास तयार ठेकेदारांना अपात्र कसे ठरविले ? पासवर्ड कोण कोण मनेज करीत होते ? महा टेंडर करिता वर्षा बंगल्याचा "आय. पी." कसा आला ?

*महा आयटी तील दुसरे प्रमुख घटक "महा भरती" हे सरकारी नोकर भरती चे पोर्टल कोण चालवीत होता, बॅक एंड मधून हेराफेरी करून लाखो रुपयांची "अमृत वसुली" च्या बदल्यात नोकऱ्या विकणारे कोण होते ? आहेत काय याची उत्तरे ??*

अश्या प्रकारे अनेक ग्रभित इशारे देणारे प्रश्न उपस्थित करून तिवारी यांनी पुढे म्हटले आहे की "अहो, होवूद्या ना "फॉरेन्सिक सायबर क्राईम ऑडिट", बिहार मधील "चारा घोटाळा" सुध्धा लाजेल, असा भयानक प्रकार "महा आयटी" घोटाळ्यात झाला आहे ! या सर्व अति गंभीर प्रकरणी माफीचे साक्षीदार बनून सर्व सत्य पुराव्यानिशी समोर आणण्यासाठी तुमची पूर्वीची "ब्ल्यू आय" टीम अगदी दोन दिवसाचा पोलीस कस्टडी मधे एका पायावर तयार होणार आहेच, सोबतच ऑर्थर रोड तुरुंग सुद्धा !" 

किशोर तिवारी आपल्या निवेदनात पुढे म्हणतात की या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी करण्यास महाराष्ट्र पोलीस चा सायबर क्राईम विभाग पूर्ण पने सज्ज आहे च सोबत दिमतीला के.पी.एम.जी.ची फडणवीस सरकार ची जुनी टीम सुद्धा !!

या प्रकरणी गांभीर्य लक्षात घेऊन सखोल चौकशी होणे फार आवश्यक असताना, कांहीं प्रसिध्दीगीर भाजप नेत्यांनी खऱ्या आरोपींना वाचविण्याचा प्रयत्न करणे आणि धूळ फेक करणारे खुलासे देणे म्हणजे महाराष्ट्र लुटून देश सेवे चे ढोल वाचविणे होय !
--------


*किशोर तिवारी,*
अध्यक्ष ( राज्यमंत्री दर्जा)
शेतकरी स्वावलंबन मिशन, 
महाराष्ट्र सरकार, मुंबई 
संपर्क : 9422208846
Email :

Monday, January 31, 2022

राज्यातील अभयारण्यातील पर्यटन दोन दिवसात सुरु करणार-वन सचिवांच्या आश्वासनामुळे सत्याग्रह आंदोलन मागे- किशोर तिवारी

राज्यातील अभयारण्यातील पर्यटन दोन दिवसात सुरु करणार-वन सचिवांच्या आश्वासनामुळे सत्याग्रह आंदोलन मागे- किशोर तिवारी 

दिनांक ३१ जानेवारी २०२२

राज्यातील अभयारण्य तसेच व्याघ्र प्रकल्पातील पर्यटन दोन दिवसात सुरु करण्यात येणार आहे. आज लेखी आश्वासन प्राप्त झाल्यामुळे टिपेश्वर अभयारण्य येथे सुरु असलेले सत्याग्रह आंदोलन मागे घेण्यात येत असल्याची घोषणा शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष तसेच शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी केली. 

यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यासह राज्यातील अनेक व्याघ्र प्रकल्प  येथील  शेकडो जिप्सी चालक, कर्मचारी  तसेच गाईड यांची होत असलेली उपासमार टाळण्यासाठी अभयारण्याचे पर्यटन  त्वरीत सुरु करावे  अशी  आग्रही मागणी शेती स्वावलंबन मिशन चे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचेकडे केली होती. मात्र या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याने दिनांक 31 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजता टिपेश्वर अभयारण्य च्या गेट समोर सत्याग्रह आंदोलन सुरु करण्यात आले. जीप्सी चालक, गाईड तसेच किशोर तिवारी यांनी थेट टिपेश्वर अभयारण्याच्या गेट समोरच ठिय्या मांडून आंदोलनाला सुरुवात केली. आपल्या मागण्या पुर्ण कराव्या यासाठी आंदोलन करणा-यांनी घोषणाबाजी केली. काही अघटीत घडू नये म्हणून प्रशासनाच्या वतीने पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. दरम्यान वन सचिव तसेच जिल्हाधिकारी यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर वन सचिव यांनी काही अटींच्या  आधारावर दोन दिवसात अभयारण्य तसेच व्याघ्र प्रकल्प सुरु करण्याचे आश्वासन दिले. याव्यतिरीक्त पर्यटन सुरु करण्यात येणार असल्याचे पत्र सुध्दा पांढरकवडा डीएफओ यांनी दिल्यामुळे आजचे सुरु असलेले आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा किशोर तिवारी यांनी केली. या आंदोलनात सुन्ना ग्रामपंचायतचे उपसरपंच पवन चिंताकुंटलावार, जिप्सी चालक प्रवीण बोरकुंटवार, शाहरुख खान, पांढरकवडा चे माजी नगरसेवक अंकित नैताम, सतीश जिद्देवार, मंगेश मैदपवार, प्रवीण बोळकुटवार, रिजवान शेख, शंकर मरसकोल्हे, राजू मरसकोल्हे, साहिल शेख, सलमान खान, योगेश ठोंबरे, जावेद शेख, अश्विन बाकमवार, गजानन जिद्देवार, नागेश्वर मेश्राम, सेनु आत्राम, चंदू मडावी, कृष्णा आडे, नरेंद्र गेडाम, तोफिक शेख, श्रीकांत गद्दमवार, सागर मडावी, प्रशांत मार्तावार, आकाश बावणे, सुहास शिरपुरकर, महेंद्र आत्राम, सुरज सीडाम, निलेश गड्डमवार, सदानंद मोरे यांच्यासह अनेक जीप्सीचालक, गाईड सहभागी झाले होते.

अन्यायाच्या विरोधात आंदोलन

मध्य प्रदेश, राजस्थान आणि कर्नाटकातील व्याघ्र प्रकल्प सुरु असताना ताडोबा, टिपेश्वर तसेच इतर व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी बंद का ? असा प्रश्न किशोर तिवारी  यांनी सरकारला केला होता. राज्यातील शाळा, महाविद्यालये सुरु करण्याचा निर्णय घेतल्या जातो त्याचवेळी  राज्यात अटी शर्ती ठेऊन टिपेश्वर अभयारण्यातील पर्यटन का सुरु करण्यात येत नाही असा प्रश्न सुध्दा तिवारी यांनी उपस्थित केला आहे. गेल्या दोन वर्षापासून टिपेश्वर चे अभयारण्य बंद, चालु करण्यात येत असल्यामुळे जिप्सी चालक तसेच गाईड्स यांच्या वर उपासमारीची पाळी आली  आहे. त्यामुळेच न्यायासाठी आजचे आंदोलन करण्यात आले.
==============================================

Monday, January 17, 2022

यवतमाळ जिल्ह्यातील ग्रामपंचायच्या कचरा कुंडी खरेदी प्रकरण हा एक संघटीत गुन्हेगारीचा प्रकार -विभागीय आयुक्तांनी चौकशी करण्याची किशोर तिवारी यांची मागणी

यवतमाळ जिल्ह्यातील ग्रामपंचायच्या  कचरा कुंडी खरेदी  प्रकरण हा एक संघटीत गुन्हेगारीचा प्रकार -विभागीय आयुक्तांनी चौकशी करण्याची किशोर तिवारी यांची मागणी 

दिनांक १७ जानेवारी २०२२


यवतमाळ जिल्हा परीषदेमध्ये पंचायती राज विभाग मागील दोन वर्षात संघटीत गुन्हेगारी करून कोट्यवधी लूट करण्यासाठी सतत चर्चेत असतांना व सॅनिटरी पॅड नष्ट करण्याच्या मशीनचा शात्रशुद्ध भ्र्ष्टाचाराची चौकशी अहवाल प्रलंबित असतांना जिल्हा विकास निधी मधुन ग्रामपंचायतींना घनकचरा व्यवस्थापनाची दिलेला निधी जिल्हा परिषदेमध्येच कागदोपत्री निविदा प्रक्रिया राबवून सुमारे ५ कोटीचा जुना लावल्याची सतत ५ महिन्यापासून प्रत्येक लोकशाही दिनात तक्रार केराची टोपली दाखविणाऱ्या प्रशासनाचा अनुभव घेतल्यानंतर हा सारा संच एका समाजसेवकाने कै वसंतराव नाईक शेती स्वालंबन मिशनकडे सादर केल्यावर यवतमाळ जिल्ह्यातील पुरवडा झालेल्या १३४ गावातील ग्रामपंचायतीमध्ये चौकशी केल्यानंतर हा सर्व प्रकार ग्राम पंचायतीच्या लोकनियुक्त प्रतिनिधींना अंधारात ठेऊन प्रशासकीय सर्व खरेदीचे नियम धाब्यावर ठेऊन संघटीत गुन्हेगारी करून कोट्यवधी लूट राजरोसपणे करण्यात आल्याचे समोर आले असल्यामुळे हा एक सखोल चौकशीचा फौजदारी गुन्हा असल्यामुळे विभागीय आयुक्तांनी या सर्व प्रकाराची प्राथमीक चौकशी करून पोलीसात प्रकरण देण्यासाठी एक तक्रार शेतकरी मिशनचे किशोर तिवारी यांनी केली आहे . 

यवतमाळ जिल्हा विकास निधीमधुन २०२१-२२ मध्ये कचरापेटी ग्रामपंचायतीना देण्याचा प्रस्ताव आदीवासी प्रकल्प विभागात पुरवडा करून लाखोंचा चूना लावणाऱ्या एका फौजदारी गुन्हे असणाऱ्या राजकीय नेते पगारपटावर ठेवणाऱ्या पुरवडा करणाऱ्या दलालाने कट रचुन कोट्यवधींचा चूना सालाबादप्रमाणे लावण्यासाठी निधी योजना अधिकाऱ्याला टक्केवारी देऊन मंजूर केला मात्र याची सूचना एका जागृत समज सेवकाला लागल्यावर त्यांनी  २३/८/२०२१ ,३०/८/२१,२९/९/२१,१८/१०/२१ ला वारंवार जिल्हाधिकाऱ्याला व इतर अधिकाऱ्याला दिली व पुरवडा करण्यात येत असलेली कचरा कुंडी ही जास्तीत जास्त १८०० ते २००० रुपयाची असुन त्यासाठी ७००० रुपये देण्यासाठी पंचायत समिताना ग्राम पंचायतींना सांगण्यात येत असल्याच्या तक्रारी केल्या मात्र १३४ गावात पूर्वी ज्याप्रकारे निकामी सॅनिटरी पॅड नष्ट करण्याच्या मशीनचा पुरवडा झाला होता त्याच धर्तीवर पुरवडा झाल्याची ओरड केली परंतु मस्तवाल अधिकाऱ्यांनी त्यांचे एकही तक्रार गंभीरपणे घेतली नाही शेवटी या समाजसेवकाने किशोर तिवारी यांच्याकडे तक्रार केली व त्यांनी कचराकुंडी तयार झाली त्या ठिकाणावरून सर्व ग्रामपंचायती गाठल्या मात्र तेव्हां वस्तुस्थिती पाहील्यावर ही सर्वमान्य लुट विभागीय आयुक्तांना सांगीतली व फौजदारी चौकशीची मागणी केली आहे . 

सरकारने टाचणी पासुन कोणतीही महागडी वस्तू दर्जा व दर नियंत्रणासाठी जेम पोर्टल वरूनच घ्यावी अशी अट असतांना कचरा पेटी सरकारला आदीवासी विभागात चुना लावल्याचा आरोप असणारा पुरवडादार शोधुन चौपट दराने एकत्रीत करून जबरीने दिलेली ऑर्डर वादग्रस्त आहे व ऑर्डर देणारा खाते प्रमुख हा जिल्हा परिषदेमध्ये पैसे खाऊन डॉन झाला असल्यामुळे मुख्यकार्यपालन अधिकाऱ्यासह सर्वच त्याच्या मर्जीने काम करतात व त्याने ग्राम विकास विभागला विकत घेतल्याची चर्चा तो नियमित करतो अशा भ्र्ष्ट अधिकाऱ्यांना तुरुंगात टाकुन जनतेचा पैसा तिजोरीत परत आणण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचा निर्धार किशोर तिवारी यांनी यावेळी व्यक्त केला जर विभागीय आयुक्तांनी फौजदारी कारवाई केली नाही आपण उच्चंन्यायालयात जाणार असल्यची माहिती  त्यांनी यावेळी दिली . 

==============================================================









Thursday, January 6, 2022

Maharashtra Farm Taskforce urges PM not to bend upon pressure tactics of Southern India Mills Association to remove Import Duty on Cotton

Maharashtra Farm Taskforce urges PM not to bend upon pressure tactics of Southern India Mills Association to remove Import Duty on Cotton 

Nagpur, 6th January


In memorandum submitted to Prime Minister of India Shri. Narendra Modi , Maharashtra Farmers' Mission President (MoS Rank) Kishore Tiwari urged him not to bend upon the pressure tactics of textile lobby & Southern India Mills Association (SIMA) and not to reduce import duty on Cotton so as to protect interest of lakhs of cotton growers in India.

Tiwari, specifically pointed out that there is further need to increase cotton import duty  so that local upward price trend to benefit cotton growers in India so as to make it at par with global market. Hence, the demand made by textile lobby and Southern India Mills Association (SIMA) on Tuesday to remove the 11 per cent import duty on cotton and cotton waste and also cotton from MCX and NCDEX features for further speculation, is most unfortunate and against the interest of lakhs of cotton growers in India, especially suicide proven Vidarbha,  Marathwada & Khandesh regions of Maharashtra, Tiwari warned PMO. 

He further demanded that under the grab of proactive policy initiatives to help cotton growers in India, along with the structural issues on the tax front, raw materials and tariff to give advantage of the global competitiveness of various manufacturing sectors, especially textile industry, the only positive step that the government brought in was the levy of 5 per cent basic custom duty and 5 per cent Agricultural Infrastructure Development Cess and 10 per cent social welfare cess on both totaling 11 per cent on cotton imports in the 2021-22 Budget, It's welcome step.

Maharashtra Farm Taskforce  need to be further increased to import duty to 18%.

Hence, to protect farmers, the demand of industry to roll back the decision as it has been importing only 4 to 5 per cent of the cotton consumed by the industry that are not produced by the Indian farmers, Tiwari countered version of SIMA Chairman Ravi Sam. Therefore, the removal of 11 per cent import duty on cotton and cotton waste will directly affect the prospects of Indian cotton farmers, Tiwari said.

To the fortune of Cotton growers in India, during the cotton season 2021-22, though the season started with comfortable opening stock of 75 lakh bales and estimated crop of 360 lakhs bales, the cotton prices  shown positive pulse from the beginning of the season owing to the unprecedented volatility in international cotton prices.

Tiwari also countered and rediculated SIMA claim that the quality cotton is not available in the market and the premium for the same is 5 to 7 per cent higher and the mills are finding it difficult to procure cotton even for the day-to-day use, it's all unfortunate !

Due to international market conditions, as the farmers anticipate a further hike in cotton prices and it will go against in import duty is reduced !

In view of above, Tiwari pointed out that a big lobby of textile sector is trying to influence Finance Minister Nirmala Sitaraman and seeking reduction or exemption in Import duty on Cotton which will be killing step against lakhs of cotton growers in India, Tiwari cautioned 

===============================================================


Thursday, December 9, 2021

महाराष्ट्रातील ३ लाख कोटीच्या सहकारी बँका बंद पाडण्याचा अमित शहा यांचा कट :शिवसेना नेते किशोर तिवारी कै बाबाजी दाते महिला बँकेग्रस्त ठेवीदार ग्राहक व कर्मचाऱ्यांशी ११ डिसेंबरला संवाद साधणार

महाराष्ट्रातील ३ लाख कोटीच्या सहकारी  बँका बंद पाडण्याचा अमित शहा यांचा कट :शिवसेना नेते किशोर तिवारी कै बाबाजी दाते महिला बँकेग्रस्त ठेवीदार ग्राहक व कर्मचाऱ्यांशी  ११ डिसेंबरला संवाद साधणार 

दिनांक ९ डिसेंबर २०२१
सध्या मागील १४ महीने वसुली करू नये असा आदेश काढणाऱ्या व सरकारी बँका प्रमाणे कमीत कमी २ लाख कोटीचे पॅकेज नागरी बँकांना न देता केंद्रामध्ये सहकार खाते उघडल्या बरोबर दररोज केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या आदेशाने आर बी आई आपल्या अधिकाराच्या बेफाम दुरुपयोग निर्बंध लावत असुन पहिले मकलापूर अर्बन बँक  त्यानंतर कै बाबाजी दाते महीला अर्बन बँक व आता नगर अर्बन बँकेवर निर्बंध लावल्याने सुमारे ४ लाख कोटीच्या सहकारी बँका व पत संस्था यामधील ठेवी झपाट्याने काढण्यात येत असल्यामुळे महाराष्ट्रातील सामान्य जनतेच्या व चाकरमान्या पेन्शन धारकांनी आपल्या ठेवी ठेऊन समाजाच्या अंत्योदयाचे आंदोलन लवकरच पडणार असुन हा सगळा ४ लाख कोटीच्या सहकारी बँका व पत संस्था यामधील गुजरातच्या खाजगी बँकांना देण्याचा कट मोदी -शहा रचला असुन पीएमसी बँक सुद्धा या अधिवेशनात कायदा करून खाजगी बँकेला देण्याचा अफलातुन प्रयोग करण्यात येत असल्याने महाराष्ट्र शिवसेना या सहकारी बँका लुटण्याच्या अमित शहा पॅटर्नचाविरोध करणार असुन यवतमाळ कै बाबाजी दाते महिला बँकेग्रस्त ठेवीदार ग्राहक व कर्मचाऱ्यांशी  ११ डिसेंबरला संवाद  टिम्बर  भवन येथे दुपारी १२ वाजता साधणार असल्याची माहीती शिवसेना व्यापारी आघाडीचे अध्यक्ष प्रवीणभाऊ निमोडीया यांनी यावेळी दिली . 
दिनांक. ८ डिसेंबरला अमरावती येथे कै बाबाजी दाते महिला बँकेग्रस्त ठेवीदार ग्राहक व कर्मचाऱ्यांशी बैठकीत  यवतमाळ येथील हजारो शेतकरी विधवा ,दलित ,मुस्लिम ,आदीवासी ,मध्यमवर्गीय लोकांच्या ठेवी व जमा पैशाची बँकेचे अधिकारी ,संचालक ,ऑडिटर,रिझर्व बँकेचे अधिकारी तसेच सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांनी ३७० कोटीची केलेली  लुटकेल्याचा आरोप शिवसेना नेते किशोर तिवारी केला असुन महाराष्ट्र पोलीस कडुन एसआईटी निर्माण करून बँकेचे अधिकारी ,संचालक ,ऑडिटर,रिझर्व बँकेचे अधिकारी तसेच सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांनी सर्व लुटीची रक्कम बाहेर काढणार व एकाही ठेवीदार वा ग्राहक यांची घामाची कमाई बुडणार नाही व यासाठी शिवसेना सर्व चोरांना आंदोलन करून गजाआड करेल अशी हमी आज बाबाजी दाते महिला सहकारी बँक ग्रस्तांच्या बैठकीत दिली . 
एकवर्षांपूर्वी ज्या बँकेचा  एनपीए फक्त ४ टक्के होता तो एकदम ऑडिटर नवा आल्यानंतर ३१ मार्च २०२१ च्या अंकेक्षणामध्ये बँकेचा नेट एनपीए ५१.११ टक्के तर ढोबळमानाने ६४.१३ टक्केपर्यंत पोहचल्याचे दिसून आले. बँकेला ‘ड’दर्जा देण्यात आला हा सर्व प्रकार  बँकेचे अधिकारी ,संचालक ,ऑडिटर,रिझर्व बँकेचे अधिकारी तसेच सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांनी यांनी संघटीतपणे केलेल्या लुटीने साध्य झाले आहे याला बाबाजी दाते महिला सहकारी बँकेचा कंचलवार पॅटर्न जबाबदार असुन व हा सर्व प्रकार मागील ५ वर्षापासून जगासमोर आल्यानंतरही सारे गप्प का होते हा सवालही किशोर तिवारी यांनी केला आहे . 
८ नोव्हेंबर रोजी रिझर्व बँकेने परिपत्रक काढून बँकेवर निर्बंध लादले आहेत  खातेदारांनी ५ हजार रूपये काढण्याचे निर्देश आरबीआयने दिले मात्र कालावधी स्पष्ट नमुद केलेला नाही ही सर्व परिस्थिती संचालक मंडळ तसेच बॅक व्यवस्थापनाने स्वत:च्या आर्थीक हितसंबंधातून व हितसंबंधांना कमी किमतीच्या मालमत्तांवर जास्त कर्ज दिल्याने थकित कर्ज व वसुलीचा समतोल एनपीए ७० टक्के नेण्यासाठी कारणीभुत झाली आहे. 
कै बाबाजी दाते महिला बँकेग्रस्त ठेवीदार ग्राहक व कर्मचाऱ्यांचा यांच्या अनेक तक्रारी आरबीआई  व जिल्हा उपनिबंधकांकडून कुठलीही कारवाई केली जात नाही,आमच्या कडे भरपुर प्रकरणे प्रलंबीत असून सवड मिळत नसल्याचे कारण दिले जाते. वास्तविक जिल्हा उपनिबंधकांचा कारभार संशयास्पद असल्याचे दिसून येत आहे,त्यांची भुमीका बँकेच्या बाजूला असून पिडीतांना अन्याय केला जात आहे. जिल्ह्यातील इतर शाखांमधूनही तक्रारींचा ओघ वाढला आहे.हा सर्व प्रकार आंधळा दळत आहे व कुत्रे खात आहेत असा असुन यावर एकही भाजपा आमदार मात्र बोलत नसुन त्यांच्या कार्यकर्त्यांचे जीवनभर कमाई करून जमविलेले घामाचे पैसे चोरांनी लुटल्यानंतर त्यांचा नाकर्तेपणा पाहण्यासारखा आहे . 
सध्या महाराष्ट्रात अनेक नागरी सहकारी बँका व पत संस्था  बाबाजी दाते महिला सहकारी बँकेचा कंचलवार पॅटर्न चालवीत असल्यामुळे त्यांचा एनपीए सुद्धा दाते महिला सहकारी बँके जास्त असुन फक्त ऑडीटर आरबीआय व सहकार खात्यातील चोर अधिकारी यांच्यामुळे दाबून ठेवण्यात येत आहे याचा  पर्दाफाश लवकरच करू असा विश्वास किशोर तिवारी यांनी यावेळी व्यक्त केला . 
====================================================


Friday, November 26, 2021

वीज तोडणी सुरूच राहिलं ही उर्जामंत्री नितीन राऊत यांची भुमिका नापिकीग्रस्त भागातील शेतकऱ्यांवर अन्याय करणारी-शेतकऱ्यांची वीज तोडणी थांबवा किशोर तिवारींचे ऊर्जामंत्र्याना निवेदन

वीज तोडणी सुरूच राहिलं ही उर्जामंत्री नितीन राऊत यांची भुमिका  नापिकीग्रस्त भागातील शेतकऱ्यांवर अन्याय करणारी-शेतकऱ्यांची वीज तोडणी थांबवा  किशोर तिवारींचे  ऊर्जामंत्र्याना निवेदन 

दिनांक -१८ डिसेंबर  २०२१

महाराष्ट्रात शेतकऱ्यांना वीज फुकट मिळणार नाही ही उर्जामंत्री नितीन राऊत यांची घोषणा विदर्भ व मराठवाड्यातील वीज तोडणी सुरूच राहिलं ही उर्जामंत्री नितीन राऊत यांची भुमिका  नापिकीग्रस्त भागातील शेतकऱ्यांवर अन्याय करणारी असुन विदर्भातील सबसिडी जी मागील तीस वर्षे उत्तर महाराष्ट्राने लाटली त्याचा हिशोब व चुकीच्या अधिभार ,वीज गळतीचा दंड व अंधाधुंद पाठविलेली वीज बिले यावर ही वीजमंत्र्यांनी बोलावे जरा काँग्रेसचा जाहीरनामा व इतर काँग्रेस शासित राज्यात कृषी वीज बिल फुकटात देण्याचे धोरण यावरही दाबून बोलावे सध्या विदर्भ व मराठवाड्यातील नापिकीग्रस्त भागातील शेतकरी प्रचंड अडचणीत आहे व ऊर्जामंत्री विदर्भ विभागातील दलीत मागासवर्गीयांचे आधार आहेत त्यांना विदर्भाच्या होत असलेल्या शेतकरी आत्महत्या व विदर्भाचा विजेचा बिलाचा अनुदानाचा अनुषेय यावर दांडगा अभ्यास आहे त्यांच्याकरून अशा घोषणा अपेक्षित नाहीत तेंव्हा येणाऱ्या जिल्हापरिषदेच्या निवडणुका लक्षात घेऊन 
विदर्भ व मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात एकीकडे महाविकास आघाडी सरकारने खरीप हंगाम अतिवृष्टीने कापूस सोयाबीन तूर धान या पिकांची प्रचंड प्रमाणात नापिकी झाल्यामुळे  ओला दुष्काळ जाहीर करून नुकसान भरपाई दिली आहे मात्र केंद्र सरकारच्या बँका ही नुकसान  भरपाई पीककर्जात जॅम करण्यास सुरु केली असतांना वीज वितरणने कृषी पंपाची वीज तोडणीचा सपाटा लावला आहे आणि या जुलमी अत्याचारामुळे विदर्भ व मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या प्रचंड प्रमाणात वाढल्या आहेत यातच प्रशासकीय उदासीनता पीकविमा कंपन्यांचा नाकर्तेपणा यामुळे हैराण झालेल्या आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातविदर्भ व मराठवाड्यातील नापिकीग्रस्त भागात कृषी पंपाची वीज तोडणी थांबवा अशी विनंती कै वसंतराव नाईक शेती स्वालंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केली आहे .
चालु खरीप हंगामामुळे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचा खरिप हंगामा पूर्णतः बुडाला असून आता शेतकऱ्यांची सर्वस्वी मदार रब्बी वर आहे.अतिवृष्टीमुळे शेतात पाणी पातळी चांगली असतांना आता वीज वितरण कपंनीने वीज तोडणीमुळे  शेतकऱ्यांच्या कामात बाधा येत असुन  शेतकऱ्यांशी सहकार्याने वागावे व  कृषी पंपाची वीज तोडणी त्वरित थांबावी अशी विनंती अनेक महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केली असुन सध्या विदर्भ व मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात शेतकरी आर्थिक अडचणीत असल्यामुळे आपण शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी अपेक्षा आहे अशी आग्रही मागणी किशोर तिवारी यांनी महाराष्ट्राचे ऊर्जामंत्र्यांना केली आहे 

खरीप हंगामात झालेला प्रचंड नुकसानीची भरपाई करण्यासाठी शेतकरी थोडीबहुत  रब्बीची तयारी करीत आहेत  मात्र वीज वितरणने कृषी पंपाची वीज तोडणीचा सपाटा लावला आहे आता परिस्थिती अधिकच बिकट होत आहे सनदी अधिकारी मंत्रालयात आपल्या वातानुकूल चेंबरमध्ये बसुन सक्तीच्या वसुलीसाठी दररोज नवीन नवीन आदेश काढत असुन वीज कंपनीचे अधिकारी एकीकडे वीज तोडणी वा रोहित्रे-ट्रान्सफार्मर दुरुस्तीसाठी १०० टक्के थकबाकीचा भरणा करा अशी सक्ती करीत मात्र अशी सक्ती नापिकीग्रस्त वा दुष्काळग्रस्त भागात करता येत नाही मात्र वीज वितरण कम्पनीचे अभियंता सरळ ऊर्जामंत्रीशी बोला असा सल्ला देत आहेत तर विरोधी पक्ष या वीज तोडणीचे घाणेरडे राजकारण करीत आहेत या करीता मुख्यमंत्र्यानी वीज तोडणीस तोडगा काढावा अशी विनंती किशोर तिवारी यांनी महाराष्ट्राचे महाराष्ट्राचे ऊर्जामंत्र्यांना केली आहे  .

एकीकडे वीज तोडणी तर वाघांचा दररोज शेतकरी व शेतमजुरांचा फडशा पडत असताना   कृषी पंपाना देण्यात येणारी विजेची वेळ ही शेतकऱ्यांसाठी त्रासदायक असून ही वेळही बदलून देण्याची मागणी होत आहे कारण रात्री मिळणारी वीज रात्री ११वा. ऐवजी ही सकाळी ८ ते सायं.५  पुरवण्यात यावी अशी मागणी करण्यात वनभागातील  देण्यात यावी तसेच सर्व रोहित्रे व इतर दुरुस्ती करून शेतकऱ्यांना सुरळीत वीज पुरवठा करावा अशी विनंती किशोर तिवारी यांनी महाराष्ट्राचे महाराष्ट्राचे ऊर्जामंत्र्यांना केली आहे 

==========================================

Sunday, June 20, 2021

प्रताप सरनाईक यांचे प्रेमपत्र - भाजपने शिवसेनेच्या फारकत घेण्याचे आत्मचिंतन करण्याची गरज -किशोर तिवारी

प्रताप सरनाईक यांचे प्रेमपत्र - भाजपने शिवसेनेच्या  फारकत  घेण्याचे आत्मचिंतन करण्याची गरज -किशोर तिवारी 

दिनांक २१ जुन २०२१ 


शिवेसना नेते आणि आमदार प्रताप सरनाईक यांनी शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे यांना लिहलेल्या पत्रामुळे भाजप -सेना युती पुन्हा होणार वा का तुटली यावर अनेक प्रतिक्रिया येत आहे मात्र केंद्रात भाजपची सत्ता तसेच देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एकसुत्री काम करण्यासाठी एकवटलेली सत्ताकेंद्रे व प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस  देशात जवळपास ५५ वर्षे सत्तेत राहुन आज आपल्या जनाधारासाठी व अस्तित्वाची लढाईत गुंतला असतांना भाजपचा सर्वात जवळ असलेला सखा  शिवसेना अशा पोषक परिस्थिती मध्ये  आपल्याला का सोडून गेला यावर आत्मचिंतन न करता महाराष्ट्र भाजपाचे एकसुत्री काम लहरी सत्ता गाजविणारे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस ,प्रदेश अध्यक्ष चंदा कांत पाटील व राज्यात शिवसेने वर एकही संधी न  गमावता आसुड ओढणारे राणे पितापुत्र किरीट सोमय्या आशिष शेलार कदम भातखळकर  दरेकर यांच्या कडुन आलेली प्रतिक्रिया फारच विकृत प्रकारच्या असुन यामध्ये आकस व सत्ता गमावल्यामुळे सुड काढण्याचा मनभेद दिसतो हे राज्याच्या राजकारणासाठी दुर्भाग्यपुर्ण असल्याचे मत शिवसेना कार्यकर्ते मात्र राष्ट्रीय स्तरावर मागील एका वर्षापासून माध्यमांवर बाजु मांडणारे किशोर तिवारी यांनी व्यक्त केली आहे . 

मागील १८ महिन्यात  ही इतकी जुनी मैत्री का तुटली यावर सत्य परिस्थितीचे व वास्तविकतेचे आत्मचिंतन न करता ही युती मुख्यमंत्री पदावरूनच  तुटली यावर जोर देण्यात आला मात्र खरी परिस्थितीचे अवलोकन करणे अत्यंत आवश्यक झाले आहेत ते असे कीं  २०१४ च्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर भाजपने आपल्या एनडीए मधील घटक पक्षांना त्यांच्या त्यांच्या राज्यात संपविण्याचा प्रयन्त सुरु केला त्यामुळेच विधानसभेच्या निवडणुकीमध्ये युती तोडुन स्वबळावर निवडणूक लढविली मात्र पूर्ण बहुमत न आल्यामुळे व पोडापोडी न जमल्यामुळे शिवसेनेच्या घुबडया घेतल्या व सत्तेत आले मात्र २०१४ ते २०१९ च्या काळात भाजपच्या वागणुक फारच बदलेली होती त्याचा अनुभव वारंवार उद्धवजींना आला मात्र २०१९ निवडणुकीमध्ये मोदी -अमित शाह यांनी लहान भाऊ मोठा भाऊ करीत पुन्हा युती केली मात्र २०१९ मध्ये जशी एकखांबी सत्ता भाजपाला आली त्याचवेळी शिवसेनेला कट टू साईज करण्यासाठी सर्व कारस्थान रचण्यात पुन्हा सुरवात समसमान जागेच्या नांवावर १२० जागा त्यातही त्याठिकाणी बहूतेक आपले बंडखोर उभे करून कोट्यवधी रुपये फडणवीस साहेबांनी फेकले मात्र तरीही बहुमत मिळाले नाही त्यानंतरही दिलेले सारे वचन धाब्यावर ठेवत अभद्रपणे सरकार स्थापन करण्याचा लाजिरवाणा प्रयन्त देवेन्द्रजीनी केला व आपली फजीती करून  घेतली माञ मागील १८ महिन्यात आपला सखा शिवसेना ज्याच्या कुबडया घेत आपण महाराष्ट्रात अस्तिव निर्माण केले तो एकेकाळचा मोठा भाऊ दूर का गेला यावर एक दिवसही आत्मचिंतन न करता ,आपली सत्ता कशी येणार याचा प्रयन्त करणाऱ्या चिल्लर अल्पबुद्धीधारक भाजपच्या नेत्यांना कसा  कळेल कारण आज सर्वांना घेऊन चालणारे  महाजन मुंडे नाहीत तर जे समेट आणण्यात सक्षम आहेत अशा नितीन गडकरी यांना भाजपने कट टू  नागपुर केले आहे असा टोमणा किशोर   तिवारी यांनी मांडला आहे . 

आज रोज भाजप शिवसेना संबंधामह्ये  हळू हळू विष कालविणारे देवेंद्र फडणवीस यांनी भाजपला शिवसेनेच्या युतीमध्ये रस नाही अशी प्रतिक्रिया दिली तर भाजपामध्ये देवेन्द्र टीम चे सर्वात सक्रीय किरीट सोमय्या यांनी विष कालविणारी प्रतिक्रिया दिली आता देवेंद्र टीमचे राणे पिता पुत्र प्रवीण दरेकर राम कदम आशिष शेलार अतुल भातखळकर कोणतीही आवश्यकता नसतांना मागील १८ महिन्यांपासून जशा प्रकारे एकही  संधी न गमावता ज्या प्रकारे विकृत प्रतिक्रिया देत आहेत त्याचप्रमाणे प्रतिक्रिया देतील असा विश्वास किशोर तिवारी प्रगट  केला . 

मागील दीड वर्षापासुन देवेंद्र टीमने केंद्राच्या NIA CBI  ED NCB चा वापर करून शिवसेनेला वा महाविकास आघाडीच्या नेत्यांना अडचणीत आणण्याचा  सपाटा लावला आहे वा ज्याप्रकारे भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शिवसेनेचा "शवसेना सोनीयासेना" असा उल्लेख करतात त्यामुळे शिवसेने-भाजपा सम्बंधामध्ये दुरावा निर्माण होत  आहे मात्र या मुर्खांना महाराष्ट्रात भाजपा सोबत शिवसेना नसली तर लोकसभेत व विधानसभेत  खासदार आमदारांची मोठी घसरण होणार हे कळत नाही . शिवसेनेनी महाविकास आघाडी मध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी सोबत जाऊन सत्ता स्थापन केली आहे व उध्दवजी प्रशासनाचा कोणताही अनुभव नसतांना मुख्यमंत्री म्हणुन ज्याप्रकारे या विषम विचारांच्या पक्षासोबत व भाजपच्या केन्द्र सरकार सोबत अतिशय प्रेमाने  कोरोना संकटात काम करीत आहेत त्याची नोंद जागतिक पातळीवर झाली आहे व याचा इतिहास साक्षीदार राहणार . शिवसेनेच्या या महाविकास आघाडी मध्ये  जाण्याच्या निर्णयावर मतदार कौल देतील मात्र ज्या प्रकारचे सुडाचे व व्यक्तिगत चारीत्र्य हनन बदनामी करण्याचे अत्यंत घाणेरडे प्रकार भाजपच्या  देवेंद्र टीमने केले त्याचा साक्षी सुद्धा इतिहास राहणारच असा इशारा भाजपला किशोर तिवारी यावेळी दिला . 

आपला भाजपावारी अनुभव सांगताना किशोर तिवारी म्हणाले की "मी २०१२ च्या डिसेंबर मध्ये त्यावेळचे राष्ट्रीय अध्यक्ष वं माझे १९७७ पासुन मित्र नितीन गडकरी यांच्या विनंतीला मान देऊन फक्त त्यांना पंतप्रधान पाहण्याच्या  दृष्टीने भाजपसोबत काम करणे सुरु केले मात्र माझा २०१२ ते २०१९ चा अनुभव विश्वासघातांचा राहीला व मी  लोकसभेत भाजपाची एकखांबी सत्ता आल्यानंतर त्यांच्याशी फारकत घेत कोणतीही अट वा मागणी न करता माझे १९९९ पासून चे मित्र उद्धवजी ठाकरे यांच्या  सोबत सामाजिक चळवळ करण्यासाठी सोबत काम करण्याचे ठरविले मी त्यांच्या पेक्षा थोरला असल्यामुळें त्यांच्याशी फारच अधिकाराने जवळुन चर्चा करण्याची संधी मिळाली . मला त्यांच्या बोलण्यात २०१४ ते २०१९ भाजपच्या वेळोवेळी दिलेल्या वागणुकीचा वा प्रादेशिक पक्ष कट टू साईज करण्यासाठी होत असलेल्या प्रयन्ताचा त्यांचा साक्षात्कार जाणवत होता त्यातच ऐन दिवाळीत आम्ही शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देण्याचा करारच झाला नाही अशी अकालनीय देवेंद्र घोषणेमुळे त्यात प्रचंड भर पडली मात्र  आज शिवसेनेचा प्रवास जसा  भारतात जसा बंगाल ओरीसा तेलंगाणा आंध्रप्रदेश तामिळनाडू सारख्या एकखांबी सत्ता गाजविणाऱ्या प्रादेशिक पक्षासारखा झाला त्यातच उद्धवजींना राष्ट्रवादीचे शरद पवार सारख्या भारताच्या  राजकारणातील पितामह व्यक्तीचा  आशीर्वाद मिळाला आहे मला तर असे वाटत २०२४ मध्ये सगळे हे प्रादेशिक पक्ष काँग्रेस व डावे यांना  सोबत घेऊन  उद्धवजींच्या नेतृत्वात भारताच्या सत्तेवर येतील व २०२४ ते २०२९ या काळात भारताला "भाजपा मुक्त " करून खऱ्या अर्थाने चांगले दिवस आणतील . 

किशोर तिवारी 

संपर्क -९४२२१०८८४६ 

===================================================