भाजपा द्वारे राजकीय इव्हेंट करून 'शो बाजी' च्या प्रचंड दबावात भारत वर्ल्ड कप क्रिकेट अंतिम सामना नाहक हरला !
नरेंद्र मोदी आणि अमित शाह यानी देशाची माफी मागावी !- किशोर तिवारी, राष्ट्रीय प्रवक्ते शिवसेना (उद्धव ठाकरे)नागपूर , दिनांक २४ नोव्हेंबर २०२३"वर्ल्ड कप क्रिकेट अंतिम सामना जाणून बुजून मुंबई ऐवजी अहमदाबाद येथे ठेवून नरेंद्र मोदी स्टेडियम मध्ये भाजपा द्वारे राजकीय भांडवल आणि इव्हेंट बनवून 'शो बाजी' च्या प्रचंड दबावात भारत वर्ल्ड कप क्रिकेट अंतिम सामना नाहक हरला, ही दुर्दैवी बाब आता समोर आली असून, ज्या पध्दतीने अंतिम मॅच चे ३/४ दिवस पूर्वी पासून टीव्ही चॅनल, मीडिया त्या साठी अहमदाबाद येथील क्रिकेट चे स्टेडियम वर कब्जा केला होता, अति विशिष्ट सुरक्षा यंत्रणे च्या विळख्याने आणि जणू विजय झाल्याचे श्रेय मोदींना कसे देता येईल? मीडिया ने याचा 'मेगा शो' कसा प्रसारित करावा ? या साठी भाजपाने २४ तास रात्रं दिवस केलेली कसरत, यामुळे भारतीय खेळाडूवर एक प्रकार चा मानसिक दबाव पडून शेवटी हा सामना आपल्या देशाने गमाविला. या साठी भाजपाचा "मेगा शो" करण्याचा अट्टाहास जबाबदार असल्याने या पराभवाची नामुष्की साठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृह मंत्री अमित शाह यानी देशाची माफी मागावी", अशी मागणी शिवसेना (उद्धव ठाकरे) राष्ट्रीय प्रवक्ते किशोर तिवारी यांनी केली आहे.अहमदाबाद येथे वर्ल्ड कप क्रिकेट अंतिम सामन्यात केवळ इव्हेंट बाजी समोर ठेवून नरेंद्र मोदी स्टेडियम मध्ये भाजपा द्वारे राजकीय भांडवल बनवून 'शो बाजी' साठी प्रचंड दबाव निर्माण केला गेला होता. पूर्वी विकलेल्या हजारो तिकिटा पंतप्रधान सुरक्षा कारणामुळे रद्द करून त्या भाजपा कार्यकर्त्यांना देण्यात आल्या, जेणे करून विजय कप रथ घेवून मोदी संपूर्ण स्टेडियम आणि अहमदाबाद / गांधीनगर परिसरात मिरवून त्याचे प्रसारण भाड्याच्या मीडिया लावून दिवस रात्र प्रसारित करून देशभरात ठीक ठिकाणी विजय जुलूस काढून जणू नरेन्द्र मोदी यांनीच हा वर्ल्ड कप जिंकून आणला, असा इव्हेंट आणि शो बाजी करण्याचे नादात
दुसरी कडे भारतीय खेळाडूवर मनोविज्ञानिक दबाव आणि दडपण येवून त्याची परिणीती फायनल मॅच हरण्यात झाली. ज्या पद्धतीने बी.सी.सी.आय. ने खेळाडू वर दबाव निर्माण केला होता, स्टेडियम वर एकतर्फी घोळके समशान शांतता प्रस्थापित करून नकारात्मक भावना पसरवीत होते, मो. शमी आणि मो.सिराज यांना त्यांचे प्रतेक ओवर्स वर उद्देशून अर्वाच्य टोमणे मारणारे भाजपा कार्यकर्ते त्यामुळे प्रत्येक चेंडू वर खेळाडू हतबल होऊन पराजयाकडे जात होते, या सर्व वातावरणा साठी सत्तेचा माज चढलेले नेते जबाबदार असून १० सामने जिंकूनही भारतीय संघ या अनाठायी दबावामुळे शेवटी अपयशी ठरला. या साठी अवास्तव इव्हेंट बाजी आणि प्रसिद्धी साठी हपापलेले मोदी शहा हेच जबाबदार असून त्यांनी १४० कोटी भारत वासियांची जाहीर माफी मागावी, अशी मागणी तिवारी यांनी केली आहे.क्रिकेट च्या मैदानाचा राजकीय इव्हेंट साठी दुरुपयोग करणाऱ्या या सर्व बाबींचा उल्लेख करून खरपूस समाचार घेणार एक खुले पत्र किशोर तिवारी यांनी पंतप्रधान मोदी आणि गृह मंत्री अमित शहा यांना पाठविले असून त्यात जाहीर माफी मागावी अशी मागणी केली आहे.भारतीय क्रिकेट नियंत्रण बोर्डाने(बी.सी.सी.आय.) धोरणात्मक निर्णय घेवून भविष्यात क्रिकेट च्या मैदानाचा राजकीय इव्हेंट होण्यापासून बंदी घातली पाहिजे, अशी मागणी ही तिवारी यांनी केली आहे.------किशोर तिवारी,राष्ट्रीय प्रवक्ते शिवसेना (उद्धव ठाकरे)मो. ९४२२१०८८४६*Email ID : kishortiwari@gmail.com
Thursday, November 23, 2023
भाजपा द्वारे राजकीय इव्हेंट करून 'शो बाजी' च्या प्रचंड दबावात भारत वर्ल्ड कप क्रिकेट अंतिम सामना नाहक हरला- नरेंद्र मोदी आणि अमित शाह यानी देशाची माफी मागावी !- किशोर तिवारी, राष्ट्रीय प्रवक्ते शिवसेना (उद्धव ठाकरे)
Thursday, September 28, 2023
हरितक्रांतीचे जनक डॉ स्वामीनाथन याना राष्ट्रीय शेतकरी आयोगाच्या शिफारशींची अंबलबजावणी करणेच खरी श्रद्धांजली ठरेल - किशोर तिवारी
हरितक्रांतीचे जनक डॉ स्वामीनाथन याना राष्ट्रीय शेतकरी आयोगाच्या शिफारशींची अंबलबजावणी करणेच खरी श्रद्धांजली ठरेल - किशोर तिवारी
दिनांक -२८ सप्टेंबर २०२३
भारताच्या हरीतक्रांतीचे जनक डॉ.एम.एस स्वामिनाथन यांचे आज वयाच्या ९८वर्षी वृद्धापकाळामुळे निधन झाले यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान झाले कारण राष्ट्रीय शेतकरी मिशनच्या अध्यक्षपदी त्यांनी यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची कारणे व उपाय यावर सतत दौरे करून सखोल अभ्यास करून आपल्या अहवालात हमीभाव ,पीक पद्धती बदल ,पत पुरवडा धोरण या संबंधी शिफारशी केल्या होत्या मात्र मागील १० वर्षात सरकारने स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींना केराची टोपली दाखविल्यामुळे भारतात २०१४ पासुन दोन लाखावर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असुन जर डॉ.एम.एस स्वामिनाथन यांच्या आत्म्याला खरी श्रद्धांजली देण्यासाठी हमीभाव ,पीक पद्धती बदल ,पत पुरवडा धोरण या संबंधी शिफारशी खऱ्या अर्थाने तात्काळ लागु कराव्या अशी मागणी विदर्भातील शेतकऱ्यांच्या प्रश्न्नावर डॉ.एम.एस स्वामिनाथन सोबत १९९९ पासुन सतत काम करणारे शेतकरी कार्यकर्ते व महाराष्ट्र सरकारच्या स्व वसंतरावं नाईक शेती स्वालंबन मिशन माजी अध्यक्ष किशोर तिवारी यांनी या दुःखद निधनावर आपली संवेदना व्यक्त करताना केली आहे .
स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींना मोदी सरकारने सोयीने बगल दिल्याची यांची शेवटपर्यंत खंत
किशोर तिवारी यांनी तीन वर्षापूर्वी डॉ.एम.एस स्वामिनाथन यांची विषेय भेट घेऊन विदर्भाच्या शेतकऱ्यांच्या समस्यांवर चर्चा केली होती त्यावेळी त्यांनी लागवडीचा खर्च अधिक ५० टक्के नफा हा आपला हमीभावाचा फार्म्युल्याप्रमाणे लागवडीचा खर्च याचा हिशोब करतांना शेती शेतकरी कुटुंब श्रम सह अनेक खर्चाचा हिशोब न करताच जाहीर केल्यामुळे हमीभाव लागवडी खर्चापेक्षा कमी येत असल्याची खंत प्रगट केली होती . अन्नाच्या पिकांची लागवडी साठी अनुदान पीक कर्ज धोरण ,डाळीचे व तेलबियांचे क्षेत्र वाढविण्यासाठी तसेच जागतीक तंत्र व संशोधन याच्या वापरासाठी अम्बलत येणारे धोरण यावर त्यांनी सरकारच्या धोरणावर चिंता व्यक्त केली होती
विदर्भ जनआंदोलन समिती कडुन विदर्भ मित्र पुरस्काराने सन्मानित
६ऑक्टोबर २००५ मध्ये पांढरकवडा येथे डॉ एम एस स्वामिनाथन यांचा सपत्नीक विदर्भ मित्र हा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला होता यावेळी तात्काळणी नगराध्यक्ष अनिल तिवारी यांनी सत्कार केला होता . यावेळी पांढरकवडा येथील अग्रसेन भवन मध्ये विदर्भातील शेतकरी विधवांशी त्यांनी संवाद सुद्धा साधला होता .
विदर्भाच्या शेतकरी विधवांच्या साठी भरीव कार्य
डॉ.एम.एस स्वामिनाथन यांनी विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त वर्धा व यवतमाळ जिल्ह्यात महीला शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबविल्या होत्या .त्यांनी आपल्या फॉउंडेशन मार्फत शास्वत शेतीचे प्रयोग सुद्धा यशस्वीपणे राबविले .महिला शेतकऱ्यांच्या अधिकारांसाठी व विकासासाठी त्यांनी आपल्या राज्यसभेच्या कार्यकाळात महीला शेतकरी अधिकार बिल सादर केले होते त्या बिलामध्ये शेतकरी विधवांच्या कल्याणाच्या संपूर्ण एकात्मीक कार्यक्रम सादर केला होता मात्र सरकारने यावर साधी चर्चा सुद्धा करण्याची तसदी दाखविली याचे दुःख त्यांना शेवटच्या काळात होते .
=================================================
Tuesday, September 19, 2023
यवतमाळमध्ये ४८ तासात पाच शेतकऱ्यांच्या आत्महत्यां :२०२३ मध्ये विदर्भात १५६५ शेतकऱ्यांच्या आत्महत्या -संसदेच्या विषेय सत्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर सरकारने दिलासा द्यावा -किशोर तिवारी
यवतमाळमध्ये ४८ तासात पाच शेतकऱ्यांच्या आत्महत्यां :२०२३ मध्ये विदर्भात १५६५ शेतकऱ्यांच्या आत्महत्या -संसदेच्या विषेय सत्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर सरकारने दिलासा द्यावा -किशोर तिवारी
दिनांक -१९ सप्टेंबर २०२३
शेतकऱ्यांचा वार्षीक महत्वाचा पोळा सण अख्या महाराष्ट्रात साजरा केला जात असतांना व गणरायाचे आगमन होत असतांना यवतमाळ जिल्ह्यात बंजारा ,आदीवासी व दलीत समाजाचे पाच कर्जबाजारी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी मागील ४८ तासात आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या आहेत ,मिळालेल्या माहिती प्रमाणे
१. यवतमाळ जिल्ह्यातील हिवरी येथील प्रवीण काळे
२. यवतमाळ जिल्ह्यातील खिडकी येथील त्र्यंबक केराम
३. यवतमाळ जिल्ह्यातीलशिवणी येथील मारोती चव्हाण
४ यवतमाळ जिल्ह्यातील अर्जुना येथील गजानन शिगणे
५. यवतमाळ जिल्ह्यातील बाणगाव येथील तेवीचंद राठोड
"खूप कमी मागणी असलेल्या कापूस या मुख्य नगदी पिकामुळे विदर्भाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. लागवडीचा खर्च यामध्ये प्रचंड वाढ झाली आहे आणि बँकांद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अत्यंत कमी पीककर्जामुळे संकटात आणखी भर पडली आहे. शाश्वतपीक अन्न ,डाळी आणि तेलबिया पिकांना प्रोत्साहन देण्यात सरकार अपयशी ठरले आहे. या प्रदेशात आणि जागतिक हवामानातील बदल हे सध्याच्या कृषी संकटाचे कारण आहेत,” किशोर तिवारी पुढे म्हणाले.
संसदेच्या विषेय सत्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर सरकारने दिलासा द्यावा -किशोर तिवारी
विदर्भातील अत्यंत लहान प्रदेशात दररोज एकापेक्षा जास्त शेतकरी आत्महत्या होत असताना, नजीकच्या भविष्यात ५ ट्रिलियन अर्थव्यवस्थेचा भारताचा दावा फोल ठरत आहे, संसदेच्या विषेय सत्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर सरकारने चर्चा करून तसेच नरेंद्र मोदी यांना विदर्भाचा दौरा करून शेतकऱ्यांना आत्महत्येला भाग पाडणाऱ्या प्रमुख समस्यांचे निराकरणकरण्यासाठी विषेय पॅकेज जाहीर करण्याचे आवाहन ,किशोर तिवारी यांनी पंतप्रधानांना केलेआहे .
Saturday, August 19, 2023
राष्ट्रीय महामार्ग भ्रष्टाचार प्रकरण म्हणजे नितीन गडकरी यांना गोवण्याचा प्रकार-किशोर तिवारी यांचा मोदी शाह यांचे वरती घणाघाती प्रहार - गडकरी यांना षडयंत्र पूर्वक बदनाम करण्याचे पातक
राष्ट्रीय महामार्ग भ्रष्टाचार प्रकरण म्हणजे नितीन गडकरी यांना गोवण्याचा प्रकार-किशोर तिवारी यांचा मोदी शाह यांचे वरती घणाघाती प्रहार - गडकरी यांना षडयंत्र पूर्वक बदनाम करण्याचे पातक
नागपूर दि. १९ ऑगस्ट २३
गेल्या १५ दिवसापासून सी.ए.जी. अहवालाचे निमित्त करून दिल्ली येथील द्वारका एक्सप्रेस हायवे वर २५३ कोटी रुपये प्रति किलोमीटर अशी प्रचंड रक्कम खर्च केल्याचा ठपका राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण वर ठेवून त्यात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री श्री नितीन गडकरी यांचे वर लक्ष वेधून त्यांनी खूप मोठा भ्रष्टाचार केला आहे, असे देशाला भासविले जात आहे. यात वास्तविकता अशी आहे की द्वारका एक्सप्रेस हायवे ज्या दिल्ली तील अती गजबजलेल्या दाट वस्तीतून जातो, त्या रस्त्याने भूमी अधिग्रहण किंमत ही देशात सर्वात मोठी असून रू. २० ते २५,००० प्रति स्क्वेअर फूट प्रमाणे भूमी अधिग्रहण न्यायालयाने दिलेला दर दिल्ली उच्च न्यायालयाने ग्राह्य ठरविल्या नंतर ११०.६ कोटी प्रति एकर प्रमाणे भूमी अधिग्रहण खर्च झाला. एकूण २९ किलोमीटर अंतरासाठी १० पदरी रस्त्याचे कामासाठी २३५ कोटी रुपयांचा प्रति किलोमिटर खर्च असा भूमी अधिग्रहण खर्च झाला असताना, ही वास्तविक बाब रेकॉर्ड वरून लपवून ठेवली जात आहे. तसेच इतरही हाइवे प्रकल्पात घोळ करून नितीन गडकरी त्यांनी खूप मोठा भ्रष्टाचार केला आहे, असे देशाला भासविले जात आहे. हा एक प्रकारे महाराष्ट्र आणि विदर्भातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित मोठे नेतृत्व खलास करण्याचा मोठा कार्यक्रम भाजपा तील कलुशित विचार सरणी चे लोकांनी हाती घेतला आहे. केंद्रात मोदी प्रणित भाजपा चे पतन झाल्यास सर्व मान्य धडाडीचे नेते म्हणून पंतप्रधान पदी नितीन गडकरी यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याचा केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी दिलेला अहवाल कळताच गडकरी यांना बदनाम करण्याचे मोदी शाह यांचे हे पातक असून गडकरी यांना या प्रकरणात नाहक गोवण्याचा प्रकार असल्याचा घणाघाती प्रहार शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी केला आहे.
सी.ए.जी. चे आता पर्यंत उघड झालेले १८ अहवालापैकी केवळ गडकरी यांचे विभागाशी संबंधीत अहवाल व आरोपच प्रकाश झोतात आणून कोविड काळात झालेला रेमिडिसीविर घोळला, रेल्वेतील खाजगी करणातील खुला गैरव्यवहार, फूड कॉर्पोरेशन मधील घोटाळा, कांहीं उद्योगपतीना 'इंसोलवांसी व बँकरेपसी कोड' चे खाली दिलेली १५.३८ लाख कोटी रुपयांची विशाल कर्ज माफी, आदी सी.ए.जी.ने ठपका ठेवून उघड केलेले गंभीर विषय दाबून फक्त गडकरी यांच्या विभागाशी संबंधित रिपोर्ट प्रकाश झोतात आणून मोदी शहा मजा बघत आहेत ! नागपूरचा रा. स्व. संघ परिवार कसा कचाट्यात येईल, अशी पद्धतशीर बदनाम करणारी यंत्रणा मोदी शहा चालवीत असल्याचा तिवारी यांचा खुला आरोप आहे.
किशोर तिवारी हे गेल्या २५ वर्षापासून विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी व शेतमजूर आणि ग्रामीण भागातील समस्यासह आदिवासी व पददलित लोकांच्या समस्या भुतलावर काम करून मांडीत आहेत. राज्य सरकारच्या शेतकरी मिशन चे ते ८ वर्ष राज्यमंत्री दर्जा प्राप्त अध्यक्ष पदी जबाबदारी सांभाळत असताना, कुणाशीही पर्वा न करता, त्यांनी केंद्र व राज्य सरकारला अनेक सखोल अहवाल सादर करून शेतकऱ्यांच्या अडचणी सरकार दरबारी रेटून प्रवाहा विरूध्द जावून काम केले होते.
गडकरी यांची ज्या प्रकारे विकेट पाडून महाराष्ट्र आणि विदर्भातील मोठे नेतृत्व खलास करण्याचा मोठा कार्यक्रम मोदी शहा यांनी आखला आहे, त्यामुळे तिवारी यांनी मोदी शहा यांचे विरूध्द उघड मोहीम सुरू करून गडकरी यांना पद्धतशीर बदनाम करण्याचे राष्ट्रीय षडयंत्र केले जाते आहे, असा आरोप तिवारी यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे
किशोर तिवारी हे सध्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे राष्ट्रीय प्रवक्ते असून अनेक विषयावर सरकारच्या चुकीच्या धोरणावर सातत्याने पाठपुरावा करून राष्ट्रीय स्तरावर आवाज उठवीत आहेत.
नितीन गडकरी, हे एक धडाडीचे नेतृत्व असल्याचे विचार मांडून गडकरी यांना बदनाम करण्याचे षडयंत्र प्रकरणी त्यांनी पक्षीय राजकारणाचे पलीकडे जाऊन खुली भूमिका मांडून आता या विषयावर चर्चा घडवून आणली आहे.
=====================================================================
Friday, August 18, 2023
स्वातंत्र्यदीना दरम्यान यवतमाळमध्ये पाच शेतकऱ्यांच्या आत्महत्यांकडे महाराष्ट्राच्या कृषीमंत्र्यांनी पाठ फिरविली :२०२३ मध्ये विदर्भात १५६५ विक्रमी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना नाकर्ते सरकार जबाबदार-किशोर तिवारी
स्वातंत्र्यदीना दरम्यान यवतमाळमध्ये पाच शेतकऱ्यांच्या आत्महत्यांकडे महाराष्ट्राच्या कृषीमंत्र्यांनी पाठ फिरविली :२०२३ मध्ये विदर्भात १५६५ विक्रमी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना नाकर्ते सरकार जबाबदार-किशोर तिवारी
दिनांक -१७ ऑगस्ट २०२३
ज्या बंजारा ,पारधी,आदीवासी व दलीत समाजाच्या कल्याणासाठी साठी स्व.वसंतराव नाईक यांनी आपले अखे आयुष्य वेचले त्यांचा स्मृतिदिना कार्यक्रमासाठी यवतमाळ येथे आलेले महाराष्ट्राचे कृषीमंत्री धनंजय मुंडे याच समाजाच्या पाच शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्यांप्रती पूर्ण उदासीनता दाखवीत त्यांचा गावासमोरून गाड्यांचा ताफा देत कुटुंबाची साधी विचारपूसही केली नाही या घटनेचा निषेध शिवसेना (उबाठा) राष्ट्रीय प्रवक्ते व महाराष्ट्राच्या स्व वसंतराव नाईक शेती स्वालंबन मिशनचे माजी अध्यक्ष किशोर तिवारी केला असुन यावर्षी २०२३ मध्ये विदर्भात १५६५ विक्रमी शेतकऱ्यांच्या आत्महत्यां झाल्या असुन या होत असलेल्या शेतकरी आत्महत्यांना केंद्र व राज्य सरकारचे चुकीचे ढवण जबाबदार असुन संपुर्ण विदर्भात शेतकरी मागील वर्षीच्या कापूस सोयाबीन च्या मंदीमुळे तसेच जुलै महिन्यातील अति पाऊसामुळे झालेल्या प्रचंड नापिकी मुळे आर्थिक संकट आले आहेत लागवडीचा खर्च अतिशय वाढल्यामुळे व बँकांनी अपुरे पीककर्ज वाटप केल्यामुळे ह्या आत्महत्या होत असल्याचा आरोप किशोर तिवारी यांनी केला .जेव्हा देश आपला ७६ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत होता आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना गेल्या ९ वर्षात कृषी क्षेत्रात विक्रमी वाढ झाल्याचा दावा करीत होते त्याचवेळी
१. यवतमाळ जवळील येरद गावातील अत्यंत युवा शेतकरी मनोज राठोड (३५) यांनी गळफास लावून आत्महत्या केली तर स्वतंत्रदिनाच्या पूर्व संध्येला
२. १४ ऑगस्ट रोजी टेंभी येथील कर्णू किनके (५१) या गावातील आणखी एका आदिवासी शेतकर्याने आर्थिक संकटामुळे व वन्य प्राण्यांनी उद्ध्वस्त केलेल्या पिकामुळे आत्महत्या केली.
३. १४ ऑगस्टला उमर विहीर गावातील पारधी महीला शेतकरी शालू पवार (४२) त्यांचे उभे पीक वन्य प्राण्यांनी नष्ट केल्यामुळे आत्महत्या केली
४ .१३ऑगस्टला यवतमाळ जिल्हयातील ल तिवरंग गावातील नामदेव वाघमारे (45) मागास वर्गीय शेतकऱ्यांनी कर्जबाजारी झाल्याने आत्महत्या
५. १३ऑगस्टला यवतमाळ जवळील लोहारा गावातील बंजारा समाजाचे शेतकरी रामराव राठोड (४२) यांनी प्रचंड अडचणीमुळे आत्महत्या केली
असे त्यामुळे एकट्या यवतमाळ जिल्ह्यात गेल्या ४८ तासांत पाच शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या असून या व्यतिरिक्त अमरावती जिल्ह्यातील शिराळा या गावातील चनद्रभान गवई या दलीत समाजातील शेतकऱ्यांनीही प्रचंड कर्ज आणि पिकांच्या नापिकीमुळे आत्महत्या केली आहे .यावर्षी महाराष्ट्रातील विदर्भात आत्महत्या झाल्या आहेत. १९९७ पासून शेतकरी आत्महत्यांचा मागोवा घेणारे आणि शेतकऱ्यांच्या दुर्दैवी नरसंहाराला आंतरराष्ट्रीय पातळीवर आणणारे ज्येष्ठ शेतकरी कार्यकर्ते किशोर तिवारी यांच्या म्हणण्यानुसार, चालू वर्षात विदर्भाच्या ग्रामीण संकटामुळे १५६५ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत, जो गेल्या २५ वर्षांतील हा विक्रमी आकडा आहे.
"लागवडीचा खर्च नियंत्रण ,हमीभाव , पीकपद्धती आणि पतपुरवडा धोरण , पर्यावरणातील बदल यावर शेतकऱ्यांना सरकारं करणारी पीक विमा योजना यासंबंधीचे मुख्य प्रश्न्नाकडे केंद्र सरकार लक्ष देत नसल्यामुळे, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या निष्पाप हत्येवर नियंत्रण ठेवले जात नाही आणि १९९७ पासून शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. कोलमडलेल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला मदत पॅकेजेस कोणताही दिलासा देत नाहीत. राजकीय नेतृत्वाचा अभाव आणि व्यवस्थेतील अनियंत्रित भ्रष्टाचारामुळे विदर्भातील सर्वात मागासलेला प्रदेश आहे, असे किशोर तिवारी यांनी गावांना भेटी दिल्यानंतर सांगितले.
"खूप कमी मागणी असलेल्या कापूस या मुख्य नगदी पिकामुळे विदर्भाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. लागवडीचा खर्च यामध्ये प्रचंड वाढ झाली आहे आणि बँकांद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अत्यंत कमी पीककर्जामुळे संकटात आणखी भर पडली आहे. शाश्वतपीक अन्न ,डाळी आणि तेलबिया पिकांना प्रोत्साहन देण्यात सरकार अपयशी ठरले आहे. या प्रदेशात आणि जागतिक हवामानातील बदल हे सध्याच्या कृषी संकटाचे कारण आहेत,” किशोर तिवारी पुढे म्हणाले.
पंतप्रधानांनी तातडीने हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले
विदर्भातील अत्यंत लहान प्रदेशात दररोज एकापेक्षा जास्त शेतकरी आत्महत्या होत असताना, नजीकच्या भविष्यात ५ ट्रिलियन अर्थव्यवस्थेचा भारताचा टोल दावा कमी आहे, विदर्भाच्या शेतकऱ्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विदर्भाचा दौरा करून शेतकऱ्यांना आत्महत्येला भाग पाडणाऱ्या प्रमुख समस्यांचे निराकरण करण्याचे आवाहन केले. ,किशोर तिवारी यांनी पंतप्रधानांना विनंती केली आहे .
Saturday, August 12, 2023
यवतमाळ जिल्ह्यातील शेकडो टॉवरग्रस्त शेतकऱ्यांवर विदयुत कंपनी कडुन अन्याय :१३ ऑगस्टला घाटंजी येथे टॉवरग्रस्त शेतकऱ्यांच्या घाटंजी येथे मेळावा
दिनांक -१२ ऑगस्ट २०२३
टॉवर उभे करतांना दिलेल्या आश्वासनाला सरकारने पाणी पुसली
यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी आर्णी केळापुर तालुक्यातील शेकडो आदीवासी ,दलीत व भटक्या जमातीतील कोरडवाहू शेतकऱ्यांच्या जेमतेम २ ते ३ एकर शेतात मोठमोठाले टॉवर उभारण्यात आले व शेतकऱ्यांनी विरोध केला असतांना आपल्या जागेचा मोबदला देण्याची रक्कम जी सांगीतली आता जिल्हा प्रशासनाला चुकीची माहिती देऊन अर्ध्यावरून कमी मोबदला शासनाने मंजूर केला आहे व या अन्यायाविरुद्ध शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालय व उपविभागीय अधिकारी केळापूर या ठिकाणी चक्र मारत आहेत मात्र टॉवरग्रस्त शेतकऱ्यांची हाक कोणीही एकात नसुन जो मोबदला प्रशासन मंजूर करीत आहे तो गुपचुप घ्या व घरी बसा असा उरफाटा सल्ला केळापुर येथील मस्तवाल उपविभागीय अधिकारी शेतकऱ्यांना धमकावून देत असल्याची माहीती अन्यायग्रस्त शेतकरी नागोराव राठोड, ज्ञानेश्वर जाधव, वासुदेव गुरणुले,गजानन राठोड ,बाबुलाल चव्हाण ,उत्तम नेवारे यांनी दिली .
यवतमाळ जिल्ह्यातील शेकडो टॉवरग्रस्त शेतकऱ्यांनी मेळाव्याला यावे -गोवर्धन तामगाडगे
सरकारने टॉवर लीने टाकतांना प्रचंड अन्याय केला असुन राजकीय नेत्यांची शेत सोडुन आदीवासी ,दलीत व भटक्या जमातीतील शेकडो शेतकऱ्यांनवर अन्याय करीत जुलूम करीत शेती लागवडी अयोग्य करून उपासमारीला आणून ठेवले आहे तरी येत्या १३ ऑगस्टला घाटंजी येथील बाळ कृष्ण मंगल कार्यालय येथे दुपारी १२ वाजता शेतकऱ्यांचा मेळाव्याला टॉवरग्रस्त शेतकऱ्यांनी यावे असे आवाहन गोवर्धन तामगाडगे यांनी केले आहे .
============================================================
Sunday, May 14, 2023
Cotton Farmers Demand Rs.9000/- MSP and Economic Bailout Package in Protest Rally
Cotton Farmers Demand Rs.9000/- MSP and Economic Bailout Package in Protest Rally
Dated - 19 May 2023
This year cotton export is dropped from 6 million bales to 2 million and to protect the the interest of textile mill owners there is record import 3 million bales import of cotton in india thus anti cotton farmers policies has fueled the crisis .the prevailing rate of cotton is only due to strong Doller against the rupee otherwise cotton rates will tumbled to Rs.6000 per quintal below the minimum support price (MSP),Veteran farm activist Vijay Jawandhia said today .
================================================= =================










