शिवसेना"इंडिया आघाडीच्या पाच गॅरंटी"साठी महाराष्ट्रात जनआंदोलन करणार -शिवसेना प्रवक्ते किशोर तिवारी
दिनांक -७ जुन २०२४
यावेळेस राहुल गांधी-उद्धव ठाकरे-शरद पवार यांनी निवडणुक प्रचारात शेतकऱ्यांना ,महिलांना ,बेरोजगार युवकांना ,वंचितांना दिलेल्या ' पंच गॅरंटी ' ची पूर्तता ,ही काळाची गरज असुन सामाजिक न्यायासाठी लढणाऱ्या धर्मनिरपेक्ष पक्षांच्या कुबडया घेवून सत्तेत आलेल्या भाजपावर सशक्त विरोधक या नात्याने केंद्रात व राज्यात असलेल्या निकामी सरकारच्या विरोधात आता जनतेच्या आक्रोश रस्त्यावर दाखविणें गरजेचे असुन त्यासाठी आता महाविकास आघाडीचे सर्व पक्ष जनआंदोलन सुरु करतील व भाजपला संपूर्णपणे नाकारलेल्या विदर्भ व मराठवाड्यात शिवसेना लवकरच पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या परवानगी सुरु करेल ,अशी माहीती विदर्भाचे कापूस उत्पादक शेतकरी चळवळीचे कार्यकर्ते व शिवसेनेचे प्रवक्ते किशोर तिवारी यांनी दिली .
शेतकऱ्यांसाठी गॅरंटी
सध्या शेतकऱ्यांना बियाणे व कीटक - तण नायक करमुक्त करणे ,सर्व शेतकऱ्यांचे थकीत कर्ज माफ करणे ,हमीभाव कापसाला १० हजार रुपये प्रती क्विंटल तर सोयाबीनला ६ हजार रुपये प्रती क्विंटल देणे गरजेचे आहे त्या बरोबर रोजगार हमी योजनेतून शेतीच्या मजुरीचे अनुदान देणे ,शेतकऱ्यांना पूर्णवेळ मोफत वीज देणे हे अत्यंत आवश्यक झाले आहे व त्यासाठी या भांडवलदारांचे हित जोपासणाऱ्या सरकारच्या विरोधात जनतेचा एल्गार अत्यंत आवश्यक आहे व उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेना संपुर्ण राज्यात मशाल पेटविणार व या घटनाबाह्य सरकारची पापाची लक्तरे टांगणार असा विश्वास किशोर तिवारी व्यक्त केला
महीला व बेरोजगार युवकांना गॅरंटी
देशाच्या संपत्तीं व संसाधनावर फक्त अडाणी सारख्या २२ लुटारूंचा अधिकार आहे व ९० टक्के सरकारच्या ५ किलो अन्नावर जगत आहे तसेच ग्रामीण महाराष्ट्रातील कोट्यवधी बेरोजगार युवक सरकारी नौकरीसाठी फक्त मागच्या दहा वर्षापासुन आहेत आता प्रत्येक गरीब कुटुंबाला कमीत कमी १० हजार रुपये शोषणमुक्ती भत्ता व प्रत्येक शिक्षित युवकाला बेरोजगारी भत्ता देणे गरजेचे आहे ,
महागडे शिक्षण व आरोग्य सेवा मोफत करण्याची गॅरंटी
सध्या सर्व गरीब शेतकरी शेतमजूर महागड्या खाजगी शिक्षणामुळे व अती महाग आरोग्यसेवे मुळे जगणे कठीण झाले आहे ,श्रीमंतांसाठी काम करणाऱ्या भाजपा सरकारला महागडे शिक्षण व आरोग्य सेवा मोफत करण्यासाठी जनआंदोलन करणे काळाची गरज आहे व यासाठी जनआंदोलन हाच एक मार्ग आहे .
आदिवास्यांना जल जंगल जमिनीचा अधिकार
आज पर्यंत मूळ निवासी आदीवासी जनतेला त्यांचा 'जल-जंगल -जमिनीचा ' अधिकार देण्यात आला नसुन सध्या त्यांना या संसाधनावरून भाजपा हुसकावुन देत आहे यासाठी जनआंदोलन सुरु करण्याची घोषणा किशोर तिवारी केली .
जातीनिहाय जनगणना व त्यानुसार आरक्षणाचा मुद्दा
बिहार सारखं जाती जमाती निहाय सर्वे अत्यंत आवश्यक असुन अती वंचितांना 'जगण्याचा अधिकार ' अबाधित राहावा व त्यांना देशाच्या मुख्य धारेत आणावे हि काळाची गरज आहे व हे काम महाराष्ट्रात उद्धव ठाकरेच करू शकतात असा विश्वास किशोर तिवारी यावेळी प्रगट केला
=========================================================================
No comments:
Post a Comment