१० जूनला किशोर तिवारी यांचा आभार प्रदर्शन व ऋणानुबंध दौरा - डेंगू ग्रस्त गावांना सुद्धा भेट देणार
दिनांक ९ जुन २०२४
शेतकऱ्यांच्या पीककर्ज ,बियाणे टंचाई ,टेंगूची साथ याच्या तक्रारी शासनदारी मांडणार
सध्या ग्रामीण भागात शेतकऱ्यांना शेतीसाठी पतपुरवडा मिळत नसुन ,बियाणे व रासायनिक खते सुद्धा दर्जेदार मिळत नसुन ,अनेक भागात पावसाच्या पुर्वीच टेंगू इतर आजार मोठ्या प्रमाणात पसरले आहेत मात्र मस्तवाल सरकारचे आमदार व अधिकारी फक्त पैसे खाण्यात गुंतले असुन ग्रामीण जनतेला वाऱ्यावर सोडले आहे .पाणी पुरवड्याच्या सर्व योजना आमदाराने आपल्या दलाल यान दिल्यामुळे तसेच सर्व कामात आमदाराने ५० टक्के कमीशन खाऊन वाढल्याने त्याचे तीन तेरा वाजले आहे या साठी जनआंदोलन सुरु करण्यासाठी आभार व ऋणानुबंध दौऱ्यात नियोजन करण्यात येणार असल्याची माहीती किशोर तिवारी यांनी यावेळी केली .
=============================================
No comments:
Post a Comment