Friday, October 25, 2019

शेतकरी स्वावलंबन मिशन च्या कार्यक्षेत्रात महायुतीला मिळालेले यश : शेतकरी व ग्रामीण जनतेचा बहुमताचा कौल महायुतीचे बाजूनेच !-- किशोर तिवारी

शेतकरी स्वावलंबन मिशन च्या कार्यक्षेत्रात महायुतीला मिळालेले यश :
शेतकरी व ग्रामीण जनतेचा बहुमताचा कौल महायुतीचे बाजूनेच !--  किशोर तिवारी 

दि. २५ ऑक्टोबर २०१९  --            

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूक निकालाचे सविस्तर विश्लेषण केले असता विदर्भ व मराठवाडयातील १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हयांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेत्तृत्वातील युती सरकारने स्थापन केलेल्या स्व. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनच्या कार्यक्षेत्रात महायुतीला ब-यापैकी यश मिळाले असल्याचे स्पष्ट होत आहे.  मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांच्या विगत साडेचार वर्षाच्या अथक पाठपुराव्याने शासनाच्या शेतकरी व ग्रामीण जनजीवनासाठी असलेल्या अनेक कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यात मिशनने जे प्रयत्न केलेत़ , त्यामुळे मिशनच्या कार्यक्षेत्रातील  पश्चिम विदर्भातील यवतमाळ, अकोला, वाशिम, अमरावती, बुलढाण्यासह वर्धा जिल्हयातील एकूण ३४ विधानसभेच्या जागांपैकी महायुतीला २२ जागी यश प्राप्त झाले असून मिशनच्या कार्यक्षेत्रातील मराठवाडयातील सर्व आठही जिहयांत एकूण ४६ जागांपैकी २९ जागी महायुतीला विजय प्राप्त झाल्याने मिशनच्या कार्यक्षेत्रात असलेल्या विधानसभेच्या एकूण ८० जागांपैकी ५१ जागांवर विजय प्राप्त झाला असून  शेतकरी व ग्रामीण जनतेचा बहुमताचा कौल महायुतीचे बाजूनेच असल्याचे स्पष्ट होते, असे प्रतिपादन शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष व शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांचे शेती व ग्रामीण अर्थव्यवस्था संबंधी सल्लागार किशोर तिवारी यांनी व्यक्त केले आहे. 
शेतकरी मिशनने स्वतंत्रपणे पाठपुरावा करुन शेतकरी व ग्रामीण जनतेच्या कल्याणासाठी युती सरकारने केलेल्या योजनांचा प्रत्यक्ष लाभ  मिळवून देण्यात येणा-या अडचणी दूर करण्यासाठी गेल्या साडेचार वर्षात अथक प्रयत्न केलेत.  त्यामुळे कर्जमाफी, शेती पत पुरवठा करण्यात राष्ट्रीयकृत बँकाची कुचराईवर मात, आरोग्यासंबंधी असलेल्या योजनांचा लाभ, किमानभूत शेतमालाच्या किंमती मिळवून देण्यात केलेले प्रयत्न, प्रशासन लोकाभिमुख व्हावेत यासाठी केलेले प्रयत्न, ग्रामीण जनजीवनात प्रत्यक्ष मिसळून घेण्यात आलेले “सरकार आपल्या दारी” यासारखे लोकोपयोगी कार्यक्रम राबविण्यात मिळालेले यश इत्यादीमुळे युती सरकारच्या अनेक लोकोपयोगी योजनांचा लाभ मिळवून देण्यात मिशनला यश प्राप्त झाले आणि त्याची प्रचिती विधानसभा निवडणुकीच्या निकालावरुन आता स्पष्ट दिसत आहे.  मिशनच्या कार्यक्षेत्रातील यवतमाळ जिल्हयात महायुतीला ७ पैकी ६ जागा राखण्यात यश मिळाले आहे.  त्याचप्रमाणे अकोला जिल्हयातील ५ पैकी ५ जागा, बुलडाणा जिल्हयातील ७ पैकी ५ जागा, वाशिम जिल्हयातील ३ पैकी २ जागा, वर्धा जिल्हयातील ४ पैकी ३ जागांवर महायुतीला यश प्राप्त झाले असून फक्त अमरावती जिल्हयात ८ पैकी १ जागा मिळाल्याने तो अपवाद वगळता पश्चिम विदर्भातील शेतकरी व ग्रामीण वैफल्यग्रस्त क्षेत्रात मिशनच्या अथक प्रयत्नाने एक सकारात्मक विजय दिसून येत असून ३४ पैकी २२ जागा जनतेने निवडून दिल्या आहेत.  त्याचप्रमाणे मराठवाडयातील ग्रामीण भागातील शेतकरी व सामान्य जनतेने दिलेल्या भरघोस पाठींब्याने औरंगाबाद जिल्हयातील सर्व ९ पैकी ९ जागा, उस्मानाबाद जिल्हयातील सर्व ४ पैकी ४ जागा, नांदेड जिल्हयातील ९ पैकी ४ जागा, हिंगोली जिल्हयातील ३ पैकी २ जागा, जालना जिहयातील ५ पैकी ३ जागा, बीड जिल्हयातील ६ पैकी २ जागा, परभणी जिल्हयातील ४ पैकी ३ जागा, लातूर जिल्हयातील ६ पैकी २ जागा महायुतीला मिळून  एकूण ४६ जागांपैकी २९ जागी विजय प्राप्त होऊन यश मिळाले आहे.  अशाप्रकारे शेतकरी मिशनच्या १४ जिल्हयातील विस्तृत कार्यक्षेत्रात ८० पैकी ५१ विधानसभा क्षेत्रात महायुतीला यश प्राप्त झाल्याने नव्या सरकारच्या स्थापनेचा महायुतीचा मार्ग मोकळा झाला  असल्याचे तिवारी यांनी स्पष्ट करुन शेतकरी व ग्रामीण जनतेचे आभार व्यक्त केले आहेत.



शेतकरी मिशनच्या कार्यक्षेत्रात महायुतीला मिळालेल्या यशाचे विवरण खालीलप्रमाणे       
*पश्चिम  विदर्भ* 
(६ जिल्हे : अमरावती विभाग व वर्धा जिल्हा )
एकूण ३४ जागा पैकी २२ जागी विजय ...! 
*यवतमाळ * 
७ पैकी ६ जागी विजय )
दिग्रस - संजय राठोड - शिवसेना
यवतमाळ - मदन येरावार - भाजप
आर्णी - डॉ संदिप धूरवे - भाजप
राळेगाव - डॉ. प्रा. अशोक उईके - भाजप
वणी - संजीव रेड्डी बोदकुरवार - भाजप 
उमरखेड - नामदेवराव ससाणे – भाजप

*अकोला*
(५ पैकी सर्व ५ जागी विजय)
अकोट - प्रकाश भारसाकळेभाजप
अकोला पश्चिम - गोवर्धन शर्माभाजप
अकोला पूर्व - रणधीर सावरकरभाजप
बाळापूर - नितीन टाले - देशमुख-शिवसेना
मूर्तिजापूर - हरीश पिंपळेभाजप

*बुलडाणा*
७ पैकी ५ जागी विजय )
खामगाव - आकाश फुंडकरभाजप
चिखली - श्वेता महालेभाजप
जळगाव जामोद - संजय कुटेभाजप
बुलडाणा - संजय गायकवाडशिवसेना
मेहकर - संजय रायमुलकरशिवसेना

*वाशिम*
३ पैकी २ जागी विजय )
कारंजा - राजेंद्र पाटनीभाजप
वाशिम - लखन मलिकभाजप

*अमरावती*
८ पैकी १ जागी विजय )
धामणगाव रेल्वे - प्रताप अडसडभाजप
*वर्धा*
४ पैकी ३ जागी विजय )
आर्वी - दादाराव केचेभाजप
हिंगणघाट -समीर कुनावारभाजप
वर्धा - डॉ. पंकज भोयरभाजप

*मराठवाडा* ( सर्व - ८ जिल्हे  )
एकूण ४६ जागा पैकी २९ जागी विजय 
*औरंगाबाद*
(९ पैकी सर्व ९ जागी विजय)
औरंगाबाद पश्चिम - संजय शिरसाटशिवसेना
औरंगाबाद पूर्व - अतुल सावेभाजप
औरंगाबाद मध्य - प्रदीप जयस्वालशिवसेना
कन्नड - उदयसिंह राजपूतशिवसेना
गंगापूर - प्रशांत बंबभाजप
पैठण - संदीपान भुमरेशिवसेना
फुलंब्री - हरीभाऊ बागडेभाजप
वैजापूर - रमेश बोरनारेशिवसेना
सिल्लोड - अब्दुल सत्तारशिवसेना

*हिंगोली*
३ पैकी २ जागी विजय )
कळमनुरी - संतोष बांगरशिवसेना
हिंगोली - तानाजी मुटकुळेभाजप

*परभणी*
४ पैकी २ जागी विजय )
जिंतूर - मेघना बोर्डिकरभाजप
परभणी - डॉ. राहुल पाटीलशिवसेना
गंगाखेड – रत्नाकर गुट्टे- रासप

*जालना*
५ पैकी ३ जागी विजय )
परतूर - बबनराव लोणीकरभाजप
बदनापूर - नारायण कुचेभाजप
भोकरदन - संतोष दानवेभाजप
*उस्मानाबाद*
(४ पैकी सर्व ४ जागी विजय)
उमरगा - ज्ञानराज चौगुलेशिवसेना
तुळजापूर - राणाजगजीतसिंह पाटीलभाजप
उस्मानाबाद - कैलास पाटीलशिवसेना
परांडा - तानाजी सावंतशिवसेना

*नांदेड*
९ पैकी ४ जागी विजय )
किनवट - भिमराव केरामभाजप
नांदेड उत्तर - बालाजी कल्याणकरशिवसेना
नायगाव - राजेश पवारभाजप
मुखेड - डॉ. तुषार राठोडभाजप

*लातूर*
६ पैकी २ जागी विजय )
औसा - अभिमन्यू पवारभाजप
निलंगा - संभाजी पाटील निलंगेकरभाजप

*बीड*
६ पैकी २ जागी विजय )
गेवराई - लक्ष्मण पवारभाजप
केज - नमिता मुंदडाभाजप
                                अशाप्रकारे शेतकरी स्वावलंबन मिशनच्या कार्यक्षेत्रात महायुतीला ८० पैकी  ५१ विधानसभा क्षेत्रात यश प्राप्त झाल्याने शेतकरी व ग्रामीण वैफल्यग्रस्त भागात महायुती  आपली आघाडी कायम ठेवण्यात यशस्वी ठरली आहे.   ग्रामीण जनतेने सरकारच्या  प्रामाणिक प्रयत्नांची ही पावती दिली असल्याचे मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी व्यक्त केले आहे.   
-----------------
                                                          (  किशोर  तिवारी  )
                                                          अध्यक्ष, व.ना. शेतकरी स्वावलंबन मिशन
                                           मो. ९४२२१०८८४६ – kishortiwari@gmail.com          

No comments:

Post a Comment