काँग्रेस -राष्ट्रवादीचा शिवसेनेला पाठींबा एक मृगजळ -भाजपने मुख्यमंत्रीपदाचा अट्टाहास सोडावा -किशोर तिवारी
दिनांक -२६ ऑक्टोबर २०१९
महाराष्ट्राला शेतकरी आत्महत्यांची जगात ओळख करण्यात २००४ ते २०१४ पर्यंत काँग्रेस -राष्ट्रवादीचे सरकारचे चुकीचे धोरणच जबाबदार असुन त्याकाळचे सरकारचे कृषिमंत्री विदर्भ -मराठवाड्यातील ३४ हजारावर कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे शिल्पकार असल्यामुळे त्यांनी शिवसेनेला दिलेला विनाशर्त पाठींबा एक मृगजळ असुन महायुती एकदाची तोडण्याचा डाव असल्याचा आरोप शिवसेनेचे शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी केला आहे . तसेच सध्या १० किलो कापुस फक्त ३७० रुपयात विकल्या जात असतांना कलम ३७० च्या गप्पा बंद कराव्या कारण आता भाजप बंडखोरांमुळे शिवसेनेच्या ३० जागा पाडण्यात यश आल्यामुळे जागांचा खेळ करून मुख्यमंत्री पदाचा आग्रह धरण्यात अर्थ नसुन आता खऱ्याअर्थाने शिवसेनेने मोठ्या भावाची समाजदारीची भूमिका घेतल्यामुळे फक्त जागा जास्त याचा कांगावा न करता व ''सब जगह केवल भारत '' ही आताताई भुमिका सोडत शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे यांना महाराष्ट्राची किमान द्यावी व आदर्श निर्माण करावा असे आवाहन किशोर तिवारी यांनी भाजप अध्यक्ष अमित शहा यांना केली आहे .
भाजपामधील गटबाजी व विकासाचा मॉडेल नागपूर सारख्या शहरात नामंजूर झाला आहे विदर्भात भाजपच्या पायाखालची जमीन अनेक जिल्ह्यात खरसली आहे सगळे नेते खुर्चीच्या मागे लागले आहेत व एकमेकांचे पाय ओढत आहेत अशा परीस्थिती भाजपने शिवसेनेला बाहेरून पाठींबा दयावा व आपले घर दुरुस्त करावे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोटे सर्वे व वॉर रूमचा तमाशा करणारे पगारी जनाधार शुन्य सल्लागारांना हाकलुन तळागाळाच्या कार्यकर्त्यांच्या भाजप निर्माण करावा कारण ही निवडणुक ग्रामीण महाराष्ट्रातील जातीय समीकरणाच्या भरोशावर राजकारण करण्याच्या धोरणावर धोक्याची घंटा आहे ,असा सावधगिरीचा इशारा शेतकरी नेते किशोर तिवारी दिला आहे .
महाराष्ट्रात पुन्हा शेतकऱ्यांनी महायुतीवर विश्वास प्रगट केले असतांना आतां शेतकरी आत्महत्यांनी जगाचे लक्ष वेधीत असलेल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या सर्व आशा केंद्रीय सरकारवर लागल्या असुन याचे कारण गेल्या हंगामात कापसाचे कमी उत्पादन होऊनही जागतिक मंदी आणि गेल्या हंगामातील शिल्लक साठा, सरकीच्या दरातील घसरण, वाढती आयात अशा विविध कारणांमुळे यंदाच्या हंगामात कापसाचे दर हमीभावापेक्षा कमी असुन हा बाजारभाव फरक प्रति क्विंटल हमीभावापेक्षा दोन हजार रुपयांनी कमी असल्यामुळे तसेच आवक वाढल्यावर सरकीची भाव पडल्याने सध्या दलालांनी कापसाची खरेदी जेमतेम ३५०० ते ४००० प्रति क्विं सुरु केली आहे तरी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना वाचविण्याकरिता सरकारने कोरडवाहू शेतकऱ्यांच्या मूळ प्रश्न्नाला लक्ष देण्याकरीता महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून उद्धवजी ठाकरे पाहीजे अशी शेतकऱ्यांची मागणी असल्याचा दावा शेतकऱ्यांच्या अस्तित्वाचा लढा लढणारे देणारे शिवसेना नेते किशोर तिवारी यांनी केली आहे .
सध्या १० किलो कापुस फक्त ३७० रुपयात विकल्या जात असतांना कलम ३७० चा मुद्दा गौण झाला आहे कारण देशातील सर्वाधिक कापूस लागवड महाराष्ट्रात होते. राज्यात गेल्या पाच वर्षांपासून सरासरी ४४ लाख हेक्टरवर कपाशीची लागवड होत आली आहे. विदर्भ, मराठवाडा, खानदेशसह पश्चिम महाराष्ट्रातील काही भागाचे शेती अर्थकारण कापूस पिकावरच अवलंबून आहे. पण, कापूस लागवड बहुतांशी कोरडवाहू आहे. सुमारे १० टक्के क्षेत्रावरच पूर्वहंगामी कापूस लागवड असते. निसर्गावरच कापूस हंगाम अवलंबून आहे. गेली चार ते पाच वर्षे कापूस उत्पादकांसाठी खडतर गेली. अलीकडच्या काळात गुलाबी बोंडअळीच्या संकटाने शेतकऱ्यांना उद्ध्वस्त केले त्यातच यावर्षी अतिपाऊसाने कापसाचे पिकांचे उत्पादन प्रचंड प्रमाणात कमी होणार आहे मागीलवर्षीच राज्यात २०१८-१९ च्या हंगामात ४२.५४ लाख हेक्टर क्षेत्रात कपाशीची लागवड करण्यात आली होती. उत्पादन केवळ ७१ लाख गाठी झाले. उत्पादकता २८३.७३ किलोग्रॅम प्रतिहेक्टर इतकी कमी आहे. कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाच्या अहवालात या अल्प उत्पादकतेकडे लक्ष वेधण्यात आले आहे मात्र भाजपचा एकही नेता या विषयावर बोलत नाही याची खंत किशोर तिवारी यांनी व्यक्त केली आहे .
====================================================================
No comments:
Post a Comment