केंद्रीय अर्थ संकल्पात महाराष्ट्राच्या कोरडवाहू दुष्काळ्ग्रस्त शेतकऱ्यांना विषेय पॅकेज द्या -किशोर तिवारी
दिनांक २७ जानेवारी २०१७
नोटबंदी नंतर सरकारी बँकात सुमारे १५ लाख कोटीवर पैसा जमा झाला असुन नोटबंदीच्या निर्णयाचा महाराष्ट्रातील ग्रामीण जनतेनी व शेतकऱ्यांनी जबरदस्त पाठींबा दिला व सतत दोन महीने अनेक वेदना व अडचणी सहन करीत येत्या केंद्रीय अर्थ संकल्पात दिलासा देण्यात येणार असा विश्वास शेतकऱ्यांना असुन त्यांच्या मुलभुत अडचणी त्यामध्ये १. थकीत कर्जापासुन मुक्ती व नव्याने पीककर्ज २. महाराष्ट्राच्या कोरडवाहू दुष्काळग्रस्त भागातील नगदी पीक कापुस ,सोयाबीन तूर या पिकांचे हमीभाव मागील दोन वर्षात झालेली तुरळक वाढ तसेच बाजारामध्ये शेतकऱ्यांना बाजार भाव पडताना वाचविण्यासाठी केंद्रीय अर्थ संकल्पात विशेष भाव स्थिरता निधी व ३. सशक्त यंत्रणा गावपातळीवर कृषी मालाची प्रक्रिया उद्योगासाठी विषेय योजना कृषीवर आधारीत प्रक्रिया उद्योगासाठी व ४. शेतकऱ्यांच्या मुलांसाठी गावपातळीवर धंद्यासाठी मुद्रा योजनेमधुन सर्व शेतकऱ्यांच्या मुलांना कर्ज वाटप करण्यासाठी बँकांना सक्ती करणारा कायदा व् या सर्व अडचणी दूर करण्यासाठी विषेय आर्थिक पॅकेज घोषणा येत्या केंद्रीय अर्थ संकल्पात सरकारने करावी अशी आग्रही मागणी वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे प्रमुख किशोर तिवारी यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली याना केली आहे .
थकीत कर्ज व नवे पीककर्ज
सरकारी बँका शेतकऱ्यांना नव्याने पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करीत असतात व जुने सतत दुष्काळ व नापिकीमुळे थकीत झालेले जुने पीक कर्ज ही मोठी समस्या असुन यावर तोडगा निघणे ही काळाची गरज झाली आहे कारण आत्महत्याग्रस्त विदर्भ व मराठवाड्यात शेतकऱ्यांना बँकांची दारे बंद झाल्यामुळे आता यावर तोडगा काढण्यात यावा बँका मुंबई मध्ये बसुन आपल्या कृषी कर्जाच्या लक्ष्य शेतकऱ्यांना न देता सरळ खाजगी मायक्रो फायनान्स कंपनीला ,कृषीवर आधारीत उद्योगांना देतात यावर सरळ पीक कर्ज इतर कृषी कर्ज सरळ शेतकऱ्यांना देण्याची मागणी शेतकरी मिशनने केली आहे .
कापुस ,सोयाबीन तूर या पिकांचे हमीभाव व सरकारचे खुल्या बाजारात शेतकऱ्यांना संरक्षण
मागील तीन वर्षापासुन महाराष्ट्राच्या कोरडवाहू दुष्काळग्रस्त भागातील नगदी पीक कापुस ,सोयाबीन तूर या पिकांचे हमीभाव लागवडीचा खर्च व बाजार भाव यामध्ये प्रचंड तफावत असल्यामुळे शेतकऱ्यांची खुली लुट होत आहे सरकारने हमीभावाबाबत राष्ट्रीय कृषी आयोगाच्या शिफारशींवर गंभीरपणे अंतिम अंबालबजावणीचा निर्णय घ्यावा मागणी शेतकरी मिशनने केली आहे . तुर व् तेलांची आयात यावर बंदी टाकावी कारण देशात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी दाल व् तेलबीयानाची लागवड सुरु केली असुन त्यामध्ये वाढ होण्यासाठी दाल व् तेलांची आयात कमी होण्यासाठी व् बाजार शेतकऱ्यांची लुट करणार नाही यावर तोडगा केंद्रीय अर्थ संकल्पात सरकारने अशी मागणी मागणी शेतकरी मिशनने केली आहे.
कृषीवर आधारीत प्रक्रिया उद्योगासाठी शेतकऱ्यांना सरळ विनातारण कर्ज देण्याची मागणी
कृषीवर आधारीत प्रक्रिया उद्योगासाठी व गावपातळीवर धंद्यासाठी मुद्रा योजनेमधुन सर्व शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्यासाठी बँकांना सक्ती करणारी योजनेची घोषणा केंद्रीय अर्थ संकल्पात सरकारने करावी अशी आग्रही मागणी वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे प्रमुख किशोर तिवारी यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली याना केली आहे.
=================================================================
=================================================================