Thursday, July 7, 2016

सातासमुद्रापलीकडून आलेल्या दूताने केले आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला केले "पीककर्ज मुक्त "

राष्ट्रीयकृत बँकांनी पूनर्वसन नाकारल्यानंतर सातासमुद्रापलीकडून आलेल्या दूताने केले आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला केले "पीककर्ज मुक्त "

दिनांक - 
शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकर्‍यांना पेरणीपूर्वी कर्ज मिळावे म्हणून शासन आणि प्रशासन कडून  विविध बैठका आणि आदेशानंतरही  राष्ट्रीयकृत बँकांनी  शेतकर्‍यांच्या जखमेवर मीठच चोळत .'अर्ज द्या कर्ज घ्या' उपक्रमाला पायदळी तुडविल्याचे दिसत चित्र असताना यवतमाळ जिल्ह्यातील केळापुर तालुक्यातील कारेगाव बंडल येथील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांचे कर्जबाजारी विधवा रेखा अशोक चिंतलवार व असाध्य रोग बाल-मधुमेह टाईप वन अशा एका  आजाराने आपल्या जीवनाची लढाई लढणाऱ्या ध्यानेश्वर अशोक चिंतलवार (मो.नं.०९०१११९४३१९) यांना सातासमुद्रापलीकडून अबुधाबी येथे तेलकाढण्याच्या  समुद्रातील एका प्लेटफार्मवर  रेडिओ अधिकारी म्हूणन कामकरीत असलेले मुबंई येथील मूळ निवासी फारुख तारपूरवाला (मो नं.०९८६७५३२६०१)  यांनी देवदूताच्या रूपाने पांढरकवडा येथे येऊन ज्या पाटणबोरी येथील स्टेट बँक ऑफ इंडियाने २०१५-१६ थकीत पीककर्ज असताना पुनर्गठनासाठी साफ नकार दिला होता त्या राष्ट्रीयकृत बँकांचे मागील वर्षाचे पीककर्ज रुपये ६५०००/- व त्यावरील या वर्षाचे व्याज असे रुपये ७२०००/- चा धनादेश चिंतलवार परीवाराला पांढरकवडा येथे  शेतकरी मिशनच्या 'सरकार आपल्या दारी" या अभियानाअंतर्गत आयोजित एका कार्यक्रमात दिला .यावेळी शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी ,उपविभागीय कृषी अधिकारी राहुल सातपुते ,केळापूर तहसीलदार जोरावार ,गटविकास अधिकारी घसाळकर , तालुका आरोग्य अधिकारी डॉ सावंत ,अंकित नैताम यावेळी उपस्थित होते . बळीराजा चेतना अभियानामध्ये  गटविकास अधिकारी घसाळकर या परीवाराला आधीच आर्थिक मदतीचे वाटप केले असुन या परिवाराला ध्यानेश्वरला  बाल-मधुमेह टाईप वन लागणारे विषेय इन्सुलीन फारच महागडे असल्यामुळे जिल्हा आरोग्य अधिकारी के झेड राठोड अर्ली प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत आदेश  तालुका आरोग्य अधिकारी डॉ सावंत यांना यावेळी दिले मात्र हे औषध ठेवण्यासाठी फ्रिज आवश्यक असल्यामुळें त्यासाठी फारुख तारपूरवाला यांनी तात्काळ १०,००० रुपये शेतकरी विधवा रेखा अशोक चिंतलवार यांना यावेळी दिली व यावर्षी कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन, कृषि विभाग, महाराष्ट्र शासन आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला यांच्या संयुक्त विधमाने बिगर बीटी देशी कापूस बियाणे उत्पादनाचा अभिनव कार्यक्रमात या  शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांचा समावेश करण्यात आला असुन देशी कापूस बियाणे वाटप करण्यात आल्याची माहीती यावेळी  उपविभागीय कृषी अधिकारी राहुल सातपुते . 
शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांचे कर्जबाजारी विधवा रेखा अशोक चिंतलवार यांनी पाटणबोरी येथील स्टेट बँक ऑफ इंडियाने  आपणाला पीककर्ज पुनर्वसन न दिल्यामुळे व मागील वर्षी भरलेला पीकविमा सुद्धा देत नसल्याची तक्रार यावेळी केली . 
जिल्ह्यात यावर्षी खरीप हंगामात १७३६ कोटी रुपयांचे पीक कर्ज वितरित करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. ३0 जूनपर्यंत संपूर्ण कर्जाचे वितरण करणे बँकांनी अपेक्षित होते. यासाठीच अर्ज द्या, कर्ज घ्या उपक्रमही राबविण्यात आला. एवढेच नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बँकांना तत्काळ कर्ज वितरणाचे आदेश दिले तर  कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे किशोर तिवारी यांनी बैठक घेऊन बँकांना तशा सूचना दिल्या. परंतु प्रत्यक्षात शेतकर्‍यांना कर्जच मिळाले नाही कारण प्रत्यक्षात राष्ट्रीयकृत बँकांनी उद्दीष्टाच्या केवळ ३७ टक्केच कर्ज वितरण केले त्यातच स्टेट बँक ऑफ इंडियाला ४६४ कोटी रुपयांचे कर्ज वितरित करायचे होते. प्रत्यक्षात त्यांनी १६७ कोटी रुपयांचेच कर्ज वितरित केले आहेराष्ट्रीयकृत बँकांचा गतवर्षीपेक्षा आकडा यंदा सूत भर वाढला असला तरी शासनाच्या मूळ उद्देशाला मात्र फाटा बसला आहे. राष्ट्रीयकृत बँकांच्या कर्ज पुनर्गठनात अनेक शेतकरी वंचित असून अनेक शेतकरी आजही बँकांचे उंबरठे झिजविताना दिसून येतात. राष्ट्रीयकृत बँका शासन आणि प्रशासनालाही जुमानत नसल्याचे पीक कर्ज वाटपावरून जिल्ह्यात दिसून येत आहे यावर किशोर तिवारी यांनी चिंता व्यक्त केली आहे 

Saturday, July 2, 2016

परंपरागत शेतीचा आवळगाव पॅटर्नला शेतकऱ्यांचा वाढता प्रतिसाद - झरी तालुक्यातील ५० आदिवासी कुटुंबाना देशी कापूस बियाणे वाटप

परंपरागत शेतीचा आवळगाव पॅटर्नला शेतकऱ्यांचा वाढता प्रतिसाद

झरी तालुक्यातील ५० आदिवासी कुटुंबाना देशी कापूस बियाणे वाटप
    दिनांक ३ जुलै २०१६ 
मारेगाव तालुक्यातील आवळगाव येथे कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन, कृषि विभाग, महाराष्ट्र शासन आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला यांच्या संयुक्त विधमाने बिगर बीटी देशी कापूस बियाणे उत्पादनाचा अभिनव कार्यक्रम ११३ आदिवासी शेतकऱ्याच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे.
याच कार्यक्रमातून प्रेरणा घेऊन श्री किशोर तिवारी अध्यक्ष, कै.वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन याच्या प्रयत्नातून झरी तालुक्यातील हिवरा बा., कटली बोरगाव, पालगाव, बोटोनी, पाचपोर, या गावातील ५० शेतकर्यांनी स्वंयस्फूर्ती ने बिगर बीटी कापूस बियाणे उत्पादन कार्यक्रम राबविण्याचा मानस दर्शविला या करिता श्री डी.आय . गायकवाड, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, यवतमाळ आणि डॉ. सी. यु . पाटील, सहयोगी संशोधन संचालक, विभागीय करीशी संशोधन केंद्र यवतमाळ यांनी बिगर बीटी बियाणे उपलब्ध करून दिले.
     कृषि दिनाचे औचित्य साधून उपविभागीय कृषि अधिकारी कार्यालय पांढरकवडा येथे कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष श्री किशोर तिवारी यांच्या हस्ते बिगर बीटी कापूस बियाणे वाटप व वृक्षरोपणाचा कार्यक्रम पार पडला.
     पारंपारिक शेतीचा आवळगाव पटर्ण राज्यभर राबवण्याचा मनोदय श्री किशोर तिवारी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात जाहीर केले.
     कोरडवाहू क्षेत्रात कापसाच्या बीटी बियाण्याचा वापर, कृषि निविष्ठेकरिता बाजारावरील अवलंबित्व या मुळे शेतीतील नफा कमी होत आहे. या सर्व परिस्थितीवर मात करण्याकरिता शेतकऱ्यांनी स्वावलंबी शाश्वत शेतीची कास धरून, वाटप करण्यात आलेल्या बियाण्यातून बियाणे उत्पादित करून, गावात ‘देशी कापसाची  बियाणे बँक’ उभारण्याचे आवाहन श्री किशोर तिवारी यांनी केले .
     शेतकर्यांना मार्गदर्शन करताना उपविभागीय कृषि अधिकारी पांढरकवडा, श्री. राहुल सातपुते यांनी अति घनता कापूस लागवड व बियाणे उत्पादन कार्यक्रम विषय माहिती दिली. अजूनहि शेतकरी स्वंयस्फूर्तीने देशी कापूस बियाणे उत्पादन  करण्यास इच्छुक असल्यास त्यांना कृषि विभागामार्फत बियाणे उपलब्ध करून देण्यात येईल तसेच शेतकऱ्याच्या अडचणी सोडविण्याकरिता कृषि विभाग सदैव तत्पर राहील याची ग्वाही दिली.
कृषि दिनाच्या दिवशी उपविभागीय कृषि अधिकारी कार्यालयाच्या परिसरात श्री किशोर तिवारी यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या उपस्थितीत वृक्षरोपण करण्यात आले. कृषि दिनाच्या या कार्यक्रमात माजी जि.प.सदस्य धर्मा अत्राम , श्री मुन्ना बोलेनवार , श्री अंकित नैताम, श्री मोहन जाधव, श्री. एम.बी. गोंधळी, तंत्र अधिकारी पांढरकवडा, कु. सोनाली कवडे, कृषि अधिकारी, श्री. निलेश ओळंबे, कु. ए. एच. बोके कृषि स., श्री गजानन कोरे इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन रोहित राठोड यांनी केले. या कार्यक्रमाच्या याश्स्वीतेकारिता कार्यालयातील सर्व कर्मचारी व अधिकारी यांनी हातभार लावला. कार्यक्रमास शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.