Friday, November 30, 2018

महावितरण व सिंचन विभागाच्या नाकर्तेपणामुळे दुष्काळग्रस्त शेतकरी आत्महत्येच्या दारावर -दातोडी सायतखर्डा येथील सरकार आपल्या दारी कार्यक्रमात समोर आले सत्य

महावितरण व सिंचन विभागाच्या नाकर्तेपणामुळे  दुष्काळग्रस्त शेतकरी आत्महत्येच्या दारावर -दातोडी सायतखर्डा येथील सरकार आपल्या दारी कार्यक्रमात समोर आले सत्य 
दिनांक -२९ नोव्हेंबर २०१८
राज्यात विदर्भ मराठवाड्यातील कापूस पिकाखाली ४४ लाख हेक्टरचे क्षेत्र असून मागील वर्षी  सर्वच  ठिकाणी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला होता  त्यामुळे आता  कापसाचे उत्पन्न   प्रचंड प्रमाणात घटले होते यावर्षी मात्र मान्सुनने  दिलेला धोका ,पर्यावरणात झालेला प्रचंड बदल ,रासायनिक शेतीने जैविक तत्वे गमावलेली जमीन ,निकामी झालेले बी टी बियाणांचे तंत्रद्यान ,जमिनीमध्ये ओलावा रोखण्यासाठी सेंद्रिय शक्तीची क्षमता नसल्यामुळे या दशकातील सर्वात कमी कापसाचे पीक कोरडवाहु क्षेत्रात आल्यामुळे  दिवाळीपूर्वीच सर्व कापसाची उलंगवाडी झाली  असुन सरासरी कापसाचे उत्पन्न विदर्भ मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी व कृषी क्षेत्रातील जाणकारांनी दिलेल्या माहीती नुसार २ ते ३ क्विंटल आले  असल्याने ५० लाखावर कापूस उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा प्रचंड आर्थिक अडचणीत आले  असुन ज्यांनी धरणात  पाणी असल्यामुळे हरभरा पेरला वा कापूस विचविण्याचा प्रयन्त केला त्यांचे उभे महावितरण व सिंचन विभागाच्या नाकर्तेपणामुळे व  जुलमी कारभारामुळे बुडत असुन दुष्काळग्रस्त शेतकरी महावितरण व सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या असहकार्यामुळे लवकरच आत्महत्या सुरु करतील असा गंभीर इशारा कै वसंतराव नाईक शेतकरी स्वा. मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांना २९ नोव्हेंबरला आर्णी तालुक्यातील दातोडी तर घाटंजी तालुक्यातील सावरगाव व सायतखर्डा येथे आयोजीत कार्यक्रमात शेकडो शेतकऱ्यांनी दिली . महावितरण व मस्तवाल अधिकारी सिंचन विभागाचे अधिकारी जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी आदेश दिल्यांनतरही कार्यक्रमाला उपस्थित नव्हते . महावितरणचे अधीक्षक अभियंता सुरेश मडावी यांनी आपले अधिकारी जनतेच्या तक्रारी ऐकण्यास तयार नाहीत असे सांगिंतल्यानांतर आम्हांस जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र दिले नसल्याचे खोटी माहीती दिली त्यांनतर ऊर्जामंत्री बावनकुळे यांना तिवारी यांनी तक्रार देत महावितरणचे अधिकारी माजले असुन दुष्काळात शेतकरी मरत असतांना घराचे बिल भरा नाहीतर वीज कपात आहेत त्याचवेळी शेतकऱ्यांना कमीतकमी अखंडित ८ तास वीज देण्याची हमी दिल्यानंतरही जेमतेम तासभरही वीज येत नाही विजेचा दाब वोल्टेज कमी असल्यामुळे दररोज शेकडो मोटारी जळत आहेत मात्र वसुली करण्यात गुंतलेले महावितरण अधिकारी शेतकऱ्यांना प्रचंड त्रास देत असल्याची गंभीर तक्रार दातोडी सावरगाव व सायतखर्डा येथे आयोजीत कार्यक्रमात शेकडो शेतकऱ्यांनी केली . 

यवतमाळ जिल्ह्यात ५ जुलै व १३ ऑगस्टला प्रचंड पाऊसामुळे सर्वच धरणे व जलाशये संपूर्ण भरलेली आहेत मात्र शेतात पहले पुरामुळे नंतर पाऊसाने दगा दिल्यामुळे दुष्काळ व नापीकीला समोर जावे लागत आहेत . मागणी आल्यास शेतकऱ्यांना पाणी सोडण्याचे आदेश पालक मंत्री मदन येरावार यांनी ऑक्टोबर महिन्यातच दिल्यावरही सिंचन विभागाचे भ्र्ष्ट अधिकारी वसुलीच्या नांवावर शेतकऱ्यांना आत्महत्येस प्रवृत्त करीत असल्याचा गंभीर आरोप दातोडीचे शेतकरी भाजप नेते प्रह्लाद पाटील जगताप यांनी यावेळी केला . वेणी धरणाचे पाणी तात्काळ सोडा व लोअर   पैनगंगा धरण विरोधी  कार्यकर्त्यावरील खटले तात्काळ मागे करण्याची मागणी त्यांनी यावेळी रेटली . 
यावर्षी  संपुर्ण आर्णी व घाटंजी तालुक्यात  कोरडवाहू क्षेत्रात  शेतकऱ्यांचे यंदा ६० टक्क्यांहून अधिक नुकसान झाले आहे  त्यानुसार सर्वच भागांतून कापसाची आवक प्रचंड प्रमाणात घटली असुन बहुतेक शेतकऱ्यांनी कापसाचे पीक नष्ट केले  मात्र कृषी विभागाचे अधिकारी फक्त कार्यालयात बसल्याबसल्या पिकांचे पंचनामे करीत असल्याच्या प्रचंड तक्रारी आपणास  दातोडी सावरगाव व सायतखर्डा येथे मिळाल्या असल्याची माहीती किशोर तिवारी यांनी दिली . घाटंजी व आर्णी तसेच वणी व झरी तालुके तात्काळ दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी यावेळी एकमताने जिल्हापरिषद सदस्य प्रकाशभाऊ राठोड दातोडीचे सरपंच विकास उईके मुबारक तंवर प्रह्लाद पाटील जगताप  जिल्हापरिषद सदस्य पवनीबाई कल्लमवार , सुरेश जैस्वाल  पंचायत समिती   सभापती ,सायतखर्ड्याचे सरपंच मालनबाई शेंडे यांनी केली . 
कार्यक्रमाला तेलंगणा भाजप निवडणुकीचे निरीक्षक शेतकरी नेते सुरेशभाऊ बोलेनवार ,  कोलाम नेते बाबुलालजी मेश्राम ,माधवराव टेकाम अंकित नैताम  मधुकर घसाळकर ,दत्ता सिडाम  उपस्थित होते. या सरकार आपल्या दारी कार्यक्रमाचे संयोजक सावरगावचे तुकाराम मोहुर्ले अजयरेड्डी एलटीवार  दातोडीचे लक्ष्मण मुजमुले संदीप गाडगे ओमप्रकाश जगताप अशोक पाटील    व  सायतखर्ड्याचे रघुनाथ शेंडे संतोष मोहुर्ले मधुकर चौधरी विष्णू शेंडे तानबा आडे प्रभाकर देशमुख  होते .  
===================================================================================

Wednesday, November 21, 2018

प्रेमदास ताकसांडे यांची आत्महत्या विदर्भाच्या अभूतपूर्व नापिकीच्या संकटामुळे - शेतकरी मिशनच्या सत्यशोधन अहवालात भीषण कृषी संकट आले समोर

प्रेमदास ताकसांडे यांची आत्महत्या विदर्भाच्या अभूतपूर्व नापिकीच्या संकटामुळे - शेतकरी मिशनच्या सत्यशोधन अहवालात भीषण कृषी संकट आले समोर 
दिनांक -२१ नोव्हेंबर २०१८
सध्या शेतकरी आत्महत्याग्रस्त विदर्भ व मराठवाड्यात अनेक जिल्ह्यात कोरड्या दुष्काळाचा फटका बसला असतांना ज्या तालुक्यात सरासरी ७० ते ९० टक्के पाऊस झाला त्या तालुक्यात पूर्वी पावसाच्या खंडाने आता पर्यावरणाच्या प्रचंड बदलाने कापुस सोयाबीन धान व तुरीचे पीक अभूतपूर्व नापिकीच्या संकटात आले असुन शेतकऱ्यांचे उत्त्पन्न फक्त ३० ते ४० टक्के येत असुन त्यातच गुलाबी अळीचा हल्ला उशिरा का होईना पण मोठ्या प्रमाणात सिंचन करून कापुस घेण्याचा प्रयन्त करणाऱ्या लाखो शेतकऱ्यांना फटका बसला आहे . पर्यावरणाच्या प्रचंड बदलाने बदलाने तापमानात झालेली प्रचंड वाढ संपूर्ण तुरीचे पीक नष्ट करीत आहे यामध्ये शेतकऱ्यांच्या अडचणीत कमालीची वाढ झाली असुन यामुळे प्रचंड नैऱ्याश   पसरले असल्याचे सत्य या कठीण समयी सरकारी अधिकारी व कर्मचारी जनतेशी योजनांचा फायदा तर सोडा मात्र सदा संपर्कही करीत नसल्याचे कटू सत्य कै .वसंतराव नाईक शेती स्वालंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी शेतकरी आत्महत्यासाठी जगात प्रसीद्ध असलेल्या यवतमाळ जिल्ह्याच्या पाथरी गावात दलीत शेतकरी प्रेमदास ताकसांडे यांनी केलेल्या १५ नोव्हेंबरच्या आत्महतेच्या संदर्भात २० नोव्हेंबरला त्यांच्या घरी भेट दिल्यावर समोर आले हे सत्य आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सादर करणार असल्याचे किशोर तिवारी यांनी सांगीतले . 
आपल्या अहवालात किशोर  तिवारी यांनी प्रामुख्याने मांडले आहेत 
१-मस्तवाल सनदी व पोलीस अधिकारी - महाराष्ट्र सरकारने वारंवार आदेश काढल्यांनंतरही २० नोव्हेंबर पर्यंत एकही सनदी वा उच्चं स्तरीय पोलीस अधिकारी चौकशीला आला नसल्याचे सत्य प्रेमदास ताकसांडे यांच्या पत्नी तुळसाबाई ताकसांडे यांनी सांगीतले फक्त पटवारी कृषी सहायक आल्याचे सांगीतले . किशोर तिवारी यांच्या भेटीच्या वेळीही उपविभागीय अधिकारी ,उपविभागीय पोलीस अधिकारी फक्त १० किलोमीटरवर वातानुकूल केबिन मध्ये बसले होते मात्र विभागीय आयुक्त ,जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक  विनंती केल्यावरही कोणीच आला नाही तेव्हा मौदा  या ठिकाणी ५ किलोमीटरवर पांढरकवड्याचे ठाणेदार आठवडी बाजाराची वसुली करीत असल्याचे कळल्यावर जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी विनंती केल्यावर त्याठिकाणी आले .त्याच प्रमाणे तिवारी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी ,जिल्हा आरोग्य अधिकारी ,जिल्हा पुरवडा अधिकारी यांना फोन लाऊन कमीतकमी तालुक्याच्या अधिकाऱ्यांना पाठवा अशी विनंती केली त्यांनतर मस्तावलेले अधिकारी त्याठिकाणी आले . सध्या आमदार खासदार यांना पोसा व शेतकरी मरत असलेल्या जनतेला वाऱ्यावर सोडा अशी भूमिका अधिकाऱ्यांनी खेतली असल्याचे कटू सत्य तिवारी यांनी आपल्या अहवालात मांडले आहे . 
२-पीककर्ज माफीचा लाभ व नवे कर्ज पीककर्ज मिळाल्यानंतरही आत्महत्या - प्रेमदास ताकसांडे हे आपल्या ४ एकर जमिनीसाठी नियमित पीक कर्ज घेणारे असल्याने पीक कर्जमाफीमध्ये त्यांना १५ हजार रुपये मिळाले होते ,मात्र दलीत असतांना त्यांना एकही कृषी योजनेचा लाभ मिळाला नसल्याचे तुळसाबाई ताकसांडे यांनी सांगितले,
. प्रचंड कापसाची व तुरीची नापिकी - यावर्षी फक्त जेमतेम १ क्विंटल कापसाचे उत्त्पन्न आले असुन प्रत्येक वर्षी कमीत कमी २० क्विंटल कापुस होते यामुळे प्रेमदास प्रचंड चिंतेत होते साऱ्या परिसराची परिस्थिती अशीच असल्याची माहीती यावेळी शेतकरी व पाथरीचे सरपंच राजू पेंदोर व मोहद्याचे सरपंच विजय तेलंगे यांनी दिली 
४. उज्वला गॅस योजनेत लाभ पण सिलिंडर भरण्यास पैसे नाही - उज्वला गॅस योजनेत गॅस कनेक्शन मिळाले मात्र सिलिंडर १२०० रुपयात देत असल्यामुळे विकत घेणे कठीण झाल्याचे तुळसाबाई ताकसांडे यांनी सांगितले. जंगलात वाघ असल्यामुळे आता अनेक वेळा  चुली जळत नसल्याची माहितीही त्यांनी दिली . 
५. दलीत असुनही रमाई योजनेचा लाभ नाही - प्रेमदास यांनी घर तट्टे व प्लास्टिक बांधून प्रचंड गरीबीत दिसले मात्र डोळ्याला पट्टी बांधलेल्या अधिकाऱ्यांना हे दिसत नसल्याची खंत तिवारी यांनी अहवालात व्यक्त केली. 
६-वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभार - या भेटीत वीज कंपनीचे कार्यकारी अभियंता सह सर्व अधिकारी कार्यालयात बसले असतांना त्यांनी पाथरीला लाईनमन पाठविला होता .दिवसा कधीच लाईन येत नाही व रात्री वाघ असल्यामुळे शेतकरी शेतात जाऊ शकत नाही यामुळे पाणी असूनही आम्ह्चे पीक बुडाले अशी तक्रार सर्वच शेतकऱ्यांनी यावेळी केली मात्र माजलेले वीज वितरण कंपनीचे अधिकारी सरळ वीजमंत्र्यांचा हवाला देत त्यांना भेटा असा निरोप देत असल्याची तक्रार यावेळी शेतकऱ्यांनी केली . 
७- आरोग्य यंत्रणेचे तीनतेरा -प्रेरणा प्रकल्प कागदावर -   प्रेमदास बी वर्गातील नैरायात होता मात्र यांचे उपचार करण्याची जबाबदारी आमची नाही अशी माहीती तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली . प्रेरणा 
प्रकल्पाचा एकही अधिकारी आरोग्य विभागाकडून आला असल्याचे  तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी यावेळी सांगीतले , प्राथमिक आरोग्य केंद्रात औषध व उपचार करण्याची आम्हाला सक्ती नाही आम्ही रोगराई रोखण्यासाठी असल्याची अफलातून माहीती यावेळी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली ,डॉक्टर कर्मचारी अपुरे असल्याने व प्राथमिक आरोग्य केंद्राची लहान लहान डागडुगी होत नसल्याची तक्रारही त्यांनी यावेळी केली तर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी हे माझ्या हातात नाही असे सांगीतले . 
८- प्रेमदास ताकसांडे मदतीस प्रात्र नाही  - प्रेमदास ताकसांडे यांचेवर थकीत पीककर्ज नसल्याने व ते प्रामाणिक शेतकरी असल्यामुळे पत्नी तुळसाबाई ताकसांडे यांना मदत मिळणार नाही असे तात्काळ तलसीलदारांनी सांगीतले तर तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी चक्क प्रेमदास ताकसांडे मनोरुग्ण होता असे  घोषीत करण्याची तयारी केल्याचे अहवालात तिवारी म्हटले आहे . 
विदर्भ व मराठवाड्यातील ५० लाखावर शेतकरी दुष्काळ व नापीकीमुळे दररोज ४ ते ५ शेतकरी आत्महत्या करीत आहेत तर भ्रष्ट व्यवस्था त्यांच्या टाळू वरचे लोणी खात असल्याची खंत तिवारी आपल्या अहवालात व्यक्त केली आहे -. 

Thursday, November 15, 2018

प्रितीश नंदीचे आरोप बिनबुडाचे -नरभक्षक अवनी हत्येच्या विरोधात सुरु असलेली मोहीम वन्यप्राणी व मानव संघर्षात आग ओकणारी -किशोर तिवारी

प्रितीश नंदीचे आरोप बिनबुडाचे -नरभक्षक अवनी  हत्येच्या विरोधात सुरु असलेली मोहीम वन्यप्राणी व मानव संघर्षात आग ओकणारी -किशोर तिवारी 
दिनांक -१५ नोव्हेंबर २०१८
आज सध्या भारताच्या वाघांचे चित्रीकरण व वन्यप्राणी प्रेमापोटी  गांधारीप्रमाणे डोळ्याला पट्टी बांधून आंधळ्याचे ढोंग करणाऱ्या अतिरेकी निसर्गप्रेमींच्या रांगेत प्रसिद्ध पत्रकार व सिनेनिर्माते प्रितीश नंदी यांनी मुंबईच्या आपल्या पंचतराकिंत वातानुकूल जुहू चौपाटीच्या घरात बसुन अवनीच्या हत्येचे सत्य आपणास साक्षात्कार झाल्याने  कळले असुन व त्यांनी एका हिंदी राष्ट्रीय दैनिकात लेख लिहून सादर केलेली सत्यता वस्तुस्थितीचा विपर्यास असल्याने अशा बिनबुडाच्या प्रचाराने सध्या प्रचंड प्रमाणात मानव आणि वन्यप्राणी यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस बिकट स्थिती धारण करत असल्याने  वन्यप्राण्यांविरुद्ध टोकाच्या भुमिकेत जात असुन वन्यप्राणी प्रेमीजनांनी हा वाद संपवावा अशी कळकळीची विनंती शेतकरी जळवळीचे कार्यकर्ते किशोर तिवारी यांनी केली आहे .
प्रितीश नंदी यांनी जे आरोप केले आहेत त्यांनी जे सत्य उकळल्याचे लिहले आहे त्यामध्ये  ज्या वाघग्रस्त भागात तसेच राळेगाव व केळापूर तालुक्याच्या ज्याभागात  अवनी टी १ वाघिणीने १३ जणांचा जीव घेतला त्याभागात वा त्याचा १०० किलोमीटर एकही खदानी वा उद्योग सुरु नाही वा एकही खदानी वा उद्योगाचा कोणताही प्रस्ताव नाही अशा राळेगाव केळापुर तालुक्यातील ७० आदीवासी बहुल खेड्यात सुमारे १ लाखावर निष्पाप शेतकरी व आदीवासी  जनजीवन जवळ जवळ संपले असतांना बिर्ला आणि अंबानी यांच्या उद्योगांसाठीच अवनी वाघिणीची खात्मा  केल्याचा आरोप २००९ मध्ये सर्व नियम धाब्यावर ठेऊन आघाडी सरकारने  ऐन निवडणुकीची आचार संहीता लागण्यापूर्व अनिल अंबानी यांच्या उद्योग समुहाला यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर तालुक्यातील चनाखा, घुबडी, निमडेली व कारेगांव या खेड्यातील हजारो  एकर जमिन फुकटात दिली होती  किशोर तिवारी यांनी बिर्ला अंबानी यांच्या साठी अवनी मारल्याचा आरोपावर जगाला माहिती देण्यासाठी वस्तुस्थिती दाखविणारा यवतमाळ नकाशाच प्रकाशीत केला असुन प्रितीश  नंदी सारख्या मुंबई पुण्याला  बसुन लेख लिहणे व विदेशी पैशाने उच्चं वा सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणारे  तसेच फोटो काढण्यासाठी वाघावर छंद म्हणुन निष्पाप आदिवासी व शेतकऱ्यांच्या जिवापेक्षा नरभक्षक वाघिणीसाठी ओरड करणारे पाखंडी नेत्यांनी संयम ठेवण्याचा सल्ला किशोर तिवारी दिला आहे . 

एकीकडे वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात निष्पाप मरणाऱ्यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत आहे त्याचवेळी वेगवेगळ्या कारणांमुळे वन्यप्राण्यांच्या मृत्यूचा आकडा वाढत आहे. निसर्ग आणि वन्यजीव यांच्याविषयी नव्या पिढीत आस्था वाढविण्यासाठी वन विभागाने मागील चारवर्षात  वन्य जीव संरक्षण  जनजागृतीपर उपक्रम मोठा प्रमाणात हाती घेतला त्यातच मानव आणि वन्यजीव यांच्यातील प्रत्यक्ष अन् अप्रत्यक्ष संघर्षांवर समाधान न शोधता अतिरेकी भुमिका घेणे सर्वांना चुकीचे राहणार असा इशारा यावेळी किशोर तिवारी यांनी दिला . 

सध्या नागरी वसाहतीत शिरकाव करणाऱ्या वन्य प्राण्यांचे हल्ले दिवसेंदिवस वाढत आहेत. गत पाच वर्षांत बिबटय़ाने केलेल्या हल्ल्यात महाराष्ट्रात अनेक ठार तर शेकडो  जण जखमी झाले आहेत त्यातच  लांडग्याच्या हल्ल्यात सुद्धा अनेकजण ठार तर शेकडो  जण जखमी झाले. उसाच्या क्षेत्रात वास्तव्य करणे पसंत करणाऱ्या बिबटय़ाचे पाळीव प्राणी हे खरे भक्ष्य. त्यामुळे त्याच्या भक्ष्यस्थानी पडणाऱ्या पाळीव प्राण्यांची संख्या मोठी आहे. बिबटय़ाच्या हल्ल्यात १० हजारावर  शेळ्या, मेंढय़ांना तर लांडग्यांच्या हल्ल्यात ही संख्या १००० वर  वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात होणाऱ्या या नुकसानीपोटी वन विभाग नुकसान भरपाई देत असतो ती हास्यास्पद आहे .वाघाच्या वा  बिबटय़ाच्या हल्ल्यात ठार झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना यापूर्वी दोन लाख रूपयांची मदत दिली जात असे. आता शासनाच्या नव्या निर्णयानुसार दहा  लाख रूपये मदतीपोटी दिले जातात. . वन्यप्राण्याच्या हल्ल्यात पाळीव प्राण्यांचा मृत्यू झाल्यास शासनाचा निकष आहे बैल व गायीसाठी प्रती दहा हजार आणि मेंढी व बकरीसाठी प्रत्येकी तीन हजार. त्याचा विचार करता मागील पाच वर्षांत नुकसान भरपाईपोटी लाखो रूपयांची रक्कम वाटण्यात आली आहे.पण, हा संघर्ष अजून तसाच सुरू आहे. या संघर्षांस सर्वाधिक जबाबदार कोण, याची चर्चा सतत होत नसुन त्यातच मनेका गांधी यांच्या प्रेमात अडकलेले प्रितीश नंदी आपली लेखणीने आग ओकत असल्याचा आरोप किशोर तिवारी यांनी केला आहे . 

Monday, November 12, 2018

‘Supporting T1 is Urban Extremism’-TIMES OF INDIA

‘Supporting T1 is Urban Extremism’-TIMES OF INDIA 


https://timesofindia.indiatimes.com/city/nagpur/supporting-t1-is-urban-extremism/articleshow/66596377.cms
(Here is extracts of interview of farm Activist Kishore Tiwari published on 13th November 2018)  
tnn | Nov 13, 2018, 05.34 AM IST

You are uniting affected tribals in support of T1’s killing but many people are protesting it. Are they wrong?
I respect their sentiments for wildlife conservation. But they should not support a man-eater. This is urban extremism. None of these so called conservationists have bothered to meet the families of the victims. They have not met the tribals who lived in fear of T1. These people should stay for a few days in the affected villages. I feel like tying these conservationists to trees in the forest for three nights and see whether wild animals attack them or not.
It is not conservationists but politicians, including a BJP minister, who are demanding action against the forest minister...
Congress spokesperson Sanjay Nirupam is slamming the government but his own partyman Vasant Purke was lobbying with the government for killing T1. Shiv Sena chief Uddhav Thackeray is demanding against Sudhir Mungantiwar but his party MP Bhavna Gawli wanted T1 killed. Let me tell you, Congress and Shiv Sena are going to lose votes of tribals and farmers for supporting T1. The local leaders of these parties have told me this thing.
NCP leader Jayant Patil said that the tigress was killed to help Reliance. The company’s land is 150km away from the affected area. And land was granted to Reliance by Congress chief minister Ashok Chavan. There is no report which states that there are mineral reserves in the area, so helping mining barons is out of question. Saying that government took Rs25 crore from industrialists to kill T1 is insane.
As for Union minister Maneka Gandhi, she is a nuisance. I demand that she should resign if a single child dies of malnutrition.

Conservationists are saying that no efforts were made to tranquillize the animal.
Forest officials tried to do it five times but failed. The fact is that our veterinarians are incompetent. However, if the investigation team finds serious lapses, then action should be taken against the shooter and the officials concerned.
Are you against wildlife?
No, I have made personal efforts to get a piece of wire removed from a tigress’ neck in Tipeshwar. I check whether forest staffers have filled up the water tanks in forest areas in summer. But it is a fact that wild animals cause great loss to farmers and they do not get proper compensation.
A human is being attacked by wild animals almost every day in Vidarbha. The solution to this problem can’t be found without taking farmers into confidence. 
What are your demands?
A family member of men killed by T1 should be given a job in forest department as the families have lost their bread winner. Pay compensation to the farmers who were unable to sow crops due to T1. The compensation policy should be amended to increase the amount significantly for deaths as well as crop damage.

*वन्यप्राण्यांच्या शेती व नागरी क्षेत्रातील प्रचंड हैदोसा ने झालेल्या अतोनात नुकसानीचे आकलन करण्यासाठी स्वतंत्र आयोगाची स्थापना करण्या साठी भारत सरकारने एक प्रभावी कायदा त्वरित अध्यादेशाद्वारे अमलात आणावा* - *किशोर तिवारी*


*वन्यप्राण्यांच्या शेती व नागरी क्षेत्रातील प्रचंड हैदोसा ने झालेल्या अतोनात नुकसानीचे आकलन करण्यासाठी स्वतंत्र आयोगाची स्थापना करण्या साठी भारत सरकारने  एक प्रभावी कायदा त्वरित अध्यादेशाद्वारे अमलात आणावा* - *किशोर तिवारी*

 दी. १२.११.२०१८

वन्यप्राण्यांच्या शेती व नागरी क्षेत्रातील प्रचंड हैदोसा ने झालेल्या अतोनात नुकसानीचे आकलन करण्यासाठी संवैधानिक स्वतंत्र  आयोगाची स्थापना करण्यासाठी भारत सरकारने एक प्रभावी कायदा त्वरित अध्यादेशाद्वारे अमलात आणावा व या गंभीर प्रश्नावर उपाय योजना करता यावी या साठी राज्य सरकार ला सक्षम करावे, अशी मागणी महाराष्ट्र शासनाच्या शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष श्री किशोर तिवारी यांनी केली आहे.

वन्यप्राण्यांच्या नागरी क्षेत्रातील व जंगलाशेजारी शेतीमध्ये घातलेल्या हैदोसाने महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील अनेक राज्यातील हजारो  शेतकरी - ग्रामीण जनता आज त्रस्त झाली असल्याने व त्यांचे शेकडो कोट्यावधी रुपयांचे अतोनात नुकसान व जीवित हानी होत असूनही या नुकसानीची भरपाई करण्यासाठी आज कोणताही कायदा अस्तित्वात नसल्याने भारत सरकारने भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३९,४३ व ४८अ खाली त्वरित एक सक्षम असा कायदा करावा व त्या अंतर्गत एक स्वतंत्र कायदेशीर यंत्रणेच्या माध्यमाने शेती व नागरी नुकसानीचे आकलन करण्यासाठी स्वतंत्र संवैधानिक आयोग स्थापन करावा अशी महत्वपूर्ण सूचना वजा मागणी महाराष्ट्रातील हवालदिल शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी स्थापन करण्यात आलेल्या कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन चे अध्यक्ष श्री किशोर तिवारी यांनी केली आहे.

वन्यप्राण्यांच्या नागरिक व शेती व्यवसाय क्षेत्रातील हैदोसाने आता कळस गाठला आहे. शेतकरी व ग्रामीण जनजीवन त्रस्त झाले आहे. दर वर्षी कोट्यावधी रुपयांचे नुकसान होत आहे. वन्यप्राण्यांच्या प्रेमापोटी व प्राणी संवर्धन संस्थांच्या दबावा खाली सरकार आत्ता कोणतीही उपाययोजना करू शकत नाही. प्राण्यांची शिकार व हत्या होऊ नये हे जितके महत्त्वपूर्ण आहे त्या पेक्षाही जास्त शेतकरी व ग्रामीण जनतेचे माल व जीवन सुरक्षित करणे आवश्यक आहे. नागरी क्षेत्रातील वन्यप्राण्यांच्या त्रासाने शेतकरी हैराण झाले आहेत. त्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे, परंतु आज स्वतंत्र असा कायदा अस्तित्वात नसल्याने त्यांना नुकसान भरपाई देण्यामध्ये सरकारला फार अडचणी येत आहेत. ग्रामीण जनता व शेतकरी हतबल झाले, असून विदर्भ मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे हेसुद्धा एक महत्त्वपूर्ण कारण आहे, शेकडो शेतकऱ्यांनी यांच्या झालेल्या नुकसान मुळे आत्महत्यांसारखे दुर्दैवी प्रकार अवलंबिले आहेत परंतु याची शासन दरबारी दखल घेतल्या जात नाही. कारण यासाठी एक स्वतंत्र असा कायदा नाही. म्हणूनच हा स्वतंत्र असा कायदा व स्वतंत्र संवैधानिक आयोग स्थापन करणे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून या प्रचंड हैदोसाचे व नुकसानीचे आकलन एक स्वतंत्र यंत्रणा करू शकेल आणि ग्रामीण जनतेला व शेतकऱ्यांना एक खूप मोठा सामाजिक दिलासा देण्यासाठी सरकार सक्षम होऊ शकेल. म्हणूनच आज स्वतंत्र असा कायदा व आयोग स्थापन करणे व एक संवैधनिक यंत्रणा उभारणे फार गरजेचे आहे, असे प्रतिपादन श्री तिवारी यांनी केलेले आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील टी १ अवनी वाघिणीच्या हल्यात १३ निष्पाप शेतकरी व आदिवासींचे बळी गेलेत. यावर मोठे वादळ उठले आहे. या पार्शवभूमीवर किशोर तिवारी हा लढा सरकार दरबारी प्रकर्षाने मांडीत आहेत.

वन्य प्राण्यांच्या हैदोसाने गेल्या एक दशकातील झालेल्या नुकसानीची सविस्तर आकडेवारी व जीवित हानी ची संपूर्ण माहिती भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना सादर करण्यात आली असून यावर तातडीने उपाययोजना व्हावी अशी मागणी शेतकरी मिशनद्वारे करण्यात आली आहे.

या राष्ट्रीय पातळीवर प्रश्नावर सरकारने वेळीच लक्ष न दिल्यास सर्वोच्च न्यायालयात याचिका सादर करून शेतकरी व ग्रामीण जनतेला न्याय मिळवून देन्यासाठी लढा उभारला जाईल असा विश्वास तिवारी यांनी व्यक्त केला आहे .

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

Saturday, November 10, 2018

वन्यप्राणीग्रस्त शेतकऱ्यांच्या बोराटी येथे ११ नोव्हेंबरला मेळावा :सरकारला अवनीपिडीत मागणार जगण्याचा अधिकार

वन्यप्राणीग्रस्त शेतकऱ्यांच्या बोराटी येथे ११ नोव्हेंबरला  मेळावा :सरकारला अवनीपिडीत मागणार जगण्याचा अधिकार 
दिनांक -१० नोव्हेंबर २०१८
एकीकडे संपुर्ण महाराष्ट्रात टी १ अवनी वाघाणीचा खात्मा करतांना नियमांचा पालन केला नाही यावर वन्यप्रेमी वाद करीत असतांना राजकीय नेते आप आपल्या परीने राजकारण करण्यात गुंतले असतांना ज्या भागात टी १ अवनी वाघाणीने १३ेजीव घतले होते त्या निष्पाप उपासमारीला तोंड देत असलेल्या कुटुंबाच्या लहान लहान मुलांसोबत "आमची आई आमचे बाबा परत द्या " असे फलक लाऊन तसेच या परीसरातील सराटी लोणी बंदर सावरगाव वरंध घुबडहेटी  सुभानहेटी  झाडगाव मोहदा जिरामीरा वाढोणा झोटिंगधरा काहीगाव कासार चिखलदरा कृष्णापूर खेमकुंड पळसकुंड परीसरातील शेकडो वन्यप्राणीग्रस्त शेतकरी सुद्धा मागील दोन वर्षांपासून त्यांचा शेतीचा रोजगार हिरावुन गेल्याने आपला जीवन जगण्याचा अधिकार मिळविण्यासाठी सरकारला मागणीपत्र देणार आहेत . मानव वन्यप्राणी ह्या प्रश्न्नावर समाधानकारक तोडगा या  मेळाव्यात निघावा यासाठी  पालकमंत्री ना . मदन येरावार , सहपालकमंत्री ना संजय राठोड ,आमदार डॉ अशोक उईके माजी मंत्री प्रा वसंतराव पुरके,शिवाजीराव मोघे ,जिल्ह्यातील अवनी वाघीणीचा बंदोबस्त करावा यासाठी सभागृहात वा सभागृहाबाहेर आवाज उठविणारे सर्व  खासदार व  आमदार ,यवतमाळ जिल्ह्यातील सन्माननीय   आमदार  व जिल्हा परीषद ,पंचायत समिति सदयस ,अवनीग्रस्त गावाचे सरपंच वनविभागाचे सर्व अधिकारी . महसूल विभागाचे सर्व अधिकारी कृषी विभागाचे सर्व अधिकारी ग्रामीण विकास विभागाचे अधिकारी  पोलीस विभागाचे अधिकारी तसेच यांना केळापूर व राळेगाव विभागाचे वाघग्रस्त खेड्यात काम करणारे सर्व   वन्यप्राणीग्रस्त शेतकरी व अवनीच्या मृत्यूमुळे दुःख झालेल्या व वन्यप्राण्यांसाठी काम करणाऱ्या सर्व आदरणीय समाज सेवकांनाही सादर आमंत्रित करण्यात आल्याची माहीती या वन्यप्राणीग्रस्त शेतकरी मेळाव्याचे संयोजक किशोर तिवारी यांनी दिली . 
या वन्यप्राणीग्रस्त शेतकरी मेळाव्यामध्ये वनामध्ये राहणाऱ्या ग्रामीण जनतेच्या प्रमुख मागण्यांमध्ये अवनी वाघाणीनें ज्या १३ निष्पाप आदिवासी व शेतकरी -शेत मजुरांचा बळी  घेतला त्या कुटूंबाच्या लोकांना सरकारी नौकरी तसेच अवनीग्रस्त खेड्यात सरसकट प्रति कुटुंब दोन लाख रुपयाची नुकसान भरपाई देण्यात यावी वन्यप्राण्यामुळे पिकाची नुकसान भरपाई देण्याचे निकष बदलून सरसकट  प्रति हेक्टरी ५० हजार देण्याचा कायदा करण्यात यावा जर वन्यप्राणी जगाला अन्न देणाऱ्या बळीराजापेक्षा महत्वाचा असेल तर आमचे सर्व शेत सरकारने ५ पट्टीच्या दराने घ्यावी व आमच्या सर्वाना ज्या शहरात चाकरमाने व विदेशी पैशावर वन्यजीव प्रेम करणारे  एन जी ओ चे  कार्यकर्ते वातानुकूल घरात राहतात त्या ठिकाणी पुनर्वसन करावे खुशालपणे मनेका पध्यतीने देश चालवावा अशी विनंती अवनीग्रस्त भागाचे कार्यकर्ते विजय तेलंगे यांनी केली आहे . 
सध्या संपुर्ण विदर्भात हजारो रोही डुक्कर यांचे कळपच्या कळप सर्व उभे पीक नष्ट करीत आहे त्यांच्या मागे येणारे वाघ यांचा हैदौस अनेक शेतकऱ्यांना शेतीमधून पलायन करण्यास लावत आहे ,मागील दशकात लाखो हेक्टर वरील पिकाची हानी झाली आहे ,शेकडो जीव गेले आहेत मात्र शहरात राहणारे चाकरमाने व विदेशी पैशावर वन्यजीव प्रेम करणारे  एन जी ओ चे  कार्यकर्ते  व त्यांच्या नेत्या मनेका गांधी वन्यप्राण्यामुळे होत असलेली प्रचंड प्राणहानी व पिकांचे हजारो -कोटींचे नुकसान यावर एक शब्दही बोलत नाहीत  . कोणताही धोरणात्मक निर्णय घेतला जात नाही मानव-वन्यप्राणी संघर्ष टोकाला गेला आहे आज संपूर्ण विदर्भात शेकडो वाघिणीचा आपल्या मुलांसह क्षेत्रासाठी लढा करीत आहेत एकीकडे विदर्भ प्रदेश जगात वाघ प्रदेश    म्हणून ओळखला जात आहे त्याचवेळी  अवनी  वाघिणीच्या मेल्याने उपस्थित झालेला वाद आर्थिक  संकटात वन्यप्राण्यांचे हित जपणाऱ्या त्यांची संख्या विक्रमी वाढविणाऱ्या वनखात्याचा ,आदिवासींच्या तसेच शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा तसेच उपमान करणारा असल्याचे दुःख किशोर तिवारी व्यक्त केले आहे . 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Thursday, November 8, 2018

रिलायन्सला वनखात्याची हजारो एकर वाटपाचे पाप आघाडी सरकारचे: खदानी व उद्योगासाठी अवनी टी १ वाघिणीचा खात्मा हा आरोप बिनबुडाच्या

रिलायन्सला वनखात्याची  हजारो एकर  वाटपाचे पाप आघाडी सरकारचे: खदानी व उद्योगासाठी अवनी टी १ वाघिणीचा  खात्मा हा आरोप बिनबुडाच्या   
दिनांक -९ नोव्हेंबर २०१८
ज्या वाघग्रस्त भागात तसेच राळेगाव व केळापूर तालुक्याच्या ज्याभागात  अवनी टी १ वाघिणीने १३ जणांचा जीव घेतला त्याभागात वा त्याचा १०० किलोमीटर एकही खदानी वा उद्योग सुरु नाही वा एकही खदानी वा उद्योगाचा कोणताही प्रस्ताव नाही अशा राळेगाव केळापुर तालुक्यातील ७० आदीवासी बहुल खेड्यात सुमारे १ लाखावर निष्पाप शेतकरी व आदीवासी  जनजीवन जवळ जवळ संपले असतांना बिर्ला आणि अंबानी यांच्या उद्योगांसाठीच अवनी वाघिणीची खात्मा  केल्याचा आरोप २००९ मध्ये सर्व नियम धाब्यावर ठेऊन आघाडी सरकारने  ऐन निवडणुकीची आचार संहीता लागण्यापूर्व अनिल अंबानी यांच्या उद्योग समुहाला यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर तालुक्यातील चनाखा, घुबडी, निमडेली व कारेगांव या खेड्यातील हजारो  एकर जमिन फुकटात दिल्याचे तसेच ही जमिन देण्यासाठी महाराष्ट्राच्या तत्कालीन मुख्‌यमंत्री अशोक चव्हाण यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला असून या सर्व व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी आदिवासी व शेतकरी चळवळीचे कार्यकर्ते किशोर तिवारी यांनी एका पत्रकाव्दारे केली आहे. आज किशोर तिवारी यांनी बिर्ला अंबानी यांच्या साठी अवनी मारल्याचा आरोपावर जगाला माहिती देण्यासाठी वस्तुस्थिती दाखविणारा यवतमाळ नकाशाच प्रकाशीत केला असुन मुंबई पुण्याला  बसुन प्रेस नोट काढणे व विदेशी पैशाने उच्चं वा सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणारे  तसेच फोटो काढण्यासाठी वाघावर छंद म्हणुन निष्पाप आदिवासी व शेतकऱ्यांच्या जिवापेक्षा नरभक्षक वाघिणीसाठी ओरड करणारे पाखंडी नेत्यांना यामुळे सत्य कळेल अशी सदभावना त्यांनी व्यक्त केली आहे . 
यासंबंधी आपल्या निवेदनात तिवारी यांनी ३१ आँगष्ट २००९ला   निघालेल्या जि. आर. हवाला देत म्हटले आहे की  यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी भागातील चनाखा, घुबडी, निमडेली व कारेगांव या गावातील अंदाजे १० कि.मी. पेक्षा जास्त लांबीच्या हजारो  एकराचा पट्टा खनिज खनन करण्यासाठी सरकारने अर्ज बोलावले होते व या अर्जाची सुनावनी २१ जुलै २००९ ला मुख्‌यमंत्र्यांनी स्वत: केली होती यामध्ये एकूण आलेल्या ३८ अर्जामधून ३० लोकांनी आपली बाजू मांडली होती व या पट्टयातील ४५० लाख टन खनिजावर आपला दावा करण्यासाठी प्रतिवाद केला होता मात्र मुख्यमंत्र्यांनी आपला आदेश क्रमांक एम एम एन - १००९/सी.आर. २९३९/ आय एन डी-९ देत असतांना  सरकारने यापैकी फक्त संचीत इस्पात, मुरली उद्योग, श्री सिमेंट, ए.सी.सी. सिमेंट, लाप्रिजी इंडिया, अंबुजा सिमेंट व रिलायन्स सिमेंट यांचाच विचार केला व इतर अर्ज खारीज केले या ७ कंपन्यांचा मुख्यमंत्र्यांनी आपल्या आदेशामध्ये ए.सी.सी., अंबुजा, श्री सिमेंट सारख्या कंपन्यांना डावलुन रिलायन्सला हा पट्टा देण्याची जी कारणे दिली आहे ती संशयास्पद होती  हा पट्टा निवडणुकीच्या तोंडावर कोणताही अनुभव नसलेल्या रिलायन्स ग्रुपला देतांना भ्रष्टाचाराचा संशय येत असल्‌याची दाट शक्यता सुद्धा  किशोर तिवारी यांनी वर्तविली होती कारण   ज्या १० कि.मी. च्या परिसरात ही नविन खान येत आहे त्याच्या  बाजूला टिपेश्वरचे अभयारण्य असून दुसरीकडे पैनगंगा नदी आहे अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी एवढे मोठे खनन करण्याची परवानगी भारत सरकारच्या  पर्यावरण व वन खात्याकडून कशी मिळणार असा सवाल सुध्दा किशोर तिवारी यांना केला होता मात्र २०१२ मध्ये केंद्राने सारा व्यवहार मान्य केला होता आज तेच नेते सध्याचा सरकारला दोष देत आहे  या पापाचे खरे धनी कोण हे समाजाने समजावे अशी विनंती  किशोर तिवारी केली आहे . 
वन्यप्राण्यामुळे विदर्भाच्या शेतकऱ्यांना शेती करणे कठीण -मागील दशकातील विदर्भातील 
सध्या संपुर्ण विदर्भात हजारो रोही डुक्कर यांचे कळपच्या कळप सर्व उभे पीक नष्ट करीत आहे त्यांच्या मागे येणारे वाघ यांचा हैदौस अनेक शेतकऱ्यांना शेतीमधून पलायन करण्यास लावत आहे ,मागील दशकात लाखो हेक्टर वरील पिकाची हानी झाली आहे ,शेकडो जीव गेले आहेत मात्र शहरात राहणारे चाकरमाने व विदेशी पैशावर वन्यजीव प्रेम करणारे पोटभरू एन जी ओ ज्या कार्यकर्त्यांवर व मनेका गांधी वन्यप्राण्यामुळे होत असलेली प्रचंड प्राणहानी व पिकांचे हजारो -कोटींचे नुकसान यावर एक शब्दही बोलत नाही . कोणताही धोरणात्मक निर्णय घेतला जात मानव वन्यप्राणी संघर्ष टोकाला गेला आहे आज संपूर्ण विदर्भात शेकडो वाघिणीचा आपल्या मुलांसह क्षेत्रासाठी लढा करीत आहेत एकीकडे विदर्भ प्रदेश जगात वाघप्रदेश   म्हणून ओळखला जात आहे त्याचवेळी  अवनी  वाघिणीच्या मेल्याने उपस्थित झालेला वाद आर्थिक  संकटात वन्यप्राण्यांचे हित जपणाऱ्या त्यांची संख्या विक्रमी वाढविणाऱ्या वनखात्याचा ,आदिवासींच्या तसेच शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा तसेच उपमान करणारा असल्याचे दुःख किशोर तिवारी व्यक्त केले आहे . 
 ==================================================

अवनी प्रकरणाचा धर्मगुरू प्रेमसाई यांना यवतमाळ लोकसभा उमेदवारी देण्यासाठी केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांचा वापर -खदाणीसाठी व उद्योगांकरिता अवनीचा खात्मा केल्याचा आरोप हि एक दिवाळखोरी -किशोर तिवारी

अवनी प्रकरणाचा धर्मगुरू प्रेमसाई यांना यवतमाळ लोकसभा उमेदवारी देण्यासाठी  केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांचा वापर -खदाणीसाठी व  उद्योगांकरिता अवनीचा खात्मा केल्याचा   आरोप हि एक दिवाळखोरी -किशोर तिवारी 
दिनांक -८ नोव्हेंबर २०१८
सध्या जगात सर्व वन्यजीव व पर्यावरणवाद्यांना  बिनबुडाची माहीती देऊन  महाराष्ट्रच्या भाजप सरकारला अडचणीत आणण्यात आघाडीवर असलेल्या   केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचेवर आपले योगगुरु प्रेमासाई बाबा उर्फ सुरेशभाऊ नटराजन नायर यांना यवतमाळ लोकसभा उमेदवारीसाठी दबाव टाकत असल्याचा गंभीर आरोप यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा वन विभागात मागील ३० वर्षापासून आदीवासी व शेतकऱ्यांच्या मदतीने वन्य व  वन्यजीव रक्षक चळवळ चालविणारे किशोर तिवारी यांनी केला मूळचे चंद्रपूरचे असलेले सुरेशभाऊ नटराजन नायर उर्फ प्रेमासाई बाबा हे मूळचे चंद्रपूर जिल्ह्यातले गुन्हेगारीचे काही वादग्रस्त प्रकरणे बाहेर आल्यावर त्यांनी आसामच्या कामाख्या मंदिरात एका महंताच्या आश्रय घेतला होता त्याच ठिकाणी मेनका गांधी यांना या बाबानी भुरड टाकली मात्र या बाबाचा शोध यावर्षी १२  ऑगस्ट रोजी यवतमाळच्या प्रेमसाईंच्या आश्रमात नागपूरची बैठक रद्यकरून खासगी वाहनात   आल्या वर भेट दिल्यावर लागला त्यानंतर १५ ऑगस्टला त्यांचे पुत्र खासदार वरुण गांधीही आश्रमात आले. त्यामुळे प्रेमसाईंचा भाव यवतमाळच्या धार्मिक वर्तुळात एकदम वधारला. अभिनेत्री सुधा चंद्रन यांना बोलावून बाभुळगाव तालुक्यात मोठा कार्यक्रम बाबानी घेतला होता त्यांनतर आपणास यवतमाळ -वाशीम लोकसभा मतदार संघाची उमेदवारी केंद्रीय मंत्री मनेका गांधी दिल्याची घोषणा पत्रकार परीषदेत केली त्यानंतर कोण अशी विचारणा करीत त्यांचे ते पुत्रप्राप्ती साठी दरबार घेतात व अनेक चंद्रपूर व यवतमाळ येथील महिलांच्या गंभीर तक्रारी भाजप नेत्यांनी  प्रेमसाईंची बदनामी सुरु केली त्यांनतर चंद्रपूर व यवतमाळच्या या भाजप नेत्यांची तक्रार सरळ अमित शहा मनेका गांधीकडुन करण्यात आली व   दिल्लीत तक्रार केल्यानंतर उलट भाजप नेत्यांना कडक समज देण्यात आल्याची माहीती  भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी जाहीरपने सांगीतले ,मागील  आठवड्यात महाराष्ट्र भाजप अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी मनेका गांधी यांनी वारंवार विनंती केल्यावर या बाबाच्या कडे भेट नाकरल्यानंतर संतापलेल्या  मनेका गांधी यांनी  प्रेमसाई बाबांच्या नादात केंद्रीय मंत्री  'वाघ बचाव' आणि 'मुनगंटीवार हटाव' अशी गरळ ओकत असल्याची चर्चा होत आहे. प्रेमसाईबाबा यांना राजकारणात येण्याची इच्छा असणे योग्य आहे मात्र  त्यासाठी मनेका गांधी यांच्या राजकीय पार्श्वभूमीचाही ते वापर करीत आहे मात्र  ज्या अवनी टी १ वाघिणीने १३ जणांचा जीव घेतला होता त्यामुळे शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाचे नेते सतत आंदोलन करीत होते आता त्याचं प्रकरणाचे प्रेमसाई यांना उमेदवारी मिळवून देण्यासाठीच मनेका गांधी यांनी वापर करावा हा प्रकारच चुकीचा असल्याची टीका किशोर तिवारी यांनी केली आहे . 
खदानी व उद्योगासाठी अवनी टी १ वाघिणीचा  खात्मा हा आरोप बिनबुडाच्या  
ज्या वाघग्रस्त भागात तसेच राळेगाव व केळापूर तालुक्याच्या ज्याभागात  अवनी टी १ वाघिणीने १३ जणांचा जीव घेतला त्याभागात वा त्याचा १०० किलोमीटर एकही खदानी वा उद्योग सुरु नाही वा एकही खदानी वा उद्योगाचा कोणताही प्रस्ताव नाही अशा राळेगाव केळापुर तालुक्यातील ७० आदीवासी बहुल खेड्यात सुमारे १ लाखावर निष्पाप शेतकरी व आदीवासी  जनजीवन जवळ जवळ संपले असतांना बिर्ला आणि अंबानी यांच्या उद्योगांसाठीच अवनी वाघिणीची शिकार केल्याचा आरोप करणे एक प्रकारची दिवाळखोरी असल्याची टीका सुद्धा तिवारी यांनी केली. 
मनेका गांधीसह सर्व वन्यजीव प्रेमींवर १३ जीव गमावलेल्या कुटुंबाचे नातलग तसेच हजारो कोटीचे पीक नुकसानीचे व सदोष मानववध दावे ठोकणार 
शहरात राहणारे चाकरमाने व विदेशी पैशावर वन्यजीव प्रेम करणारे पोटभरू एन जी ओ ज्या कार्यकर्त्यांवर व मनेका गांधी वन्यप्राण्यामुळे होत असलेली प्रचंड प्राणहानी व पिकांचे हजारो कोटींचे नुकसान यांचे सामुहिक दावे गावकरी आदीवासी दाखल करतील तसेच  १३ जीव गमावलेल्या कुटुंबाचे नातलग फौजदारी कारवाईसाठी पहिले पोलीसात तक्रार दाखल करतील व नाकर्त्या पोलिसवाल्यांची कारवाही केली नाही तर न्यायालयात दाद मागतील कारण सध्या पांढरकवडा वन विभागात वाघांची संख्या प्रत्येक वर्षी वाढतच आहे जवळच्या टिप्पेश्वर अभयारण्यमध्ये यावर्षी ४ वाघिणी बाहेर आली आहेत . झरी केळापुर मारेगाव वणी राळेगाव येथे सध्या ९ वाघिणीचा आपल्या मुलांसह क्षेत्रासाठी लढा सुरु आहे त्यातच चंद्रपूर जिल्हातून आलेल्या वाघिणीच्या वणी कोळसा खदानीच्या परीसरात हैदौस सुरु झाला आहे यामुळे  अवनी  वाघिणीच्या मेल्याने हा वाद संपणारा नसुन यापरीसरातील सुमारे ५ लाखावर ग्रामीण जनतेच्या जीविताचा प्रश्न उभा झाला आहे यासाठी वन्यजीव कार्यकत्यांनी ,मनेका गांधींसारख्या नेत्यांनी एकात्मिक आदीवासी व शेतकरी वाचवा कार्यक्रम लागू करण्यासाठी बसावे लागेल फक्त दिल्ली मुंबई पुण्याला  बसुन प्रेस नोट काढणे व विदेशी पैशाने उच्चं वा सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याने हा प्रश्न पुन्हा पुन्हा समोर येणार अशी भीतीसुद्धा किशोर तिवारी यांनी व्यक्त केली आहे . 

===============================================================================

Tuesday, November 6, 2018

Maneka Gandhi's remark that Avni T1 Tigress was murdered is unfortunate -Kishore Tiwari

Maneka Gandhi's remark that Avni T1 Tigress was murdered is unfortunate -Kishore Tiwari

Dated -6th Nov.2018 

Avni T1 Waghini killed 13 people. For the last two years, the forest department was trying to seize it, the tiger population is more than the number of tigers in the Greenland forest area. The ability of forests is over there. They are coming out because there is nothing in the forest. Avni was tranquilized 5 times this past 2 years. But she did not calm down. The villagers saw it. We went to that place immediately so that no person should be killed in the Wagheni attack. The forest officials conducted a trickle work dart in her direction. But, that made her more excited and shocked us on our car. I was shot dead by her for the sake of vandalism, before her accidental death occurred. In the Yavatmal district, after the horror of Avni in Panchkvada forest area, in Ralegaon Kelapur taluka, at around one lakh people, innocent farmers and tribals were living continuously in one of the villagers. The life of this parivar was almost endless There was a lot of dissidence on the officers and forest officials of the Forest Department. Many times the agitation was also violent. Many wildlife activists sitting in the Pune city of Pune, for the past two years, were arrested by the Wildlife activists in Pune. They filed a public interest petition against the forests and stopped the campaign. Justice The wildlife activists of Pune, who repeatedly ordered the decision of the forest authorities to take decisions according to the National Tiger Conservation Authority's (NTCA) Guidelines, have repeatedly tried to stop the wildlife activists from Pune, but in the 70-year-old village of Pahul, they started the campaign to save the lives of tribals from the wildlife and wildlife. Big Cages, 500 forest workers and private employees, where army. Parameters and Italian dogs were also brought to Waghini's search. Nevertheless, this war effort was not being successful. Finally, Avni was destroyed after the invention of a research team. On one hand, innocent farmers and tribals are celebrating Diwali after the last two years in Pahelul village of Ralegaon Kelapur taluka on one hand. At the same time, in the political circles of Delhi, Mumbai, many wildlife forests are facing the caretaker minister Sudhir Mungantiwar, Union Minister Maneka Gandhi Are at the forefront Since the information given to the people is totally wrong, Prime Minister expresses his concern over the government's decision to express condolence on the death of Kishore Tiwari, Union Minister Maneka Gandhi, on behalf of tribals and farmers, who have run wild and wildlife protection movement for the last 30 years in Yavatmal district. Narendra Modi Our publication is requested to insert the ministers in advance.
Presently, the number of tigers in the Greenland forest area is increasing every year. 4 Waghini has come out this year in the nearby Tippeshwar Sanctuary. At present, there is a fight for the area along with 9 wagheen children in Zeli Kelapur Maregaon Wani Ralegaon, among which the wildlife activists have raised the issue of livelihood of the people of about 5 lakhs in this region due to the death of Avni Waghini. , Netaka like Maneka Gandhi To implement the Integrated Adivasi and Save the Farmers Program, it has to settle for implementing Bus Press Press notes to Delhi Mumbai Pune and petition for higher and highest court by foreign money
Kishore Tiwari has expressed his fear that the question will be raised again.
During Sudhir Mungantiwar the humble Maneka Gandhi, the response Kishore Tiwari joradarasamarthana be easily the two months Maneka Gandhi said Yavatmal called Yoga Guru to meet alyahotya at India's Women and Child Welfare Department manryanni vaghini the attack late in the women families adivasi and farmers in the hunger mouth If there was a dispute, the dispute would not have been present. If there is no post-mortem report even if the wildlife lover is appearing in the High and Supreme Court against this incident, as well as the National Tiger Conservation Authority's (NTCA) inquiry has not been completed even if there is no post-mortem report. Due to allegations that the prejudice was corrupted S style is alleged that Tiwari.
NCP State President Jayant Patil also criticized the allegations of Binny and Ambani being hired for the industries of Avni Waghini, which is a kind of insolvency. According to the Wild Act, if a wild animal becomes violent, it is difficult to get caught and caught by the high court or by the order of the Supreme Court, it was directly killed that the Birla and Ambani industries have been accused of having a time limit and Tiwari criticized the fact that 13 of the tribals and farmers of the dead were of the type of butter eaten.
================================================== =============================

अवनी मृत्यू: केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांची भुमिका शेतकरी व आदीवासी विरोधी -किशोर तिवारी

अवनी मृत्यू:  केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांची भुमिका शेतकरी व आदीवासी विरोधी -किशोर तिवारी 

दिनांक -६ नोव्हेंबर २०१८

https://vidarbhatimes.blogspot.com/2018/11/blog-post_6.html
ज्या अवनी T १ वाघिणीने १३ जणांचा जीव घेतला होता. मागील २ वर्षांपासून वन खाते तिला जेरबंद करण्याचा प्रयत्न करत होते, पांढरकवडा वन विभागात  वाघांची १०च्या  संख्यापेक्षा  अधिक आहे. तेथील जंगलांची क्षमता संपली आहे. जंगलात काही नसल्याने ते बाहेर पडत आहेत. या  मागील २ वर्षांत अवनीला ५ वेळा ट्रँक्विलाइज़ करण्यात आले. पण ती शांत झाली नाही. ग्रामस्थांना त्या दिवशी ती  दिसली. वाघिणीच्या हल्ल्यात कोणताही व्यक्ती मारला जाऊ नये म्हणून विषेय चमू त्या ठिकाणी  त्या वेळी गेली असता वनअधिकाऱ्यांनी तिच्या दिशेने ट्रँक्विलाइज डार्टने निशाणा साधला होता  परंतु, यामुळे ती आणखीनच उत्तेजित झाली आणि चमूच्या  वाहनावर ती झेपावली व त्यांनी स्वरक्षणार्थ तिच्यावर गोळी झाडली त्यानं तिचा अपघाती मृत्यू झाला हि वस्तूथिती  असतांना त्यावर होत असलेला वाद दुभाग्यपूर्ण असुन यामध्ये  केंद्रीय मंत्री मनेका गांधी आघाडीवर आहेत त्यांना देण्यात येत असलेली माहीती पूर्णपणे चुकीची असल्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा वन विभागात मागील ३० वर्षापासून आदीवासी व शेतकऱ्यांच्या मदतीने वन्य व  वन्यजीव रक्षक चळवळ चालविणारे किशोर तिवारी केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांच्या वाघिणीच्या मृत्यूवर दुःख व्यक्त करतांना केलेली सरकारवर  टीका शेतकरी व आदीवासी विरोधी असल्याची खंत व्यक्त करीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अशा आगाऊ मंत्र्यांना आवर घालण्याची विनंती केली आहे . 

यापुर्वी यवतमाळ येथील पांढकवडा वन विभागात अवनी या वाघिणीने दहशत माजविल्यानंतर राळेगाव केळापुर तालुक्यातील ७० आदीवासी बहुल खेड्यात सुमारे १ लाखावर निष्पाप शेतकरी व आदीवासी सतत दहशतीला  जगत होते एक एक करीत या वाघिणीने १३ लोकांचा जीव घेतला मात्र यामुळे या परीसरातील  जनजीवन जवळ जवळ संपले होते  सतत होणारी उपासमार शेती व्यवसाय ठप्प झाला होता वन खात्याच्या अधिकाऱ्यांवर व महसूल अधिकाऱ्यांवर प्रचंड असंतोष वाढला होता अनेक वेळा आंदोलन सुद्धा हिंसक झाले त्यांनतर वन अधिकाऱ्यांनी गेल्या दोन वर्षांपासून पकडण्यासाठी मात्र दिल्ली मुंबई पुण्याला बसलेल्या  वन्यजीव कार्यकत्यांनी उच्चंन्यायालयात वारंवार   वनखात्याविरोधात  जनहित याचिका दाखल करून ही मोहीम बंद पाडली आता भारताच्या सर्व न्यायालयाने वनअधिकाऱ्यांनी राष्ट्रीय वाघ संरक्षण प्राधिकरणाच्या (एनटीसीए) मार्गदर्शिकेनुसार  निर्णय  घेण्याचे आदेश दिलें त्याही आदेशाला वारंवार दिल्ली मुंबई पुण्याला बसलेल्या  वन्यजीव कार्यकत्यांनी रोखण्याचा प्रयन्त सतत केला मात्र निर्दोष  ७० आदीवासी बहुल खेड्यात सुमारे १ लाखावर मूळ वन्यप्रेमी व  वन्यजीव रक्षक आदिवासींचा जीव वाचविण्यासाठी ही मोहीम सुरु केली यासाठी  तीन मोठे पिंजरे, ५०० वन कर्मचारी आणि खासगी कर्मचाऱ्यांची फौज या ठिकाणी होती. वाघिणीचा शोध घेण्यासाठी पॅरामिटर आणि इटालियन कुत्रेही आणण्यात आले होते. असे असले तरीही या वाघिणीला पकडण्यात यश येत  नव्हते. अखेर अवनीला  शोध चमूवर हल्ला केल्यानंतर खात्मा करण्यात आला एकीकडे  राळेगाव केळापुर तालुक्यातील ७० आदीवासी बहुल खेड्यात सुमारे १ लाखावर निष्पाप शेतकरी व आदीवासी मागील दोन वर्षांनंतर दिवाळी साजरी करीत आहेत त्याचवेळी  दिल्ली मुंबईच्या  राजकीय वर्तुळातही अनेक वन्यप्रेमी  वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचेवर तोंडसुख घेत आहेत यामध्ये  केंद्रीय मंत्री मनेका गांधी आघाडीवर आहेत त्यांना देण्यात येत असलेली माहीती पूर्णपणे चुकीची असल्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा वन विभागात मागील ३० वर्षापासून आदीवासी व शेतकऱ्यांच्या मदतीने वन्य व  वन्यजीव रक्षक चळवळ चालविणारे किशोर तिवारी केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांच्या वाघिणीच्या मृत्यूवर दुःख व्यक्त करतांना केलेली सरकारवर  टीका शेतकरी व आदीवासी विरोधी असल्याची खंत व्यक्त करीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अशा आगाऊ मंत्र्यांना आवर घालण्याची विनंती केली आहे . 
सध्या पांढरकवडा वन विभागात वाघांची संख्या प्रत्येक वर्षी वाढतच आहे जवळच्या टिप्पेश्वर अभयारण्यमध्ये यावर्षी ४ वाघिणी बाहेर आली आहेत . झरी केळापुर मारेगाव वणी राळेगाव येथे सध्या ९ वाघिणीचा आपल्या मुलांसह क्षेत्रासाठी लढा सुरु आहे त्यातच चंद्रपूर जिल्हातून आलेल्या वाघिणीच्या वणी कोळसा खदानीच्या परीसरात हैदौस सुरु झाला आहे यामुळे  अवनी  वाघिणीच्या मेल्याने हा वाद संपणारा नसुन यापरीसरातील सुमारे ५ लाखावर ग्रामीण जनतेच्या जीविताचा प्रश्न उभा झाला आहे यासाठी वन्यजीव कार्यकत्यांनी ,मनेका गांधींसारख्या नेत्यांनी एकात्मिक आदीवासी व शेतकरी वाचवा कार्यक्रम लागू करण्यासाठी बसावे लागेल फक्त दिल्ली मुंबई पुण्याला  बसुन प्रेस नोट काढणे व विदेशी पैशाने उच्चं वा सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याने हा प्रश्न पुन्हा पुन्हा समोर येणार अशी भीतीसुद्धा किशोर तिवारी यांनी व्यक्त केली आहे . 
दरम्यान सुधीर मुनगंटीवार यांनी  विनम्रपणे मनेका गांधी दिलेल्या प्रत्युत्तराचे किशोर तिवारी यांनी जोरदारसमर्थन केले असुन दोन महिन्यांपूर्वी मनेका गांधीं यांनी यवतमाळला तथाकथित योग गुरूला भेटण्यासाठी आल्याहोत्या त्यावेळी भारताच्या महिला व बालकल्याण विभागाच्या मंऱ्यांनी  वाघिणीच्या हल्ल्यात मृत झालेल्या महिलांचा कुटुबांची उपासमारी तोंड देत असलेल्या आदीवासी व शेतकऱ्यांची विचारपूस केली असती तर वाद उपस्थित झाला नसता आता हा वाद वन्यप्राणी प्रेमी नेहमीप्रमाणे या घटनेच्या विरोधात उच्चं वा सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल असल्याने तसेच राष्ट्रीय वाघ संरक्षण प्राधिकरणाच्या (एनटीसीए) चौकशी सुद्धा पूर्ण झाली नाही इतके काय  पोस्टमार्टम रीपोर्ट सुद्धा आलेला नसतांना अवनीला बेशुद्ध करण्याऐवजी थेट ठार करण्यात आले असे आरोप करणे पूर्वग्रह दूषित ठेवण्याचा प्रकार असल्याचा आरोप तिवारी यांनी केला आहे . 
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी  बिर्ला आणि अंबानी यांच्या उद्योगांसाठीच अवनी वाघिणीची शिकार केल्याचा आरोप एक प्रकारची दिवाळखोरी असल्याची टीका सुद्धा तिवारी यांनी केली  . वन्य कायद्यानुसार एखादा वन्य प्राणी हिंसक झाला तर त्याला बेशुद्ध करून पकडणं अवघड झाल्यावर उच्चं वा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बेशुद्ध करण्याऐवजी थेट ठार आले  यात बिर्ला आणि अंबानी यांच्या उद्योगांसाठी केल्याचा आरोप टाईम पास असल्याचा व मेलेल्या १३ आदीवासी व शेतकऱ्यांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार असल्याची टीका तिवारी यांनी केली 
===============================================================================

Saturday, November 3, 2018

गॅस वितरकाव्दारे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेत ग्रामीण भागात हजारोची वसुली -तक्रार देण्याचे शेतकरी मिशनचे आवाहन

गॅस वितरकाव्दारे  प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेत ग्रामीण भागात हजारोची वसुली -तक्रार देण्याचे शेतकरी मिशनचे आवाहन 
दिनांक -३ नोव्हेंबर २०१८
भारतामध्ये स्वच्छ इंधन वापरात वाढ घडवून आणणे,महिलांच्या आरोग्यामध्ये सुधारणा घडवून आणणे व महिला सशक्तीकरण करणे, प्रदूषण प्रमाण कामी करणे यासाठी  दारिद्र्यरेषेखालील जीवन जगणार्‍या कुटुंबांना  नि:शुल्क एल पी जि  गॅसकनेक्शन उपलब्ध करून देण्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत १ एप्रिल २०१६ प्रासून दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील  महिलांना पहिले गॅस  कनेक्शन नि:शुल्क देण्यात येणारी योजना सुरु केली मात्र कै वसंतराव नाईक शेती स्वालंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारीं यांचेडून राबविण्यात येत असलेल्या सरकार आपल्या दारी कार्यक्रमात आदीवासी दलित तसेच  दारिद्र्यरेषेखालील जीवन जगणार्‍या कुटुंबांतील महिलांनी सतत केलेल्या तक्रारीवरून लक्षात आले आहे की बहुतेक सर्वच गॅस वितरक या गरीबांकडून ३५०० रुपयापासून २५०० रुपयांपर्यंत जबरीने वसूल करीत आहेत तर गॅस सिलींडर सुद्धा रु १२०० ते १५०० रुपयात रिफील करून देत आहेत जे गरीब तक्रार करीत आहेत त्यांना गॅस वितरक  धमकावतात व होते ते करा असा सल्ला देतात वनखात्यामार्फत देण्यात येणाऱ्या गॅस वितरणामध्येही हाच प्रकार होत असल्याचे समोर आले आहे मात्र अन्न नागरी विभागाचे वन खात्याचे तसेच गॅस कंपनीचे अधिकारी गॅस वितरकाकडून मासीक हप्ते खात असल्यामुळे हा गोरखधंदा राजरोसपणे सुरु असल्याचा आरोप किशोर तिवारी यांनी केला असुन ज्या गरीबांकडून अशा प्रकारे निशुक्ल योजनेमध्ये वसुली करण्यात आहे त्यांनी आपणाकडे मोबाईल ९४२२१०८८४६ वर  तक्रार करावी अशी विनंती किशोर तिवारी यांनी केली आहे . 

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत केंद्र सरकारव्दारे मागील ३ वर्षांमध्ये ५ कोटी कुटुंबांना नि:शुल्क गॅस कनेक्शन उपलब्ध करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते त्यावर  ८ हजार कोटी रुपये खर्च झाला असून तरीही गरीबांना रोजरोसपणे गॅस वितरकाकडून होणारी वसुली  हा फौजदारी गुन्हा असुन जर या सर्व गरीबांना मुक्याने घेतलेले हजारो कोटी रुपये तात्काळ परत करण्यात यावे यासाठी शेतकरी मिशन मोहीम उघडणार असल्याची माहिती किशोर तिवारी यांनी यावेळी दिली 

======================