Thursday, August 27, 2020

किशोर तिवारी यांनी यवतमाळ जिल्हा आरोग्य सेवेचे बैठकीत काढले वाभाडे -एकही फवारणी विषबाधेमुळे शेतकऱ्याचा बळी जाणार नाही याची जिल्हा आरोग्य यंत्रणेने काळजी घ्यावी

किशोर तिवारी यांनी यवतमाळ जिल्हा आरोग्य सेवेचे  बैठकीत काढले वाभाडे -एकही फवारणी विषबाधेमुळे शेतकऱ्याचा बळी  जाणार नाही   याची जिल्हा आरोग्य  यंत्रणेने काळजी घ्यावी 

दिनांक - २८ ऑगस्ट २०२०


एकीकडे कोरोना हा जिल्ह्यात कळस गाठत आहे आता  ग्रामीण भागात प्रचंड  कोरोना बाधित मिळत आहेत त्याच बरोबर प्रचंड प्रमाणात डेंगू व इतर ताप व साथीच्या आजाराचे रुग्ण शहरी व ग्रामीण भागात असुन सरकारी दवाखान्यात कोरोनाची टेस्ट व विलगीकरण करतात या  भीतीने जात नसुन सर्व खाजगी रुग्णालयात जात आहेत त्यामुळेच घरोघर जाऊनही लोक आजार सांगत नसुन अनेक प्राथमिक आरोग्य केंद्र मागील ३ महिन्यापासून ओसाड पडले आहेत त्यातच कोलगाव सारख्या अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रात अनेक महिन्यांपासून फरार आहेत व ज्या डिलेव्हरी दवाखान्यात दाखविल्या आहेत त्यासर्व  घरीच झाल्याचा खळबळजनक खुलासा करीत जिल्ह्या आरोग्य अधिकारी स्वतःच आजारी राहत असल्यामुळे त्यांना विश्राम द्यावा अशी विनंतीही  वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विषयांचा आढावा घेतल्यानं म्हटले यावेळी   प्रामुख्याने आरोग्य, कृषी, शिक्षण यांचा या विषयाच्या प्रामुख्याने समावेश होता. 

मागील चार महिन्यात कोरोना संकटाचे कारण सांगत किशोर तिवारी यांच्या आढावा बैठकीला आयोजीत करण्यास प्रशासनाने मज्जाव केला होता मात्र आज दया दाखवून त्यांना आढाव बैठक घेण्यास परवानगी देण्यात आली होती या बैठकीला जिल्हाधिकारी एम.डी.सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. आर.पी.सिंह, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, उपजिल्हाधिकारी सविता चौधर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळासाहेब चव्हाण, वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. बाबा येलके, डॉ. विजय डोंबळे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर आदी उपस्थित होते.
यावेळी किशोर तिवारी म्हणाले, नागरिकांच्या मनातून कोरोनाची भीती कमी करण्यासाठी अधिका-यांनी जनजागृती करावी. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रात कोणतीही सुचना न देता जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने दौरा करावा. असुविधा दिसल्या तर संबंधितांवर कारवाई करावी. शेतमालावर बोंडअळीचे आगमन झाले आहे.  किटकनाशक फवारणीमुळे शेतकरी / शेतमजुर बाधित होऊ देऊ नका. विषबाधेचा एकही मृत्यु होता कामा नये. सार्वजनिक आरोग्य यंत्रणेवर नागरिकांचा विश्वास वाढावा, यासाठी प्रयत्न करा, अशा सुचना किशोर यांनी केल्या.या बैठकीला विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 
०००००००००