Saturday, March 2, 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यवतमाळ येथील सभेत विदर्भ मराठवाडयातील कोरडवाहू शेतकरी ,आदीवासी ,बंजारा व महिला बचत गटांची घोर निराशा केली -किशोर तिवारी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यवतमाळ येथील सभेत विदर्भ मराठवाडयातील कोरडवाहू शेतकरी ,आदीवासी ,बंजारा व महिला बचत गटांची घोर निराशा केली -किशोर तिवारी 

दिनांक २ मार्च २०२४

ज्या विदर्भ मराठवाड्याने मोदींना २०१४ व २०१९ च्या लोकसभेच्या निवडणुकीत प्रचंड विश्वास दाखविली तेथील  आत्महत्याग्रस्त शेतकरी ,शोषित महीला आदिवासी यांची आपलय २०२४ च्या लोकसभेचा प्रचार सुरु करण्यासाठी घेतलेल्या सभेत प्रचंड निराशा केली २०१४ व २०१९ च्या निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी घेतलेल्या सभेत त्यांनी दिलेल्या सर्व आश्वासनाचा यावेळी त्यांना संपुर्ण विसर पडल्यामुळे सकाळी पासुनउपाशी तापाशी  बसून असलेल्या महिला आदिवासी व शेतकऱ्यांची प्रचंड निराशा झाली असुन याचा फटका भाजपाला निवडणुकीत बसणार अशी घणाघाती प्रतिक्रिया विदर्भाचे शेतकरी चळवळीचे कार्यकर्ते व शिवसेनेचे राष्ट्रीय प्रवक्ते किशोर तिवारी यांनी व्यक्त केली आहे . 

साध्य विदर्भ मराठवाड्यातील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकरी प्रचंड नापीकी व हमीभावापेक्षा कमी भावात कापूस सोयाबीन विकल्यामुळे आर्थिक अडचणीत आले आहेत . मागील १० वर्षात विदर्भ मराठवाड्यात ३२ हजारावर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत ,आदीवासी व बंजारा भटक्या समाजाचे अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य हे प्रश्न प्रचंड प्रमाणात या १० वर्षात वाढले आहेत .विदर्भ मराठवाड्यात लाखो बचत गटांपैकी फक्त २ टक्के महिला बचत गट सरकारी बँकातून कर्ज काढत आहे तर ९८ टक्के बचत गट मायक्रोफायनान्स कंपन्या वा सहकारी नागरी पत संस्थांच्या दाम दुपट्टीच्या व्याजात फरफटत आहे व आरबीआय ने बघ्याची भूमिका घेतली आहे . 

२०१४ मध्ये दाभाडी येथे नरेंद्र मोदीजींनी  शेतकऱ्यांचे उत्त्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट करणे ,बँक शेतकऱ्यांच्या दारावर जाऊन मुबलक पतपुरवठा करतील,लागवडीचा खर्च अर्धा करणार ,जमिनीचे आरोग्य ,पोत व पुनर्जीवन करणार , सर्व शेतकऱ्यांना  सिंचनाची सुविधा देणार ,सर्व शेतकऱ्यांना सिंचनासाठी वीज पुरवडा देणार , कापूस व सोयाबीन मध्ये बियाणे ,लागवड पद्धत यामध्ये तांत्रीक अडचणी दूर       करणार . ,कोरडवाहू क्षेत्रात तेलबिया ,डाळ पिके ,कडधान्य पिकासाठी विशेष प्रोसाहन देणार, हमीभाव देतांना डॉ स्वामिनाथन यांच्या शिफारशी प्रमाणे लागवड खर्च अधिक ५० टक्के नफा देणार  रासायनिक शेतीमुळे निर्माण झालेल्या कर्क, किडनी आचार,पाण्याचे प्रदूषण ,पाण्याची शुद्धता ,आम्लता कमी करणे यावर विशेष  कार्यक्रम व योजना राबविणार तसेच  २०१९ मध्ये  पांढरकवडा  येथे नरेंद्र मोदीजींनी आदिम आदीवासी जसे कोलामाना पक्के घर शुद्ध पाणी शाळा उपलब्ध पाणी समाज जीवन शेती पट्टे देऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणार ,भटक्या जातीच्या जसे बंजारा व पारधी यांना विशेष निधी उपलब्ध करून  पक्के घर शुद्ध पाणी समाज जीवन शेती पट्टे  शाळा उपलब्ध करून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणार ,महिला बचत गटांमार्फत देण्यात आलेले सर्व कृषी कर्ज माफ करण्यात येणार ,सर्व महिला बचत गटांना ३ लाखापर्यंत नवीन भांडवल देण्यात येणार हि आश्वासने दिली होती मात्र या आश्वासनांची पूर्तता तर केली नाही मात्र नवीन आश्वासनांची खैरात वाटुन वंचितांच्या जखमेवर मीठ चोळले ,असा आरोप किशोर तिवारी यांनी यावेळी केला 

सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी जिल्ह्यातील दाभडी या गावी "चाय पे चर्चा" हा कार्यक्रम गाजावाजा करून घेण्यात आला. या ठीकाणी  गाजावाजा करून दिलेली सर्व आश्वासने आता १० वर्षानंतर खोटी ठरली असल्याचे आणि भाजपा सरकार हवालदिल शेतकरी, बेरोजगार आणि सामान्य माणसाची सतत फसवणूक करीत असल्याचा आरोप तिवारी यांनी केला. या संबंधात तिवारी यांनी एक पत्र नरेंद्र मोदींना पाठवले असून त्यात अनेक गंभीर वास्तविक विषयावर प्रकाश टाकला आहे.केंद्रात सत्तेत आल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न दीड पट करू, दोन कोटी रोजगार देवू, महागाई वर लगाम आणू, पेट्रोल, डिझेल, गॅस चे भाव कमी करू, शेतकऱ्यांच्या दुर्दैवी आत्महत्या थांबतील आणि भ्रष्टाचार समूळ नष्ट करू, अशी प्रमुख आश्वासने भाजपा ने दिली होती. १० वर्षात यातील एक ही शब्द नरेंद्र मोदी सरकारने पाळला नसून एकीकडे शेतीवर खर्च दुप्पट झाला तरी आज सरकार हमी भाव सुद्धा द्यायला तयार नाही. कापूस, सोयाबीन चे भाव पडले असतानाही केंद्र सरकारच्या नोडल एजन्सी सी.सी.आय. आणि नाफेड माल खरेदी करण्यास तयार नाहीत. तुटपुंजे केंद्र उघडुन शेतकऱ्यांची थट्टा सुरू आहे. शिक्षण, आरोग्य यांचे वरील खर्च तिप्पट झाला आहे. बेलगाम महागाई ने आम आदमी हैराण आहे. पेट्रोल, डिझेल,गॅस चे भाव आकाशाला भिडले आहे. प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार राजरोस पणे सुरू असून नरेंद्र मोदी या गंभीर विषया वर आपले तोंड कधी उघडणार? असा सीधा सवाल किशोर तिवारी यांनी केला आहे.

शेतीकडे सरकारचे दुलर्क्ष 

मागील दशकात एप्रिल २०१४ ते डिसेंबर २०२३ पर्यंत महाराष्ट्रात ३२४१६ शतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत आतातर तरुण युवक युवती हे सुद्धा मोठ्या प्रमाणात आत्महत्या करीत आहेत दररोज ८ शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असतांना २०२४ मध्ये मोदीजींना त्यांच्या गारंटी वर बालवेच लागेल आता भारत सरकारच्या सर्व योजनांचे तीन तेरा वाजलेल्या यवतमाळ जिल्ह्यात २०२४ चा लोकसभेच्या  निवणुकीचे बिगुल फ़ुंकताना त्यांना वास्तविक सत्यावरही बोलावे कारण सन २०१४ लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी दाभडी येथे पंप्रधान मोदी साहेबांनी विदर्भ शेतकरी आत्महत्या मुक्त करू,शेतकऱ्यांचे मूळ प्रश्न हमीभाव,पत पुरवठा,लागवड खर्च कमी करणे,जमिनीची उत्पादकता वाढविणे,सिंचनाची व्यवस्था करणे,कृषी क्षेत्रात नवीन टेक्नॉलॉजी आणणे,पीक पद्धतीत बदल करणे ही प्रमुख आश्वासने दिली होती. तर २०१९ मध्ये पांढरकवडा येथे लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी महिला बचत गटांचे कर्ज माफ करून ३ लाखाचे व्याजमुक्त कर्ज देणे व सर्व आदिम आदिवासी बंजारा, भटक्या समाजाला पक्के घर देण्याचे,सर्वाना पिण्याचे शुद्ध पाणी नळाने घरी देऊ,प्रत्येक घरात एकाला रोजगार देऊ अशा घोषणा केल्या होत्या. मात्र मागील १० वर्षात शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रचंड प्रमाणात वाढल्या आहेत. मायक्रो फायनान्स कंपन्यांनी व सहकारी पत संस्थांनी १८ ते २४ टक्के व्याज वसुली करून सर्व महिला बचत गटाच्या आई, बहिनींचे संसार रस्त्यावर आणले आहेत. मात्र सरकारी बँका झोपा काढत आहेत.केंद्र सरकार चे धोरण हे फक्त मोठ्या कॉर्पोरेट क्षेत्रातील कंपन्यांना लाखो कोटी रुपयांचा फायदा पोहचविणे हाच असून शेतकऱ्यांचे शोषण, बेलगाम महागाई, बेरोजगारी आणि सर्वत्र बोकाळलेला भ्रष्टाचार आणि शेतकऱ्यांच्या दुर्दैवी आत्महत्या या ज्वलंत मुद्यांवर लक्ष देण्यास नरेंद्र मोदी सरकार जवळ अजिबात वेळ नाही. रेटून खोटे बोलणे हे फक्त एकमेव तंत्र मोदींना चांगले अवगत असून ज्वलंत मुद्यांवर बोलण्यास त्यांना अजिबात आवडत नसल्याचा आरोप नरेन्द्र मोदी यांच्या “चाय पे चर्चा” कार्यक्रमाचे वॉर रुम सदस्य राहीलेल्या किशोर तिवारी यांनी केला आहे. 


-----------------------------------------------------------------

किशोर तिवारी

राष्ट्रीय प्रवक्ते - शिवसेना (ठाकरे गट) 

मो. ९४२२१०८८४६

Email ID : kishortiwari@gmail.com