इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांनी कांदा महाग झाल्याची ओरड थांबवावी कारण हा महागाईचा नाहीतर निर्सगाचा प्रकोप -साऱ्या भारताला स्वस्त कांदा महाराष्ट्र महिन्याभरात देणार -किशोर तिवारी यांचे साकडे
दिनांक -५ डिसेंबर २०१९
सध्या मोठ्या ब्रेकिंग न्यूज मिळत नसल्यामुळे कांद्याचा नापिकीमुळे झालेल्या तुटीमुळे वाढलेल्या किमतींचा जबरीने बाजार करणाऱ्या राष्ट्रीय हिंदी व इंग्लिश माध्यमांना ही ही राष्ट्रीय विपदा मद्यम वर्गीय ग्राहकांवर आली असुन अनेक गरीबांचे बळी पडतील देश आर्थिक संकटात येणार असा समज पसरू नका फक्त महीना दीड महिन्यात नाशीक कांदा भारताचा बाजारात येणार हे निश्चित असुन जर या राष्ट्रीय हिंदी व इंग्लिश माध्यमांची अनाहुत ओरड ऐकून भारत सरकारने स्वस्त भावाचा कांदा पाकीस्थान मधुन मोठ्या प्रमाणात आणला तर जानेवारी नंतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आपला कांदा व्यापाऱ्यांना मोतीमोल भावात विकून आत्महत्या कराव्या लागतील तरी आपल्या प्रसारणाला देण्यात येत असलेला राष्ट्रोय संकटाचे स्वरूप संयमित करावे असे आव्हान शेतकरी चळवळीचे कार्यकर्ते किशोर तिवारी यांनी राष्ट्रीय हिंदी व इंग्लिश माध्यमांना केले आहे
आपल्या निवेदनात कांद्याचे संकट हे दिवाळी दरम्यान झालेल्या अकाली पाऊसामुळे असुन यामध्ये महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचे सुमारे ४० हजार कोटींचे उभे पीक नष्ट झाले आहे व याचा भारत सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणाचा संबंध नसुन महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना आपल्या फक्त १० टक्के उरलेल्या कांद्याला थोडा भाव मिळत असल्यामुळे ग्राहकही सहकार्य करीत आहेत तसेच कोणताही प्रसिद्धिप्रधान राजकीय पक्ष सुद्धा आपला मोमबत्ती मार्च करीत नसुन फक्त राष्ट्रीय हिंदी व इंग्लिश माध्यमांनी साऱ्या मध्यम वर्गीयांचा ठेका घेत सतत कांदा हा विषय लावून धरला आहे ही ओरड करणाऱ्यांनी जैन बांधवांचा सल्ला घ्यावा कारण युगाण युगे ते कांदा लसूण शिवाय जगतायेत अनेक समाजात चार चार महीने कांदा न खाता सहज जगतात व त्यांचे विकारही कमी होतात आता सर्वच धर्मीय शेतकऱ्यासाठी आम्हीही कांद्याशिवाय वा कमी कांद्याने जगू शकतो न दाखून दिले आहे कारण आजकाल एका कुटुंबाला महिन्यात जास्तीत जास्त ५ किलो कांदा लागतो आणि बजेट ६० रुपये कांदा या भावाने केले असेल तर कांदा फक्त ३ किलो खरेदी करा वाढलेलं बजेट सौदर्य प्रसाधन सिनेमा हॉटेल आणि इतर खर्च करून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे रहा फक्त हे दोन महिन्यासाठी आहे पुढे रब्बी चा कांदा आला की कांद्याचे भाव जेमतेम २० रुपये होतील असा विश्वास किशोर तिवारी यांनी व्यक्त केला आहे .
जेव्हा कांदा २० रुपये किलोच्या खाली होतो तेव्हा शेतकरी सतत तोट्यात असतो कांही तोटा आज कमी होतोय तर होई ओरड का कारण शेती ही चॅरिटी नाही व्यवसाय आहे हे मान्य करावयाला पाहीजे सद्याची भाववाढ ही निर्सगाचा प्रकोपामुळे केवळ मागणी आणि पुरवठा यामुळेच झाली आहे हे लक्षात घेण्याची गरज असल्याचे किशोर तिवारी म्हटले आहे लोकांना खुश ठेवण्याआठी कांदा बटाटा हा जीवनाव्यशक हा का यावर राष्ट्रीय हिंदी व इंग्लिश माध्यमांनी खुली चर्चा करण्याचे आवाहन किशोर तिवारी यांनी केले आहे .
राष्ट्रीय हिंदी व इंग्लिश माध्यमांनी गरिबांचे काय होईल याची चिंता करू नका.ते आपलं बजेट सांभाळून चटणी भाकरी खाऊन आनंदी असतात त्यामुळे ग्राहकांनी तेव्हा कांदा महाग झाला हा राष्ट्रीय हिंदी व इंग्लिश माध्यमांनी सुरु केलेल्या कांगावा पाहण्यात टाळावे अशी विनंती शेतकरी चळवळीचे कार्यकर्ते किशोर तिवारी यांनी केली आहे .
================================================