वीज तोडणी सुरूच राहिलं ही उर्जामंत्री नितीन राऊत यांची भुमिका नापिकीग्रस्त भागातील शेतकऱ्यांवर अन्याय करणारी-शेतकऱ्यांची वीज तोडणी थांबवा किशोर तिवारींचे ऊर्जामंत्र्याना निवेदन
दिनांक -१८ डिसेंबर २०२१
महाराष्ट्रात शेतकऱ्यांना वीज फुकट मिळणार नाही ही उर्जामंत्री नितीन राऊत यांची घोषणा विदर्भ व मराठवाड्यातील वीज तोडणी सुरूच राहिलं ही उर्जामंत्री नितीन राऊत यांची भुमिका नापिकीग्रस्त भागातील शेतकऱ्यांवर अन्याय करणारी असुन विदर्भातील सबसिडी जी मागील तीस वर्षे उत्तर महाराष्ट्राने लाटली त्याचा हिशोब व चुकीच्या अधिभार ,वीज गळतीचा दंड व अंधाधुंद पाठविलेली वीज बिले यावर ही वीजमंत्र्यांनी बोलावे जरा काँग्रेसचा जाहीरनामा व इतर काँग्रेस शासित राज्यात कृषी वीज बिल फुकटात देण्याचे धोरण यावरही दाबून बोलावे सध्या विदर्भ व मराठवाड्यातील नापिकीग्रस्त भागातील शेतकरी प्रचंड अडचणीत आहे व ऊर्जामंत्री विदर्भ विभागातील दलीत मागासवर्गीयांचे आधार आहेत त्यांना विदर्भाच्या होत असलेल्या शेतकरी आत्महत्या व विदर्भाचा विजेचा बिलाचा अनुदानाचा अनुषेय यावर दांडगा अभ्यास आहे त्यांच्याकरून अशा घोषणा अपेक्षित नाहीत तेंव्हा येणाऱ्या जिल्हापरिषदेच्या निवडणुका लक्षात घेऊन
विदर्भ व मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात एकीकडे महाविकास आघाडी सरकारने खरीप हंगाम अतिवृष्टीने कापूस सोयाबीन तूर धान या पिकांची प्रचंड प्रमाणात नापिकी झाल्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून नुकसान भरपाई दिली आहे मात्र केंद्र सरकारच्या बँका ही नुकसान भरपाई पीककर्जात जॅम करण्यास सुरु केली असतांना वीज वितरणने कृषी पंपाची वीज तोडणीचा सपाटा लावला आहे आणि या जुलमी अत्याचारामुळे विदर्भ व मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या प्रचंड प्रमाणात वाढल्या आहेत यातच प्रशासकीय उदासीनता पीकविमा कंपन्यांचा नाकर्तेपणा यामुळे हैराण झालेल्या आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातविदर्भ व मराठवाड्यातील नापिकीग्रस्त भागात कृषी पंपाची वीज तोडणी थांबवा अशी विनंती कै वसंतराव नाईक शेती स्वालंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केली आहे .
चालु खरीप हंगामामुळे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचा खरिप हंगामा पूर्णतः बुडाला असून आता शेतकऱ्यांची सर्वस्वी मदार रब्बी वर आहे.अतिवृष्टीमुळे शेतात पाणी पातळी चांगली असतांना आता वीज वितरण कपंनीने वीज तोडणीमुळे शेतकऱ्यांच्या कामात बाधा येत असुन शेतकऱ्यांशी सहकार्याने वागावे व कृषी पंपाची वीज तोडणी त्वरित थांबावी अशी विनंती अनेक महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केली असुन सध्या विदर्भ व मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात शेतकरी आर्थिक अडचणीत असल्यामुळे आपण शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी अपेक्षा आहे अशी आग्रही मागणी किशोर तिवारी यांनी महाराष्ट्राचे ऊर्जामंत्र्यांना केली आहे
खरीप हंगामात झालेला प्रचंड नुकसानीची भरपाई करण्यासाठी शेतकरी थोडीबहुत रब्बीची तयारी करीत आहेत मात्र वीज वितरणने कृषी पंपाची वीज तोडणीचा सपाटा लावला आहे आता परिस्थिती अधिकच बिकट होत आहे सनदी अधिकारी मंत्रालयात आपल्या वातानुकूल चेंबरमध्ये बसुन सक्तीच्या वसुलीसाठी दररोज नवीन नवीन आदेश काढत असुन वीज कंपनीचे अधिकारी एकीकडे वीज तोडणी वा रोहित्रे-ट्रान्सफार्मर दुरुस्तीसाठी १०० टक्के थकबाकीचा भरणा करा अशी सक्ती करीत मात्र अशी सक्ती नापिकीग्रस्त वा दुष्काळग्रस्त भागात करता येत नाही मात्र वीज वितरण कम्पनीचे अभियंता सरळ ऊर्जामंत्रीशी बोला असा सल्ला देत आहेत तर विरोधी पक्ष या वीज तोडणीचे घाणेरडे राजकारण करीत आहेत या करीता मुख्यमंत्र्यानी वीज तोडणीस तोडगा काढावा अशी विनंती किशोर तिवारी यांनी महाराष्ट्राचे महाराष्ट्राचे ऊर्जामंत्र्यांना केली आहे .
एकीकडे वीज तोडणी तर वाघांचा दररोज शेतकरी व शेतमजुरांचा फडशा पडत असताना कृषी पंपाना देण्यात येणारी विजेची वेळ ही शेतकऱ्यांसाठी त्रासदायक असून ही वेळही बदलून देण्याची मागणी होत आहे कारण रात्री मिळणारी वीज रात्री ११वा. ऐवजी ही सकाळी ८ ते सायं.५ पुरवण्यात यावी अशी मागणी करण्यात वनभागातील देण्यात यावी तसेच सर्व रोहित्रे व इतर दुरुस्ती करून शेतकऱ्यांना सुरळीत वीज पुरवठा करावा अशी विनंती किशोर तिवारी यांनी महाराष्ट्राचे महाराष्ट्राचे ऊर्जामंत्र्यांना केली आहे
==========================================