महाराष्ट्रातील ३ लाख कोटीच्या सहकारी बँका बंद पाडण्याचा अमित शहा यांचा कट :शिवसेना नेते किशोर तिवारी कै बाबाजी दाते महिला बँकेग्रस्त ठेवीदार ग्राहक व कर्मचाऱ्यांशी ११ डिसेंबरला संवाद साधणार
दिनांक ९ डिसेंबर २०२१
सध्या मागील १४ महीने वसुली करू नये असा आदेश काढणाऱ्या व सरकारी बँका प्रमाणे कमीत कमी २ लाख कोटीचे पॅकेज नागरी बँकांना न देता केंद्रामध्ये सहकार खाते उघडल्या बरोबर दररोज केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या आदेशाने आर बी आई आपल्या अधिकाराच्या बेफाम दुरुपयोग निर्बंध लावत असुन पहिले मकलापूर अर्बन बँक त्यानंतर कै बाबाजी दाते महीला अर्बन बँक व आता नगर अर्बन बँकेवर निर्बंध लावल्याने सुमारे ४ लाख कोटीच्या सहकारी बँका व पत संस्था यामधील ठेवी झपाट्याने काढण्यात येत असल्यामुळे महाराष्ट्रातील सामान्य जनतेच्या व चाकरमान्या पेन्शन धारकांनी आपल्या ठेवी ठेऊन समाजाच्या अंत्योदयाचे आंदोलन लवकरच पडणार असुन हा सगळा ४ लाख कोटीच्या सहकारी बँका व पत संस्था यामधील गुजरातच्या खाजगी बँकांना देण्याचा कट मोदी -शहा रचला असुन पीएमसी बँक सुद्धा या अधिवेशनात कायदा करून खाजगी बँकेला देण्याचा अफलातुन प्रयोग करण्यात येत असल्याने महाराष्ट्र शिवसेना या सहकारी बँका लुटण्याच्या अमित शहा पॅटर्नचाविरोध करणार असुन यवतमाळ कै बाबाजी दाते महिला बँकेग्रस्त ठेवीदार ग्राहक व कर्मचाऱ्यांशी ११ डिसेंबरला संवाद टिम्बर भवन येथे दुपारी १२ वाजता साधणार असल्याची माहीती शिवसेना व्यापारी आघाडीचे अध्यक्ष प्रवीणभाऊ निमोडीया यांनी यावेळी दिली .
दिनांक. ८ डिसेंबरला अमरावती येथे कै बाबाजी दाते महिला बँकेग्रस्त ठेवीदार ग्राहक व कर्मचाऱ्यांशी बैठकीत यवतमाळ येथील हजारो शेतकरी विधवा ,दलित ,मुस्लिम ,आदीवासी ,मध्यमवर्गीय लोकांच्या ठेवी व जमा पैशाची बँकेचे अधिकारी ,संचालक ,ऑडिटर,रिझर्व बँकेचे अधिकारी तसेच सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांनी ३७० कोटीची केलेली लुटकेल्याचा आरोप शिवसेना नेते किशोर तिवारी केला असुन महाराष्ट्र पोलीस कडुन एसआईटी निर्माण करून बँकेचे अधिकारी ,संचालक ,ऑडिटर,रिझर्व बँकेचे अधिकारी तसेच सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांनी सर्व लुटीची रक्कम बाहेर काढणार व एकाही ठेवीदार वा ग्राहक यांची घामाची कमाई बुडणार नाही व यासाठी शिवसेना सर्व चोरांना आंदोलन करून गजाआड करेल अशी हमी आज बाबाजी दाते महिला सहकारी बँक ग्रस्तांच्या बैठकीत दिली .
एकवर्षांपूर्वी ज्या बँकेचा एनपीए फक्त ४ टक्के होता तो एकदम ऑडिटर नवा आल्यानंतर ३१ मार्च २०२१ च्या अंकेक्षणामध्ये बँकेचा नेट एनपीए ५१.११ टक्के तर ढोबळमानाने ६४.१३ टक्केपर्यंत पोहचल्याचे दिसून आले. बँकेला ‘ड’दर्जा देण्यात आला हा सर्व प्रकार बँकेचे अधिकारी ,संचालक ,ऑडिटर,रिझर्व बँकेचे अधिकारी तसेच सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांनी यांनी संघटीतपणे केलेल्या लुटीने साध्य झाले आहे याला बाबाजी दाते महिला सहकारी बँकेचा कंचलवार पॅटर्न जबाबदार असुन व हा सर्व प्रकार मागील ५ वर्षापासून जगासमोर आल्यानंतरही सारे गप्प का होते हा सवालही किशोर तिवारी यांनी केला आहे .
८ नोव्हेंबर रोजी रिझर्व बँकेने परिपत्रक काढून बँकेवर निर्बंध लादले आहेत खातेदारांनी ५ हजार रूपये काढण्याचे निर्देश आरबीआयने दिले मात्र कालावधी स्पष्ट नमुद केलेला नाही ही सर्व परिस्थिती संचालक मंडळ तसेच बॅक व्यवस्थापनाने स्वत:च्या आर्थीक हितसंबंधातून व हितसंबंधांना कमी किमतीच्या मालमत्तांवर जास्त कर्ज दिल्याने थकित कर्ज व वसुलीचा समतोल एनपीए ७० टक्के नेण्यासाठी कारणीभुत झाली आहे.
कै बाबाजी दाते महिला बँकेग्रस्त ठेवीदार ग्राहक व कर्मचाऱ्यांचा यांच्या अनेक तक्रारी आरबीआई व जिल्हा उपनिबंधकांकडून कुठलीही कारवाई केली जात नाही,आमच्या कडे भरपुर प्रकरणे प्रलंबीत असून सवड मिळत नसल्याचे कारण दिले जाते. वास्तविक जिल्हा उपनिबंधकांचा कारभार संशयास्पद असल्याचे दिसून येत आहे,त्यांची भुमीका बँकेच्या बाजूला असून पिडीतांना अन्याय केला जात आहे. जिल्ह्यातील इतर शाखांमधूनही तक्रारींचा ओघ वाढला आहे.हा सर्व प्रकार आंधळा दळत आहे व कुत्रे खात आहेत असा असुन यावर एकही भाजपा आमदार मात्र बोलत नसुन त्यांच्या कार्यकर्त्यांचे जीवनभर कमाई करून जमविलेले घामाचे पैसे चोरांनी लुटल्यानंतर त्यांचा नाकर्तेपणा पाहण्यासारखा आहे .
सध्या महाराष्ट्रात अनेक नागरी सहकारी बँका व पत संस्था बाबाजी दाते महिला सहकारी बँकेचा कंचलवार पॅटर्न चालवीत असल्यामुळे त्यांचा एनपीए सुद्धा दाते महिला सहकारी बँके जास्त असुन फक्त ऑडीटर आरबीआय व सहकार खात्यातील चोर अधिकारी यांच्यामुळे दाबून ठेवण्यात येत आहे याचा पर्दाफाश लवकरच करू असा विश्वास किशोर तिवारी यांनी यावेळी व्यक्त केला .
====================================================