Monday, December 5, 2022

शिंदे सरकारच्या अन्यायाच्या विरोधात हजारो शेतकऱ्यांचा व आदिवास्यांचा सत्त्याग्रह सहभाग - प्रशासकीय नाकर्तेपणा विरोधात हजारो आंदोलन करते पोलीस स्टेशनमध्ये धडकले

शिंदे सरकारच्या  अन्यायाच्या विरोधात हजारो शेतकऱ्यांचा व आदिवास्यांचा सत्त्याग्रह सहभाग - प्रशासकीय नाकर्तेपणा विरोधात   हजारो आंदोलन करते पोलीस स्टेशनमध्ये धडकले 

दिनांक -६  डिसेंबर २०२२

महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस व वन मंत्री सुधीर मुनगंट्टीवार यांनी पूर्व विदर्भातील नागपुर चंद्र्पुर भंडारा गोंदीया गडचिरोली जिल्हांसाठी शिंदे सरकारने विषेय आदेश काढुन फक्त दिवसा १२ तास कृषी पंप वीज पुरवडा देण्याची व्यवस्था केली असुन मात्र ज्या पश्चिम  विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात अवनी वाघांनी दोन तीन वर्षापुर्वी डझनावर निरपराध बळी घेतले व मागील तीन वर्षात प्रत्येक आठवड्यात वाघांचे हल्ले शेतकऱ्यांवर व शेतमजुरांवर होत असुन यवतमाळ जिल्ह्यात भाजपा-शिंदे गटाचे पालकमंत्री ,खासदार व ७  आमदार असतांना वन्यप्राण्यांच्या त्रासामुळे हजारो हेक्टर मधील उभे  नष्ट होत असतांना काहीच कारवाई करीत नसल्यामुळे ,तसेच हजारो शेतकरी नुकसान भरपाई ,पीकविमा तर आदीवासी जमिनीचे पट्टे तर गरीब घरकुलाचे पट्टे न  मिळाल्यामुळे या अन्याय विरुद्ध  शेतकऱ्यांनी व आदिवास्यांनी एल्गार उगारला असुन आज यवतमाळ जिल्ह्यातील  पांढरकवडा येथे सत्ताग्रह आंदोलनात सहभाग घेतला  . 
 सर्व जबाबदार प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आंदोलनाची वेळी कार्यालयाला दांडी मारल्यामुळे सर्व आंदोलन कर्ते पांढरकवडा पोलीस स्टेशन मध्ये पोहचले मात्र अति जिल्हाधिकाऱ्यांनी चर्चेस आमंत्रण दिल्यामुळे ,सत्ताग्रहाची सांगता झाली 
यावेळी  आंदोलनाच्या प्रमुख मागण्या मध्ये  शेतकऱ्यांना २४ तास मोफत वीज पुरवडा व्हावा ,नापिकीग्रस्त पश्चिम विदर्भात पीकविमा मोबदला तसेच नुकसान भरपाई अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे मिळत नसल्याने यावर तात्काळ तोडगा काढावा ,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे प्रत्येक २०२२ मध्ये प्रत्येकाला पक्के घर देण्याची सरकारची योजना होती मात्र आज ८० टक्के पक्के घर नसणारी जनता प्रतीक्षेतच आहे सर्वांना घरकुल देण्यात यावे व आदिवास्यांना जमिनीचे पट्टे देण्यास प्रशासन कुचराई करीत आहे सर्व आदिवास्यांना जमिनीचे पट्टे द्यावे ह्या प्रमुख मागण्या पूर्ण होत नाही तोवर आंदोलन पुढे रेटण्याची घोषणा यावेळी आंदोलनाचे  संयोजक किशोर तिवारी व अंकित भाऊ नैताम यांनी दिली . 
नुकसान भरपाई देतांना प्रचंड नापिकी व पीकविमा देतांना नापीकी नाही 
ज्या यवतमाळ जिल्ह्यातील तालुक्यात अतिवृष्टी सरकारने १०० टक्के नुकसान भरपाई दिली त्याच तालुक्यात पीकविमा कंपनी बम्पर पीक आल्याचा अफलातून अहवाल देत पीकविमा मोबदला देण्यास स्पष्ट नकार देत आहे अशा वेळी कृषी विभाग व महसूल विभाग बघ्याच्या भूमिकेत असल्याने अडचणीत असलेले शेतकरी रस्त्यावर येत आहेत अशी माहीती शेतकरी नेते अजय राजूरकर ,प्रेम चव्हाण ,बाळासाहेब जाधव शिवनीकर यांनी दिली . 
वीज वितरण कंपनीचा अत्याचार थांबवा 
एकीकडे डुकरांचा हैदौस व त्याच वेळी वीज वितरण कंपनी कडून वारंवार खंडीत होणारा वीज पुरवडा त्यामुळे शेतकरी त्रस्त  झाले आहेत . वीज वितरण कंपनी सक्तीची वसुली नापिकीच्या वर्षात करीत असुन सर्व आजी-माजी आमदार व खासदार चूप आहेत आता या पोटभरू लोकप्रतिनिधी विरुद्ध आंदोलन सुरु करण्याचा इशारा शेतकरी नेते मोहन भाऊ मामीडवार व विजय तेलंगे यांनी यावेळी दिली 
या आंदोलनातं हजारो आदीवासी महीला शामील होत असल्याची  माहीती बाबू जैनेकर निलेश जयस्वाल सुरेश तलमले मनोज चव्हाण अशोक वाघाडे यांनी दिली 
या आंदोलनाच्या  सूरज जयस्वाल सतिश सूबुगडे गुड्डू जयस्वाल साहिल अंबादे सुजल गेडाम पवन नैताम  चेतन साळुंके सागर कांबळे नकुल जेनेकर गणेश कांबळे ओम ढाकणे संतोष चामलवार रामराव साळुंके गणेश कोल्हे सचिन मोरे बबलू धूर्वे गोलू बारसागडे गणेश तलमले हर्षल नैताम गोपाल इंधोरीया बाबू हजारे आशुतोष अंबादे सचिन मिसाळ  बबलू पोतिरवार अलोक कोटुरवार रफीक गौरी इरफान शेख यश तलमले सतिश जूनगरे शुभम साळुंके यश जोशी प्रदिप कोसरे चंदन जैनेकर गोलू पाल पंकज बोडस शुभम नागपुरे सहभागी झाले होते 
========================================================