Wednesday, April 19, 2023

चनाका बॅरेज महाराष्ट्रातील प्रकल्पग्रस्तना न्याय देण्यासाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांचा पुढाकार ३ मे ला करणार किशोर तिवारी यांच्याशी चर्चा

चनाका बॅरेज महाराष्ट्रातील प्रकल्पग्रस्तना न्याय देण्यासाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांचा पुढाकार ३ मे ला करणार किशोर तिवारी यांच्याशी चर्चा   

दिनांक -२८ अप्रिल २०२३


तेलंगणा सरकारने पैनगंगा नदीवर विराट बॅरेज चनाका येथे बांधले असुन  हे बॅरेज सर्व पर्यावरण व वन खात्याचे नियम धाब्यावर ठेऊन राज्य सरकारला न विचारता चनका गावातच हा बॅरेज भिंत बांधली असुन ज्यावेळेस हा बॅरेज बांधण्याची मंजुरी देण्यात आली होती त्यावेळेस एकही घर विस्थापित होणार नाही व चनाका गावाला धोका राहणार नाही मात्र सध्या संरक्षण भिंत फक्त २०० फुटाची असुन यामुळे संपूर्ण गावाला धोका निर्माण झाला आहे व बॅरेज पाणी सुद्धा महाराष्ट्रातील गावांना मिळणार नाही या कारणाने २० एप्रिल शेकडो प्रकल्पग्रस्त वंचित आदिवासी 
यांनी आंदोलन करून शिवसेनेचे राष्ट्रीय प्रवक्ते किशोर तिवारी यांच्या नेतृत्वात येत्या १ मे 'जल समाधी ' घालणार असल्याची घोषणा केली होती यावर तेलंगणा सरकारने लक्ष घातले तेलंगणा सरकारचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी येत्या ३ मे चर्चेसाठी निमंत्रित केले आहे त्यामुळे १ मे चा जल समाधी कार्यक्रम पुढे ढकलला असल्याची माहीती प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष गजानन गोदुरवार व सचिव दिलीप नुनेलवार यांनी दिली आहे 
महाराष्ट्राचे  मिंधे सरकार पैनगंगा पट्ट्यातील गावांसाठी उदासीन 

आंदोलनाकडे मिंधे सरकारचा  एकही अधिकारी आंदोलनाची सूद घेण्यासाठी चनाका कडे फिरकला नसुन ,स्थानीय आमदार सुद्धा झोपाळे मात्र  तेलंगणा सरकारचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव भारत राष्ट्र समिती काढून महाराष्ट्रात राजकीय अस्तिव निर्माण करीत असल्यामुळे या प्रश्न्नाकडे गंभीरपणे घेतले मात्र  त्याच वेळी  महाराष्ट्रातील हद्दीत गावासाठी मिंधे सरकारला विकत घेऊन बॅरेज बांधले असुन आता महाराष्ट्रातील जनतेला वाऱ्यावर सोडले आहे हा अन्याय असुन हा अन्याय  दूर झाला नाहीतर आता आपले आंदोलन सुरूच ठेवतील अशी माहीती युवा आदिवासी नेते अंकित नैताम यांनी  आहे . 

चनाका गावातील कोदोरी घुबडी कारेगाव अर्ली रूढा परिसरातील सर्व गावातील शेतकऱ्यांना व गावकऱ्यांना  सिंचनासाठी पाणी व घरपोच पिण्याचे पाणी  देऊन सुजलाम करण्याची घोषणा त्यावेळी तेलंगणा सरकारने केली  होती मात्र बॅरेज बांधकाम करतांना प्रचंड  स्फोट सुरंगामुळे अनेक घराची वाताहत झाली होपती त्यावेळी एकही पैसे मोबदला देण्यात आला नसून बॅरेजची भिंत अपुरी व कमी उंचीची बांधण्यात येत असल्यामुळे संपूर्ण चनाका गाव धोक्यात आले आहे मात्र यवतमाळ जिल्ह्याचे निकामी जिल्ह्याधिकारी झोपा  असुन विस्थापित जनतेला मिंधे सरकारने वाऱ्यावर सोडले असुन स्थानीय प्रशासन तेलंगणा सरकारची चाकरी करीत असून प्रकल्पग्रस्तांवरच फौजदारी कारवाई करीत असल्यामुळे यावेळी  अन्यायाविरुद्ध शिवसेनेचे राष्ट्रीय प्रवक्ते किशोर तिवारी यांनी येत्या २० एप्रिलला चनाका येथे ग्राम पंचायत  कार्यालयासमोर ह्या आंदोलनाचे आयोजन केले होते यावेळी युवा आदिवासी नेते अंकित नैताम   प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष गजानन गोदुरवार व सचिव दिलीप नुनेलवार यांनी सभेला संबोधित केले .या  आंदोलनात  श्रीरामभाऊं  नुन्नलवार ,नरशिंग अय्यपवार ,गंगाराम दांडेकर चंद्रकांत बंडेवार सुभाषभाऊ दांडेकर अडेलू मिटपेल्लीवार मनोहर दांडेकर रमेश मिटपेल्लीवार प्रशांत शेर्लावार देऊबाई मुक्कावार कलावती नक्कलवार राजू मोरेवार यांनी सहभाग घेतला होता  

हि तर मिंधेसरकारची दिवाळखोरी -किशोर तिवारी 

सर्व विस्थापितांना महाराष्ट्राच्या नियमाप्रमाणे मोबदला देणे तसेच  बॅरेज मधील ५०% पाण्यावर  महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना हक्क असतांना फक्त पैसे खाऊन तेलंगाना सरकार समोर स्वतःची विक्री केल्याने चनाका येथील हा अन्याय शिवसेनेने लावून धरला असुन आता मिंधे सरकारची पापांची लक्तरे तेलंगाणाच्या वेशीवर टांगण्याची घोषणा शिवसेनेचे राष्ट्रीय प्रवक्ते किशोर तिवारी यांनी  आंदोलनात केली होती . 

==============================================================