- म. टा. वृत्तसेवा। वर्धा
विदर्भात मोठ्या प्रमाणावर दुष्काळ पडला असून खेड्यांमध्ये पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चाऱ्याची टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे गांजलेल्या शेतकऱ्यांचा बजेटकडूनही अपेक्षाभंग झाल्यानंतर गेल्या तीन दिवसांत आठ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. राज्य मानवाधिकार आयोगाने शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची गंभीर दखल घेतली आहे.
विदर्भातील दुष्काळामुळे ग्रामीण भागात रोजगारीचे संकट उभे राहिले आहे. केंद सरकारकडून बजेटमध्ये निराशाच पदरी पडल्यानंतर कृष्णा साठे (नांदोरा, वर्धा), गजानन वावगे(दहिगाव, बुलढाणा), हरिश्चंद बुरांडे(विरली, भंडारा), आनंद ठाकरे (कासार, यवतमाळ), बबन डोंगरे (कुऱ्हाड, यवतमाळ), गुलाब वाघमारे (कळंब, यवतमाळ), ज्ञानराव तायडे (चमक, अमरावती) आणि वासुदेव गोमासे (आकोली, वर्धा) या आठ शेतकऱ्यांनी गेल्या तीन दिवसांत आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत.
या आत्महत्यांची गंभीर दखल घेत राज्य मानवाधिकार आयोगाने या प्रकरणाची सुनावणी येत्या २५ फेब्रुवारी रोजी ठेवली आहे.
No comments:
Post a Comment