http://loksatta.com/index.php?
नागपूर, ३० मार्च/प्रतिनिधी

महाराष्ट्र सरकारने उच्च न्यायालयात शपथपत्र सादर करून २०१० पर्यंत विदर्भातील सर्व कोलाम समाजाला १०० टक्के घरकुल सुविधा, अंत्योदय योजना, जमीन पट्टे देण्याचे मान्य केले होते. केंद्र सरकारने यासंबंधी राज्य सरकारला निधीसुद्धा उपलब्ध करुन दिला. मात्र, अधिकाऱ्यांनी व राजकीय नेत्यांनी हा निधी इतर कामासाठी वळवला व कोलाम समाजाला विकासापासून वंचित केले. स्वातंत्र्याच्या ६४ वर्षांनंतरही भारतीय घटनेत आदिम कोलाम समाजाला विकासासाठी कलम ३७१, ३७२ प्रमाणे विशेष अधिकार दिल्यानंतरही राज्य सरकार मात्र या अति मागास समाजावर सतत दुर्लक्ष करीत आहे.

या समाजाच्या विकासासाठी आलेला निधी इतर समाजासाठी वापरला जात असून हा अन्याय दूर करण्यासाठी आता एकत्रित लढा उभारण्याचा संकल्प करण्यात आला असून येत्या ६ एप्रिलला आयोजित मेळाव्यात विदर्भ जनआंदोलन समितीचे नेते किशोर तिवारी, आदिवासी नेते तुकाराम मेश्राम, अंकीत नैताम, भीमराव नैताम उपस्थित राहणार आहेत. कोलाम समाजबांधवांनी या मेळाव्याला उपस्थित राहावे, असे आवाहन श्यामराव टेकाम, लक्ष्मण दाभडी, दौलत रामपूरे, तुकाराम तुमकोड आदींनी केले आहे.
============
=========
No comments:
Post a Comment