लोकशाही वार्ता/१४ जानेवारी

महाराष्ट्र सरकारने मध्यस्थी केल्यानंतर व महाराष्ट्रातील साखर कारखानेदारांनी हमी भरल्यानंतरच खा. राजु शेट्टी यांनी आपले उपोषण मागे घेतले होते. मात्र विदर्भाच्या ऊस उत्पादक शेतकर्यांना १८00 रुपये भाव द्यावा यासाठी आघाडी सरकारने दबाव टाकावा, अशी मागणी विदर्भ जनआंदोलन समितीचे नेते किशोर तिवारी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना एका निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनाची एक प्रत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनाही देण्यात आली आहे.
विदर्भात सध्या सुरू असलेले सर्वच साखर कारखाने भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या पूर्ती उद्योग समुहाचे असून शेतकर्यांना मंजुर केलेल्या १८00 रुपये दर न देता फक्त १५00 रुपये द्यावे, हा निर्णय नितीन गडकरी यांनी स्वत: बैठकीत घेतला असून ऑक्टोबरच्या बारामती येथील खासदार राजू शेट्टी यांच्या ऊस उत्पादक शेतकर्यांच्या हमीभाव वाढीच्या आंदोलनाला महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी भेट देऊन सक्रिय पाठिंबा जाहीर केला होता. शिवसेना व मनसेनेही पाठिंबा दिला होता व मागण्या मंजूर झाल्यानंतर आंदोलनाच्या यशाचे श्रेय भाजपसह सर्व विरोधी पक्षांनी घेतले होते. मात्र राज्य सरकार व ऊस उत्पादकांमध्ये हमीभावबाबत झालेला समझोता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी केराच्या टोपलीत टाकल्यानंतर भाजपासह शिवसेना व मनसेही या विषयावर मौन साधुन आहे. हमीभाव न मिळाल्यास ऊस उत्पादक शेतकरी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या रामनगर निवासस्थानासमोर उपोषण, करेल अशी घोषणा किशोर तिवारी यांनी केली.
No comments:
Post a Comment