आम आदमी पार्टीने जागतीककरण व जैविक बियाण्यांवर आपले धोरण स्पष्ट करावे - किशोर तिवारी
http://www.suparbharat.com/newskishortiwari.html#.UtoEfzknIog.facebook
विदर्भ- दिल्ली येथे विधानसभेच्या निवडणुकीत प्रस्तापित पक्षांना आपली जागा दाखवत जनतेनी सामान्य कार्यकर्त्यांना आम आदमी पार्टीच्या रूपाने निवडुन दिल्यानंतर येत्या राष्ट्रीय सार्वजनिक निवडणुकांमध्ये आम आदमी पार्टी महत्वाची भुमिका बजावणार व भ्रष्टाचारी, पोटभरू नेत्यांना आपली जागा दाखविणार अशी चर्चा प्रसार माध्यमात जोरात सुरू असतांना आम आदमी पार्टीने दिल्ली येथे चिल्लर किराणा मध्ये विदेशी गुंतवणुक व बहुराष्ट्रीय कंपन्यांचे दारे बंद करून गरिबांना पाणी व विज स्वस्त देवुन जो दिलासा दिला आहे त्यामुळे अनेक सामाजिक नेत्यांनी आम आदमी पार्टीला पाठींबा दिला आहे अशा वेळेस आम आदमी पार्टीने आपले जागतीकरण व जैविक शेतीच्या संबंधी व विकासाच्या आराखड्यात गरिबांच्या विकासाचे स्थान यावर आपले धोरण स्पष्ट करावे अशी मागणी शेती व खुल्या बाजार व्यवस्थेचा विरोध करणारे आत्महत्याग्रस्त शेतकय्रांच्या कुटुंबाचे नेते किशोर तिवारी यांनी आम आदमी पार्टीचे नेते योगेंद्र यादव व प्रशांत भुषण यांना लिहीलेल्या पत्रात केली आहे.
भारतात जागतीककरण व जैविक तंत्रज्ञानामुळे २ लाखांवर शेतकय्रांच्या आत्महत्या
विदर्भही शेतकय्रांच्या आत्महत्येची राजधानी म्हणुन जगात कुप्रसिध्द होण्यास सरकारने कापसासाठी खुली लुट अर्थ व्यवस्था, उधारीकरण बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या जैविक बियाण्याच्या माध्यमातुन आलेले कृषी वरील पुर्ण नियंत्रण, ३० लाख कापुस उत्पादक शेतकय्रांना कर्जबाजारी तर १० हजारावर शेतकय्रांना मागील दशकात आत्महत्या करण्यास प्रमुख कारण म्हणुन समोर येत आहे. विश्व बँकेच्या दबावाने सरकारने कापसावरील अनुदान बंद केले आहे तर शेतीच्या पाण्याचे खाजगीकरण केले आहे. सध्या अस्तित्वात असलेले प्रमुख राष्ट्रीय पक्ष काँग्रेस व भाजप हे खुल्या अर्थ व्यवस्थेचे व जागतीककरणाच्या धोरणाचे खंदे पुरस्कर्ते असल्यामुळे त्यांच्या विकासाच्या आराखड्यात वंचीत आदीवासी व कर्जबाजारी कोरडवाहु शेतकय्रांना स्थान नसल्याची खंत विदर्भाच्या शेतकय्रांना सतत होत आहे मात्र आम आदमी पार्टीच्या रूपाने सध्या जनता परंपरागत भांडवलदारांच्या नियंत्रणात असलेल्या राजकीय पक्षांना पर्याय म्हणुन पाहत असुन मात्र या पक्षाने आपले आर्थिक धोरण स्पष्ट न केल्याने अनेक राजकीय संस्था व कार्यकर्ते समर्थन देण्यास मागेपुढे पाहत आहेत. तर पक्षाच्या नेतृत्वात गंभीरता नसणे, राष्ट्रीय प्रश्नावर व भारताच्या सार्वभौम अस्तित्वावर आपच्या नेत्याचे अस्पष्ट धोरण यामुळे आर्थिक धोरणाबाबती मवाळ भुमिका आली तर आप पासुनही वंचितांची, शेतकय्रांची व आदिवास्यांची निराशा होईल असे किशोर तिवारी यांनी म्हटले आहे. आप ने आपले जागतिककरण व जैविक शेती यावर भुमिका स्पष्ट करावी अशी विनंती विदर्भ जनआंदोलन समितीने केली आहे.
=========================================================