' आम्हाला सन्मानाने जगू द्या 'शेतकरी विधवांचा एल्गार-जाग तिक महिला दिनी उपोषण
उपोषणास बसलेले विदर्भ जनआंदोलन समितीचे नेते किशोर तिवारी व शेतकरी विधवास्थानिक
प्रतिनिधी / यवतमाळ
विदर्भात २00४ पासून होत असलेल्या शेतकरी आत्महत्यांनी ११ हजारावर निष्पाप शेतकरी विधवा व त्यांचे असहाय्य कुटुंबिय कर्जाच्या ओझ्यात विपन्नावस्थेच्या आर्थिक संकटात उपासमारीला तोंड देत असून या शेतकरी विधवांच्या ह्रदय हेलावणार्या दु:खाची वाट जागतिक महिलादिनी पांढरकवडा येथे आयोजित त्यांच्या उपोषण सत्याग्रहात मोकळी झाली व त्यांची प्रत्येक पाऊलावर होणारी प्रताडणा जीवन जगण्याचा लढा सन्मान व अधिकाराच्या प्राप्तीसाठी लागणारा संघर्ष पुरोगामी सरकार व समाजाला कलंक लावणारा असून सरकारने मागील दशकात शेतकर्याच्या आत्महत्यानंतर मदतीपासून वंचित असलेल्या १0 हजार शेतकरी विधवांना त्यांच्या शेतीचा अधिकार देण्यात यावा, त्यांच्या कुटुंबियांवरील संपुर्ण कर्ज माफ करण्यात यावे, प्रत्येक शेतकरी विधवांना ५ हजार रुपये प्रतिमहा सामाजिक सुरक्षा निर्वाह भत्ता देण्यात यावा, अन्नपुर्णा योजने अंतर्गत अन्नसुरक्षा देण्यात यावी, शेतकरी विधवांच्या मुलामुलीचे सर्व उच्च शिक्षण सरकारने मोफत करावे व शेतकरी विधवांच्या कुटुंबांना मोफत आरोग्य सुविधा द्यावी ज्या १0 हजार कुटुंबात शेतकर्यांच्या आत्महत्या झाल्या आहे. त्या कुटुंबातील एक व्यक्तीला सरकारी नोकरी देण्यात यावी असा एकमुखी ठराव मांडला व शेतकरी विधवा चंद्रकला मेर्शाम, अर्चना राऊत यांनी अनुमोदन केले.
या शेतकरी विधवांच्या उपोषण सत्याग्रहात अर्पणा मालीकर, रेखा गुणरुले, भारती पवार, माया वैद्य, शिला मांडवगडे, सरस्वतीबाई अंबरवार, अंजुबाई भुसारी, निर्मला शेंडे, नंदा भेंडारे, वंदना शेंडे, पुष्पा प्रधान, गिता राठोड, इंदुबाई आष्टेकर, रत्नमाला टेकाम, सुशीला आस्वले, लता भोयर, मिराबाई लोडे, मंगला बेतवार, पौर्णिमा कोपूलवार, रेखा चाहारे, संगीता पंचनेत्रीवार, उमा जिड्डेवार, ज्योती जिड्डेवार, गिता चिंचोळकर, कमलबाई सुरपाम, पार्वताबाई सोयाम, मंगलाताई किनाके, रमा ठमके, वंदना मोहुर्ले, प्रेमीला गेडाम, निर्मला कोहचाडे, राधाबाई मरापे यांनी सहभाग घेतला व आपल्या मागण्या रेटल्या.
निवडणुकीच्या धामधुमीमध्ये सारे राजकीय नेते व्यस्त आहे. मस्तवाल अधिकारी आचार संहितेच्या नावावर निरंकुश झाले आहे. अशा परिस्थितीमध्ये गारपीटग्रस्त व दुष्काळग्रस्त श्ेातकर्यांचे अर्शू पुसण्यात कोणीही तयार नाही. महाराष्ट्रातील अभुतपुर्व गारपीट व सैतानी पावसाने त्रस्त झालेल्या सुमारे ३0 लाख शेतकरी व ग्रामीण जनतेला तात्काळ मदत देण्यासाठी मुख्य निवडणूक आयोगाला विशेष ठराव करून या उपोषण सत्याग्रहात पारीत करण्यात आला व त्यांचा फॅक्स मुख्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी यांना देण्यात आल्याची उपोषण सत्याग्रहात शेतकरी नेते किशोर तिवारी, मोहन जाधव, सुरेश बोलेनवार, अंकीत नैताम, मोरेश्वर वातीले, नितिन कांबळे, नंदु जयस्वाल, भूमराव नैताम, प्रेम चव्हाण, संतोष नैताम, सुनिल राऊत सहभागी झाले होते
No comments:
Post a Comment