Monday, January 18, 2016

पंतप्रधानाच्या आवाहनाला प्रतिसाद देत महाराष्ट्राने "सिक्कीम सेंद्रीयशेती मॉडेल" विदर्भात लागू करावे -शेतकरी मिशनची मागणी

सिक्कीम "संपूर्ण सेंद्रीयशेती  राज्य"-पंतप्रधानाच्या आवाहनाला प्रतिसाद देत महाराष्ट्राने "सिक्कीम मॉडेल"   लागू करावे -शेतकरी मिशनची मागणी 

दिनांक १९ जानेवारी 

गंगटोक येथे १८ जानेवारी रोजी शाश्वत शेतीविषयी परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी   यांनी सिक्कीम हे संपूर्ण सेंद्रीय शेती करणारे भारतातील पहिले राज्य औपचारिक घोषणा करून इतर राज्यांनी सिक्कीम सेंद्रीयशेती मॉडेल" आपल्या राज्यात एकातरी जिल्यात लागु करावे असे केलेल्या आवाहनाचा दुवा घेत महाराष्ट्रातील कोरडवाहू दुष्काळग्रस्त विदर्भ व मराठवाड्याचा १४ जिल्यात शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सरकारने स्थापित केलेल्या शेतकरी मिशन संयोजक व शेतकरी चळवळीचे कार्यकर्ते किशोर तिवारी यांनी संपुर्ण विदर्भ व मराठवाड्यात विषमुक्त शेतीचे  "सिक्कीम सेंद्रीयशेती मॉडेल" लागू करावे अशी मागणीसाठी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी साकडे घातले आहे . 


सिक्कीम राज्यात ‘राष्ट्रीय सेंद्रीय उत्पादन कार्यक्रमातील मार्गदर्शक नियमांनुसार सेंद्रीय पद्धती आणि तत्त्वांचा वापर करून जवळपास 75 हजार हेक्टर शेतजमीन हळूहळू प्रमाणित सेंद्रीय जमिनीत रुपांतरीत करण्यात करण्यात आली.‘निसर्ग-पर्यावरणाच्या ऱ्हासाबाबत जगभर ओरड सुरू असताना या विषयावर अचूक मात्रा घेत सिक्कीमसारख्या एका छोटय़ाशा राज्याने संपूर्ण राज्यात केवळ ‘सेंद्रिय शेती’चे क्रांतिकारी पाऊल टाकले आहे. या प्रकारची शेती करणारे सिक्कीम हे देशातील पहिले राज्य ठरले  आहे. सध्या विदर्भ व मराठवाड्यात होत असलेल्या शेतकरी आत्महत्या ,रासायनिक खत ,कीटक नाशक व घेणाऱ्या रासायनिक रासायनिक औषधी यामुळे जीमिनीचे संपूर्ण पात गेली असुन आता शाश्वत विषमुक्त शेती हाच एकमेव पर्याय असून सिक्कीम राज्याने  पर्यटनाचा मुख्य स्रोत असलेल्या निसर्गाला गेल्या काही वर्षांमध्ये रासायनिक शेतीमुळे मोठा धोका उत्पन्न होऊ लागल्यावर या राज्याने  ‘सेंद्रिय शेती’चा प्रयोग.  १५ ऑगस्ट २०१० रोजी ‘सिक्कीम ऑरगॅनिक मिशन’ची घोषणा सुरु केला आता ही राष्ट्रीय चळवळ होणे गरजेचे असुन महाराष्ट्राच्या सरकारने तात्काळ आत्महत्याग्रस्त जिल्यात विषमुक्त शेतीचा पथदर्शी कार्यक्रम सुरु करावा अशी  मागणी शेतकरी मिशन संयोजक किशोर तिवारी  यांनी केली आहे . सध्या युरिया, नायट्रोजन व पोटाशिअम , फोस्फेट उत्पादने / रासायनिक खतांचा अती वापराणे जमीन हलकी पत गमावून बसली आहे  यामध्ये उत्पादक आणि त्याना मदत करणारे अधिकारी पुर्णपणे शामिल असुन आता कुठल्याही प्रकारची रासायनिक खते, औषधे, कीटकनाशकांच्या वापरावर र्निबध टाकणे वं  पारंपरिक निसर्गपूरक शेती पद्धती, प्रदेशनिष्ठ पिकांचीच निवड, बाह्य़ घटकांचा कमीतकमी वापर हा मंत्र असलेल्या  ‘सेंद्रिय’ पद्धतीची हाच एकमेव मार्ग असुन सरकारने तात्काळ आत्महत्याग्रस्त जिल्यात हा मार्ग स्वीकारावा अशी मागणी  किशोर तिवारी  यांनी केली आहे 

शेतकरी मिशन मागील सहा महीन्यापासून सर्व दुष्काळग्रस्त व नापिकीग्रस्त शेतकऱ्यांना नव्याने पत पुरवढा , शेती खर्चात बचत, बाजारपेठेशी जोडणी आणि वाढीव बाजारमूल्य यावर काम करीत असुन विषमुक्त शेतीच  कोरडवाहु जमीन , शेतकरी, समाज, आरोग्य, अर्थव्यवस्था आणि निसर्ग-पर्यावरण या साऱ्या घटकांमध्ये दुरुस्ती करू शकते तरी  सिक्कीममध्ये सुरू झालेली ही चळवळ आता देशव्यापी होणे हे मानवजातीच्या हिताचे आहे,यासाठी शेतकरी मिशन कालबद्ध देत असल्याची माहितीही किशोर तिवारी यांनी यावेळी दिली . 

No comments: