परंपरागत शेतीचा आवळगाव पॅटर्नला शेतकऱ्यांचा वाढता प्रतिसाद
झरी तालुक्यातील ५० आदिवासी कुटुंबाना देशी कापूस बियाणे वाटप
दिनांक ३ जुलै २०१६
मारेगाव तालुक्यातील आवळगाव येथे कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन, कृषि विभाग, महाराष्ट्र शासन आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला यांच्या संयुक्त विधमाने बिगर बीटी देशी कापूस बियाणे उत्पादनाचा अभिनव कार्यक्रम ११३ आदिवासी शेतकऱ्याच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे.
याच कार्यक्रमातून प्रेरणा घेऊन श्री किशोर तिवारी अध्यक्ष, कै.वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन याच्या प्रयत्नातून झरी तालुक्यातील हिवरा बा., कटली बोरगाव, पालगाव, बोटोनी, पाचपोर, या गावातील ५० शेतकर्यांनी स्वंयस्फूर्ती ने बिगर बीटी कापूस बियाणे उत्पादन कार्यक्रम राबविण्याचा मानस दर्शविला या करिता श्री डी.आय . गायकवाड, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, यवतमाळ आणि डॉ. सी. यु . पाटील, सहयोगी संशोधन संचालक, विभागीय करीशी संशोधन केंद्र यवतमाळ यांनी बिगर बीटी बियाणे उपलब्ध करून दिले.
कृषि दिनाचे औचित्य साधून उपविभागीय कृषि अधिकारी कार्यालय पांढरकवडा येथे कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष श्री किशोर तिवारी यांच्या हस्ते बिगर बीटी कापूस बियाणे वाटप व वृक्षरोपणाचा कार्यक्रम पार पडला.
पारंपारिक शेतीचा आवळगाव पटर्ण राज्यभर राबवण्याचा मनोदय श्री किशोर तिवारी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात जाहीर केले.
कोरडवाहू क्षेत्रात कापसाच्या बीटी बियाण्याचा वापर, कृषि निविष्ठेकरिता बाजारावरील अवलंबित्व या मुळे शेतीतील नफा कमी होत आहे. या सर्व परिस्थितीवर मात करण्याकरिता शेतकऱ्यांनी स्वावलंबी शाश्वत शेतीची कास धरून, वाटप करण्यात आलेल्या बियाण्यातून बियाणे उत्पादित करून, गावात ‘देशी कापसाची बियाणे बँक’ उभारण्याचे आवाहन श्री किशोर तिवारी यांनी केले .
शेतकर्यांना मार्गदर्शन करताना उपविभागीय कृषि अधिकारी पांढरकवडा, श्री. राहुल सातपुते यांनी अति घनता कापूस लागवड व बियाणे उत्पादन कार्यक्रम विषय माहिती दिली. अजूनहि शेतकरी स्वंयस्फूर्तीने देशी कापूस बियाणे उत्पादन करण्यास इच्छुक असल्यास त्यांना कृषि विभागामार्फत बियाणे उपलब्ध करून देण्यात येईल तसेच शेतकऱ्याच्या अडचणी सोडविण्याकरिता कृषि विभाग सदैव तत्पर राहील याची ग्वाही दिली.
कृषि दिनाच्या दिवशी उपविभागीय कृषि अधिकारी कार्यालयाच्या परिसरात श्री किशोर तिवारी यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या उपस्थितीत वृक्षरोपण करण्यात आले. कृषि दिनाच्या या कार्यक्रमात माजी जि.प.सदस्य धर्मा अत्राम , श्री मुन्ना बोलेनवार , श्री अंकित नैताम, श्री मोहन जाधव, श्री. एम.बी. गोंधळी, तंत्र अधिकारी पांढरकवडा, कु. सोनाली कवडे, कृषि अधिकारी, श्री. निलेश ओळंबे, कु. ए. एच. बोके कृषि स., श्री गजानन कोरे इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन रोहित राठोड यांनी केले. या कार्यक्रमाच्या याश्स्वीतेकारिता कार्यालयातील सर्व कर्मचारी व अधिकारी यांनी हातभार लावला. कार्यक्रमास शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
No comments:
Post a Comment