जांबुवंतराव धोटे :एका महान जनआंदोलकाचा अंत :वेगळ्या विदर्भराज्याची निर्मिती हीच धोटे यांना खरी श्रध्दांजली
१८ फेबु २०१७
वेगळ्या विदर्भाच्या आंदोलनाचे आधारस्तंभ एक महान जनआंदोलक आज आम्ही गमावला असुन वेगळ्या विदर्भराज्याची निर्मिती हीच माजी खासदार जांबुवंतराव धोटे यांना खरी श्रध्दांजली होईल अशी भावना शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी व्यक्ती केली आहे.. आपल्या मध्ये जनआंदोलनची प्रेरणा लहानपणापासुन जांबुवंतराव धोटे यांच्यामुळेच मिळाली मला प्रत्येक जनआंदोलनात जांबुवंतराव धोटेभाऊंचा सतत आधार होता आज धोटेंच्या निधनाने आमच्या सारख्या विदर्भाच्या आंदोलकांवर शोककळा पसरली आहे व आम्ही निराधार झालो आहोत . विदर्भातील शेतकऱ्यांच्या समस्यांसोबतच वेगळ्या विदर्भाचा मुद्दा धोटेंनी आक्रमकपणे मांडला सतत त्यांचे प्रश्न मार्गी लावले . त्यासाठी आयुष्यभर कणखर लढा दिला. या दरम्यान त्यांना अनेक सहकारी सोडून गेले. तरीही त्यांनी माघार घेतली नाही. त्यामुळे त्यांना ‘विदर्भवीर’ असेही संबोधले जात होते.आज विदर्भवीर जांबुवंतराव धोटे यांच्या निधनाने विदर्भ राज्य निर्मितीच्या आंदोलनातील सच्चा नेता हरपला आहे त्यांनी आपले सर्व जिवन वेगळ्या विदर्भ राज्य निर्मितीच्या आंदोलनात त्यांनी स्वतःला झोकून दिले होते असे किशोर तिवारी यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले की, विधानसभा सदस्य, लोकसभा सदस्य म्हणून त्यांनी सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी त्यांनी सतत संघर्ष केला होता . सर्वसामान्य जनतेच्या सुख-दुःखाशी समरस होत त्यांनी नेहमीच निर्धाराने आंदोलन करून गरीबांचे प्रश्न सरकारी दरबारात, विधिमंडळात, संसदेत मांडली व सोडविलें होते . एक सर्जनशील कलावंत त्यांव थोर बहुआयामी नेत्याच्या निधनाने सामाजिक, राजकीय क्षेत्राची मोठी हानी असुन त्यांना वेगळे विदर्भ राज्य निर्माण करून खरी खरी श्रध्दांजली द्यावी ही काळाची गरज असल्याचे तिवारी यांनी आपल्या वेदनांना वाट करीत म्हटले आहे .
आपल्या लहानपणाच्या आठवणीमध्ये विदर्भवीर भाऊ जांबुवंतराव धोटे यांनी स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी आयुष्यभर संघर्ष आजही उभा असुन भाऊंच्या एका शब्दावर लाखो लोक विदर्भ आंदोलनात सहभागी होत होते आणि त्यांनी त्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्र विदर्भाच्या मागणीसाठी दणाणून सोडला होता व आज ना उद्या विदर्भ राज्य होईल या आशेवर भाऊ शेवटपर्यंत संघर्ष करत होते. त्यांच्यासमोर विदर्भ राज्य होईल हि आशा होती परंतु नियतीला वेगळेच काही मान्य असावे मात्र .जेव्हा कधी विदर्भ राज्य होईल तेव्हा हे राज्य बघायला भाऊ नसेल याचे तीव्र दुःख होत आहे. भाऊंचे विदर्भ राज्याचे स्वप्न आपण साकारण्याचा प्रयत्न करू. भाऊंना भावपूर्ण श्रद्धांजली अशी तीव्र भावना किशोर तिवारी व्यक्त केली आहे . ..