Sunday, September 23, 2018

पाटणबोरी स्टेट बँक २० सप्टेंबरपासून बंद : शेतकऱ्यांना पीककर्ज नाकारणाऱ्या बँक व्यवस्थापकाचा स्मरणार्थ बँक अधिकारी संघटनेने शेतकरी व ग्राहकांच्या सेवा रोखल्या

पाटणबोरी  स्टेट बँक २० सप्टेंबरपासून बंद : शेतकऱ्यांना पीककर्ज नाकारणाऱ्या बँक व्यवस्थापकाचा स्मरणार्थ बँक अधिकारी संघटनेने शेतकरी  व ग्राहकांच्या सेवा रोखल्या 
दिनांक २४सप्टेंबर २०१८
यवतमाळ जिल्हातील पाटणबोरी येथील स्टेट बँकेमध्ये पीककर्ज मिळावे यासाठी २ महिन्यापासून १० ते १५ वेळा चक्र मारूनही पात्र शेतकऱ्यांना नवीन पीककर्ज खरीप हंगाम संपत असतांना मिळत नसल्याच्या तसेच बँकेत आदिवासी वृद्ध विधवा महीला यांना सरकारी अनुदानही ५ ते १० वेळा चकरा मारूनही मिळत नसल्याच्या शेकडो तक्रारी घेऊन बँकेसमोर मागणी करणाऱ्या जमावाला शांत करण्यासाठी १९ सप्टेंबरला पाटणबोरी स्टेट बँकेसमोर शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी बँक मॅनेजरला देत असलेल्या त्रासाबद्दल सुनावल्यामुळे तिवारी यांनी मूर्ख नालायक कामचुकार  म्हटले याच्या विरोधात बँक संघटनेने बँकेच्या व्यवस्थापनाच्या अनुमतीने पाटणबोरी स्टेट बँकच बंद करून आपल्या सेवा अचानक सर्व ग्राहकांना बंद केल्या असुन या घटनेचा तिव्र निषेध करीत हे आपण शेतकऱ्यांसाठी अविरतपणे बँकांच्या उदासीन धोरणाविरुद्ध सूर असलेल्या लढा रोखावा यासाठी दबावतंत्र असुन जर आपल्या विरुद्ध तक्रार असल्यास आपणावर कायद्याच्या चौकटीत कारवाई तात्काळ करावी मात्र सरकारी बँक कोणतीही सूचना न देता बेमुदत बंद करणे बँक अधिकारी संघटनेकडुन आपली समांतर सत्ता गाजविण्याचा प्रकार असुन अख्ख्या विदर्भ व मराठवाड्यात स्टेट बँकेने सर्वात कमी पिक कर्ज वाटप केले आहे ,यवतमाळ जिल्हात जिल्हाधिकाऱ्यांनी १४४ कोटी रुपयाची खाती बंद केल्यांनतर जेमतेम ५० टक्के वाटप करण्यात आले आहे ,वाशीम ,अमरावती ,अकोला ,बुलढाणा .हिंगोली ,परभणी ,बीड सह अनेक जिल्हात स्टेट बँकेनी पीककर्ज वाटपात २५ ते ३५ टक्केच वाटप केले आहे ,आपला सर्व स्टेट बँक अधिकाऱ्यांशी वारंवार वाद होत असुन आपण यांची भारत सरकारला अनेक तक्रारी केल्या आहेत आता पाटणबोरी स्टेट बँकेच्या घटनेचा बाजार मांडून आपण पीककर्ज वाटपाचा पाठपुरावा करू नये व महाराष्ट्र सरकारने किशोर तिवारीच्या बंदोबस्त करावा या मागणीसाठी सुरु असलेल्या स्टेट बँक अधिकारी संघटनेच्या आंदोलनास शेतकऱ्यांनी व ग्राहकांनी समजून घ्यावी यासाठी हा खुलासा
पाटण बोरी साठे बँकेच्या सेवा क्षेत्रात येणाऱ्या रूढा ,अर्ली ,घुबडी ,सुन्ना .,कोदोरी येथील शेतकऱ्यांनी आपण मागील २ महिन्यापासून सतत चक्रामारूनही पीककर्ज मिळत नसल्याच्या प्रचंड तक्रारी आल्यामुळे  तसेच  १२ सप्टेम्बर नंतर खरीप वाटप बंद झाले असे बँक अधिकाऱ्यांनी घोषीत केल्यामुळे जिल्हा परीषद सदयस गजानन बेजंकीवार पिक कर्ज वाटप मेळावा १९ सप्टेंबरला पाटणबोरी स्टेट बँकेसमोर लावला व याला शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी ,लोकनेते माजी आमदार अण्णासाहेब पारवेकर यांना आंमत्रित केले होते . १९ सप्टेंबरच्या सकाळपासूनच ५०० च्या वर शेतकरी ,महीला बजेट गटाच्या महीला ,आदीवासी ,निराधार वृद्ध व विधवा जमले होते  . स्टेट बँकेच्या कामकाजाविषयी प्रचंड असंतोष त्यावेळी प्रगट होता त्यावेळी परिस्थिती स्फोटक होती .
कार्यक्रमाची बातमी 
https://youtu.be/GMriMenjodE

स्टेट बँकेचे प्रादेशिक व्यवस्थापक जयंतराव घोडखांदे यांनी मला फोन करून तात्काळ बोलावुन घेतले ,आपण जनतेला शांत  केल्यांनतर आपल्या तक्रारी देण्यास सांगीतले त्यावेळी तक्रारीचा पाऊस पडला त्यामध्ये खालील तक्रारीमुळे आम्ही सर्वानी आपली मान लज्जेने खाली झाली .... 
१. अर्ली येथील मागासवर्गीय ९ महिन्याच्या  गर्भवती महिलेने २ महिन्यांपासून सतत चक्रामारूनही आम्हला पिक कर्ज देण्यास आज या उद्या या आज पर्यंत कर्ज मिळाले नसल्याची तक्रार केली . 
२. घुबडी येथील कुमरे या ७२ वर्षाच्या आदीवासी वृद्धांनी मागील ३ महिन्यापासून आपण ५ वेळा आलो मात्र केस तयार असूनही पीककर्ज नाकारले . 
३.पीवरडोल येथील शेतकरी महीला महिलेने माझे ५० हजाराचे पीककर्ज मंजूर झाले असतांना दिवसभर बसवूनही हातपाय झोडूनही बँक अधिकाऱ्यांनी सणासाठी ५०० रु. ही दिले नाही . 
४. सरकारी अनुदान व निराधार निराधार वृद्ध व विधवायांचे बँकेत जमा झालेले पैसे महिन्या भऱ्यापासून मिळत नसल्याची तक्रारी शेकडो  वृद्धांनी महिलांनी केली . 
५.रूढा व गवारा सह शेतकडो शेतकऱ्यांनी सरकारने पीककर्ज वाटप बंद केल्याचे सांगुन बँक मॅनेजरने परत पाठविल्याची तक्रार केली . 
६. बँकेत ज्या लोकांना पीककर्ज मंजूर झाले त्यांना सरकारी प्रमाणे न देता बँक मॅनेजर मर्जीने देत असल्याची तक्रार यावेळी केली . 
७. अनेक ग्राहकांनी पैसे काढण्यासाठी दिवस दिवसभर उन्हात उभे रहावे लागत असल्याची तक्रार केली . 
८. बँक कॅशियर पैसे मोजता येत नसल्यामुळे व बँक मॅनेजर दिवस मोबाईलवर चिट चॅटींग करीत बसत असल्याची तक्रार यावेळी केली. बँक अधिकारी महिलांना व ग्राहकांचा सतत अपमान करतात ही तक्रार यावेळी करण्यात आली . 
९.बँकेत मुद्रा योजनेसाठी एकालाही कर्ज मिळत नसल्याची तक्रार शेकडो नागरीकांनी यावेळी केली . 
१०. बँकेत पीककर्जाच्या अनेक फाईल गहाळ झाल्याची तसेच सर्च रिपोर्ट सह सर्व बँकांचे नाहरकत बँक अधिकारी मागत असल्याची तक्रार यावेळी करण्यात आली . 
११. बँक मॅनेजरला बँकेच्या कर्ज समाधान योजनेविषयी विचारले असता या बँकेला लागु  नाही असे उत्तर दिले . 
१२.-ज्या शेतकऱ्यांचे पीककर्ज सरकारने माफ केले व कर्जमाफीची रक्कमही बँकेत दिली तरी बँकेने नवीन   पीककर्ज नाकारले अशी तक्रार यावेळी करण्यात आली . 

आपण पाटणबोरी बँक मॅनेजर वरील तक्रारी खऱ्या की खोट्या यावर विचारणा केली असता त्यांनी तक्रारी खऱ्या आहेत माझे होते ते करा असे उत्तर दिले व आपण दोन महिन्यांपासून आले असुन २५० च्या वर शेतकऱ्यांच्या पीककर्जाचे प्रकरण प्रलंबित असल्याचे सांगीतले व मला पीककर्ज वाटप बंद करण्याचे वरून सांगण्यात आल्याचे सांगीतले . आपण सरकारी नियमांचे पालन करून पिक कर्ज मर्यादा कमी का केली तर मला पीककर्ज वाटपाचे नियम माहीत नसल्याचे उत्तर दिले . बँकेत फक्त ६ कर्मचारी व २ अधिकारी असल्याने कामे होत नसल्याचे सांगुन मुजोऱ्या करण्यास सुरवात केल्यावर जनतेचा आक्रोश कमी करण्यासाठी स्टेट बँकेचे प्रादेशिक व्यवस्थापक जयंतराव घोडखांदे यांनी सर्व पात्र शेतकऱ्यांना  येत्या ७ दिवसात कर्ज देण्यात येणार असल्याची हमी दिली व पीककर्ज मेळावा आटोपला मात्र त्यांनतर बँक अधिकाऱ्यांनी आपली झाडा झडती घेताना किशोर तिवारी यांनी आपण नालायक ,गाढव व इतर ठिकाणी जागा मिळाली नाही बिहारवरून पाठविले ,मंत्री दर्जा असल्यामुळे शांत आहे जर शेतकऱ्यांना व आदीवासी वृद्ध व विधवांना सन्मान दिला नाही तर पुढच्या वेळेस बदडल्याशिवाय जाणार नाही अशी धमकी दिल्याने स्टेट बँक बँकेच्या अधिकाऱ्यांच्या आदेशाने शुक्रवारपासुन बंद केल्याचे जाहीर केले असल्याचे बँक अधिकारी संघटनेच्या पदाधिकाऱ्याने आपणास सांगितले ,आपण ह्या हुकूमशाही शेवट पर्यंत विरोध करणार व बँकांची मुजोरी विरुद्ध आंदोलन सुरु करणार असल्याची माहीती यावेळी दिली . 
स्टेट बँक पाटणबोरी बंद करणाऱ्या ३ घटना 
१ घटना पहीली - वर्ष २०१६-२०१७ खरीप हंगामात स्टेट बँक मॅनेजर बारई यांनी पीककर्ज मागणाऱ्या शेतकऱ्याला संगणकाच्या मॉनिटरने मारले पोलिसात गुन्हा दाखल 
बँकेची कारवाई - नागपूर विभागीय कार्यालयात पदोन्नती देऊन बदली 
२. घटना दुसरी -वर्ष २०१८-२०१९ खरीप हंगामात स्टेट बँक मॅनेजर प्रश्नात फटिंग यांनी झरी तहसीलदार यांनी दिलेला मदतीचा धनादेश नाकारला व तलसीलदारांना खुलेआम धमकी दिली . 
बँकेची कारवाई - नागपूर विभागीय कार्यालयात पदोन्नती देऊन बदली 
३. घटना तीसरी -१९ सप्टेंबर २०१८ रोजी खरीप हंगाम संपत आलं तरी २५० शेतकऱ्यांना पीककर्ज नाकारल्यामुळे पीककर्ज मेळावा 
बँकेची कारवाई - बँक व्यवस्थापनाकडून कोणतीही चौकशी न करता पाटणबोरी स्टेट बँक बंद करण्याच्या निर्णय 
वरील तीनही घटनांमध्ये शेतकरी वा बँकांच्या ग्राहकांनी कोणतीही अनुचित घटना केलेली नाही ,आज पर्यंत एकही तक्रार शेतकऱ्याविरुद्ध बँक अधिकाऱ्यांनी केलेली नाही


शेतकऱ्यांना पिककर्ज नाकारणाऱ्या सरकारी बँकामध्ये स्टेट बँक आघाडीवर 
अख्ख्या विदर्भ व मराठवाड्यात आत्महत्याग्रस्त भागात महाराष्ट्र सरकारच्या कर्जमाफीच्या सर्व तीनतेरा करून पीककर्ज नाकारणाऱ्या सरकारी बँकांमध्ये स्टेट बँक आघाडीवर असून आपण  विदर्भ व मराठवाड्यात  स्टेट बँकेच्या शाखानिहाय भेटी देऊन झाडाझडती घेत असल्यामुळे दररोज किशोर तिवारींचा बंदोबस्त करा असे निरोप सोशल मीडियावर टाकत आहे ,पाटणबोरीच्या घटनेचा आवाज मुंबई मध्ये घेऊन जाणारे महाभाग नागपूर पावर  कंपनीच्या घबाडाचे धनी आहेत ज्यांची पत नाही अशांना २० हजार कोटीचे कर्ज देणारे ३० लाख शेतकऱ्यांना ३० लाख कोटीची जमीन  असतांना ३ हजार कोटी कर्ज नाकारतात व त्यांचा झळ करतात त्या मस्तवाल अधिकाऱ्यांना सरकार रोखत नसल्यास हे शेतकऱ्यांचे दुर्भाग्य आहे . 
पाटणबोरी स्टेट बँक बंद घटनेची चौकशी करा 
तडकाफडकी बंद करण्याच्या तसेच बँक व्यवस्थापक यांनी केलेल्या तक्रारीची उच्च स्तरीय न्यायालयीन चौकशी करण्यात यावी ज्या इतर दोन घटनांचा उलेख्ख बँक करण्यात आला आहे त्याची सुद्धा  उच्च स्तरीय न्यायालयीन चौकशी करण्यात यावी ही आपली मागणी असुन यासाठी आपण २ ऑक्टोबर पासुन बँकेसमोर उपोषण सत्याग्रह सुरु करणार असल्याची माहीती किशोर तिवारी यांनी दिली 
==================================================











No comments: