शेतकरी स्वावलंबन मिशन च्या कार्यक्षेत्रात महायुतीला मिळालेले यश :
शेतकरी व ग्रामीण जनतेचा बहुमताचा कौल महायुतीचे बाजूनेच !-- किशोर तिवारी
दि. २५ ऑक्टोबर २०१९ --
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूक निकालाचे सविस्तर विश्लेषण केले असता विदर्भ व मराठवाडयातील १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हयांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेत्तृत्वातील युती सरकारने स्थापन केलेल्या स्व. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनच्या कार्यक्षेत्रात महायुतीला ब-यापैकी यश मिळाले असल्याचे स्पष्ट होत आहे. मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांच्या विगत साडेचार वर्षाच्या अथक पाठपुराव्याने शासनाच्या शेतकरी व ग्रामीण जनजीवनासाठी असलेल्या अनेक कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यात मिशनने जे प्रयत्न केलेत़ , त्यामुळे मिशनच्या कार्यक्षेत्रातील पश्चिम विदर्भातील यवतमाळ, अकोला, वाशिम, अमरावती, बुलढाण्यासह वर्धा जिल्हयातील एकूण ३४ विधानसभेच्या जागांपैकी महायुतीला २२ जागी यश प्राप्त झाले असून मिशनच्या कार्यक्षेत्रातील मराठवाडयातील सर्व आठही जिहयांत एकूण ४६ जागांपैकी २९ जागी महायुतीला विजय प्राप्त झाल्याने मिशनच्या कार्यक्षेत्रात असलेल्या विधानसभेच्या एकूण ८० जागांपैकी ५१ जागांवर विजय प्राप्त झाला असून शेतकरी व ग्रामीण जनतेचा बहुमताचा कौल महायुतीचे बाजूनेच असल्याचे स्पष्ट होते, असे प्रतिपादन शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष व शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांचे शेती व ग्रामीण अर्थव्यवस्था संबंधी सल्लागार किशोर तिवारी यांनी व्यक्त केले आहे.
शेतकरी मिशनने स्वतंत्रपणे पाठपुरावा करुन शेतकरी व ग्रामीण जनतेच्या कल्याणासाठी युती सरकारने केलेल्या योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यात येणा-या अडचणी दूर करण्यासाठी गेल्या साडेचार वर्षात अथक प्रयत्न केलेत. त्यामुळे कर्जमाफी, शेती पत पुरवठा करण्यात राष्ट्रीयकृत बँकाची कुचराईवर मात, आरोग्यासंबंधी असलेल्या योजनांचा लाभ, किमानभूत शेतमालाच्या किंमती मिळवून देण्यात केलेले प्रयत्न, प्रशासन लोकाभिमुख व्हावेत यासाठी केलेले प्रयत्न, ग्रामीण जनजीवनात प्रत्यक्ष मिसळून घेण्यात आलेले “सरकार आपल्या दारी” यासारखे लोकोपयोगी कार्यक्रम राबविण्यात मिळालेले यश इत्यादीमुळे युती सरकारच्या अनेक लोकोपयोगी योजनांचा लाभ मिळवून देण्यात मिशनला यश प्राप्त झाले आणि त्याची प्रचिती विधानसभा निवडणुकीच्या निकालावरुन आता स्पष्ट दिसत आहे. मिशनच्या कार्यक्षेत्रातील यवतमाळ जिल्हयात महायुतीला ७ पैकी ६ जागा राखण्यात यश मिळाले आहे. त्याचप्रमाणे अकोला जिल्हयातील ५ पैकी ५ जागा, बुलडाणा जिल्हयातील ७ पैकी ५ जागा, वाशिम जिल्हयातील ३ पैकी २ जागा, वर्धा जिल्हयातील ४ पैकी ३ जागांवर महायुतीला यश प्राप्त झाले असून फक्त अमरावती जिल्हयात ८ पैकी १ जागा मिळाल्याने तो अपवाद वगळता पश्चिम विदर्भातील शेतकरी व ग्रामीण वैफल्यग्रस्त क्षेत्रात मिशनच्या अथक प्रयत्नाने एक सकारात्मक विजय दिसून येत असून ३४ पैकी २२ जागा जनतेने निवडून दिल्या आहेत. त्याचप्रमाणे मराठवाडयातील ग्रामीण भागातील शेतकरी व सामान्य जनतेने दिलेल्या भरघोस पाठींब्याने औरंगाबाद जिल्हयातील सर्व ९ पैकी ९ जागा, उस्मानाबाद जिल्हयातील सर्व ४ पैकी ४ जागा, नांदेड जिल्हयातील ९ पैकी ४ जागा, हिंगोली जिल्हयातील ३ पैकी २ जागा, जालना जिहयातील ५ पैकी ३ जागा, बीड जिल्हयातील ६ पैकी २ जागा, परभणी जिल्हयातील ४ पैकी ३ जागा, लातूर जिल्हयातील ६ पैकी २ जागा महायुतीला मिळून एकूण ४६ जागांपैकी २९ जागी विजय प्राप्त होऊन यश मिळाले आहे. अशाप्रकारे शेतकरी मिशनच्या १४ जिल्हयातील विस्तृत कार्यक्षेत्रात ८० पैकी ५१ विधानसभा क्षेत्रात महायुतीला यश प्राप्त झाल्याने नव्या सरकारच्या स्थापनेचा महायुतीचा मार्ग मोकळा झाला असल्याचे तिवारी यांनी स्पष्ट करुन शेतकरी व ग्रामीण जनतेचे आभार व्यक्त केले आहेत.
शेतकरी मिशनच्या कार्यक्षेत्रात महायुतीला मिळालेल्या यशाचे विवरण खालीलप्रमाणे
*पश्चिम विदर्भ*
(६ जिल्हे : अमरावती विभाग व वर्धा जिल्हा )
एकूण ३४ जागा पैकी २२ जागी विजय ...!
*यवतमाळ *
( ७ पैकी ६ जागी विजय )
दिग्रस - संजय राठोड - शिवसेना
यवतमाळ - मदन येरावार - भाजप
आर्णी - डॉ संदिप धूरवे - भाजप
राळेगाव - डॉ. प्रा. अशोक उईके - भाजप
वणी - संजीव रेड्डी बोदकुरवार - भाजप
उमरखेड - नामदेवराव ससाणे – भाजप
*अकोला*
(५ पैकी सर्व ५ जागी विजय)
अकोट - प्रकाश भारसाकळे, भाजप
अकोला पश्चिम - गोवर्धन शर्मा, भाजप
अकोला पूर्व - रणधीर सावरकर, भाजप
बाळापूर - नितीन टाले - देशमुख-शिवसेना
मूर्तिजापूर - हरीश पिंपळे, भाजप
*बुलडाणा*
( ७ पैकी ५ जागी विजय )
खामगाव - आकाश फुंडकर, भाजप
चिखली - श्वेता महाले, भाजप
जळगाव जामोद - संजय कुटे, भाजप
बुलडाणा - संजय गायकवाड, शिवसेना
मेहकर - संजय रायमुलकर, शिवसेना
*वाशिम*
( ३ पैकी २ जागी विजय )
कारंजा - राजेंद्र पाटनी, भाजप
वाशिम - लखन मलिक, भाजप
*अमरावती*
( ८ पैकी १ जागी विजय )
धामणगाव रेल्वे - प्रताप अडसड, भाजप
*वर्धा*
( ४ पैकी ३ जागी विजय )
आर्वी - दादाराव केचे, भाजप
हिंगणघाट -समीर कुनावार, भाजप
वर्धा - डॉ. पंकज भोयर, भाजप
*मराठवाडा* ( सर्व - ८ जिल्हे )
एकूण ४६ जागा पैकी २९ जागी विजय
*औरंगाबाद*
(९ पैकी सर्व ९ जागी विजय)
औरंगाबाद पश्चिम - संजय शिरसाट, शिवसेना
औरंगाबाद पूर्व - अतुल सावे, भाजप
औरंगाबाद मध्य - प्रदीप जयस्वाल, शिवसेना
कन्नड - उदयसिंह राजपूत, शिवसेना
गंगापूर - प्रशांत बंब, भाजप
पैठण - संदीपान भुमरे, शिवसेना
फुलंब्री - हरीभाऊ बागडे, भाजप
वैजापूर - रमेश बोरनारे, शिवसेना
सिल्लोड - अब्दुल सत्तार, शिवसेना
*हिंगोली*
( ३ पैकी २ जागी विजय )
कळमनुरी - संतोष बांगर, शिवसेना
हिंगोली - तानाजी मुटकुळे, भाजप
*परभणी*
( ४ पैकी २ जागी विजय )
जिंतूर - मेघना बोर्डिकर, भाजप
परभणी - डॉ. राहुल पाटील, शिवसेना
गंगाखेड – रत्नाकर गुट्टे- रासप
*जालना*
( ५ पैकी ३ जागी विजय )
परतूर - बबनराव लोणीकर, भाजप
बदनापूर - नारायण कुचे, भाजप
भोकरदन - संतोष दानवे, भाजप
*उस्मानाबाद*
(४ पैकी सर्व ४ जागी विजय)
उमरगा - ज्ञानराज चौगुले, शिवसेना
तुळजापूर - राणाजगजीतसिंह पाटील, भाजप
उस्मानाबाद - कैलास पाटील, शिवसेना
परांडा - तानाजी सावंत, शिवसेना
*नांदेड*
( ९ पैकी ४ जागी विजय )
किनवट - भिमराव केराम, भाजप
नांदेड उत्तर - बालाजी कल्याणकर, शिवसेना
नायगाव - राजेश पवार, भाजप
मुखेड - डॉ. तुषार राठोड, भाजप
*लातूर*
( ६ पैकी २ जागी विजय )
औसा - अभिमन्यू पवार, भाजप
निलंगा - संभाजी पाटील निलंगेकर, भाजप
*बीड*
( ६ पैकी २ जागी विजय )
गेवराई - लक्ष्मण पवार, भाजप
केज - नमिता मुंदडा, भाजप
अशाप्रकारे शेतकरी स्वावलंबन मिशनच्या कार्यक्षेत्रात महायुतीला ८० पैकी ५१ विधानसभा क्षेत्रात यश प्राप्त झाल्याने शेतकरी व ग्रामीण वैफल्यग्रस्त भागात महायुती आपली आघाडी कायम ठेवण्यात यशस्वी ठरली आहे. ग्रामीण जनतेने सरकारच्या प्रामाणिक प्रयत्नांची ही पावती दिली असल्याचे मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी व्यक्त केले आहे.
-----------------
( किशोर तिवारी )
अध्यक्ष, व.ना. शेतकरी स्वावलंबन मिशन