Saturday, October 12, 2019

मागेल त्याला ९० टक्के अनुदानावर कुंपण -उद्धव ठाकरे यांच्या घोषणेचे शेतकऱ्यांकडून स्वागत

मागेल त्याला ९० टक्के अनुदानावर कुंपण -उद्धव ठाकरे यांच्या घोषणेचे शेतकऱ्यांकडून स्वागत 
दिनांक -१२ ऑक्टोबर २०१९
शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी अमरावती येथील दसरा मैदानात ११ ऑक्टोबरला आपला सरसकट कर्जमुक्तीची घोषणेसोबत वन्यप्राणी ग्रस्त महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यात मागेल त्याला ९० टक्के अनुदानावर कुंपण देण्याच्या योजनेची घोषणा विदर्भ व मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त भागातील कोरडवाहू शेतकऱ्यांना प्रचंड दिलासा देणारी असुन या घोषणेचे स्वागत सर्वच स्तरावरून सर्व राजकीय पक्षाचे नेते व शेतकरी करीत असुन इतर पक्षांनी सुद्धा आपल्या जाहीरनाम्यात याचा समावेश करावा असे आवाहन कापूस उत्पादक कोरडवाहू शेतकऱ्यांच्या अस्तित्वाचा लढा लढणारे कार्यकर्ते किशोर तिवारी यांनी केले आहे  . 
सध्या  विदर्भ व मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त भागातील कोरडवाहू शेतकऱ्यांना डुक्करांचा व रोही वा रानगाईचा प्रचंड त्रास आहे पेरणी पासुन पीक हातात येत पर्यंत संपूर्ण खरीप हंगामात व रबी हंगामातही रात्रंदिवस शेतात राहुनही पिकांचे नुकसान सहन करावे लागत आहे ,वनखात्याच्या नुकसान भरपाईचे  निकष व अधिकाऱ्यांचा त्रास डुक्करांचा व रोही वा रानगाईपेक्षाही जास्त आहे त्यातच वन्यप्राण्यापासून नुकसान भरपाईची रक्कमही अत्यंत तोटकी असल्यामुळे मागेल त्याला १०० टक्के अनुदानावर कुंपण देण्याच्या योजनेची मागणी मात्र विदर्भाचे मुख्यमंत्री व वनमंत्री यांनी सनदी अधिकाऱ्यांनी तयार केलेल्या सामूहिक कुंपणाच्या प्रस्ताव द्या त्यानंतर अधिकाऱ्यांना लाज द्या यामुळे एकही सामुहिक कुंपणाचा प्रस्ताव मंजूर झाला नाही हे आपले दुर्भाग्य असल्याचे मत  किशोर तिवारी यांनी यावेळी व्यक्त केले . 
शिवसेना शेतकऱ्यांचे दुःख समजुन त्यांना दिलासा देत आहे निवडणुकीच्या रणधुमाळीतही समाजकारणाच्या मुद्दे मांडत त्याउलट भाजपसह सर्व पक्ष ३७०कलम  काढणे कलम चांगले कि वाईट यावर बोलत आहे तर कापसाचा  असलेला बाजारभाव सोयाबीनची खरेदी हमीभावापेक्षा कमी भावात होत असतांना चूप का असा सवाल किशोर तिवारी यांनी केला आहे .
 ======= 





No comments: