शिवसेना प्रेस नोट :
विदर्भ मराठवाड्यातील सुजाण, सुशिक्षित आणि सुबुद्ध मतदारांनी भाजपला धडा शिकविला ! पुढील वर्षी २०२४ मध्ये लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीत भाजपा चा सफाया होण्याची ही तर नांदीच समजा - किशोर तिवारी
निवडणुकीचा निकाल म्हणजे फोडा फाडीचे राजकारण करून सत्ता प्राप्त करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर सवाल असून विदर्भ मराठवाड्यातील जनतेच्या मनात भाजप सरकार विरुद्ध किती चिड भरली आहे याचे हे ज्योतक आहे !
नागपूर, दि. ३ फेब्रुवारी,
विदर्भातील नागपूर आणि अमरावती राजस्व विभागातील ११ जिल्ह्यात आणि मराठवाड्यातील औरंगाबाद आणि लातूर राजस्व विभागातील ८ जिल्ह्यातील म्हणजे राज्यातील १९ जिल्ह्यात सुबुद्ध, सुजान आणि सुशिक्षित मतदारांनी विधान परिषदेच्या जागा वरती भाजपा उमेदवारांचा केलेला पराभव म्हणजे भाजपा व देवेंद्र फडणवीस यांच्या सरकार विरुद्धचा हा एक जनादेश असून विदर्भ मराठवाड्यातील जनतेच्या मनात या भाजप च्या फोडा फाडी व सूडबुद्धी सरकार विरुद्ध किती चिड भरली आहे याचे ज्योतक असून पुढील वर्षी २०२४ मध्ये लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीत भाजपा चा सफाया झाल्या शिवाय राहणार नाही, अशी तिखट प्रतिक्रिया शिवसेनेचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी व्यक्त केली आहे.
फोडाफाडीचे राजकारण करून मस्तवालपणे सत्ता चालविणाऱ्या भाजपाच्या नेत्यांनी विदर्भ आणि मराठवाड्यातील जनता आपल्या खुट्या ला बांधलेली आहे असे गृहीत धरून या निवडणुकीत वावरणे सुरू केले होते. त्यांची चाल, बोल आणि मस्तवाल व्यवहार ओळखून सुजान, सुशिक्षित आणि सुविद्य मतदारांनी भाजपच्या उमेदवारांना तिन्ही जागेवर धूळ चारली आणि त्यांना त्यांची जागा दाखवून दिली असून आता भाजपाच्या पराभवाची सुरुवात झालेली आहे. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा व विधानसभेच्या निवडणूक भाजपाचा पूर्णपणे सफाया झाल्याशिवाय राहणार नाही. जनता आता मोदीच्या भाषणाला कंटाळली असून खोट्या आश्वासनांची आता हवा निघून गेलेली आहे, याचे हे निकाल म्हणजे खुली अनुभूती आहे.
लोकांच्या धार्मिक भावना भडकावून, राष्ट्रवादाच्या गप्पा मारून, संपूर्ण देशात महागाई , बेरोजगारी , लाचारी, भ्रष्टाचार आणि बँकांची लूट हे सर्व प्रकार देशातील जनता उघड्या डोळ्यांनी पहात असून आता त्याचा अंत होण्याची सुरुवात झालेली आहे. कोणाच्या ध्यानीमनी नसताना विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातील तिन्ही जागांवरती भाजपाच्या उमेदवाराचा अनपेक्षित असा दारुण पराभव होणे म्हणजे जनतेच्या मनात भरलेली चीड व्यक्त झालेली असून आता भाजपाचे पितळ उघडे झाल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन श्री किशोर तिवारी यांनी केले आहे
विदर्भ मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या दुर्दैवी आत्महत्या, शेतमालाचे पडलेले भाव, वाढलेली महागाई, बेरोजगारी, अनाचार, भ्रष्टाचार, सुड भावनेने विरोधी पक्षनेत्याना जेलात टाकून त्यांचे राजकीय जीवन नष्ट करणे यामुळे जनता त्रस्त झालेली आहे. ही सर्व विदारक सत्य पार्श्वभूमी असताना सुद्धा भाजपाचे नेते जनतेला खुट्याला बांधल्यासारखे वागत असून त्याचा झटका त्यांना आता बसलेला आहे. फोडाफोडीचे राजकारण, बदल्याच्या भावनेने लोकांना जेलात टाकने, खोट्या केसेस मध्ये फसवणे हे सर्व जनता आता पाहून पाहून थकली असून त्याचा बदला घेण्याची सुरुवात या निवडणुकीच्या निकालाने स्पष्ट झाली आहे असे श्री तिवारी यांनी स्पष्ट केले आहे.
नाशिक मध्ये काँग्रेस मधून फोडलेले तांबे तर कोकणात शिंदे सेनेचे म्हात्रे : भाजपा कुठे ?
नाशिक मध्ये काँगेसचा उमेदवार फोडून व विरोधी गटात बंडाळी माजवून आसुरी आनंद घेण्याचे भाजपाचे राजकारण विदर्भ मराठवाड्यातील सुजाण नागरिकांनी हाणून पाडले आहे. कोकणात शिंदे सेनेच्या उमेदवाराला आयते कमळ देवून "कोकण ची सीट खेचून आणली" असा फडणवीस यांनी आव आणणे म्हणजे आपल्याच पक्षाच्या शीर्ष नेतृत्वास फसविने होय, असेही तिवारी यांनी स्पष्ट केले आहे.
********
No comments:
Post a Comment