हरितक्रांतीचे जनक डॉ स्वामीनाथन याना राष्ट्रीय शेतकरी आयोगाच्या शिफारशींची अंबलबजावणी करणेच खरी श्रद्धांजली ठरेल - किशोर तिवारी
दिनांक -२८ सप्टेंबर २०२३
भारताच्या हरीतक्रांतीचे जनक डॉ.एम.एस स्वामिनाथन यांचे आज वयाच्या ९८वर्षी वृद्धापकाळामुळे निधन झाले यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान झाले कारण राष्ट्रीय शेतकरी मिशनच्या अध्यक्षपदी त्यांनी यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची कारणे व उपाय यावर सतत दौरे करून सखोल अभ्यास करून आपल्या अहवालात हमीभाव ,पीक पद्धती बदल ,पत पुरवडा धोरण या संबंधी शिफारशी केल्या होत्या मात्र मागील १० वर्षात सरकारने स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींना केराची टोपली दाखविल्यामुळे भारतात २०१४ पासुन दोन लाखावर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असुन जर डॉ.एम.एस स्वामिनाथन यांच्या आत्म्याला खरी श्रद्धांजली देण्यासाठी हमीभाव ,पीक पद्धती बदल ,पत पुरवडा धोरण या संबंधी शिफारशी खऱ्या अर्थाने तात्काळ लागु कराव्या अशी मागणी विदर्भातील शेतकऱ्यांच्या प्रश्न्नावर डॉ.एम.एस स्वामिनाथन सोबत १९९९ पासुन सतत काम करणारे शेतकरी कार्यकर्ते व महाराष्ट्र सरकारच्या स्व वसंतरावं नाईक शेती स्वालंबन मिशन माजी अध्यक्ष किशोर तिवारी यांनी या दुःखद निधनावर आपली संवेदना व्यक्त करताना केली आहे .
स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींना मोदी सरकारने सोयीने बगल दिल्याची यांची शेवटपर्यंत खंत
किशोर तिवारी यांनी तीन वर्षापूर्वी डॉ.एम.एस स्वामिनाथन यांची विषेय भेट घेऊन विदर्भाच्या शेतकऱ्यांच्या समस्यांवर चर्चा केली होती त्यावेळी त्यांनी लागवडीचा खर्च अधिक ५० टक्के नफा हा आपला हमीभावाचा फार्म्युल्याप्रमाणे लागवडीचा खर्च याचा हिशोब करतांना शेती शेतकरी कुटुंब श्रम सह अनेक खर्चाचा हिशोब न करताच जाहीर केल्यामुळे हमीभाव लागवडी खर्चापेक्षा कमी येत असल्याची खंत प्रगट केली होती . अन्नाच्या पिकांची लागवडी साठी अनुदान पीक कर्ज धोरण ,डाळीचे व तेलबियांचे क्षेत्र वाढविण्यासाठी तसेच जागतीक तंत्र व संशोधन याच्या वापरासाठी अम्बलत येणारे धोरण यावर त्यांनी सरकारच्या धोरणावर चिंता व्यक्त केली होती
विदर्भ जनआंदोलन समिती कडुन विदर्भ मित्र पुरस्काराने सन्मानित
६ऑक्टोबर २००५ मध्ये पांढरकवडा येथे डॉ एम एस स्वामिनाथन यांचा सपत्नीक विदर्भ मित्र हा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला होता यावेळी तात्काळणी नगराध्यक्ष अनिल तिवारी यांनी सत्कार केला होता . यावेळी पांढरकवडा येथील अग्रसेन भवन मध्ये विदर्भातील शेतकरी विधवांशी त्यांनी संवाद सुद्धा साधला होता .
विदर्भाच्या शेतकरी विधवांच्या साठी भरीव कार्य
डॉ.एम.एस स्वामिनाथन यांनी विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त वर्धा व यवतमाळ जिल्ह्यात महीला शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबविल्या होत्या .त्यांनी आपल्या फॉउंडेशन मार्फत शास्वत शेतीचे प्रयोग सुद्धा यशस्वीपणे राबविले .महिला शेतकऱ्यांच्या अधिकारांसाठी व विकासासाठी त्यांनी आपल्या राज्यसभेच्या कार्यकाळात महीला शेतकरी अधिकार बिल सादर केले होते त्या बिलामध्ये शेतकरी विधवांच्या कल्याणाच्या संपूर्ण एकात्मीक कार्यक्रम सादर केला होता मात्र सरकारने यावर साधी चर्चा सुद्धा करण्याची तसदी दाखविली याचे दुःख त्यांना शेवटच्या काळात होते .
=================================================