यवतमाळमध्ये ४८ तासात पाच शेतकऱ्यांच्या आत्महत्यां :२०२३ मध्ये विदर्भात १५६५ शेतकऱ्यांच्या आत्महत्या -संसदेच्या विषेय सत्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर सरकारने दिलासा द्यावा -किशोर तिवारी
दिनांक -१९ सप्टेंबर २०२३
शेतकऱ्यांचा वार्षीक महत्वाचा पोळा सण अख्या महाराष्ट्रात साजरा केला जात असतांना व गणरायाचे आगमन होत असतांना यवतमाळ जिल्ह्यात बंजारा ,आदीवासी व दलीत समाजाचे पाच कर्जबाजारी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी मागील ४८ तासात आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या आहेत ,मिळालेल्या माहिती प्रमाणे
१. यवतमाळ जिल्ह्यातील हिवरी येथील प्रवीण काळे
२. यवतमाळ जिल्ह्यातील खिडकी येथील त्र्यंबक केराम
३. यवतमाळ जिल्ह्यातीलशिवणी येथील मारोती चव्हाण
४ यवतमाळ जिल्ह्यातील अर्जुना येथील गजानन शिगणे
५. यवतमाळ जिल्ह्यातील बाणगाव येथील तेवीचंद राठोड
"खूप कमी मागणी असलेल्या कापूस या मुख्य नगदी पिकामुळे विदर्भाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. लागवडीचा खर्च यामध्ये प्रचंड वाढ झाली आहे आणि बँकांद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अत्यंत कमी पीककर्जामुळे संकटात आणखी भर पडली आहे. शाश्वतपीक अन्न ,डाळी आणि तेलबिया पिकांना प्रोत्साहन देण्यात सरकार अपयशी ठरले आहे. या प्रदेशात आणि जागतिक हवामानातील बदल हे सध्याच्या कृषी संकटाचे कारण आहेत,” किशोर तिवारी पुढे म्हणाले.
संसदेच्या विषेय सत्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर सरकारने दिलासा द्यावा -किशोर तिवारी
विदर्भातील अत्यंत लहान प्रदेशात दररोज एकापेक्षा जास्त शेतकरी आत्महत्या होत असताना, नजीकच्या भविष्यात ५ ट्रिलियन अर्थव्यवस्थेचा भारताचा दावा फोल ठरत आहे, संसदेच्या विषेय सत्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर सरकारने चर्चा करून तसेच नरेंद्र मोदी यांना विदर्भाचा दौरा करून शेतकऱ्यांना आत्महत्येला भाग पाडणाऱ्या प्रमुख समस्यांचे निराकरणकरण्यासाठी विषेय पॅकेज जाहीर करण्याचे आवाहन ,किशोर तिवारी यांनी पंतप्रधानांना केलेआहे .
No comments:
Post a Comment