सी.सी.आय.ने सुरु केलेली कापूस खरेदी फक्त कागदावर -सी.सी.आय कापूस खरेदी केंद्रावर शेतकऱ्याने कापसाची होळी केली -खाजगी व्यापारी आणि सी.सी.आय. चे अधिकारी यांचे लागेबांधे असल्याने शेतकरी वाऱ्यावर तर लोकप्रतिनिधी मात्र उदासीन !
नागपूर, दि. १८ डिसेंबर, २०२३
विदर्भ मराठवाड्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा लाखों क्विंटल कापूस खाजगी व्यापारी पडक्या भावात अक्षरशः लुटून नेत असून किमान आधारभूत किंमत सुद्धा आज मिळत नाहीनसल्यामुळे शेतकऱ्यांचे बेहाल थांबविण्यासाठी सी.सी.आय.ची कापूस खरेदी केंद्रे तातडीने सुरू करण्यात यावीत अशी मागणी शेतकरी नेते आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) राष्ट्रीय प्रवक्ते किशोर तिवारी यांनी आज सरकार कडे केली होती मात्र आज सोमवारला सी.सी.आय.ची कापूस खरेदी केंद्रे मोजक्याच ठिकाणी उघडण्यात आली मात्र तांत्रिक करणे समोर करून केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पियूष गोयल, राज्यमंत्री श्रीमती दर्शना जरदोष आणि वस्त्रोद्योग सचिव श्रीमती रचना शहा यांनी फक्त उच्च प्रतीचा कापुस घ्यावा हे कारण समोर करून एकही क्विंटल कापूस घेतला नाही .
सी.सी.आय कापूस खरेदी केंद्रावर शेतकऱ्याने कापसाची होळी केली
यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांचा पूर आलेल्या राळेगाव तालुक्यातील खैरी सी.सी.आय.ची कापूस खरेदी केंद्रावर कापूस ओला आहे हे कारण देत सी.सी.आय अधिकाऱ्यांनी कापुस घेण्यास नकार दिल्याने तर खाजगी व्यापाऱ्याने फक्त ६२०० रुपये भाव देत असल्यामुळे शेतकरी शंकर वरगट याने सारा कापुस खरेदी केंद्रावरच जाळला व मोदी सरकारच्या विरुद्ध घोषणा दिल्या ,आपण असाच कापुस दोन वर्षांपूर्वी १०,००० प्रति क्विंटल विकला आता खर्ज दुप्पट झाला व भाव अर्धा झाला असल्याने आपण कापसाची होळी करीत असल्याचे या शेतकरी शंकर वरगट यांनी यावेळी सांगीतले ,हा सगळा प्रकार किशोर तिवारी यांनी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांना पाठविलेल्या ईमेल संदेशात कळविलें असुन ,श्री तिवारी यांनी विदर्भ मराठवाड्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी मांडून गेल्या दीड महिन्यापासून लाखों क्विंटल कापूस खाजगी व्यापारी पडक्या भावात अक्षरशः लुटून नेत असून किमान आधारभूत किंमत सुद्धा दिला जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांत कमालीचे नैराश्य पसरले असून अनेक शेतकऱ्यांच्या दुर्दैवी आत्महत्या सातत्याने होत असून शेतकऱ्यांचे बेहाल थांबविण्यासाठी सी.सी.आय.ची कापूस खरेदी केंद्रे सर्व ठिकाणी सुरु करावे ही विनंती केली आहे
सध्या कापूस खरेदी बाजारात किमान मूल्य आधारित खरेदी केंद्रे सुरू नसल्याने त्याचा नाहक फायदा खाजगी व्यापारी घेत असून आज विदर्भ मराठवाड्यात अनेक ठिकाणी उच्च प्रति चा कापूस सुद्धा ४०० ते ६०० रुपये कमी दरात विकण्याची पाळी शेतकऱ्यांवर आली आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा कापूस केंद्र सरकारने जाहीर केलेल्या किमान आधारभूत किमतीत खरेदी करणे नोडल एजन्सी कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया - सी.सी.आय. चे कायद्याने बंधनकारक असताना सुद्धा सी.सी.आय. खरेदी केंद्रे कधी सुरू होतील, याचा कांहीं थांगपत्ता नाही. जिथे केंद्रे सुरू केलीत तिथे सुद्धा खरेदी अजिबात नाही. कारण खाजगी व्यापारी आणि सी.सी.आय. चे अधिकारी यांचे लागेबांधे असल्याने कित्यके केंद्रावर सरसकट कापूस रिजेक्ट केला जात आहे तर दुसरी कडे खाजगी व्यापारी पडक्या किमतीत कापूस खरेदी करून शेतकऱ्यांची उघड लूट करीत आहेत. कोणताही पणन अधिकारी किंवा बाजार समिती शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यात अपयशी ठरली असून अश्या विपरित परिस्थितीत केंद्र सरकारच्या नोडल एजन्सी असलेल्या कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया - सी.सी.आय. चे कायद्याने बंधनकारक असलेली खरेदी केंद्रे विदर्भ मराठवाड्यातील लाखों कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या भल्यासाठी अत्यंत आवश्यक असल्याने सरकारने तातडीने आदेश द्यावेत , अशी मागणी श्री किशोर तिवारी यांनी केली आहे.
सारे लोकप्रतिनिधी उदासीन -भोजनवळीचा आनंद घेण्यात गुंतले
कापूस खरेदी बाजारात किमान मूल्य आधारित खरेदी केंद्रे सुरू नसल्यामुळे एकीकडे कापूस उत्पादकांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढल्या असुन मात्र विदर्भ मराठवाड्याच्या समस्या निवारणासाठी नागपूर सुरु असलेल्या अधिवेशनात मात्र हा विषय लावून यावर तोडगा काढण्यासाठी साधी चर्चाही होत नसुन सारे आमदार भोजनावळी आनदं घेत असुन काही भाजप आमदार तर मुलाच्या लग्नाचे स्वागत सभारंभ आटपून घेत आहेत मात्र ज्या पश्चिम विदर्भांत मोदी सरकारच्या १० वर्षात ६ हजारावर कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यानंतर भाजपा नेते झोपा काढत आहेत तर मंत्री दलाल मार्फत मिळत त्या प्रकारे पैसे खाण्यात गुंतले आहेत .एकीकडे केंद्र सरकार मोदी संकल्प यात्रेचे सोंग करीत आहे तर राज्य सरकार करोडो रुपये "शासन आपल्या दारी " या थोतांडात खर्च होत आहे मात्र हवालदिल शेतकरी शासन दारी चपला घासत असल्याची खंत किशोर तिवारी यांनी यावेळी व्यक्त केली आहे.
---------
वरील प्रेस नोट प्रकाशित करण्याची नम्र विनंती !
किशोर तिवारी,
राष्ट्रीय प्रवक्ते - शिवसेना (उद्धव ठाकरे गट)
आणि
अध्यक्ष, विदर्भ जन आंदोलन समिती,
Mbl. 9422108846
Email ID : kishortiwari@gmail.com
No comments:
Post a Comment