Monday, January 22, 2024

राम मंदिरासाठी मोदींचे अभिनंदन -आता शेतकऱ्यांच्या, महिलांच्या ,बेरोजगारांच्या व ग्रामीण भारताच्या समस्यांवर तोडगा काढा -किशोर तिवारी यांचे मोदींना साकडे

राम मंदिरासाठी मोदींचे अभिनंदन -आता शेतकऱ्यांच्या, महिलांच्या ,बेरोजगारांच्या व  ग्रामीण भारताच्या समस्यांवर तोडगा काढा -किशोर तिवारी यांचे मोदींना साकडे 

दिनांक -२२ जानेवारी २०२४

ज्या मुद्याला धरून भाजपने भारताची सत्ता काबीज केली व शिवसेना प्रमुख हिंदू हृदयसम्राट स्व .बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण केल्याबद्दल शिवसेनेचे प्रवक्ते व विदर्भाच्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी तसेच आदीवासी जनतेच्या प्रश्न्नावर काम करणारे कार्यकर्ते किशोर तिवारी यांनी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे खुल्यामनाने अभिनंदन केले असुन आता महाराष्ट्रातील अतिशय मागास व शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सोबतच  अतिमागास आदीवासी बेरोजगार महिलांच्या तसेच ग्रामीण भागातील प्रचंड आर्थिक विपन्नतेवर तोडगा काढा साकडे घातले आहे . महाराष्ट्र ही छत्रपती शाहू महाराज , ज्योतिबा फुले, गाडगेबाबा व बाबासाहेब आंबेडकर यांची भूमी आहे या ठिकाणी सामाजिक न्याय व समानता सर्वोच आहे या मागासवर्गीय दलीत आदीवासी जनतेनी सुद्धा मर्यादापुरुष प्रभू राममंदिर प्राण प्रतिष्ठेचे स्वागत केले असुन मात्र आपण आता राजधर्माचे पालन करीत आर्थिक व सामाजिक न्याय दयावा अशी कळकळीची विनंती केली असुन देशाला शुद्ध धर्माची गरक असुन धर्माच्या नावांवर अंधश्रद्धेचेथो थोतांड मांडून २५०० वर्षांपूर्वीची   परिस्थिती देशात आणून धर्मांथेच्या नावावर अराजकतेला जन्म देत असल्याची भीती ग्रामीण भागातील शेतकरी आदीवासी वंचित जनता बोलून दाखवत आहे यावर किशोर तिवारी यांनी चिंता व्यक्त केली आहे . 

देशाचे महामाहीन राष्ट्रपती व चारही शंकराचार्य यांना अपमानित करून राममंदिराच्या राष्ट्रार्पण देशाच्या लोकशाहीला घातक 

एकीकडे ज्या रीतीने राममंदिर निर्माण याला ५०० वर्षांपूर्वीचा हिंदू समाजाचे स्वप्न व भाजपने याला आपला राजकीय व येणाऱ्या २०२४ च्या राष्ट्रीय निवडणुकीमध्ये राममंदिराच्या प्रमुख मुद्दा करून पुन्हा सत्ता मिळविण्याचा कुटील डाव रचण्यात आला असुन मात्र ज्या रीतीने चारही पिठाचे शंकराचार्य यांचे सर्व आक्षेप केराच्या टोपलीत टाकण्यात आले मात्र भारताच्या महामाहीन आदिवासी  महीला राष्ट्रपती यांना कार्यक्रमाचे यजमान पद कट रचुन मोदींनी दिले नाही व भाजपा धार्जिण्या संतांना ,भारताची ९८ टक्के संपत्ती व सर्व संसाधन यावर अधिकार सांगणाऱ्या २ टक्के मुठभर निवडक लोकांसमोर देशाच्या ९८ टक्के मागासवर्गीय दलीत आदीवासी जनतेच्या रामावरील श्रद्धेचा बाजार करून आपल्या १० वर्षाच्या अराजकता व विफलता लपविण्याचा प्रयन्त तर नाहीना असा सवाल किशोर तिवारी यांनी यावेळी केला आहे . 

राममंदिराच्या बाजार करून भाजपा २०२४ मध्ये निवडणूक जिंकू शकत नाही 

सध्या ज्या रीतीने भाजपने धर्माच्या खुला बाजार मांडला असुन आपले राजकीय क्षेत्रातील चुकीच्या धोरणामुळे निर्माण झालेल्या सामाजीक असमानता ,भौतिकवाद ,अन्नाचे व आरोग्याचे तसेच शिक्षणाचे बाजारीकरण मुळे तयार झालेल्या समस्येला बाजूला ठेऊन जसे २०१९ जसे भारतीय जनतेला पुलगामा समोर करून आपले राजकीय अपशय लपविता येणार का हा प्रश्न यावेळी किशोर तिवारी यांनी उपस्थित करून ज्या देशात शंकराचार्य यांचाही खुला अपमान कधीही सहन केला नाही तसेच ज्यावेळी धर्माचा बाजार मांडला गेला त्यावेळी भारताने भगवान गौतम बुद्धाच्या अष्टांग मार्गाचा स्वीकार केला याची आठवण नरेंद्र मोदींना यावेळी करून दिली . 

====================================================================

  

No comments: