अजित पवार यांची उपमुख्यमंत्री पदावर फेरनियुक्ती हे शेतकरयांच्या जखमेवरमीठच-विदर्भ जनआंदोलन समिती
तरुण भारत वृत्तसेवा
यवतमाळ, ९ डिसेंबर
महाराष्ट्र सरकारने सिचन घोटाळ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे वादग्रस्त नेते अजित पवार यांची उपमुख्यमंत्री पदावर फेरनियुक्ती करून विदर्भाच्या आत्महत्याग्रस्त शेतकरयांच्या पॅकेजमधील ३० हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचारावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न म्हणजे विदर्भातील ३० लाख नैराश्यग्रस्त व कर्जबाजारी शेतकरयांच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच प्रकार आहे. विदर्भाचे शेतकरी या अपमानाचा वचपा काढतील, असा इशारा कापूस उत्पादक शेतकरयांच्या हक्कासाठी लढणारया विदर्भ जनआंदोलन समितीने दिला आहे.
सिचनामधील हजारो कोटी रुपये मंत्र्यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून भ्रष्ट मार्गानी वळविले. शेतकरयाचे पाणी व शेतकरयांच्या हक्काचे सिचनाचे क्षेत्र कट रचून कमी केले. याविषयी गंभीर स्वरूपाचे आरोप झाल्यानंतर व भ्रष्टाचाराचे पुरावे सिचन विभागाच्या उच्चपदस्थ अधिकारयांनी दिल्यानंतर अजित पवार यांनी लोकलाजेस्तव प्रसिद्धी माध्यम व जनआक्रोशाला शांत करण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व शरद पवार यांनी छुपा समझोता करून हे नाटक घडविले असल्याचे समितीने म्हटले आहे. अजित पवार व सुनील तटकरे यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल होऊन त्यांना तुरुंगाची हवा दाखविल्याशिवाय विदर्भाचे शेतकरी शांत बसणार नाही. आम्ही त्यांचा सारा भ्रष्टाचार न्यायालयाद्वारे अंतिम टोकापर्यंत नेऊ आणि आघाडी सरकारला नागडे करू, असा इशाराही विदर्भ जनआंदोलन समितीचे नेते किशोर तिवारी यांनी दिला.
महाराष्ट्राचे तत्कालीन व आजचे सिचन मंत्री अजित पवार व सुनील तटकरे यांच्यावर ५० हजार कोटींच्या सिचनाचे कंत्राट देताना मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचे आणि मंत्र्यांनी सर्व नियम व कायदे धाब्यावर बसवून आत्महत्या करणारया शेतकरयांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा आरोप होत आहे. असे असताना आपली अडचण टाळण्यासाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सिचनाच्या सर्व वादावर श्वेतपत्रिका जाहीर करण्याचे सोंग घेतले होते, असे त्यांनी म्हटले आहे. या ‘योजने'तून मुख्यमंत्र्यांनी सर्व विरोधी पक्ष, प्रसार माध्यम व जनतेला शांत केले होते. त्यानंतर श्वेतपत्रिकेमध्ये भ्रष्टाचार करणारया मंत्र्यांवर गाज पडणार असा आवसुद्धा आणला होता. त्यानुसार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चारित्र्याचे डोहाळे घेत राजीनामासुद्धा दिला होता. मात्र सरकारने सिचन प्रकल्पावरील श्वेतपत्रिकेत सिचन प्रकल्पात गेल्या ८ वर्षांत झालेल्या भ्रष्टाचाराचा कोणताही उल्लेख केला नसून, एकूणच भ्रष्टाचाराच्या विषयाला संपूर्णपणे बगल दिली असल्याचा आरोप तिवारी यांनी केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आजीमाजी सिचन मंत्री अजित पवार व सुनील तटकरे यांना या सर्व प्रकरणात चारित्र्य प्रमाणपत्र देण्याच्या व दोषमुक्त आहे असे
दाखविण्याचाच महाराष्ट्र सरकारचा प्रयत्न आहे. विदर्भातील शेतकरी व आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील विधवा या प्रकाराचा निषेध करत
असून येत्या मंगळवार, ११ डिसेंबरला नागपूर विधान भवनासमोर श्वेतपत्रिकेची होळी करण्यात येणारअसल्याची माहिती विदर्भ जनआंदोलन समितीचे नेते किशोरतिवारी यांनी दिली आहे.
No comments:
Post a Comment