Tuesday, January 22, 2013

प्रजासत्ताकदिनी शेकडो शेतकरी विधवांचा उपोषण सत्याग्रह- विदर्भाच्या कृषी संकटाकडे लक्ष देण्याची मागणी


प्रजासत्ताकदिनी शेकडो शेतकरी विधवांचा उपोषण सत्याग्रह- विदर्भाच्या कृषी संकटाकडे लक्ष देण्याची मागणी


** महाराष्ट्रात मागीलवर्षी ४२ लाख हेक्टरमध्ये ३५० लाख क्विंटल कापसाचे पीक झाले होते. मात्र सरकारने ४ हजार कोटी रुपये सर्व 
शेतकरयांना बीटी कापसाच्या नापिकीचे नुकसान भरपाई म्हणून दिले होते. यावर्षी कापसाचे उत्पादन जेमतेम २२० लाख क्विंटल होत असताना सरकारने नुकसान भरपाई तर सोडाच कापसाच्या प्रचंड नापिकीची चर्चाही मंत्रिमंडळात केली नाही. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात विरोधीपक्ष आत्महत्याग्रस्त शेतकरयांना मदत मिळवून देतील अशी आशा होती, मात्र विरोधी पक्ष नेत्यांनी सरकारशी मांडवणी करून शेतकरयांना आत्महत्या करण्यासाठी मोकळे सोडले असल्याचा आरोप किशोर तिवारी यांनी केला आहे. 
**

तभा वृत्तसेवा
यवतमाळ, २१ जानेवारी
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मुंबईच्या मंत्रालयात विदर्भाच्या आमदारांसोबत विदर्भाची चिंता व्यक्त करीत असतानाच गुरुवार, १७ रोजी ४ कर्जबाजारी, नापिकी व दुष्काळाला तोंड देत असलेल्या शेतकरयांनी नैराश्यात जाऊन आत्महत्या केल्या. या वृत्ताने संपूर्ण विदर्भात शेतकरयांच्या आत्महत्येचे हादरे बसू लागले आहेत.
पश्चिम विदर्भात आत्महत्या होत असताना एकाच दिवशी पूर्व विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील तीन शेतकरयांनी आत्महत्या करून शेतकरयांच्या आत्महत्येचे लोण सर्वत्र पसरल्याचे स्पष्ट झाले आहे. शेतकरयांच्या प्रश्नांबाबत कोणतेही कायमस्वरूपी उपाय करण्यात येत नाहीत. शासन शेतकरी
समस्यांबाबत गंभीर नाही, असा आरोप करून विदर्भातील कृषी संकटाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रजास्ताकदिनी शेकडो शेतकरी विधवा सत्याग्रह आंदोलन करणार असल्याची माहिती विदर्भ जनआंदोलन समितीचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी दिली.

एकाच दिवसात दिनकर नवरखेडे रा. साखरी जि. चंद्रपूर), रामदास गोहणे (रा. चितेगाव, जि. चंद्रपूर), गजानन राऊत (रा. ज्वारबोरी जि. चंद्रपूर), जानराव नागले (रा. खेड जि. अमरावती) या चार शेतकरयांनी आत्महत्या केल्या असून सरकारने शेतकरयांना मदतीपासून वंचित ठेवल्यामुळे या आत्महत्या होत 
असल्याचा आरोप विदर्भ जनआंदोलन समितीचे नेते किशोर तिवारी यांनी केला आहे. यापूर्वी मकरसंक्रांतीच्या दिवशी रामराव शेंडे. (रा. मानोली जि. यवतमाळ), संजय महल्ले (रा. डोर्ली जि. यवतमाळ), पुरुषोत्तम परसुटकर (रा. मारेगाव जि. यवतमाळ) या तीन शेतकरयांनी आत्महत्या केल्या. यावर्षी केवळ एका महिन्याच्या आत आत्महत्या करणारया शेतकरयांचा आकडा १४ वर पोहोचल्याची माहिती विदर्भ जनआंदोलन समितीचे संतोष नैताम यांनी दिली आहे.

यावर्षी विदर्भातील २२ लाख हेक्टरमधील संपूर्ण कापसाचे पीक अध्र्यावर आले असून खर्च मात्र दुपटीने वाढला आहे. सोयाबीन व धान उत्पादकांनासुद्धा प्रचंड नापिकीचा फटका बसला आहे. यामध्येच सक्तीने कर्जाची वसुली, १२ तासांचे विजेचे भारनियमन त्यातच शिक्षण व आरोग्यावर येत असलेला प्रचंड खर्च, वाढलेली महागाई यामुळे परिस्थिती २००६ पेक्षाही गंभीर असून शेतकरयांच्या आत्महत्या प्रचंड प्रमाणात वाढण्याची भीती आहे. सरकार मात्र या भीषण कृषी संकटावर लक्ष देण्यास तयार नाही, अशा परिस्थितीमध्ये कृषी संकटावर लक्ष वेधण्यासाठी येत्या २६ जानेवारी प्रजासत्ताकदिनी शेकडो शेतकरी 
विधवा सांसदीय समितीनेे भेट दिलेल्या मारेगाव या आत्महत्याग्रस्त खेड्यात उपोषण सत्याग्रह करतील, अशी घोषणा विदर्भ जनआंदोलन समितीसह  
शेतकरी नेते प्रेम चव्हाण यांनी केली आहे.

यावर्षी कापसाचा उत्पादनखर्च मागील वर्षीपेक्षा दुप्पटीने वाढला असून मात्र उत्पादन ५० टक्क्यावर आले आहे. त्यातच कापसाचा बाजारभाव मागील वर्षीपेक्षा कमी असल्यामुळे महाराष्ट्रातील पाच लाख कापूस उत्पादक शेतकरयांना कमीत कमी १० हजार कोटींचे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. मागील पाच वर्षांत कापसाच्या नापिकीचे प्रमाण कोरडवाहू शेतकरयांपुरते मयादित होते. परंतु यावर्षी सिचन सुविधा असणारया व सर्व प्रकारची काळजी घेणारया पुरोगामी शेतकरयांनाही कापसाच्या नापिकीचा प्रचंड फटका बसला आहे. 
कापसाचे नवीन तंत्रज्ञान बदललेल्या पर्यावरणाच्या परिस्थितीमध्ये शेतकरयांना उपयुक्त आहे की नाही यावर सरकारने गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे, मात्र राज्यकत्र्यांना या विषयावर साधी चर्चाही करण्यास वेळ नसल्याचे किशोर तिवारी यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रात मागीलवर्षी ४२ लाख हेक्टरमध्ये ३५० लाख क्विंटल कापसाचे पीक झाले होते. मात्र सरकारने ४ हजार कोटी रुपये सर्व 
शेतकरयांना बीटी कापसाच्या नापिकीचे नुकसान भरपाई म्हणून दिले होते. यावर्षी कापसाचे उत्पादन जेमतेम २२० लाख क्विंटल होत असताना सरकारने नुकसान भरपाई तर सोडाच कापसाच्या प्रचंड नापिकीची चर्चाही मंत्रिमंडळात केली नाही. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात विरोधीपक्ष आत्महत्याग्रस्त शेतकरयांना मदत मिळवून देतील अशी आशा होती, मात्र विरोधी पक्ष नेत्यांनी सरकारशी मांडवणी करून शेतकरयांना आत्महत्या करण्यासाठी मोकळे सोडले असल्याचा आरोप किशोर तिवारी यांनी केला आहे.

No comments: