Friday, October 31, 2014

'कोरा सात-बारा-हमीभावाची वाढ- वीज बिल माफी ' या महायुतीच्या आश्वासनाचा मुख्यमंत्र्यांना पडला विसर ' - महाराष्ट्राच्या नापिकीग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ दिलासा द्या शेतकरी विधवांचा आक्रोश

'कोरा सात-बारा-हमीभावाची वाढ- वीज बिल माफी ' या महायुतीच्या आश्वासनाचा मुख्यमंत्र्यांना पडला विसर '  -  महाराष्ट्राच्या  नापिकीग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ दिलासा द्या शेतकरी विधवांचा आक्रोश 

विदर्भ -१ नोव्हंबर  २०१४

अख्या  महाराष्ट्राच्या  विदर्भ ,मराठवाडा ,खानदेश व उत्तर महाराष्ट्राच्या ९० लाख हेक्टर कोरडवाहू क्षेत्रामधील एकमात्र नगदी पिक कापुस ,सोयाबीन ,तुर व धान पुर्णपणे निसर्गाने दगा दिल्याने बुडाले असून मागील ५० वर्षात सर्वात कमी उत्पन झाले असुन अभूतपूर्व दुष्काळाचा सामना ग्रामीण भागातील ३ कोटी जनता करीत असुन यांना उपासमारीचा सामना करावा लागत आहे यांना तात्काळ अन्न सुरक्षा द्या ,जगण्यासाठी मदत द्या , लागवड खर्च अधिक ५०% टक्के नफा असा मोदींच्या आश्वासनाचा हमीभाव कापसाला व सोयाबीन द्या व सरकारी संकलन केंद्र तात्काळ सुरु करा अशी कळकळीची मागणी विदर्भाच्या शेतकरी विधवांनी एका विनंती पत्राने केली आहे व निवडणुकीच्या सातबारा कोरा करण्याच्या , दुबार पेरणीच्या मदतीची ,वीजबिल माफीच्या आश्वासनाची पुन्हा नवनिर्वाचित मुख्यमंत्री यांना करून देण्यात आल्याची माहिती शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी दिली .
मुंबईच्या  वानखेडे मैदानातील कोट्यावधी रुपयाची उधडपट्टी करून झालेल्या शपधग्रहण  सोहळा  नापिकी व कर्जबाजारी पणामुळे उपासमारीला तोंड देत असलेल्या महाराष्ट्राच्या ३ कोटी   शेतकऱ्यांना व शेतमजुरांना  जीवारी झोंबला असून  एकीकडे  शेतकऱ्यांनी तिबार पेरणी करून आपले कापुस व सोयाबीनचे पिक उभे केले होते मात्र १५ सप्टेंबर पासून पावसाची दडी, विविध किडींचा प्रकोप आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेतच सोयाबीनची पानगळ , कापसाचे बोंडे सडल्यामुळे  आणी  सध्या कृषी फिडरवरील २२ तासाचे भारनियमन त्यातच कापसाचे भाव रुपये ३५०० तर सोयाबीन रुपये २८०० वर बाजारात कोणीही विकत घेत नसल्यामुळे  आत्महत्येचा मार्गावर शेतकरी लागले त्यावर मायबाप सरकार  सरकारने तात्काळ मदत व कापसाचा व सोयाबीनचा हमीभाव व त्यावर खरेदी सुरु करण्याची घोषणा होईल अशी आशा होती मात्र नवनिर्वाचित मुख्यमंत्री यावर काहीच बोलले नाही या  हे सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गंभीर नाही असा निरोप गेला आहे तरी देवेंद्र  फडणवीसानी तात्काळ दिलासा द्यावा अशी मागणी  शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी केली  आहे. 
खुल्या बाजारात कापसाचे भाव हमीभावापेक्षा कमी झाले आहेत व कापसाचे उत्पन्न २०%  टक्का  होत आहे तर संपूर्ण सोयाबीन बरबाद झाले मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ओरड करणारे नेते आता मात्र सत्तेचे वारे लागल्यानंतर  साधा फोनही उचलत  नाही हि शरमेची बाब आहे ,केंद्र व राज्य सरकार झोपले आहे का असा सवाल ,किशोर तिवारी यांनी केला आहे 
एकीकडे भारताच्या पंतप्रधानासह नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस निवडणुकीमध्ये  शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा बाजार करीत होते याच दरम्यान विदर्भात  नापिकी व कापसाचे व सोयाबीनचे उभे पिक पाण्याने दगा दिल्याने व  रोगांचा व कीटकांचा हल्लामुळे तीस लाख हेक्टर मधील नगदी कापसाचे व सोयाबीनचे पिक बुड्याल्यामुळे ६२ कोरडवाहू शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून यावर्षी विदर्भात ९०६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची सरकार दरबारी नोंद झाली आहे  सरकारने विदर्भातील संकटावर जर लक्ष दिले नाहीतर शेकडो कर्जबाजारी  नापिकीग्रस्त कोरडवाहु शेतकरी आत्महत्या करतील असा इशारा विदर्भ जनांदोलन समितीचे नेते किशोर तिवारी यांनी दिला आहे 

यावर्षी विदर्भात  पावसाने  २५ ऑगस्टलाच हजेरी लावल्याने व नंतर १७  सप्टेंबर नंतर गायब झाल्यानंतर दुबार-तिबार  पेरणी करून थोडा दम धरलेल्या शेतकऱ्यांना भारनियमनाने पार बरबाद केले असून ऐन दिवाळीत शेतकरी व शेतमजुर उपासमारीला तोंड देत असुन दिवाळीसाठी फाटकेतर सोडा सध्या खेड्यात फुटाणे घेण्यासाठीही दमडी नसून या दशकातील हि सर्वात मोठी  नापिकी असुन मात्र सरकार व सर्व राजकीय नेते यावर एक शब्दही बोलत नसून अधिकारीमात्र वातानुकुल कक्षात बसून विक्रमी उत्पादनाचे दावे करीत आहेत यावर्षी पहिले गारपीट नंतर पावसाने दगा दिल्याने विदर्भात २० ऑक्टोबर पर्यंत ९००च्या वर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून जर सरकारने तात्काळ कापसाच्या भावाचा प्रश्न व नापिकीग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी व मदत घोषित करावी अशी मागणी विदर्भ जनांदोलन समितीचे नेते किशोर तिवारी महामहीन राज्यपालांना  आहे . 

या वर्षी संपूर्ण महाराष्ट्रात ९० लाख हेक्टर मध्ये सोयाबीन आणि कापूस पिकाने दगा दिल्याने शेतकर्‍यांची दिवाळी अंधारात जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्याचा सोयाबीन वर जर  खर्च अडीच हजार असताना उत्पन्न मात्र दोन हजार रुपयांचे होत असल्याने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. येरव्ही सोयाबीनचे ३० किलो बियाणे पेरणी केल्यानंतर आठ ते दहा क्विंटल होणारे उत्पन्न आता केवळ ८० किलोवर आले आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे. यंदा सुरूवातीलाच पावसाने दडी मारली. त्यानंतर सुरळीत पावसाला सुरूवात झाली. त्यामुळे शेतकर्‍यांनी पेरणी केली मात्र पुन्हा पावसाने दगा दिल्यानंतर अनेकांना दुबार, तिबार पेरणी करावी लागली. उशिरा पेरणी झाल्याने आणि वातावरणातील बदलाने उत्पन्नात कमालीची घट झाली. एरव्ही३० किलो सोयाबीन बियाण्याची लागवण केली की त्यापासून आठ ते दहा क्विंटल सोयाबीनचे उत्पन्न व्हायचे. मात्र यावर्षी ३० किलोला ८० किलो अशी सोयाबीनची उतारी आहे. त्यातच सोयाबीन काढणीचा खर्च प्रती बॅग १ हजार ५००रुपये झाला आहे. मशीन आणि ट्रॅक्टरचा खर्च एक हजार रुपये असा २ हजार ५०० रुपये खर्च आहे. याव्यतिरिक्त लागवण आणि मजूरीचा खर्च वेगळा असे असताना काढणीचाच खर्च २ हजार ५०० रुपये उत्पन्न मात्र २ हजार रुपये अशी परिस्थिती तालुक्यात सर्वदूर आहे. त्यामुळे शेतकरी चिंतातुर झाला आहे. अनेकांनी सोयाबीनची ही उतारी पाहून त्यामध्ये जनावरे सोडणेच पसंत केले आहे मात्र अधिकारी सरकारला अंधारात ठेवत आहेत ,असा आरोप तिवारी यांनी केला आहे . 
महराष्ट्राचे नगदी पिक  कपाशी सोयाबीन व  तूरचे उत्पन्न पाण्याअभावी जाऊ नये म्हणून तालुक्यातील शेतकर्‍यांनी कर्ज काढून सिंचनाच्या सुविधा उपलब्ध केल्या. मात्र भारनियमनाच्या फटक्याने त्या कुचकामी ठरत असून, ९० लाख हेक्टर मध्ये कापसाची पेरणी केलेले शेतकरी प्रचंड संकटात सापडले आहे. कपाशीचे उत्पन आता एकरी एक ते दोन किंटळचा होणार नाही त्यातच कापसाचा बाजार भाव हमीभावापेक्षा कमी झाला आहे सरकारने तात्काळ कापुस उत्पादक   शेतकऱ्यांची मदत करावी अशी मागणी तिवारी यांनी पुन्हा केली आहे .

.

Tuesday, October 28, 2014

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात विदर्भाच्या शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागतील :भ्रष्टाचार व ठेकेदार मुक्त सरकार द्या

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात विदर्भाच्या शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागतील :भ्रष्टाचार व ठेकेदार मुक्त सरकार द्या 
विदर्भ -२९ ऑक्टोबर २०१४
भाजप विधिमंडळ पक्षाने विदर्भाचे लाडके विदर्भवादी नेते आमदार देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून केलेल्या  निवडीचे विदर्भाच्या शेतकरी व आदिवासींच्या हक्कासाठी लढणाऱ्या विदर्भ जनांदोलन समितीने स्वागत केले असुन आता शेतकऱ्यांचे व आदिवासींचे प्रश्न तसेच वेगळ्या विदर्भ राज्य निर्मितीचा मार्ग मोकळा झाला असुन आता पश्चिम महाराष्ट्राच्या गुलामगिरीतून मुक्त होण्याची संधी आली आहे असा आशावाद विदर्भ जनांदोलन समितीचे नेते किशोर तिवारी यांनी व्यक्त केला आहे . 
विदर्भाचे लाडके विदर्भवादी नेते आमदार देवेंद्र फडणवीस हे विदर्भाच्या चळवळीचे अग्रगामी नेते असून सर्व विदर्भावाद्यानी त्यांच्या पाठीशी उभे रहावे विदर्भाचे मागासलेपण व झालेला अन्याय आता दुर करण्याची संधी आली आहे ,विदर्भाला उद्योग ,शेतकऱ्यांना कामाचे दाम ,बेरोजगारांना काम ,आदिवास्याना जगण्याच्या अधिकार  देवेंद्र फडणवीस देतील असा विस्वास तिवारी यांनी व्यक्त केला आहे . 

आज महाराष्ट्राला भ्रष्टाचार व ठेकेदार मुक्त सरकार  गरज आहे व देवेंद्र फडणवीस हे ठेकेदारांशी हित वा पार्टनरशिप असणारे नेते नाहीत , सरकारला मधले पोटभरू नेते मांडवणी करून राजकारण करणाऱ्या नेत्यांना घरी पाठवून गरिबांना देवेंद्र न्याय देईल असा जनतेला विस्वास आहे यावर्षी विदर्भात  पावसाने  २५ ऑगस्टलाच हजेरी लावल्याने व नंतर १७  सप्टेंबर नंतर गायब झाल्यानंतर दुबार-तिबार  पेरणी करून थोडा दम धरलेल्या शेतकऱ्यांना भारनियमनाने पार बरबाद केले असून ऐन दिवाळीत शेतकरी व शेतमजुर उपासमारीला तोंड देत असुन दिवाळीसाठी फाटकेतर सोडा सध्या खेड्यात फुटाणे घेण्यासाठीही दमडी नसून या दशकातील हि सर्वात मोठी  नापिकी असुन  अधिकारीमात्र वातानुकुल कक्षात बसून विक्रमी उत्पादनाचे दावे करीत आहेत यावर्षी पहिले गारपीट नंतर पावसाने दगा दिल्याने विदर्भात २९ ऑक्टोबर पर्यंत ९१२ च्या वर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून जर सरकारने तात्काळ कापसाच्या भावाचा प्रश्न व नापिकीग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी व मदत घोषित करावी अशी मागणी विदर्भ जनांदोलन समितीचे नेते किशोर तिवारी   देवेंद्र फडणवीस यांना केली आहे .  

या वर्षी संपूर्ण विदर्भात ३० लाख हेक्टर मध्ये सोयाबीन आणि कापूस पिकाने दगा दिल्याने शेतकर्‍यांची दिवाळी अंधारात जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्याचा सोयाबीन वर जर  खर्च अडीच हजार असताना उत्पन्न मात्र दोन हजार रुपयांचे होत असल्याने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. येरव्ही सोयाबीनचे ३० किलो बियाणे पेरणी केल्यानंतर आठ ते दहा क्विंटल होणारे उत्पन्न आता केवळ ८० किलोवर आले आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे. यंदा सुरूवातीलाच पावसाने दडी मारली. त्यानंतर सुरळीत पावसाला सुरूवात झाली. त्यामुळे शेतकर्‍यांनी पेरणी केली मात्र पुन्हा पावसाने दगा दिल्यानंतर अनेकांना दुबार, तिबार पेरणी करावी लागली. उशिरा पेरणी झाल्याने आणि वातावरणातील बदलाने उत्पन्नात कमालीची घट झाली. एरव्ही३० किलो सोयाबीन बियाण्याची लागवण केली की त्यापासून आठ ते दहा क्विंटल सोयाबीनचे उत्पन्न व्हायचे. मात्र यावर्षी ३० किलोला ८० किलो अशी सोयाबीनची उतारी आहे. त्यातच सोयाबीन काढणीचा खर्च प्रती बॅग १ हजार ५००रुपये झाला आहे. मशीन आणि ट्रॅक्टरचा खर्च एक हजार रुपये असा २ हजार ५०० रुपये खर्च आहे. याव्यतिरिक्त लागवण आणि मजूरीचा खर्च वेगळा असे असताना काढणीचाच खर्च २ हजार ५०० रुपये उत्पन्न मात्र २ हजार रुपये अशी परिस्थिती तालुक्यात सर्वदूर आहे. त्यामुळे शेतकरी चिंतातुर झाला आहे. अनेकांनी सोयाबीनची ही उतारी पाहून त्यामध्ये जनावरे सोडणेच पसंत केले आहे मात्र अधिकारी सरकारला अंधारात ठेवत आहेत ,असा आरोप तिवारी यांनी केला आहे . 
दिवाळी हा सण सर्वांसाठीच महत्वाचा. तीन दिवसांवर हा सण येऊन ठेपला असताना पैशाची तजवीज करण्यासाठी शेतकर्‍यांची धडपड सुरू आहे. नातेवाईक, आप्तेष्ट, सावकारांचे कर्जासाठी उंबरठे झिजविले जात आहे. असे असताना प्रशासनाकडून या गंभीर परिस्थितीची कुठलीही दखल घेतल्या गेली नाही. वास्तविक सोयाबीन पिकाचा आतापर्यंत सर्वे व्हायला हवा होता. तसेच शेतकर्‍यांना फुल ना फुलाची पाकळी अशी आर्थिक मदत करून तात्काळ दिलासा द्यावा  अशी मागणी तिवारी यांनी  केली आहे 
विदर्भाचे नगदी पिक  कपाशीचे उत्पन्न पाण्याअभावी जाऊ नये म्हणून तालुक्यातील शेतकर्‍यांनी कर्ज काढून सिंचनाच्या सुविधा उपलब्ध केल्या. मात्र भारनियमनाच्या फटक्याने त्या कुचकामी ठरत असून, २० लाख हेक्टर मध्ये कापसाची पेरणी केलेले शेतकरी प्रचंड संकटात सापडले आहे. कपाशीचे उत्पन आता एकरी एक ते दोन किंटळचा होणार नाही त्यातच कापसाचा बाजार भाव हमीभावापेक्षा कमी झाला आहे सरकारने तात्काळ कापुस उत्पादक   शेतकऱ्यांची मदत करावी अशी मागणी तिवारी यांनी पुन्हा केली आहे .

निसर्गाच्या लहरीपणासोबतच वीज वितरणाचा मनमानी कारभारही शेतकऱ्यांच्या संकटात भर घालत आहे. सध्या कृषी फिडरवर २२ तासाचे भारनियमन होत आहे. केवळ दोन तास वीज उपलब्ध होत आहे. अशा स्थितीत काही शेतकरी रात्री बे रात्री जाऊन ओलिताचा प्रयत्न करीत आहे. मात्र तेही शक्य होत नाही. वीज वितरणपुढे शेतकऱ्यांनी आता हात टेकले आहे,मात्र शेतकऱ्यांचा . कोणीच वाली दिसत नाही अशा अडचणीत शेतकर्याना फक्त देवच वाचवू शकतो कारण सर्वच नेते शेतकऱ्यांच्या कबरीवर बसून सत्ता काबीज करण्याचा प्रयन्त करीत आहेत याला आता शेतकऱ्यांनीच उत्तर देणे गरजेचे आहे मात्र शेतकरी जाती राजकारणात आंधळा झाल्याची खंत तिवारी यांनी व्यक्त केली .

Thursday, October 23, 2014

ऐन दिवाळीच्या धामधुमीत विदर्भात सहा शेतकऱ्यांच्या आत्महत्या :कापसाच्या व सोयाबीनच्या नापिकीनंतर हमीभावापेक्षा कमी भावाच्या धक्क्याने विदर्भाचे ३० लाख शेतकरी संकटात

ऐन दिवाळीच्या धामधुमीत विदर्भात सहा शेतकऱ्यांच्या आत्महत्या :कापसाच्या व सोयाबीनच्या नापिकीनंतर हमीभावापेक्षा कमी भावाच्या धक्क्याने विदर्भाचे ३० लाख शेतकरी संकटात 

विदर्भ -२४ ऑक्टोबर २०१४

एकीकडे सारा देश दिवाळी साजरा करीत होता मात्र यवतमाळ जिल्यातील केळझर येथील राजेन्द्र चहांदे ,उमरी(पाथरी ) चे दत्ता चेडे ,पारवा येथील नागराज महान्डोले व गंगापूरचे अरुणभाऊ करनुले तर अकोला जिल्याचे चिंचोली येथील किसनराव सानप व  अमरावती जिल्याचे शेंदूरजनाघाट्चे मनोजभाऊ फुटाणे यांनी नापिकी व कर्जबाजारी पणामुळे  आपली जीवनयात्रा संपविल्यामुळे विदर्भाच्या शेतकऱ्यांना मात्र 'काळी दिवाळीच ' साजरी करावी लागली  ह्या सर्व शेतकऱ्यांनी तिबार पेरणी करून आपले कापुस व सोयाबीनचे पिक उभे केले होते मात्र १५ सप्टेंबर पासून पावसाची दडी, विविध किडींचा प्रकोप आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेतच सोयाबीनची पानगळ , कापसाचे बोंडे सडल्यामुळे  आणी  सध्या कृषी फिडरवरील २२ तासाचे भारनियमन त्यातच कापसाचे भाव रुपये ३५०० तर सोयाबीन रुपये २८०० वर बाजारात कोणीही विकत घेत नसल्यामुळे झाल्या आहेत जर सरकारने तात्काळ मदत व कापसाचा व सोयाबीनचा हमीभाव व त्यावर खरेदी सुरु केली नाहीतर  उपासमारीला तोंड देत असलेले  शेतकरी आत्महत्या करतील असा गंभीर इशारा शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी दिला आहे. 

खुल्या बाजारात कापसाचे भाव हमीभावापेक्षा कमी झाले आहेत व कापसाचे उत्पन्न २०%  टक्का  होत आहे तर संपूर्ण सोयाबीन बरबाद झाले मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ओरड करणारे नेते आता मात्र सत्तेचे वारे लागल्यानंतर  साधा फोनही उचलत  नाही हि शरमेची बाब आहे ,केंद्र व राज्य सरकार झोपले आहे का असा सवाल ,किशोर तिवारी यांनी केला आहे 

एकीकडे भारताच्या पंतप्रधानासह नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस निवडणुकीमध्ये  शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा बाजार करीत होते याच दरम्यान विदर्भात  नापिकी व कापसाचे व सोयाबीनचे उभे पिक पाण्याने दगा दिल्याने व  रोगांचा व कीटकांचा हल्लामुळे तीस लाख हेक्टर मधील नगदी कापसाचे व सोयाबीनचे पिक बुड्याल्यामुळे ६२ कोरडवाहू शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून यावर्षी विदर्भात ९०६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची सरकार दरबारी नोंद झाली आहे  सरकारने विदर्भातील संकटावर जर लक्ष दिले नाहीतर शेकडो कर्जबाजारी  नापिकीग्रस्त कोरडवाहु शेतकरी आत्महत्या करतील असा इशारा विदर्भ जनांदोलन समितीचे नेते किशोर तिवारी यांनी दिला आहे 

यावर्षी विदर्भात  पावसाने  २५ ऑगस्टलाच हजेरी लावल्याने व नंतर १७  सप्टेंबर नंतर गायब झाल्यानंतर दुबार-तिबार  पेरणी करून थोडा दम धरलेल्या शेतकऱ्यांना भारनियमनाने पार बरबाद केले असून ऐन दिवाळीत शेतकरी व शेतमजुर उपासमारीला तोंड देत असुन दिवाळीसाठी फाटकेतर सोडा सध्या खेड्यात फुटाणे घेण्यासाठीही दमडी नसून या दशकातील हि सर्वात मोठी  नापिकी असुन मात्र सरकार व सर्व राजकीय नेते यावर एक शब्दही बोलत नसून अधिकारीमात्र वातानुकुल कक्षात बसून विक्रमी उत्पादनाचे दावे करीत आहेत यावर्षी पहिले गारपीट नंतर पावसाने दगा दिल्याने विदर्भात २० ऑक्टोबर पर्यंत ९००च्या वर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून जर सरकारने तात्काळ कापसाच्या भावाचा प्रश्न व नापिकीग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी व मदत घोषित करावी अशी मागणी विदर्भ जनांदोलन समितीचे नेते किशोर तिवारी महामहीन राज्यपालांना  आहे . 

या वर्षी संपूर्ण विदर्भात ३० लाख हेक्टर मध्ये सोयाबीन आणि कापूस पिकाने दगा दिल्याने शेतकर्‍यांची दिवाळी अंधारात जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्याचा सोयाबीन वर जर  खर्च अडीच हजार असताना उत्पन्न मात्र दोन हजार रुपयांचे होत असल्याने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. येरव्ही सोयाबीनचे ३० किलो बियाणे पेरणी केल्यानंतर आठ ते दहा क्विंटल होणारे उत्पन्न आता केवळ ८० किलोवर आले आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे. यंदा सुरूवातीलाच पावसाने दडी मारली. त्यानंतर सुरळीत पावसाला सुरूवात झाली. त्यामुळे शेतकर्‍यांनी पेरणी केली मात्र पुन्हा पावसाने दगा दिल्यानंतर अनेकांना दुबार, तिबार पेरणी करावी लागली. उशिरा पेरणी झाल्याने आणि वातावरणातील बदलाने उत्पन्नात कमालीची घट झाली. एरव्ही३० किलो सोयाबीन बियाण्याची लागवण केली की त्यापासून आठ ते दहा क्विंटल सोयाबीनचे उत्पन्न व्हायचे. मात्र यावर्षी ३० किलोला ८० किलो अशी सोयाबीनची उतारी आहे. त्यातच सोयाबीन काढणीचा खर्च प्रती बॅग १ हजार ५००रुपये झाला आहे. मशीन आणि ट्रॅक्टरचा खर्च एक हजार रुपये असा २ हजार ५०० रुपये खर्च आहे. याव्यतिरिक्त लागवण आणि मजूरीचा खर्च वेगळा असे असताना काढणीचाच खर्च २ हजार ५०० रुपये उत्पन्न मात्र २ हजार रुपये अशी परिस्थिती तालुक्यात सर्वदूर आहे. त्यामुळे शेतकरी चिंतातुर झाला आहे. अनेकांनी सोयाबीनची ही उतारी पाहून त्यामध्ये जनावरे सोडणेच पसंत केले आहे मात्र अधिकारी सरकारला अंधारात ठेवत आहेत ,असा आरोप तिवारी यांनी केला आहे . 
दिवाळी हा सण सर्वांसाठीच महत्वाचा. तीन दिवसांवर हा सण येऊन ठेपला असताना पैशाची तजवीज करण्यासाठी शेतकर्‍यांची धडपड सुरू आहे. नातेवाईक, आप्तेष्ट, सावकारांचे कर्जासाठी उंबरठे झिजविले जात आहे. असे असताना प्रशासनाकडून या गंभीर परिस्थितीची कुठलीही दखल घेतल्या गेली नाही. वास्तविक सोयाबीन पिकाचा आतापर्यंत सर्वे व्हायला हवा होता. तसेच शेतकर्‍यांना फुल ना फुलाची पाकळी अशी आर्थिक मदत करून त्यांना दिवाळी सणापूर्वी दिलासा द्यायला हवा होता. 
विदर्भाचे नगदी पिक  कपाशीचे उत्पन्न पाण्याअभावी जाऊ नये म्हणून तालुक्यातील शेतकर्‍यांनी कर्ज काढून सिंचनाच्या सुविधा उपलब्ध केल्या. मात्र भारनियमनाच्या फटक्याने त्या कुचकामी ठरत असून, २० लाख हेक्टर मध्ये कापसाची पेरणी केलेले शेतकरी प्रचंड संकटात सापडले आहे. कपाशीचे उत्पन आता एकरी एक ते दोन किंटळचा होणार नाही त्यातच कापसाचा बाजार भाव हमीभावापेक्षा कमी झाला आहे सरकारने तात्काळ कापुस उत्पादक   शेतकऱ्यांची मदत करावी अशी मागणी तिवारी यांनी पुन्हा केली आहे .

निसर्गाच्या लहरीपणासोबतच वीज वितरणाचा मनमानी कारभारही शेतकऱ्यांच्या संकटात भर घालत आहे. सध्या कृषी फिडरवर २२ तासाचे भारनियमन होत आहे. केवळ दोन तास वीज उपलब्ध होत आहे. अशा स्थितीत काही शेतकरी रात्री बे रात्री जाऊन ओलिताचा प्रयत्न करीत आहे. मात्र तेही शक्य होत नाही. वीज वितरणपुढे शेतकऱ्यांनी आता हात टेकले आहे,मात्र शेतकऱ्यांचा . कोणीच वाली दिसत नाही अशा अडचणीत शेतकर्याना फक्त देवच वाचवू शकतो कारण सर्वच नेते शेतकऱ्यांच्या कबरीवर बसून सत्ता काबीज करण्याचा प्रयन्त करीत आहेत याला आता शेतकऱ्यांनीच उत्तर देणे गरजेचे आहे मात्र शेतकरी जाती राजकारणात आंधळा झाल्याची खंत तिवारी यांनी व्यक्त केली .

Six farmers commit suicide in Maharashtra's Vidarbha- IANS via TIMES OF INDIA

IANS | Oct 23, 2014, 02.35 PM IST

NAGPUR: An activist on Thursday blamed official apathy for the suicide by six farmers in Maharashtra's Vidarbha region. 

Four of them were from Yavatmal district and one each from Akola and Amravati districts, Vidarbha Jan Andolan Samiti president Kishore Tiwari said. The deaths occurred on Wednesday. 

"The farmers voted overwhelmingly for the BJP in both the Lok Sabha and assembly elections hoping their suffering will be mitigated," Tiwari told IANS. 

He said the Bharatiya Janata Party promised during the election campaign to address issues such as debts, market prices of cotton and soyabean, and compensation for crop failures. 

But continuing official apathy has forced the farmers to take their lives, Tiwari said. 

The activist urged Prime Minister Narendra Modi to visit Vidarbha. He said the monsoon was delayed by two months this year and a dry spell after Sep 15 had hit the crops badly. 

According to the National Crime Records Bureau, 3,146 distressed farmers committed suicide last year in Maharashtra — the highest number for any state.

Tuesday, October 21, 2014

कापसाच्या व सोयाबीनच्या अभूतपूर्व नापिकीमुळे विदर्भात शेतकऱ्यांची काळी दिवाळी :ऐन दिवाळीच्या दिवशी शेतकरी फटाके तर सोडा फुटण्यापासून वंचित

कापसाच्या व सोयाबीनच्या  अभूतपूर्व नापिकीमुळे विदर्भात शेतकऱ्यांची काळी दिवाळी :ऐन दिवाळीच्या दिवशी शेतकरी फटाके तर सोडा फुटण्यापासून वंचित 

दिनांक -२१ ऑक्टोबर २०१४

यावर्षी विदर्भात  पावसाने  २५ ऑगस्टलाच हजेरी लावल्याने व नंतर १७  सप्टेंबर नंतर गायब झाल्यानंतर दुबार-तिबार  पेरणी करून थोडा दम धरलेल्या शेतकऱ्यांना भारनियमनाने पार बरबाद केले असून ऐन दिवाळीत शेतकरी व शेतमजुर उपासमारीला तोंड देत असुन दिवाळीसाठी फाटकेतर सोडा सध्या खेड्यात फुटाणे घेण्यासाठीही दमडी नसून या दशकातील हि सर्वात मोठी  नापिकी असुन मात्र सरकार व सर्व राजकीय नेते यावर एक शब्दही बोलत नसून अधिकारीमात्र वातानुकुल कक्षात बसून विक्रमी उत्पादनाचे दावे करीत आहेत यावर्षी पहिले गारपीट नंतर पावसाने दगा दिल्याने विदर्भात २० ऑक्टोबर पर्यंत ९००च्या वर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून जर सरकारने तात्काळ कापसाच्या भावाचा प्रश्न व नापिकीग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी व मदत घोषित करावी अशी मागणी विदर्भ जनांदोलन समितीचे नेते किशोर तिवारी महामहीन राज्यपालांना  आहे . 

या वर्षी संपूर्ण विदर्भात ३० लाख हेक्टर मध्ये सोयाबीन आणि कापूस पिकाने दगा दिल्याने शेतकर्‍यांची दिवाळी अंधारात जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्याचा सोयाबीन वर जर  खर्च अडीच हजार असताना उत्पन्न मात्र दोन हजार रुपयांचे होत असल्याने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. येरव्ही सोयाबीनचे ३० किलो बियाणे पेरणी केल्यानंतर आठ ते दहा क्विंटल होणारे उत्पन्न आता केवळ ८० किलोवर आले आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे. यंदा सुरूवातीलाच पावसाने दडी मारली. त्यानंतर सुरळीत पावसाला सुरूवात झाली. त्यामुळे शेतकर्‍यांनी पेरणी केली मात्र पुन्हा पावसाने दगा दिल्यानंतर अनेकांना दुबार, तिबार पेरणी करावी लागली. उशिरा पेरणी झाल्याने आणि वातावरणातील बदलाने उत्पन्नात कमालीची घट झाली. एरव्ही३० किलो सोयाबीन बियाण्याची लागवण केली की त्यापासून आठ ते दहा क्विंटल सोयाबीनचे उत्पन्न व्हायचे. मात्र यावर्षी ३० किलोला ८० किलो अशी सोयाबीनची उतारी आहे. त्यातच सोयाबीन काढणीचा खर्च प्रती बॅग १ हजार ५००रुपये झाला आहे. मशीन आणि ट्रॅक्टरचा खर्च एक हजार रुपये असा २ हजार ५०० रुपये खर्च आहे. याव्यतिरिक्त लागवण आणि मजूरीचा खर्च वेगळा असे असताना काढणीचाच खर्च २ हजार ५०० रुपये उत्पन्न मात्र २ हजार रुपये अशी परिस्थिती तालुक्यात सर्वदूर आहे. त्यामुळे शेतकरी चिंतातुर झाला आहे. अनेकांनी सोयाबीनची ही उतारी पाहून त्यामध्ये जनावरे सोडणेच पसंत केले आहे मात्र अधिकारी सरकारला अंधारात ठेवत आहेत ,असा आरोप तिवारी यांनी केला आहे . 
दिवाळी हा सण सर्वांसाठीच महत्वाचा. तीन दिवसांवर हा सण येऊन ठेपला असताना पैशाची तजवीज करण्यासाठी शेतकर्‍यांची धडपड सुरू आहे. नातेवाईक, आप्तेष्ट, सावकारांचे कर्जासाठी उंबरठे झिजविले जात आहे. असे असताना प्रशासनाकडून या गंभीर परिस्थितीची कुठलीही दखल घेतल्या गेली नाही. वास्तविक सोयाबीन पिकाचा आतापर्यंत सर्वे व्हायला हवा होता. तसेच शेतकर्‍यांना फुल ना फुलाची पाकळी अशी आर्थिक मदत करून त्यांना दिवाळी सणापूर्वी दिलासा द्यायला हवा होता. 
विदर्भाचे नगदी पिक  कपाशीचे उत्पन्न पाण्याअभावी जाऊ नये म्हणून तालुक्यातील शेतकर्‍यांनी कर्ज काढून सिंचनाच्या सुविधा उपलब्ध केल्या. मात्र भारनियमनाच्या फटक्याने त्या कुचकामी ठरत असून, २० लाख हेक्टर मध्ये कापसाची पेरणी केलेले शेतकरी प्रचंड संकटात सापडले आहे. कपाशीचे उत्पन आता एकरी एक ते दोन किंटळचा होणार नाही त्यातच कापसाचा बाजार भाव हमीभावापेक्षा कमी झाला आहे सरकारने तात्काळ कापुस उत्पादक   शेतकऱ्यांची मदत करावी अशी मागणी तिवारी यांनी पुन्हा केली आहे . 

Sunday, October 19, 2014

विदर्भाच्या शेतकऱ्यांना व आदिवासींना तात्काळ दिलासा -भाजपला अभूतपूर्व यशावर विदर्भ जनांदोलन समितीची प्रतिक्रिया

 विदर्भाच्या शेतकऱ्यांना व  आदिवासींना तात्काळ दिलासा -भाजपला अभूतपूर्व यशावर  विदर्भ जनांदोलन समितीची   प्रतिक्रिया 
दिनांक -१९ ऑक्टोबर  २०१४
महाराष्ट्राच्या  विधानसभेत विदर्भाने भाजपला अभूतपूर्व साथ देत ६२ मधुन ४२ आमदार देले आहेत आता विदर्भाच्या शेतकऱ्याच्या ,आदिवासींचा व युवकांच्या समस्या सोडविण्यासाठी वेगळ्या विदर्भाची निर्मिती तात्काळ करावी अशी मागणी विदर्भ जनांदोलन समितीचे नेते किशोर तिवारी यांनी आज केली कारण  जो पर्यंत विदर्भ  महाराष्ट्राच्या गुलामगीरीतून मुक्त  होण्यासाठी सध्या केंद्रामध्ये भाजप सरकार असल्यामुळे आणी वेगळा विदर्भासाठी भाजपला अभूतपूर्व जन समर्थन देऊन  शेतकऱ्यांच्या आत्मह्त्या रोखण्यासाठी ,बेरोजगारांना काम मिळण्यासाठी ,आदिवासींची उपेक्षा व उपासमार थांबण्यासाठी भाजप विदर्भाला दिलासा द्यावा अशी कळकळीची विनंतीही तिवारी यांनी केली आहे 
भाजप नेते नितीन गडकरी , देवेंद्र फडणवीस व सुधीर मूनगटीवार  यांचे या यशावर अभिनंदन करून किशोर तिवारी यांनी  केंद्रामध्ये भाजपचे मोदी सरकार आल्यावर लोकसभेच्या  निवडणुकीमध्ये 'महायुतीने ' सातबारा कोरा करण्याचे ,लागवड कर्ज अधिक ५०% नफा  कापूस ,सोयाबीन व धानाला देण्याचे तसेच संपूर्ण महाराष्ट्र 'टोल मुक्त' करण्याचे स्पष्ट आश्वासन वारंवार देण्यात आले होते याची आठवण करून दिली तर या नेत्यांनी   सातबारा कोरा करण्याचे ,लागवड कर्ज अधिक ५०% नफा  असा हमीभाव कापूस ,सोयाबीन व धानाला देण्याचे तसेच सर्व गरिबाला अन्न व आरोग्य सुरक्षा सह संपूर्ण महाराष्ट्र 'टोल मुक्त' करण्याचे मागण्यावर भाजप पुर्ण करण्याची  तर भाजप नेते नितीन गडकरी यांनी आपल्या ग्रामीण मंत्रालयातून शिरपूर बंधारे बांधण्यासाठी व शेतीसाठी सोलर पंम्प देण्याचे विषेय पकेज घोषित केले व अन्न व निवारा सर्व गरिबांना २०१३ च्या यादी नुसार दारिद्रेषेचे कार्ड व सर्व गरिबांना अंत्योदय अन्न सुरक्षा व घरकुल दिलेल्या शब्दाचे विसर करू नका अशी विनंतीही तिवारी यांनी केली आहे . 
 
विदर्भ जनांदोलन समितीने निवडणुकीपूर्वी सर्व राजकीय  पक्षांशी आपल्या मागण्यासाठी साकडे घातले होते मात्र फक्त भाजपनेच कोरडवाहु शेतकऱ्यांच्या  प्रमुख मागण्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या सात-बारा कोरा करणे, कोरडवाहु शेतकऱ्यांना रोजगार हमी योजनेमधून प्रती हेक्टरी १०० दिवसाची मजुरी सरळ अनुदान रूपाने देणे ,कापूस -सोयाबीन   - धानासाठी  राष्ट्रीय शेतकरी आयोगाच्या शिफारशी प्रमाणे हमीभाव देण,सर्व आदिवासीना तात्काळ खावटी देणे   ,दुष्काळग्रस्त आदिवासी  शेतकऱ्यांच्याना व शेतमजुरांना सरसकट खावटी वाटप   करणे ,सर्व गरिबांना २०१३ च्या यादी नुसार मोफत वैद्दकिय सेवा  व सर्व सरकारी दवाखान्यात जनरिक औषधीचे दुकान, सर्व गरीब वृद्धाना व विधवा , सर्व शेतकरी विधवा ,परितक्त्या महिलांना दरमहा कमीतकमी हजार रुपये मासीक अनुदान व सरकारी नौकर सारखे प्रत्येक महीन्याला १ तारखेला बँकेतून देण्याची योजना या सर्व मागण्या सरकार तांत्रिक अडचणी दूर करून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते  व यासाठीच विदर्भाचे शेतकरी ,आदिवासी व गरीब जनता भाजप सोबत जात आहे अशी माहिती किशोर तिवारी यांनी दिली . 

Thursday, October 16, 2014

निवडणुकीच्या प्रचार दरम्यान एकट्या यवतमाळ जिल्यात १० शेतकऱ्यांचा आत्महत्याच्या : सर्वच पक्षांना आत्महत्याग्रस्त दुष्काळ पीडितांचा विसर

निवडणुकीच्या प्रचार दरम्यान एकट्या यवतमाळ  जिल्यात  १० शेतकऱ्यांचा  आत्महत्याच्या : सर्वच पक्षांना आत्महत्याग्रस्त दुष्काळ पीडितांचा विसर 

यवतमाळ -एकीकडे भारताच्या पंतप्रधानासह सर्वच पक्षांचे राष्ट्रीय नेते प्रचार करण्यात व शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा बाजार करीत होते याच दरम्यान मागील दहा दिवसात एकट्या यवतमाळ जिल्यात नापिकी व कापसाचे व सोयाबीनचे उभे पिक पाण्याने दगा दिल्याने व  रोगांचा व कीटकांचा हल्लामुळे संपूर्ण यवतमाळ जिल्यातील सहा लाख हेक्टर मधील नगदी कापसाचे व सोयाबीनचे पिक बुड्याल्यामुळे दहा कोरडवाहू शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून सरकारने विदर्भातील शेती संकटावर जर लक्ष दिले नाहीतर शेकडो कर्जबाजारी  नापिकीग्रस्त कोरडवाहु शेतकरी आत्महत्या करतील असा इशारा विदर्भ जनांदोलन समितीचे नेते किशोर तिवारी यांनी दिला आहे . 
ज्या दहा शेतकऱ्यांच्या आत्महत्या निवडणुकीच्या दहा दिवसाच्या धामधुमीत समोर आल्या त्यामध्ये कोरेगावचे हनुमान गाडेकर ,किन्ही (तिवसाळा )चे  संजय जाधव ,  सायतखर्डा येथील  श्रीकांत ठाकरे ,पळसोनी येथे कर्ज बाजारी शेतकरी बंडू कोकडे तर कोपणा येथील बळीराम पवार हे नापिकी व उपासमारीमुळे आत्महत्या करीत होते या दोन दुर्देवी घटनेपूर्वी  मागील चार दिवसात एकट्या यवतमाळ जिल्यात पाच शेतकऱ्यांनी आत्महत्या करून आपली जीवन यात्रा संपविली असल्याची घटना समोर आल्या आहेत यामध्ये घारफळचे  सुभाष धूरट , सायफळ्चे दत्ता रावते ,पलसीचे आकाश पवार  ,हस्तापुरचे  अमोल चौधरी व वांजरीचे जनार्दन पवार यांचा समावेश ह्या सर्व शेतकऱ्यांनी तिबार पेरणी करून आपले कापुस व सोयाबीनचे पिक उभे केले होते मात्र १५ सप्टेंबर पासून पावसाची दडी, विविध किडींचा प्रकोप आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेतच सोयाबीनची पानगळ , कापसाचे बोंडे सडल्यामुळे  आणी  सध्या कृषी फिडरवरील २२ तासाचे भारनियमन झालेली नापिकी जबाबदार असून मात्र एकही नेता या विषयावर आवाज उडवीत नसुन जर तात्काळ मदत व भारनियमन बंद झाले नाही तर मोठ्या प्रमाणात ऐन  दिवाळीमध्ये उपासमारीला तोंड देत असलेले  शेतकरी आत्महत्या करतील असा गंभीर इशारा शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी दिला आहे. 
खुल्या बाजारात कापसाचे भाव हमीभावापेक्षा कमी झाले आहेत व कापसाचे उत्पन्न २०%  टक्का  होत आहे तर संपूर्ण सोयाबीन बरबाद झाले मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मत मागतानाही यावर तोडगा सुचत नाही हि शरमेची बाब आहे ,केंद्र व राज्य सरकार झोपले आहे का असा सवाल ,तिवारी यांनी केला आहे . 
 अशा स्थितीत  यवतमाळ जिल्ह्यातील सहा  लाख हेक्टरवरील सोयाबीन सोंगण्यापूर्वीच भूईसपाट झाल्याचे दिसत आहे तर कापसाची बोंडे गळून पडली आहे  या परिस्थितीतून वाचण्यासाठी शेतकरी ओलिताचा प्रयत्न करीत आहे. मात्र कृषी फिडरवरील २२ तासाचे भारनियमन यावरही पाणी फेरत आहे,निसर्ग प्रकोप शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाही. काल-पर्वापर्यंत हिरवे दिसणारे शेतशिवार उन्हाच्या तडाख्याने करपले आहे. सुरुवातीपासूनच पावसाचे दृष्टचक्र शेतकऱ्यांच्या पाठीमागे आहे. मृग आणि रोहिणी नक्षत्र कोरडे गेले. उशिरा आलेल्या पावसाने पेरणी उशिरा झाली. सर्वाधिक फटका बसला तो सोयाबीनला व कापूस या नगदी पिकाला  मात्र पावसाचा लपंडाव सुरूच होता. सोयाबीन फुलोऱ्यावर असताना पावसाने पाठ फिरविली. परतीचा पाऊसही बरसला नाही. त्यामुळे आधीच कुपोषित असलेले पीक रोगाला बळी पडले. बुरशीजन्य रोगांचे प्रारंभी आक्रमण झाले. त्यानंतर मोझॅकने कहर केला. हिवरीगार दिसणारी पाने पिवळी पडू लागली. त्यातच उंट अळीचाही प्रकोप सुरू झाला. शेंगा हिरव्या अवस्थेत असतानाच सोयाबीनची पानगळ झाली. सोयाबीनच्या झाडाला पाने नाही आणि अपरिपक्व शेंगा दिसत आहे. अशा स्थितीत अपुऱ्या पाण्यामुळे सोयाबीनच्या शेंगा भरणे कठीण झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तीन लाख हेक्टरवरील सोयाबीन सोंगण्यापूर्वीच भूईसपाट झाल्याचे दिसत आहे कापसाची नापिकी पेक्षाही जास्त आहे त्यातच निसर्गाच्या लहरीपणासोबतच वीज वितरणाचा मनमानी कारभारही शेतकऱ्यांच्या संकटात भर घालत आहे. सध्या कृषी फिडरवर २२ तासाचे भारनियमन होत आहे. केवळ दोन तास वीज उपलब्ध होत आहे. अशा स्थितीत काही शेतकरी रात्री बे रात्री जाऊन ओलिताचा प्रयत्न करीत आहे. मात्र तेही शक्य होत नाही. वीज वितरणपुढे शेतकऱ्यांनी आता हात टेकले आहे,मात्र शेतकऱ्यांचा . कोणीच वाली दिसत नाही अशा अडचणीत शेतकर्याना फक्त देवच वाचवू शकतो कारण सर्वच नेते शेतकऱ्यांच्या कबरीवर बसून सत्ता काबीज करण्याचा प्रयन्त करीत आहेत याला आता शेतकऱ्यांनीच उत्तर देणे गरजेचे आहे मात्र शेतकरी जाती राजकारणात आंधळा झाल्याची खंत तिवारी यांनी व्यक्त केली .

Friday, October 10, 2014

Maharashtra Poll game over kisan deaths-Statesman

Maharashtra Poll game over kisan deaths-Statesman 
No party seems to be bothered about concrete action on the ground
http://www.thestatesman.net/news/80677-poll-game-over-kisan-deaths.html
Statesman News service
Mumbai, 9 October
Farmer suicides continue unabated in Maharashtra, even as political parties in the state are busy indulging in a blame-game over the issue in the run up to the Assembly polls. Seven farmers have taken their lives over the past five days in Yavatmal district alone. 
During the same time span, Prime Minister Narendra Modi has lashed out at the previous Congress-NCP government in the state, blaming it for the high incidence of farm suicides; the latter, no longer in an alliance, have hit back saying suicides had decreased in 2013, and Modi was referring to 2012 data to claim that ‘more than 10 farmers (are) committing suicide every day’.
Although the issue has become a talking point owing to the trading of charges, no party seems to be bothered about concrete action on ground. In Yavatmal ~ which is part of the Vidarbha region, also known as Maharashtra’s farm suicide capital ~ the crisis has deepened owing to the absence of the retreating monsoon. Standing crops spread around 9 lakh hectares (6 lakh hectares of soyabean and 3 lakh hectares of cotton) have dried up, and incessant load-shedding has meant that even those with access to wells have not been able to water their fields.
Most farmers in the region had to sow their fields twice or thrice owing to the late onset of monsoons, thereby spiking already high-input costs. The crisis has manifested itself in about 60 farmers in Vidarbha taking their lives since the issuance of the Assembly poll notification in mid-September, as per estimates of farmer advocacy group Vidarbha Jan Andolan Samiti (VJAS).
Shekhar Joshi, a farmer who is also part of VJAS, says even if load shedding is halted for 15-20 days, there will be some visible improvement in the situation, as those with access to wells and tanks can water their fields. “At present, the state electricity board gives them power for two hours at around 2 in the night. Given the situation, can they not ensure proper electricity supply for a few days,” he asks.
Joshi says local politicians are busy skirting the issue, while state-level leaders are engaged in grand-standing. Vijay Jawandhia from farmers’ group Shetkari Sanghatana Paik agrees. “Look at what Narendra Modi said at his Khamgaon rally,” he urges. “He said cotton farmers would get good prices in the international market. Does he not know that international prices of cotton have slumped in 2014?”In 2011-12, when cotton was trading at 247 cents per pound in the US, cotton farmers here received between Rs 6000-6500 per quintal. In 2014-15, Jawandhia says, US rates have slumped to 70 cents per pound. “How will farmers get better prices? This is eyewash,” he notes.
Congress has been promised a slew of projects for agriculture if elected to power again. Its chief ministerial candidate Prithviraj Chavan has, over Twitter, promised to reduce distress sale ‘through arrangement of mortgaging agricultural produce’ and ensure electricity supply to farmers ‘for at least 8 hours in the daytime and 10 hours at night’.

Sunday, October 5, 2014

वेगळ्या विदर्भाच्या निर्मितीसाठी भाजप सोबत जाण्याच्या विदर्भ जनांदोलन समितीचा निर्धार

वेगळ्या विदर्भाच्या निर्मितीसाठी भाजप सोबत जाण्याच्या विदर्भ जनांदोलन समितीचा निर्धार  
दिनांक -६ ऑक्टोबर  २०१४
विदर्भाच्या शेतकऱ्याच्या ,आदिवासींचा व युवकांच्या समस्या सोडविण्यासाठी वेगळ्या विदर्भाची निर्मिती एकमेव पर्याय असून जो पर्यंत विदर्भ  महाराष्ट्राच्या गुलामगीरीतून मुक्त  होण्यासाठी सध्या केंद्रामध्ये भाजप सरकार असल्यामुळे आणी वेगळा विदर्भासाठी भाजप तयार असुन मात्र शिवसेना ,कॉंग्रेस , मनसे व राष्ट्रवादीने विदर्भासाठी खुल्ला विरोध केल्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्मह्त्या रोखण्यासाठी येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विदर्भाचे शेतकरी व आदिवासी भाजप सोबत जाण्याचा एकमुखी ठराव ५ ऑक्टोबरला  हजारो शेतकरी व  शेतकरी विधवांच्या पांढरकवडा येथील निर्धार मेळाव्यात घेण्यात आला ,अशी घोषणा विदर्भ जनांदोलन समितीचे नेते किशोर तिवारी यांनी आज केली . 

भाजप नेते नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून केंद्रामध्ये भाजपचे मोदी सरकार आल्यावर लोकसभेच्या  निवडणुकीमध्ये 'महायुतीने ' सातबारा कोरा करण्याचे ,लागवड कर्ज अधिक ५०% नफा  कापूस ,सोयाबीन व धानाला देण्याचे तसेच संपूर्ण महाराष्ट्र 'टोल मुक्त' करण्याचे स्पष्ट आश्वासन वारंवार देण्यात आले होते याची आठवण करून दिली तर या नेत्यांनी   सातबारा कोरा करण्याचे ,लागवड कर्ज अधिक ५०% नफा  असा हमीभाव कापूस ,सोयाबीन व धानाला देण्याचे तसेच सर्व गरिबाला अन्न व आरोग्य सुरक्षा सह संपूर्ण महाराष्ट्र 'टोल मुक्त' करण्याचे मागण्यावर भाजप गंभीर असुन मोदीची देलेले सर्व आश्वासन पुर्ण त्यांना वेळ द्या असे आवाहन केले तर भाजप नेते नितीन गडकरी यांनी आपल्या ग्रामीण मंत्रालयातून शिरपूर बंधारे बांधण्यासाठी व शेतीसाठी सोलर पंम्प देण्याचे विषेय पकेज घोषित केले व अन्न व निवारा सर्व गरिबांना २०१३ च्या यादी नुसार दारिद्रेषेचे कार्ड व सर्व गरिबांना अंत्योदय अन्न सुरक्षा व घरकुल मागणी तात्काळ पूर्ण करण्याची घोषणाही रालेगावच्या सभेत केली . 
 
विदर्भ जनांदोलन समितीने सर्व राजकीय  पक्षांशी आपल्या मागण्यासाठी साकडे घातले होते मात्र फक्त भाजपनेच कोरडवाहु शेतकऱ्यांच्या  प्रमुख मागण्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या सात-बारा कोरा करणे, कोरडवाहु शेतकऱ्यांना रोजगार हमी योजनेमधून प्रती हेक्टरी १०० दिवसाची मजुरी सरळ अनुदान रूपाने देणे ,कापूस -सोयाबीन   - धानासाठी  राष्ट्रीय शेतकरी आयोगाच्या शिफारशी प्रमाणे हमीभाव देण,सर्व आदिवासीना तात्काळ खावटी देणे   ,दुष्काळग्रस्त आदिवासी  शेतकऱ्यांच्याना व शेतमजुरांना सरसकट खावटी वाटप   करणे ,सर्व गरिबांना २०१३ च्या यादी नुसार मोफत वैद्दकिय सेवा  व सर्व सरकारी दवाखान्यात जनरिक औषधीचे दुकान, सर्व गरीब वृद्धाना व विधवा , सर्व शेतकरी विधवा ,परितक्त्या महिलांना दरमहा कमीतकमी हजार रुपये मासीक अनुदान व सरकारी नौकर सारखे प्रत्येक महीन्याला १ तारखेला बँकेतून देण्याची योजना या सर्व मागण्या सरकार तांत्रिक अडचणी दूर करून तोडगा काढण्याचे आश्वासन फक्त भाजपने दिल्याने विदर्भाचे शेतकरी ,आदिवासी व गरीब जनता भाजप सोबत जात आहे अशी माहिती किशोर तिवारी यांनी दिली . 
पंतप्रधान मोडीचा असर व  ते विदर्भाच्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखतील ,कापसाला भाव देतील ,विकास करतील असा आशावाद जनतेमध्ये आहे व जनतेच्या या भावनाचा आदर करूनच आम्ही हा निर्णय घेतला आहे आता पुढचा काळच कोण बरोबर आणि कोण चूक हे लवकरच समोर येईल ,असा आशावादी सूर तिवारी यांनी घेतला . 
 .

Friday, October 3, 2014

सामाजिक चळवळ म्हणजे पोटभरू पक्षांना पाठींबा देण्याचे दुकान नाही :शेतकऱ्यांच्या व आदिवासींचा ५ ऑक्टोबरला निर्धार मेळावा

सामाजिक चळवळ म्हणजे पोटभरू पक्षांना पाठींबा देण्याचे दुकान नाही :शेतकऱ्यांच्या व आदिवासींचा  ५ ऑक्टोबरला निर्धार मेळावा 
दिनांक -४ ऑक्टोबर  २०१४
महाराष्ट्राचे शेतकरी व ग्रामीण जनता आदिवासी आर्थिक संकटाला तोंड  देत असतांना सर्व राजकीय पक्ष जनतेच्या मूळ मागण्यांना बगल देत असून सत्ता मिळविण्यासाठी आंधळे झाले आहेत त्यांमध्ये समाजच्या नावावर व सत्तेचा मजालुटून  लोकनेते घोषित करून पाठींबा देण्याचे दुकान चालवुन राजकारणाचा धंदा करणाऱ्या नेत्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर व आदिवासींच्या उपासमारीवर व विदर्भात जनतेच्या प्रश्नांवर मौन असणारे समाजसेवक आता समाजाचे मेळावे घेऊन पोट भरत असून मात्र कोणीही सत्तेंमध्ये येण्यासाठी मत मागणाऱ्या पक्षांना विचारात नसुन आता शेतकरी ,शेत मजूर व आदिवासी येत्या ५ ऑक्टोबरला पांढरकवडा येथे आपला निर्वाणीचा निरोप देणार आहेत व येणाऱ्या महाराष्ट्राच्या सरकारमध्ये 'संपूर्ण पिककर्ज व कापूस -सोयाबीनचा वाढीव  हमीभाव व 'टोल मुक्त महाराष्ट्र '    सर्व गरिबांना अन्न सुरक्षा' ह्या मागण्याचा ठोस आश्वासन देतील त्यांनाच विदर्भाचे शेतकरी व आदिवासी मतदान  करतील या करिता सर्व प्रमुख राजकीय पक्षाशी संपर्क करून  येत्या ५ ऑक्टोबरला  आपल्या निर्धार मेळाव्यात घोषणा करतील अशी माहिती विदर्भ जनांदोलन समितीचे संयोजक किशोर तिवारी यांनी आज एका  पत्रकाद्वारे दिली  आहे . 

केंद्रामध्ये भाजपचे मोदी सरकार आल्यावर लोकसभेच्या  निवडणुकीमध्ये 'महायुतीने ' सातबारा कोरा करण्याचे ,लागवड कर्ज अधिक ५०% नफा  कापूस ,सोयाबीन व धानाला देण्याचे तसेच संपूर्ण महाराष्ट्र 'टोल मुक्त' करण्याचे स्पष्ट आश्वासन वारंवार देण्यात आले होते मात्र आता 'भाजपला या मागण्याचा पक्का विसर पडला आहे तर विदर्भाचे शेतकरी व आदिवासी कोणत्याही राजकीय पक्षाशी बांधून नाहीत व सत्तापिपासू पोटभरू नेत्यांचा नंगानाच सर्वांनी पाहिल्यावर आता जे पक्ष सत्तेवर आल्यावर १०० दिवसात  सातबारा कोरा करण्याचे ,लागवड कर्ज अधिक ५०% नफा  असा हमीभाव कापूस ,सोयाबीन व धानाला देण्याचे तसेच सर्व गरिबाला अन्न व आरोग्य सुरक्षा सह संपूर्ण महाराष्ट्र 'टोल मुक्त' करण्याचे स्पष्ट आश्वासन देणार त्यांनाच जनता उभी करणार ,किशोर तिवारी यांनी आपल्या पत्रामध्ये  ज्या   प्रमुख महत्वाचे मुद्दे  महाराष्ट्राच्या जनतेला देणे मला गरजेचे वाटते ,त्या मागण्या व मुद्दे खालील प्रमाणे आहेत 
१. अन्न व निवारा 
सर्व गरिबांना २०१३ च्या यादी नुसार दारिद्रेषेचे कार्ड व सर्व गरिबांना अंत्योदय अन्न सुरक्षा व घरकुल 
 २- टोल मुक्त महाराष्ट्र 
चार ते सहा प्रवासी क्षमता असणारे सर्व खाजगी वाहने तात्काळ तोल-मुकत करण्यात येतील 
३-कोरडवाहु शेतकऱ्यांच्या  प्रमुख मागण्या 
१. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या सात-बारा कोरा करणे 
२. कोरडवाहु शेतकऱ्यांना रोजगार हमी योजनेमधून प्रती हेक्टरी १०० दिवसाची मजुरी सरळ अनुदान रूपाने देणे 
३. कापूस -सोयाबीन   - धानासाठी  राष्ट्रीय शेतकरी आयोगाच्या शिफारशी प्रमाणे हमीभाव देण
४-सर्व आदिवासीना तात्काळ खावटी देणे   
दुष्काळग्रस्त आदिवासी  शेतकऱ्यांच्याना व शेतमजुरांना सरसकट खावटी वाटप   करणे 
५- आरोग्य सेवा 
सर्व गरिबांना २०१३ च्या यादी नुसार मोफत वैद्दकिय सेवा  व सर्व सरकारी दवाखान्यात जनरिक औषधीचे दुकान
६- शिक्षण 
१. सर्व शाळांना दुपारचे जेवण अक्षयपात्र योजने नुसार देण्यात येणार 
२. आश्रमशाळांचा गोरघधंधा बंद करणार- दुर्गमभागातील  आश्रमशाळां बंद करून शहरामध्ये सर्व सुविधायुक्त वसतीगृहात सर्व आदीवासी मुलांना व मुलींना राहण्याची तरतूद करुण व समाजाच्या इतर वर्गासोबत चांगल्या शाळेत शिक्षण देण्यात येणार 
७- वृद्ध -निराधारांना  अनुदान 
सर्व गरीब वृद्धाना व विधवा , सर्व शेतकरी विधवा ,परितक्त्या महिलांना दरमहा कमीतकमी हजार रुपये मासीक अनुदान व सरकारी नौकर सारखे प्रत्येक महीन्याला १ तारखेला बँकेतून देण्याची योजना .

जे पक्ष हे सात प्रमुख जनहिताच्या मागण्याचा आपल्या  जाहीरनाम्यात समावेश करतील त्यांना ५ ऑक्टोबरला  आपल्या निर्धार मेळाव्यात  पाठींबा देण्याची घोषणा येईल अशी माहिती तिवारी यांनी दिली .