वेगळ्या विदर्भाच्या निर्मितीसाठी भाजप सोबत जाण्याच्या विदर्भ जनांदोलन समितीचा निर्धार
दिनांक -६ ऑक्टोबर २०१४
विदर्भाच्या शेतकऱ्याच्या ,आदिवासींचा व युवकांच्या समस्या सोडविण्यासाठी वेगळ्या विदर्भाची निर्मिती एकमेव पर्याय असून जो पर्यंत विदर्भ महाराष्ट्राच्या गुलामगीरीतून मुक्त होण्यासाठी सध्या केंद्रामध्ये भाजप सरकार असल्यामुळे आणी वेगळा विदर्भासाठी भाजप तयार असुन मात्र शिवसेना ,कॉंग्रेस , मनसे व राष्ट्रवादीने विदर्भासाठी खुल्ला विरोध केल्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्मह्त्या रोखण्यासाठी येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विदर्भाचे शेतकरी व आदिवासी भाजप सोबत जाण्याचा एकमुखी ठराव ५ ऑक्टोबरला हजारो शेतकरी व शेतकरी विधवांच्या पांढरकवडा येथील निर्धार मेळाव्यात घेण्यात आला ,अशी घोषणा विदर्भ जनांदोलन समितीचे नेते किशोर तिवारी यांनी आज केली .
भाजप नेते नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून केंद्रामध्ये भाजपचे मोदी सरकार आल्यावर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 'महायुतीने ' सातबारा कोरा करण्याचे ,लागवड कर्ज अधिक ५०% नफा कापूस ,सोयाबीन व धानाला देण्याचे तसेच संपूर्ण महाराष्ट्र 'टोल मुक्त' करण्याचे स्पष्ट आश्वासन वारंवार देण्यात आले होते याची आठवण करून दिली तर या नेत्यांनी सातबारा कोरा करण्याचे ,लागवड कर्ज अधिक ५०% नफा असा हमीभाव कापूस ,सोयाबीन व धानाला देण्याचे तसेच सर्व गरिबाला अन्न व आरोग्य सुरक्षा सह संपूर्ण महाराष्ट्र 'टोल मुक्त' करण्याचे मागण्यावर भाजप गंभीर असुन मोदीची देलेले सर्व आश्वासन पुर्ण त्यांना वेळ द्या असे आवाहन केले तर भाजप नेते नितीन गडकरी यांनी आपल्या ग्रामीण मंत्रालयातून शिरपूर बंधारे बांधण्यासाठी व शेतीसाठी सोलर पंम्प देण्याचे विषेय पकेज घोषित केले व अन्न व निवारा सर्व गरिबांना २०१३ च्या यादी नुसार दारिद्रेषेचे कार्ड व सर्व गरिबांना अंत्योदय अन्न सुरक्षा व घरकुल मागणी तात्काळ पूर्ण करण्याची घोषणाही रालेगावच्या सभेत केली .
विदर्भ जनांदोलन समितीने सर्व राजकीय पक्षांशी आपल्या मागण्यासाठी साकडे घातले होते मात्र फक्त भाजपनेच कोरडवाहु शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या सात-बारा कोरा करणे, कोरडवाहु शेतकऱ्यांना रोजगार हमी योजनेमधून प्रती हेक्टरी १०० दिवसाची मजुरी सरळ अनुदान रूपाने देणे ,कापूस -सोयाबीन - धानासाठी राष्ट्रीय शेतकरी आयोगाच्या शिफारशी प्रमाणे हमीभाव देण,सर्व आदिवासीना तात्काळ खावटी देणे ,दुष्काळग्रस्त आदिवासी शेतकऱ्यांच्याना व शेतमजुरांना सरसकट खावटी वाटप करणे ,सर्व गरिबांना २०१३ च्या यादी नुसार मोफत वैद्दकिय सेवा व सर्व सरकारी दवाखान्यात जनरिक औषधीचे दुकान, सर्व गरीब वृद्धाना व विधवा , सर्व शेतकरी विधवा ,परितक्त्या महिलांना दरमहा कमीतकमी हजार रुपये मासीक अनुदान व सरकारी नौकर सारखे प्रत्येक महीन्याला १ तारखेला बँकेतून देण्याची योजना या सर्व मागण्या सरकार तांत्रिक अडचणी दूर करून तोडगा काढण्याचे आश्वासन फक्त भाजपने दिल्याने विदर्भाचे शेतकरी ,आदिवासी व गरीब जनता भाजप सोबत जात आहे अशी माहिती किशोर तिवारी यांनी दिली .
पंतप्रधान मोडीचा असर व ते विदर्भाच्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखतील ,कापसाला भाव देतील ,विकास करतील असा आशावाद जनतेमध्ये आहे व जनतेच्या या भावनाचा आदर करूनच आम्ही हा निर्णय घेतला आहे आता पुढचा काळच कोण बरोबर आणि कोण चूक हे लवकरच समोर येईल ,असा आशावादी सूर तिवारी यांनी घेतला .
.
No comments:
Post a Comment