Saturday, August 26, 2017

सर्व पात्र शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेंचा लाभ मिळणार - किशोर तिवारी

सर्व पात्र  शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेंचा लाभ मिळणार - किशोर तिवारी: खैरगाव (देशमुख) कोलाम पोड "सरकार आपल्या दारी"  कार्यक्रमात किशोर तिवारी यांची  घोषणा

दिनांक २८ ऑगस्ट  २०१७

छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनें’तर्गत आतापर्यंत ३८  लाखावर  शेतकर्‍यांनी आनलाईन अर्ज भरले आहेत.  असुन सध्या ही   मुदत १५ सप्टेंबरपर्यंत असुन तांत्रिक अडचणी असल्यास ही अंतिम तारीख  वाढविण्यात   येणार  असल्याची माहीती कै वसंतराव नाईक शेतकरी मिशन अध्यक्ष किशोर तिवारी यांनी यवतमाळ जिल्यामध्ये   केळापूर  तालुक्यातील खैरगाव (देशमुख) कोलाम पोड   येथे २५ आगस्टला   "सरकार आपल्या दारी" कार्यक्रमात दीली .

विरोधकांच्या कर्जमाफी योजना फसवी असल्याच्या खोटा प्रचाराला बळी न पडता विदर्भ -मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील सर्वच अडचणीतले गरजु शेतकऱ्यांच्या दारात  शासन जाणार असुन एकही पात्र शेतकरी वंचित राहणार नाही याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी प्रशासनावर सोपविलीं आहे . कर्जमाफीचा लाभ जास्तीत जास्त शेतकर्‍यांना व्हावा एकही पात्र शेतकरी वंचित राहणार यासाठी अर्ज भरण्यासाठी गावातील सर्व शासकीय कर्मचारी शेतकऱ्यांना मदत करण्याच्या सूचना व आदेश देण्यात आले आहेत याचा फायदा शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन किशोर तिवारी यांनी यावेळी केले . 
यावेळी अनेक शेतकऱ्यांनी आपले सरकार केंद्र, महा ई सेवा केंद्र, कॉमन सर्व्हिस सेंटर तसेच काही खासगी केंद्रांद्वारेरे शेतकऱ्यांचे कर्जमाफीचे  अर्ज भरतांना प्रचंड हेलपाटे व आर्थिक भुरदंड पडत असल्याची तक्रार केल्यावर तिवारी यांनी चौकशीचे आदेश दिलें व  अर्ज भरल्यानंतर एका अर्जामागे दहा रुपये सरकार देणार आहे. त्यामुळे अर्ज भरताना पैसे देण्याची शेतकऱ्यांना गरज नसल्याचे तिवारी यांनी स्पष्ट केले. तरी देखील कोणाकडून पैशांची मागणी झाल्यास किंवा कामकाजाबाबत हलगर्जीपणा झाल्याच्या तक्रारी आल्यास या तक्रारीत तथ्य आढळल्यास संबंधित केंद्रांवर कारवाई करुन त्यांचा परवाना रद्द  तात्काळ करण्याचा सूचना यावेळी दिल्या. 

मा . मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या सूचनेनुसार "सरकार आपल्या दारी" या कार्यक्रमाअंतर्गत ग्रामीण भागातील महसूल , कृषी ,ग्रामविकास ,वीज वितरण ,अन्न पुरवठा ,आरोग्य ,रोजगार ,शिक्षण , पोलीस प्रशासन यांच्या विभागाच्या  तालुका व  ग्रामस्तरीय अधिकारी -कर्मचारी यांच्या तक्रारीची सुनावणी व  जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांकडून  समाधान व कारवाई साठी अधिकारी -कर्मचारी चेतना जागृती अभियानाचा एक भाग म्हणून  यवतमाळ जिल्यात  केळापूर  तालुक्यातील खैरगाव (देशमुख) कोलाम पोड   येथे २५ आगस्टला   "सरकार आपल्या दारी" कार्यक्रम  जिल्हा प्रशासनामार्फत घेण्यात आला  . यावेळी खैरगाव देशमुख ,वांजरी ,झुली ,पहापळ,बोथ,जवाहर नगर,मारेगाव,जाम , कोदोरी सुकळी  रूढा घुबडी  वळवाट पिठापोंगरी खैरी येथील  कोलाम पोडावरील आदिवासींच्या येथील गावकऱ्यांच्या जमिनीच्या मालकीचा प्रश्न ,घरकुल योजनेच्या अडचणी  शेतकऱ्यांच्या शेती मालविक्रीसाठी येत असलेल्या अडचणी  आतापर्यंत  नवीन पिककर्ज ,मुद्रांकर्ज वाटप, ग्रामीण जनतेला काम व खावटी  ,अन्न ,आरोग्य ,गुरांना चारा व पाणी यासह वीज वितरण ,शिक्षण ,प्रकल्पग्रस्तांचे अनेक  प्रश्न उपस्थित केले .कार्यक्रमात आदीवासी सेवक डॉ हेमंत लोढा ,उपविभागीय अधिकारी संदीप अपार ,जिल्हा कृषी अधिकारी नवनाथ कोलपावार ,जिल्हा आरोग्य अधिकारी डी बी चव्हाण ,उपविभागीय कृषी अधिकारी राहुल सातपुते , उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी ,आदीवासी प्रकल्प अधिकारी विश्वास डाखोरे ,तहसीलदार महादेवराव जोरवार ,गट विकास अधिकारी मधुकर घसाळकर ,आदीवासी नेते अंकित नैताम ,अतुल आत्राम ,बाबुलाल मेश्राम ,भीमराव नैताम ,समाज सेवक मा. जीप सदयस विजय तेलंगे ,अजयभाऊ राजुरकर कार्यक्रमाला उपस्थित होते .
यावेळी
सौ. शिलाताई गेड़ाम प स सदरया सौ.वैशालीताई नैताम सरपंच गा प खैरगाव(दे) जेजेराम आञाम. वीलास धुर्वे. बैरू आञाम यांनी  एक ट्रान्सफॉर्मर चार महिन्यापासुन बंद असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केल्यावर किशोर तिवारी तात्काळ नवीन ट्रान्सफॉर्मर लावण्याचे आदेश दिल्यावर कार्यकारी अभियंता कोंडावार यांनी लगेच   नवीन ट्रान्सफॉर्मर लावल्याने शेतकऱ्यांनी वीज कंपनीचे यावेळी आभार मानले .

यावेळी आदिवासी बहुल भागात पिवळ्या  शिधा वाटप नाहीत अशा प्रचंड तक्रारी येत आहेत अनेक कोलाम  व पारधी पाड्यात जनतेला घरकुल योजना मिळत नसुन कारण घराचे पट्टे मालकीचे नाहीत   अनेक तांत्रिक अडचणी  वर्षानुवर्षं हा प्रश्न रेंगाळत असल्याची तक्रार करण्यात आली  तसेच वंचितांना  आजही अन्न ,आरोग्य ,गुरांना चारा व पाणी यासह वीज वितरण ,शिक्षण  यांच्या समस्या परीसरातील लोकांनी मांडल्या  यासर्व समस्यांवर तात्काळ तोडगा काढा असे आदेश  शेतकरी मिशनचे अध्क्षश किशोर तिवारी यांनी यांनी यावेळी दिलें
===========================================================

No comments: