पारधीसमाजावर होत असलेल्या उपेक्षेची दखल :मुकींदपूर पारधीबेड्यावर ३० ऑगस्टला सरकार आपल्या दारी कार्यक्रम
दिनांक -२९ ऑगस्ट २०१८
दिनांक -२९ ऑगस्ट २०१८
स्वातंत्र्यानंतर पारधी समाजाची होत असलेली सतत उपेक्षेची मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी गंभीर घेतली असुन यामुळेच त्यांनी यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील मुकींदपूर पारधी बेडा निवडला असुन याचे कारण मुकींदपूर पारधी बेडा भयाण वास्तव असून विकासाच्या नावाचा येथे कुठेही लवलेश नाही. पोट भरण्याच्या संघर्षात विकास यांच्यापासून कोसो दूर गेलेला आहे. दररोज उद्याचे काय? हा प्रश्न यांच्या आजही पारधी समाजासमोर अशा या पारधी पोडाच्या समस्या जाणून घेण्यासाठी किशोर तिवारी यांनी या बेड्याला भेट मागील ता.७ फेबु २०१७ भेट दिली असता साहेब आमच्या बेड्यावर पाणी नाही, रस्ता नाही, साधी नालीही नाही व खायला धान्यपण नाही. सांगा आम्ही जगाव तरी कस?’ असला आर्त टाहो नेर तालुक्यातील मुकींदपूर पारधी बेड्यावरील नागरिकांनी शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवार समोर फोडला होता त्यावेळी आपण ज्या ज्या कोलाम पोडावर व पारधी बेड्यावर सरकार आपल्या दारी कार्यक्रम घेतो तेंव्हा कोलाम पारध्यांना मूलभूत सुविधांपासून तसेच अंत्योदय योजनेपासून वंचित ठेवण्याचे संघटीत षडयंत्र असल्याचे दुःख प्रगत केले होते . आता पुन्हा एकदा पारधीसमाजाची सतत उपेक्षा करणाऱ्या अधिकाऱ्यांना जाब विचाराण्यासाठी ३० ऑगस्टला सरकार आपल्या दारी कार्यक्रम स्व वसंतराव नाईक स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी घेत आहेत .
उच्चंन्यायालयाच्या आदेशाची सतत पायमल्लीकरून यवतमाळ जिल्ह्यातील हजारो कोलाम पारध्यांना अंत्योदय योजनेपासून वंचित ठेवण्याच्या सर्व नागरी पुरवडा विभागाच्या सर्व जबाबदार अधिकाऱ्यांवर आदिवासी अत्याचार नियंत्रण कायद्याखाली सरकारने कारवाई आदेश स्व वसंतराव नाईक स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी यावेळी नेर तालुक्यातील मुकींदपूर पारधी बेड्यावरील‘सरकार आपल्या दारी’ कार्यक्रमात दिल्यावर महसूल विभागाच्या मस्तवाल अधिकाऱ्यांची कुंभकर्णी झोप उखडलीमोडली असुन मार्च महिन्यापासून मुकींदपूर पारधी बेड्यावरील सर्व पारधी शिथापत्रिका धारकांना अंत्योदय योजनेमधुन अन्न देण्यास सुरुवात केल्याची माहीती तहसीलदार अमोल पोवार यांनी दिली . सामाजिक कार्यकर्ते गणेश राऊत ,
मुख्यमंत्री ग्राम फेलो राजू केंद्रे सह सुनील धोटकर ,तालुका अध्यक्ष पंजाब शिरभाते यांच्या विषेय प्रयासाने हा महत्वाचा विषय मार्गी लागला होता .
आपल्या भेटीत किशोर तिवारींनी पारधी बेड्यावर घराघरात जावून प्रत्येकाच्या समस्या जाणून घेतल्या होत्या प्रत्येक घरातील चुलीपर्यंत जावून त्यांच्या अडी-अडचणी समजून घेत संबंधित अधिकार्यांना त्या सोडविण्याच्या सूचनाही दिल्या होत्या या पोडावर रस्ते, नाल्या, पिण्याचे पाणी, अंत्योदयाचे धान्य, आरोग्याच्या समस्या अशा अनेक समस्या त्यांच्या निदर्शनास आल्या. यानंतर त्यांनी येथील नागरिकांना मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना किशोर तिवारी म्हणाले ज्या नागरिकांच्या घरकुलाच्या समस्या, प्लॉटच्या समस्या आहे. त्या निवारण्याची जबाबदारी तहसीलदारांची राहील. धान्याच्या समस्येसबंधी ते म्हणाले , येत्या सात दिवसात अंत्योदयाच्या लाभ प्रत्येक नागरिकास मिळाला पाहिजे, कुणीही यापासून वंचित राहता कामा नये. या पोडाला तात्काळ महसुली दर्जा देवून दोन ते तीन गावांची ग्रामपंचायत करण्यात यावी, अंतर्गत रस्त्यांसाठी तत्काळ प्रस्ताव सादर करा, वीजेची समस्या त्वरित मार्गी लावावी. आरोग्या संदर्भात काही अडचण असल्यास मला फोन करावा, असेही त्यांनी सांगितले. संघर्षाशिवाय तुम्हाला काहीही मिळणार नाही, तेव्हा जागृत होवून आपल्या मागण्यांसाठी संघर्ष करा, असे आवाहन यावेळी केले. आदिवासी विभागाच्या सचिव वर्मा यांच्याशी व जिल्हाधिकारी यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून येथील समस्येशी त्यांना अवगत केले होते मात्र सतत पाठपूरावा करूनही पारधी समाजाच्या समस्या सुटं नसल्यामुळे आपण ही भेट घेत असल्याचे तिवारीं यांनी स्पष्ट केले

==============================