गंगापट्टयात तीन हजार हेक्टर वरील पिकाची पुरामुळे हानी : किशोर तिवारी यांनी केली पाहणी
दिनांक २७ ऑगस्ट २०१८
यवतमाळ जिल्हातील झरी तालुक्यातील पैनगंगेच्या तीरावरील धानोरा ,दुर्भा ,दिग्रस ,सतपेल्ली ,पाटण ,अहेरल्ली ,विठोली गावामधील सुमारे तीन हजार हेक्टर वरील उभेपीक पुरबुडी व खरडल्यामुळे संपूर्ण नष्ट झाले असुन या प्रचंड नुकसानीची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असुन सर्व पुरग्रस्तांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय सरकारने घेतला असुन येत्या १० दिवसात संपुर्ण पंचनामे पुर्ण करून नुकसान भरपाई देण्याची प्रक्रीया सुरु करण्यात येणार आहे व सर्व शेतकऱ्यांना ज्या ज्या ठिकाणी पुराने हानी झाली आहे त्यांना सरसकट विना अटीने ही मदत मिळणार असल्याची माहीती कै वसंतराव नाईक शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी २३ ऑगस्टला धानोरा दुर्भा ,विठोली सतपेल्ली येथे आयोजित सरकार आपल्यादारी कार्यक्रम केली .
धानोरा ,दुर्भा ,दिग्रस ,सतपेल्ली ,पाटण ,अहेरल्ली ,विठोली गावामधीलशेतकऱ्यांच्या वन्यप्राणी ,पीककर्ज माफी पीककर्ज वाटप,तसेच आदीवासी ,कोलाम पारधी, शेतकरी यांच्या कडुन आदिवासी विकास ,ग्राम विकास ,कृषी ,महसुल ,वन ,आरोग्य ,सहकार ,वीज ,सिचन ,शिक्षण ,पोलीस , अन्न सुरक्षा या विभागाच्या प्रचंड तक्रारी नागरीकांनी मांडल्या त्यावर खिरेकर साहेब तहसीलदार,चव्हाण साहेब गट विकास अधिकारी गवई साहेब , ठानेदार लशकरे साहेब यांनी जनतेच्या तक्रारींचे समाधान केले.
बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मदत मिळत नसल्याची तक्रार शेकडो शेतकऱ्यांनी केली तसेच यावर्षी सरकारने ऐतिहासिक पीककर्जमाफी दिल्यांनतर यवतमाळ जिल्ह्यातील बँकांना सुमारे हजार कोटी रुपये जमा केल्यानंतरही सरकारी बँका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनांचा पालन करीत नसुन या खरीप हंगामात झरी पाटण मुकटबन येथील बँका पिककर्ज वाटपात २० २० वेळा जक्कारा मारूंनही आज या उद्या म्हणत असल्याची तक्रार शेकडो शेतकऱ्यांनी यावेळी केली यावेळी किशोर तिवारी आपला असंतोष प्रगट करीत ३१ ऑगस्टपूर्वी पिककर्ज वाटप करण्याचे आदेश दिले
धानोरा ,दुर्भा ,दिग्रस ,सतपेल्ली ,पाटण ,अहेरल्ली ,विठोलीच्या पाहणी दौऱ्यात शेतकरी नेते अनिल भाऊ पोटे तालुका अध्यक्ष संगीताताई सुरेश मानकर जिल्हापरिषद सदस्य मिनाक्षीताई सुरेश बोलेनवार जिल्हा परिषद सदस्य, लताताई आत्राम पंचयात समिती सभापती,राजु गोंडरा वार पंचायत समिती सदस्य, अशोकरेड्डी बोदकुरवार, अनिल भाऊ पोटे तालुका भाजपा अध्यक्ष , अनिल पावडे, विठल बंडेवार ,सुरेश बोलेनवार, सुरेश मानकर, सतिश नाकले, शाम बोदकुरवार, कुश केमेकार, मनोज शर्मा, सचिन दुमनवार,सुधिर पांडे गजानन काळे, महेश बाडलवार, मोहन चुक्कलवार खिरेकर साहेब तहसीलदार,चव्हाण साहेब गट विकास अधिकारी गवई साहेब , ठानेदार लशकरे साहेब उपस्थित होते .
========================
No comments:
Post a Comment