Wednesday, August 22, 2018

सर्व पुरग्रस्तांना नुकसान भरपाई मिळणार -घुबडी येथील "सरकार आपल्यादारी कार्यक्रमात किशोर तिवारी यांचा घोषणा 
दिनांक -२३ ऑगस्ट २०१८
पैनगंगेच्या पुराने व सतत अतिवृष्टी मुळे पिंपळखुटी चनाका कोदोरी रूढा घुबडी कारेगाव हिवरी व अर्ली परीसरात झालेल्या प्रचंड नुकसानीची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असुन सर्व पुरग्रस्तांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय सरकारने घेतला असुन येत्या १० दिवसात संपुर्ण पंचनामे पुर्ण करून नुकसान भरपाई देण्याची प्रक्रीया सुरु करण्यात येणार नाही व सर्व शेतकऱ्यांना ज्या ज्या ठिकाणी पुराने हानी झाली आहे त्यांना सरसकट विना अटीने ही मदत मिळणार असल्याची माहीती कै वसंतराव नाईक शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी २१ ऑगस्टला  घुबडी येथे आयोजित   सरकार आपल्यादारी कार्यक्रम   केली . यावेळी  शेतकरी नेते शिवरेड्डी एलटीवार ,गंगारेड्डी क्यातमवार ,सुरेशभाऊ बोलेनवर ,अंकितभाऊ नैताम 
बाबुलाल मेश्राम ,सुनिलभाऊ राऊत ,घुबडी सरपंच रेखाताई कोवे ,सुभाष अयंचमवार ,गजानन गटकावार ,संजय मेश्राम ,गजानन खडसे ,निखिल मेश्राम ,गौरीशंकर कांबळे ,  प्रल्हादराव कोवे  उपस्थित होते . 
यावेळी केळापूर तालुक्यातील चनाका ,कोदोरी ,कारेगाव ,हिवरी ,रूढा,घुबडी,वळवाट,खैरी,पिठापोंगरी, पिंपळशेंडा ,अर्ली परीसरातील शेतकऱ्यांच्या वन्यप्राणी ,पीककर्ज माफी  पीककर्ज वाटप,तसेच  आदीवासी ,कोलाम पारधी, शेतकरी यांच्या कडुन आदिवासी विकास ,ग्राम विकास ,कृषी ,महसुल ,वन ,आरोग्य ,सहकार ,वीज ,सिचन ,शिक्षण ,पोलीस , अन्न  सुरक्षा या विभागाच्या प्रचंड तक्रारी नागरीकांनी मांडल्या त्यावर तहसीलदार महादेवराव जोरवार ,अभियंता राठोडसाहेब ,तालुका कृषी अधिकारी शेरखाने ,वनाधिकारी संगीता कोकणे यांनी जनतेच्या तक्रारींचे समाधान केले . 
घुबडी पूर्वी किशोर तिवारी यांनी हिवरीला भेट दिली व भोई समाजाच्या समस्या जाणून घेतल्या व तक्रारींचे समाधान केले . घुबडी येथे दररोज दार ताशी  दहावेळा लाईन जाते विद्दुत विभागाचे अधिकारी साधा फोनही उचलत नसल्याची तक्रार संजय गंगारेड्डी कायतमवार यांनी केली . 
घाटंजी तालुक्यातील भीमकुंड येथील भेटीत सर्व पुरग्रस्त आदिवासींना कायमस्वरूपी पट्टे देण्याची घोषणा सरकार तर्फे किशोर तिवारी यांनी केली . मंगी तालुका घाटंजी मध्ये शाळेवर मागील तीन महिन्यापासून शाळेवर शिक्षक नसल्यामुळे सर्व गावकऱ्यांनी आपला असंतोष प्रगट केला त्यावेळी यवतमाळ जिल्हा शिक्षणाधिकारी सुजाता पाटेकर यांनी एका आठवड्यात कायमस्वरूपी शिक्षक देण्याची घोषणा केली मंगी  येथील सरकार आपल्या दारी कार्यक्रमात सुहास पारवेकर रुपेश कनॅलवार जीवन मुद्दलवार ,अर्जुन आत्राम .तुळशीराम मोहुर्ले  हे प्रामुख्याने उपस्थित होते . 
====================================

No comments: