२३०० कोटीच्या मदतीच्या पहिल्या हप्त्यातून विदर्भाला फक्त २८८ कोटी त्यातही अमरावतीला जिल्ह्याला १७५ कोटीची मदत- विदर्भातील सोयाबीन , धान व कापुस उत्पादक शेतकऱ्यांना नापिकीमुळे नुकसान भरपाईसाठी किशोर तिवारी प्रयन्तशील
दिनांक -१७ नोव्हेंबर २०२०
यावर्षी ऑक्टोबरच्या परतीच्या पावसाने विदर्भातील सोयाबीन व धानाचे ७० टक्के नुकसान केले आहे त्यातच आता कापसाला गुलाबी -पांढरी बोण्ड अळी तसेच प्रचंड प्रमाणात बोण्डसड झाल्यामुळे फक्त पहिल्या वेच्यांचा कापूसच शेतकऱ्यांचा हातात येणार हे सिद्ध झाले आहे त्यातच सी सि आई व पणन महासंघाने हमीभावात कापूस खरेदी न केल्यामुळे महाराष्ट्रात सुमारे ५० लाख क्विंटल कापुस हमीभावापेक्षा कमी शेतकऱ्यांनी आर्थिक अडचणीमुळे विकला आहे त्यातच यावर्षी जून ते ऑक्टोबर या कालावधीत राज्यात अत्यधिक पाऊस आणि पूर यामुळे पीडित शेतकरी आणि लोकांना मदत देण्याचा ‘पहिला हप्ता’ महाराष्ट्र सरकारने मागील सोमवारी जाहीर केला. त्यामध्ये राज्याच्या एकूण २३०० कोटी रुपयांपैकी विदर्भ क्षेत्राला २८८ कोटी रुपये म्हणजे एकूण १२..55 टक्के मदत देण्यात आली आहे . यामध्ये अमरावती जिल्ह्यात १७० कोटी देण्यात आले मात्र ह्या मदतीमध्ये
यावर्षी ऑक्टोबरच्या परतीच्या पावसाने विदर्भातील सोयाबीन व धानाचे नुकसान व कापसाला गुलाबी -पांढरी बोण्ड अळी तसेच बोण्डसड झालेले नुकसानीचा समावेश नसल्याचे शेतकरी मिशनचे किशोर तिवारी यांनी स्पष्ट केले असुन विदर्भातील सोयाबीन , धान व कापुस उत्पादक शेतकऱ्यांना नापिकीमुळे नुकसान भरपाईसाठी शेतकरी मिशन प्रयन्तशील असुन मुख्यमंत्री, मुख्यसचिव ,कृषि सचिव ,पुनर्वसन सचिव यांना ग्राउंड रीपोर्ट देण्यासाठी मुंबईला डेरे दाखल झाले आहेत .
यावर्षी अस्मानी संकटामुळे हातात आलेल्या पिकांपैकी सुमारे १२० लाख हेक्टरवरील सोयाबीन धान मक्का कापुस ज्वारी तुरी ऊस बागायतीची पिके संपूर्ण नष्ट झाल्यांनतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूरग्रस्त व नापिकीग्रस्तांना एकात्मिक १० हजार कोटीचे पॅकेज जाहीर केले असुन या पॅकेजपासुन विदर्भ उत्तर महाराष्ट्र खान्देश मराठवाडा भागातील एकही नुकसानग्रस्त शेतकरी व पुरग्रस्त वंचित राहणार नाही अशी माहीती कै वसंतराव शेतकरी स्वालंबन मिशन अध्यक्ष किशोर तिवारी यांनी दिली . महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात विरोधकांनी अपप्रचार सुरु केला असून हवालदिल शेतकऱ्यानांमध्ये हे पॅकेज पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्याच्या निवडक भागासाठीच असा गैरसमज पसरवीत असल्याचा तक्रारी आल्यावर अस्मानी संकटामध्ये निवडक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देता येत नाही सर्वच नुकसानग्रस्त शेतकरी व पुरग्रस्तांचा समावेश होणारच अशी पुस्तीही किशोर तिवारी यांनी जोडली आहे .
सध्या ग्रामीण महाराष्ट्रात आर्थिक आणीबाणी अस्मानी व नाफेड तसेच सी सी आई यांनी मोदी सरकारच्या आदेशाने सोयाबीन व कापूस खरेदी करण्यास विलंब केला आहे त्यातच अनेक जाचक अटी टाकल्या आहेत म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचा दौरा तात्काळ करून कमीतकमी ५० हजार कोटीचे विषेय पॅकेज महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना दयावे अशी मागणी एका निवेदनाद्वारे किशोर तिवारी यांनी केली आहे . आज ग्रामीण अर्थव्यवस्था संपुष्टात आली आहे .सरकारी बँकांनी शेतकऱ्यांना पीककर्जमाफी देऊनही नवीन पीककर्ज दिले नाही .अशा परिस्थितीमध्ये केंद्र सरकारने शेतकऱ्यांवरील सर्व कर्ज माफ करा व पीकविमा सरसकट देण्याची गरज आहे अशी मागणी करीत पंतप्रधान कोविड केअर निधीमध्ये महाराष्ट्राने ९० टक्के निधी दिला मात्र त्याच महाराष्ट्राला मोदींनी वाऱ्यावर सोडल्याचा आरोपही किशोर तिवारी यांनी केलामहाराष्ट्राचे महाविकास आघाडीचे दिशादर्शक भारताचे माजी कृषीमंत्री शरद पवार तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेसह सर्व जिल्ह्याचे पालकमंत्री व आमदार शेतकऱ्यांच्या बांध्यावर जाऊन नुकसानीची पहाणी केली आहे मात्र पीकविमा कंपन्यांचे अधिकारी पंचनामे तर सोडाa शेतकऱ्यांचे फोनही उचलत नसुन पंचनाम्याचे आदेश देऊनही अजूनही विदर्भ उत्तर महाराष्ट्र खान्देश मराठवाडा भागातील शेतात प्रशासकीय अधिकारी पोहचले नसल्याची तक्रार शेतकरी करीत असल्याची तक्रार किशोर तिवारी याना मिळत आहेत अनेक शेतकऱ्यांनी विमा कंपनी व पंचनामेवाले आता येत नाही असा निराशेचा भावनेतुन सर्व सोयाबीन काढून फेकून दिले असुन आता हरभऱ्याच्या पेरणीसाठी मशागत सुरु केली आहे मात्र हेच अधिकारी १५ दिवसानंतर येऊन तुम्हचे नुकसानच झाले नाही असे अहवाल भीती शेतकऱ्यांनी व्यक्त करीत आहेत . प्रशासनाचा बम्पर पिकाचा दावा दिशाभूल करणारा सालाबादप्रमाणे जसे नुकसान भरपाई आपल्या खिशातून द्यावी लागते या भावनेतून यावर्षी बम्पर विक्रमी पीक येणार असा दावा सरकार दरबारी करण्यात येत असल्याने आपण शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणार असल्याची माहीती किशोर तिवारी यांनी दिली .
============================== =========================
3 comments:
Thanks
Jay namdev
0 शिंपी समाज विकास कधी होणार मुख्यमंत्री साहेब
Post a Comment