प्रताप सरनाईक यांचे प्रेमपत्र - भाजपने शिवसेनेच्या फारकत घेण्याचे आत्मचिंतन करण्याची गरज -किशोर तिवारी
दिनांक २१ जुन २०२१
मागील १८ महिन्यात ही इतकी जुनी मैत्री का तुटली यावर सत्य परिस्थितीचे व वास्तविकतेचे आत्मचिंतन न करता ही युती मुख्यमंत्री पदावरूनच तुटली यावर जोर देण्यात आला मात्र खरी परिस्थितीचे अवलोकन करणे अत्यंत आवश्यक झाले आहेत ते असे कीं २०१४ च्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर भाजपने आपल्या एनडीए मधील घटक पक्षांना त्यांच्या त्यांच्या राज्यात संपविण्याचा प्रयन्त सुरु केला त्यामुळेच विधानसभेच्या निवडणुकीमध्ये युती तोडुन स्वबळावर निवडणूक लढविली मात्र पूर्ण बहुमत न आल्यामुळे व पोडापोडी न जमल्यामुळे शिवसेनेच्या घुबडया घेतल्या व सत्तेत आले मात्र २०१४ ते २०१९ च्या काळात भाजपच्या वागणुक फारच बदलेली होती त्याचा अनुभव वारंवार उद्धवजींना आला मात्र २०१९ निवडणुकीमध्ये मोदी -अमित शाह यांनी लहान भाऊ मोठा भाऊ करीत पुन्हा युती केली मात्र २०१९ मध्ये जशी एकखांबी सत्ता भाजपाला आली त्याचवेळी शिवसेनेला कट टू साईज करण्यासाठी सर्व कारस्थान रचण्यात पुन्हा सुरवात समसमान जागेच्या नांवावर १२० जागा त्यातही त्याठिकाणी बहूतेक आपले बंडखोर उभे करून कोट्यवधी रुपये फडणवीस साहेबांनी फेकले मात्र तरीही बहुमत मिळाले नाही त्यानंतरही दिलेले सारे वचन धाब्यावर ठेवत अभद्रपणे सरकार स्थापन करण्याचा लाजिरवाणा प्रयन्त देवेन्द्रजीनी केला व आपली फजीती करून घेतली माञ मागील १८ महिन्यात आपला सखा शिवसेना ज्याच्या कुबडया घेत आपण महाराष्ट्रात अस्तिव निर्माण केले तो एकेकाळचा मोठा भाऊ दूर का गेला यावर एक दिवसही आत्मचिंतन न करता ,आपली सत्ता कशी येणार याचा प्रयन्त करणाऱ्या चिल्लर अल्पबुद्धीधारक भाजपच्या नेत्यांना कसा कळेल कारण आज सर्वांना घेऊन चालणारे महाजन मुंडे नाहीत तर जे समेट आणण्यात सक्षम आहेत अशा नितीन गडकरी यांना भाजपने कट टू नागपुर केले आहे असा टोमणा किशोर तिवारी यांनी मांडला आहे .
आज रोज भाजप शिवसेना संबंधामह्ये हळू हळू विष कालविणारे देवेंद्र फडणवीस यांनी भाजपला शिवसेनेच्या युतीमध्ये रस नाही अशी प्रतिक्रिया दिली तर भाजपामध्ये देवेन्द्र टीम चे सर्वात सक्रीय किरीट सोमय्या यांनी विष कालविणारी प्रतिक्रिया दिली आता देवेंद्र टीमचे राणे पिता पुत्र प्रवीण दरेकर राम कदम आशिष शेलार अतुल भातखळकर कोणतीही आवश्यकता नसतांना मागील १८ महिन्यांपासून जशा प्रकारे एकही संधी न गमावता ज्या प्रकारे विकृत प्रतिक्रिया देत आहेत त्याचप्रमाणे प्रतिक्रिया देतील असा विश्वास किशोर तिवारी प्रगट केला .
मागील दीड वर्षापासुन देवेंद्र टीमने केंद्राच्या NIA CBI ED NCB चा वापर करून शिवसेनेला वा महाविकास आघाडीच्या नेत्यांना अडचणीत आणण्याचा सपाटा लावला आहे वा ज्याप्रकारे भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शिवसेनेचा "शवसेना सोनीयासेना" असा उल्लेख करतात त्यामुळे शिवसेने-भाजपा सम्बंधामध्ये दुरावा निर्माण होत आहे मात्र या मुर्खांना महाराष्ट्रात भाजपा सोबत शिवसेना नसली तर लोकसभेत व विधानसभेत खासदार आमदारांची मोठी घसरण होणार हे कळत नाही . शिवसेनेनी महाविकास आघाडी मध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी सोबत जाऊन सत्ता स्थापन केली आहे व उध्दवजी प्रशासनाचा कोणताही अनुभव नसतांना मुख्यमंत्री म्हणुन ज्याप्रकारे या विषम विचारांच्या पक्षासोबत व भाजपच्या केन्द्र सरकार सोबत अतिशय प्रेमाने कोरोना संकटात काम करीत आहेत त्याची नोंद जागतिक पातळीवर झाली आहे व याचा इतिहास साक्षीदार राहणार . शिवसेनेच्या या महाविकास आघाडी मध्ये जाण्याच्या निर्णयावर मतदार कौल देतील मात्र ज्या प्रकारचे सुडाचे व व्यक्तिगत चारीत्र्य हनन बदनामी करण्याचे अत्यंत घाणेरडे प्रकार भाजपच्या देवेंद्र टीमने केले त्याचा साक्षी सुद्धा इतिहास राहणारच असा इशारा भाजपला किशोर तिवारी यावेळी दिला .
आपला भाजपावारी अनुभव सांगताना किशोर तिवारी म्हणाले की "मी २०१२ च्या डिसेंबर मध्ये त्यावेळचे राष्ट्रीय अध्यक्ष वं माझे १९७७ पासुन मित्र नितीन गडकरी यांच्या विनंतीला मान देऊन फक्त त्यांना पंतप्रधान पाहण्याच्या दृष्टीने भाजपसोबत काम करणे सुरु केले मात्र माझा २०१२ ते २०१९ चा अनुभव विश्वासघातांचा राहीला व मी लोकसभेत भाजपाची एकखांबी सत्ता आल्यानंतर त्यांच्याशी फारकत घेत कोणतीही अट वा मागणी न करता माझे १९९९ पासून चे मित्र उद्धवजी ठाकरे यांच्या सोबत सामाजिक चळवळ करण्यासाठी सोबत काम करण्याचे ठरविले मी त्यांच्या पेक्षा थोरला असल्यामुळें त्यांच्याशी फारच अधिकाराने जवळुन चर्चा करण्याची संधी मिळाली . मला त्यांच्या बोलण्यात २०१४ ते २०१९ भाजपच्या वेळोवेळी दिलेल्या वागणुकीचा वा प्रादेशिक पक्ष कट टू साईज करण्यासाठी होत असलेल्या प्रयन्ताचा त्यांचा साक्षात्कार जाणवत होता त्यातच ऐन दिवाळीत आम्ही शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देण्याचा करारच झाला नाही अशी अकालनीय देवेंद्र घोषणेमुळे त्यात प्रचंड भर पडली मात्र आज शिवसेनेचा प्रवास जसा भारतात जसा बंगाल ओरीसा तेलंगाणा आंध्रप्रदेश तामिळनाडू सारख्या एकखांबी सत्ता गाजविणाऱ्या प्रादेशिक पक्षासारखा झाला त्यातच उद्धवजींना राष्ट्रवादीचे शरद पवार सारख्या भारताच्या राजकारणातील पितामह व्यक्तीचा आशीर्वाद मिळाला आहे मला तर असे वाटत २०२४ मध्ये सगळे हे प्रादेशिक पक्ष काँग्रेस व डावे यांना सोबत घेऊन उद्धवजींच्या नेतृत्वात भारताच्या सत्तेवर येतील व २०२४ ते २०२९ या काळात भारताला "भाजपा मुक्त " करून खऱ्या अर्थाने चांगले दिवस आणतील .
किशोर तिवारी
संपर्क -९४२२१०८८४६
===================================================
No comments:
Post a Comment