सेवा किचन व आभा प्रकल्पा मार्फ़त १८ जूनला घोंसी कोलाम पोडावर कोरोना लसीकरण व खावटी वाटप कार्यक्रम
दिनांक -१७ जुन २०२१
नागपूरच्या खुशरु पोचा या रेल्वे मध्ये कर्मचारी असलेल्या व मागील २० वर्षापासुन रुग्णांना व त्यांच्या नातलगांना नागपूर प्रत्येक दवाखान्यात जेवण देण्याचा सेवा किचन या नावाने कोणतीही देणगी न घेता सुरु केलेल्या प्रकल्पाद्वारे मागीलवर्षी १० हजारावर कुटुंबाना तीन महिने अन्नाच्या किट वाटप केले होते व त्यांच्या कामाचे कौतुक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी सरळ फोन करून केली होती व महाराष्ट्र सरकारने त्यांच्या कामाचे कौतुक करण्यासाठी मागीलवर्षी पदमश्री पुरस्कारासाठी शिफारस सुद्धा केली होती .यावर्षी सुद्धा पहिल्या टप्प्यात २० मे रोजी सकाळी पांढरकवडा १५०० कुटुंबांना "अन्ना व किराणा " कीट वाटप करण्यात आले व दुसऱ्या टप्प्यात १००० कुटुंबांना "अन्ना व किराणा " कीट वाटप करण्यात आले आहे हा प्रकल्प शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना नेते नामदार एकनाथ शिंदे ,लोकनेते आमदार संजय राठोड , खुशरू पोचा यांच्या सेवा किचन विलु पूनावाला फाउंडेशन , रोहित शेलटकर यांच्या ग्रँड मराठा फाउंडेशन,सलीम खेतानी यांच्या खेतानी फाउंडेशन,जगदंबा देवस्थान ट्रस्ट तसेच शेकडो दात्यांच्या सहकार्याने चालविला जात आहे अशी माहिती "आधार उद्भवाचा " प्रकल्पाच्या संयोजिका स्मिता तिवारी तसेच क्रांतिवीर बिरसा मुंडा ट्रस्टचे आदिवासी नेते अंकित नैताम यांनी कळविले आहे.
गेल्या वर्षभरापासून कोरोना संक्रमणामुळे संपूर्ण जनजीवन, उद्योग व्यवसाय, अर्थव्यवस्थेला ग्रहण लागले असताना माझ्या कार्यालयामार्फत वर्षभरात उपाययोजना व अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. या दरम्यान आलेल्या अनुभवांवरून काही व्यवस्था या दीर्घ कालावधीसाठी उपलब्ध झाल्या पाहिजेत व या संकटाचा सामना करताना कोणत्याही अडचणी समोर उभ्या राहू नयेत. भविष्यातील नियोजनाच्या दृष्टीने आरोग्याच्या सुविधांमध्ये नागपूर-विदर्भ आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने प्रयत्नही करण्यात येत आहेत. यासाठी केंद्र शासन, राज्य शासन, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, आरोग्य सेवेतील तज्ञ डॉक्टरांचे बहुमोल सहकार्यही मिळत असल्याची माहीती किशोर तिवारी यांनी यावेळी दिली .
===========================================================
No comments:
Post a Comment