Saturday, August 19, 2023

राष्ट्रीय महामार्ग भ्रष्टाचार प्रकरण म्हणजे नितीन गडकरी यांना गोवण्याचा प्रकार-किशोर तिवारी यांचा मोदी शाह यांचे वरती घणाघाती प्रहार - गडकरी यांना षडयंत्र पूर्वक बदनाम करण्याचे पातक

राष्ट्रीय महामार्ग भ्रष्टाचार प्रकरण म्हणजे नितीन गडकरी यांना गोवण्याचा प्रकार-किशोर तिवारी यांचा मोदी शाह यांचे वरती घणाघाती प्रहार - गडकरी यांना षडयंत्र पूर्वक बदनाम करण्याचे पातक

नागपूर दि. १९ ऑगस्ट २३


"ऐन लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजण्याच्या आधी सी.ए.जी. अहवालाचे निमित्त करून एका मागून एक असे राष्ट्रीय महामार्ग भ्रष्टाचार प्रकरणे उकरून काढले जात आहे. यात षडयंत्र पूर्वक महाराष्ट्रातील व विदर्भातील झुझारू नेते नितीन गडकरी यांना बदनाम करण्याचे मोदी शाह यांचे पातक असून गडकरी यांना या प्रकरणात नाहक गोवण्याचा प्रकार आहे", असा घणाघाती प्रहार शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी केला आहे.

गेल्या १५ दिवसापासून सी.ए.जी. अहवालाचे निमित्त करून दिल्ली येथील द्वारका एक्सप्रेस हायवे वर २५३ कोटी रुपये प्रति किलोमीटर अशी प्रचंड रक्कम खर्च केल्याचा ठपका राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण वर ठेवून त्यात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री श्री नितीन गडकरी यांचे वर लक्ष वेधून त्यांनी खूप मोठा भ्रष्टाचार केला आहे, असे देशाला भासविले जात आहे. यात वास्तविकता अशी आहे की द्वारका एक्सप्रेस हायवे ज्या दिल्ली तील अती गजबजलेल्या दाट वस्तीतून जातो, त्या रस्त्याने भूमी अधिग्रहण किंमत ही देशात सर्वात मोठी असून रू. २० ते २५,००० प्रति स्क्वेअर फूट प्रमाणे भूमी अधिग्रहण न्यायालयाने दिलेला दर दिल्ली उच्च न्यायालयाने ग्राह्य  ठरविल्या नंतर ११०.६ कोटी प्रति एकर प्रमाणे भूमी अधिग्रहण खर्च झाला. एकूण २९ किलोमीटर अंतरासाठी १० पदरी रस्त्याचे कामासाठी २३५ कोटी रुपयांचा प्रति किलोमिटर खर्च असा भूमी अधिग्रहण खर्च झाला असताना, ही वास्तविक बाब रेकॉर्ड वरून लपवून ठेवली जात आहे. तसेच इतरही हाइवे  प्रकल्पात घोळ करून नितीन गडकरी त्यांनी खूप मोठा भ्रष्टाचार केला आहे, असे देशाला भासविले जात आहे. हा एक प्रकारे महाराष्ट्र आणि विदर्भातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित मोठे नेतृत्व खलास करण्याचा मोठा कार्यक्रम भाजपा तील कलुशित विचार सरणी चे लोकांनी हाती घेतला आहे. केंद्रात मोदी प्रणित  भाजपा चे पतन झाल्यास सर्व मान्य धडाडीचे नेते म्हणून पंतप्रधान पदी नितीन गडकरी यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याचा केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी दिलेला अहवाल कळताच गडकरी यांना बदनाम करण्याचे मोदी शाह यांचे हे पातक असून गडकरी यांना या प्रकरणात नाहक गोवण्याचा प्रकार असल्याचा घणाघाती प्रहार शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी केला आहे.

सी.ए.जी. चे आता पर्यंत उघड झालेले १८ अहवालापैकी केवळ गडकरी यांचे विभागाशी संबंधीत अहवाल व आरोपच प्रकाश झोतात आणून कोविड काळात झालेला रेमिडिसीविर घोळला, रेल्वेतील खाजगी करणातील खुला गैरव्यवहार, फूड कॉर्पोरेशन मधील घोटाळा, कांहीं उद्योगपतीना 'इंसोलवांसी व बँकरेपसी कोड' चे खाली दिलेली १५.३८ लाख कोटी रुपयांची विशाल कर्ज माफी, आदी सी.ए.जी.ने ठपका ठेवून उघड केलेले गंभीर विषय दाबून फक्त गडकरी यांच्या विभागाशी संबंधित रिपोर्ट प्रकाश झोतात आणून मोदी शहा मजा बघत आहेत ! नागपूरचा रा. स्व. संघ परिवार कसा कचाट्यात येईल, अशी पद्धतशीर बदनाम करणारी यंत्रणा मोदी शहा चालवीत असल्याचा तिवारी यांचा खुला आरोप आहे.

किशोर तिवारी हे गेल्या २५ वर्षापासून विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी व शेतमजूर आणि ग्रामीण भागातील समस्यासह आदिवासी व पददलित लोकांच्या समस्या भुतलावर काम करून मांडीत आहेत. राज्य सरकारच्या शेतकरी मिशन चे ते ८ वर्ष राज्यमंत्री दर्जा प्राप्त अध्यक्ष पदी जबाबदारी सांभाळत असताना, कुणाशीही पर्वा न करता, त्यांनी केंद्र व राज्य सरकारला अनेक सखोल अहवाल सादर करून शेतकऱ्यांच्या अडचणी सरकार दरबारी रेटून प्रवाहा विरूध्द जावून काम केले होते.

गडकरी यांची ज्या प्रकारे विकेट पाडून महाराष्ट्र आणि विदर्भातील मोठे नेतृत्व खलास करण्याचा मोठा कार्यक्रम मोदी शहा यांनी आखला आहे, त्यामुळे तिवारी यांनी मोदी शहा यांचे विरूध्द उघड मोहीम सुरू करून गडकरी यांना पद्धतशीर बदनाम करण्याचे राष्ट्रीय षडयंत्र केले जाते आहे, असा आरोप  तिवारी यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे

किशोर तिवारी हे सध्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे राष्ट्रीय प्रवक्ते असून अनेक विषयावर  सरकारच्या चुकीच्या धोरणावर सातत्याने पाठपुरावा करून राष्ट्रीय स्तरावर आवाज उठवीत आहेत.

नितीन गडकरी, हे एक धडाडीचे नेतृत्व असल्याचे विचार मांडून गडकरी यांना बदनाम करण्याचे षडयंत्र प्रकरणी त्यांनी पक्षीय राजकारणाचे पलीकडे जाऊन खुली भूमिका मांडून आता या विषयावर चर्चा घडवून आणली आहे.

=====================================================================

Friday, August 18, 2023

स्वातंत्र्यदीना दरम्यान यवतमाळमध्ये पाच शेतकऱ्यांच्या आत्महत्यांकडे महाराष्ट्राच्या कृषीमंत्र्यांनी पाठ फिरविली :२०२३ मध्ये विदर्भात १५६५ विक्रमी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना नाकर्ते सरकार जबाबदार-किशोर तिवारी

स्वातंत्र्यदीना दरम्यान  यवतमाळमध्ये पाच शेतकऱ्यांच्या आत्महत्यांकडे महाराष्ट्राच्या कृषीमंत्र्यांनी पाठ फिरविली :२०२३ मध्ये विदर्भात १५६५ विक्रमी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना नाकर्ते सरकार जबाबदार-किशोर तिवारी   

दिनांक -१७ ऑगस्ट २०२३

ज्या बंजारा ,पारधी,आदीवासी व दलीत समाजाच्या कल्याणासाठी साठी स्व.वसंतराव नाईक यांनी आपले अखे आयुष्य वेचले त्यांचा स्मृतिदिना कार्यक्रमासाठी यवतमाळ येथे आलेले महाराष्ट्राचे कृषीमंत्री धनंजय मुंडे याच समाजाच्या पाच शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्यांप्रती पूर्ण उदासीनता दाखवीत त्यांचा गावासमोरून गाड्यांचा ताफा देत कुटुंबाची साधी विचारपूसही केली नाही या घटनेचा निषेध शिवसेना (उबाठा) राष्ट्रीय प्रवक्ते व महाराष्ट्राच्या स्व वसंतराव नाईक शेती स्वालंबन मिशनचे माजी  अध्यक्ष किशोर तिवारी केला असुन यावर्षी २०२३ मध्ये विदर्भात १५६५ विक्रमी शेतकऱ्यांच्या आत्महत्यां झाल्या असुन या होत असलेल्या शेतकरी आत्महत्यांना केंद्र व राज्य सरकारचे चुकीचे ढवण जबाबदार असुन संपुर्ण विदर्भात शेतकरी मागील वर्षीच्या कापूस सोयाबीन च्या मंदीमुळे तसेच जुलै महिन्यातील अति पाऊसामुळे  झालेल्या प्रचंड नापिकी मुळे आर्थिक संकट आले आहेत लागवडीचा खर्च अतिशय वाढल्यामुळे व बँकांनी अपुरे पीककर्ज वाटप केल्यामुळे ह्या आत्महत्या होत असल्याचा आरोप किशोर तिवारी यांनी केला . 

जेव्हा देश आपला ७६ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत होता आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना गेल्या ९ वर्षात कृषी क्षेत्रात विक्रमी वाढ झाल्याचा दावा करीत होते त्याचवेळी 

१. यवतमाळ जवळील येरद गावातील अत्यंत युवा  शेतकरी मनोज राठोड (३५) यांनी गळफास लावून आत्महत्या केली तर स्वतंत्रदिनाच्या पूर्व संध्येला 

२. १४ ऑगस्ट रोजी टेंभी येथील कर्णू किनके (५१) या गावातील आणखी एका आदिवासी शेतकर्‍याने आर्थिक संकटामुळे व वन्य प्राण्यांनी उद्ध्वस्त केलेल्या पिकामुळे आत्महत्या केली.

३. १४ ऑगस्टला उमर विहीर गावातील पारधी महीला शेतकरी  शालू पवार (४२)  त्यांचे उभे  पीक वन्य प्राण्यांनी नष्ट केल्यामुळे आत्महत्या केली 

४ .१३ऑगस्टला  यवतमाळ जिल्हयातील ल तिवरंग गावातील नामदेव वाघमारे (45)  मागास वर्गीय शेतकऱ्यांनी कर्जबाजारी झाल्याने आत्महत्या 

५. १३ऑगस्टला यवतमाळ जवळील लोहारा गावातील बंजारा समाजाचे शेतकरी   रामराव राठोड (४२) यांनी प्रचंड अडचणीमुळे आत्महत्या  केली 

असे त्यामुळे एकट्या यवतमाळ जिल्ह्यात गेल्या ४८ तासांत पाच शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या असून या व्यतिरिक्त अमरावती जिल्ह्यातील शिराळा या गावातील चनद्रभान गवई या  दलीत  समाजातील शेतकऱ्यांनीही प्रचंड कर्ज आणि पिकांच्या नापिकीमुळे आत्महत्या केली आहे .यावर्षी महाराष्ट्रातील विदर्भात आत्महत्या झाल्या आहेत. १९९७ पासून शेतकरी आत्महत्यांचा मागोवा घेणारे आणि शेतकऱ्यांच्या दुर्दैवी नरसंहाराला आंतरराष्ट्रीय पातळीवर  आणणारे ज्येष्ठ शेतकरी कार्यकर्ते किशोर तिवारी यांच्या म्हणण्यानुसार, चालू वर्षात विदर्भाच्या ग्रामीण संकटामुळे १५६५ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत, जो गेल्या २५ वर्षांतील हा  विक्रमी आकडा आहे.

"लागवडीचा खर्च नियंत्रण ,हमीभाव , पीकपद्धती  आणि पतपुरवडा धोरण , पर्यावरणातील बदल यावर शेतकऱ्यांना सरकारं करणारी पीक विमा योजना   यासंबंधीचे मुख्य प्रश्न्नाकडे  केंद्र सरकार लक्ष देत नसल्यामुळे, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या निष्पाप हत्येवर नियंत्रण ठेवले जात नाही आणि १९९७ पासून शेतकरी आत्महत्यांचे सत्र  सुरूच आहे. कोलमडलेल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला मदत पॅकेजेस कोणताही दिलासा देत नाहीत. राजकीय नेतृत्वाचा अभाव आणि व्यवस्थेतील अनियंत्रित भ्रष्टाचारामुळे विदर्भातील सर्वात मागासलेला प्रदेश आहे, असे किशोर तिवारी यांनी गावांना भेटी दिल्यानंतर सांगितले.

"खूप कमी मागणी असलेल्या कापूस या मुख्य नगदी पिकामुळे विदर्भाची अर्थव्यवस्था कोलमडली  आहे. लागवडीचा खर्च यामध्ये प्रचंड वाढ झाली आहे  आणि बँकांद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अत्यंत कमी पीककर्जामुळे संकटात आणखी भर पडली आहे. शाश्वतपीक  अन्न ,डाळी आणि तेलबिया पिकांना प्रोत्साहन देण्यात सरकार अपयशी ठरले आहे. या प्रदेशात आणि जागतिक हवामानातील बदल हे सध्याच्या कृषी संकटाचे कारण आहेत,” किशोर तिवारी पुढे म्हणाले.

पंतप्रधानांनी तातडीने हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले

विदर्भातील अत्यंत लहान प्रदेशात दररोज एकापेक्षा जास्त शेतकरी आत्महत्या होत असताना, नजीकच्या भविष्यात ५ ट्रिलियन अर्थव्यवस्थेचा भारताचा टोल दावा कमी आहे, विदर्भाच्या शेतकऱ्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विदर्भाचा दौरा करून शेतकऱ्यांना आत्महत्येला भाग पाडणाऱ्या प्रमुख समस्यांचे निराकरण करण्याचे आवाहन केले. ,किशोर तिवारी यांनी  पंतप्रधानांना विनंती केली आहे .

Saturday, August 12, 2023

यवतमाळ जिल्ह्यातील शेकडो टॉवरग्रस्त  शेतकऱ्यांवर विदयुत कंपनी कडुन अन्याय :१३ ऑगस्टला घाटंजी येथे टॉवरग्रस्त शेतकऱ्यांच्या घाटंजी येथे मेळावा  

दिनांक -१२ ऑगस्ट २०२३

भारतातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येसाठी कुप्रसिद्ध असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी आर्णी केळापुर तालुक्यातील आदीवासी ,दलीत व भटक्या जमातीतील शेकडो शेतकऱ्यांना महाराष्ट्र सरकारच्या टॉवर उभारून विदुतय वाहण्यासाठी प्रस्थापित कंपनीच्या जरबीने टॉवर उभारून शेत जमीन खराब केल्यामुळे व आता या जागेचा मोबदला देताना जिल्हा प्रशासनाला हाताशी घेऊन अतिशय कमी देण्यात येत असल्यामुळे या प्रशासकीय उदासीनतेमुळे शेकडो शेतकरी आत्महत्या करण्याच्या मार्गावर असुन आता या शेतकऱ्यांनी "करा वा मरा" चा लढा उभारला असुन  येत्या १३ ऑगस्टला घाटंजी येथील बाळ कृष्ण मंगल कार्यालय येथे दुपारी १२ वाजता शेतकऱ्यांचा मेळावा आयोजीत करण्यात आला असुन या मेळाव्याला विदर्भाच्या शेतकरी चळवळीचे कार्यकर्ते किशोर तिवारी ,मोरेश्वर भाऊ वातीले ,आदिवासी नेते अंकित भाऊ नैताम ,युवा नेते बाळासाहेब जाधव शिवनीकर उपस्थित राहणार असल्याची माहीती टॉवरग्रस्त शेतकरी संघर्ष समितीचे संयोजक गोवर्धन तामगाडगे,किशोर धोटे,विष्णु धुर्वे,दिलीप मुनेश्वर,सुभाष राठोड यांनी दिली 

टॉवर उभे करतांना दिलेल्या आश्वासनाला सरकारने पाणी पुसली 

यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी आर्णी केळापुर तालुक्यातील शेकडो आदीवासी ,दलीत व भटक्या जमातीतील कोरडवाहू शेतकऱ्यांच्या जेमतेम २ ते ३ एकर शेतात मोठमोठाले टॉवर उभारण्यात आले व शेतकऱ्यांनी विरोध केला असतांना आपल्या जागेचा मोबदला देण्याची रक्कम जी सांगीतली आता जिल्हा प्रशासनाला चुकीची माहिती देऊन अर्ध्यावरून कमी मोबदला शासनाने मंजूर केला आहे व या अन्यायाविरुद्ध शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालय व उपविभागीय अधिकारी केळापूर या ठिकाणी चक्र मारत आहेत मात्र टॉवरग्रस्त शेतकऱ्यांची हाक कोणीही एकात नसुन जो मोबदला प्रशासन मंजूर करीत आहे तो गुपचुप घ्या व घरी बसा असा उरफाटा सल्ला केळापुर येथील मस्तवाल उपविभागीय अधिकारी शेतकऱ्यांना धमकावून देत असल्याची माहीती अन्यायग्रस्त शेतकरी नागोराव राठोड, ज्ञानेश्वर जाधव, वासुदेव गुरणुले,गजानन राठोड ,बाबुलाल चव्हाण ,उत्तम नेवारे यांनी दिली . 

यवतमाळ जिल्ह्यातील शेकडो टॉवरग्रस्त शेतकऱ्यांनी मेळाव्याला यावे -गोवर्धन तामगाडगे

सरकारने टॉवर लीने टाकतांना प्रचंड अन्याय केला असुन राजकीय नेत्यांची शेत सोडुन आदीवासी ,दलीत व भटक्या जमातीतील शेकडो शेतकऱ्यांनवर अन्याय करीत जुलूम करीत शेती लागवडी अयोग्य करून उपासमारीला आणून ठेवले आहे तरी येत्या १३ ऑगस्टला घाटंजी येथील बाळ कृष्ण मंगल कार्यालय येथे दुपारी १२ वाजता शेतकऱ्यांचा मेळाव्याला टॉवरग्रस्त शेतकऱ्यांनी यावे असे आवाहन गोवर्धन तामगाडगे यांनी केले आहे . 

============================================================