यवतमाळ जिल्ह्यातील शेकडो टॉवरग्रस्त शेतकऱ्यांवर विदयुत कंपनी कडुन अन्याय :१३ ऑगस्टला घाटंजी येथे टॉवरग्रस्त शेतकऱ्यांच्या घाटंजी येथे मेळावा
दिनांक -१२ ऑगस्ट २०२३
टॉवर उभे करतांना दिलेल्या आश्वासनाला सरकारने पाणी पुसली
यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी आर्णी केळापुर तालुक्यातील शेकडो आदीवासी ,दलीत व भटक्या जमातीतील कोरडवाहू शेतकऱ्यांच्या जेमतेम २ ते ३ एकर शेतात मोठमोठाले टॉवर उभारण्यात आले व शेतकऱ्यांनी विरोध केला असतांना आपल्या जागेचा मोबदला देण्याची रक्कम जी सांगीतली आता जिल्हा प्रशासनाला चुकीची माहिती देऊन अर्ध्यावरून कमी मोबदला शासनाने मंजूर केला आहे व या अन्यायाविरुद्ध शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालय व उपविभागीय अधिकारी केळापूर या ठिकाणी चक्र मारत आहेत मात्र टॉवरग्रस्त शेतकऱ्यांची हाक कोणीही एकात नसुन जो मोबदला प्रशासन मंजूर करीत आहे तो गुपचुप घ्या व घरी बसा असा उरफाटा सल्ला केळापुर येथील मस्तवाल उपविभागीय अधिकारी शेतकऱ्यांना धमकावून देत असल्याची माहीती अन्यायग्रस्त शेतकरी नागोराव राठोड, ज्ञानेश्वर जाधव, वासुदेव गुरणुले,गजानन राठोड ,बाबुलाल चव्हाण ,उत्तम नेवारे यांनी दिली .
यवतमाळ जिल्ह्यातील शेकडो टॉवरग्रस्त शेतकऱ्यांनी मेळाव्याला यावे -गोवर्धन तामगाडगे
सरकारने टॉवर लीने टाकतांना प्रचंड अन्याय केला असुन राजकीय नेत्यांची शेत सोडुन आदीवासी ,दलीत व भटक्या जमातीतील शेकडो शेतकऱ्यांनवर अन्याय करीत जुलूम करीत शेती लागवडी अयोग्य करून उपासमारीला आणून ठेवले आहे तरी येत्या १३ ऑगस्टला घाटंजी येथील बाळ कृष्ण मंगल कार्यालय येथे दुपारी १२ वाजता शेतकऱ्यांचा मेळाव्याला टॉवरग्रस्त शेतकऱ्यांनी यावे असे आवाहन गोवर्धन तामगाडगे यांनी केले आहे .
============================================================
No comments:
Post a Comment