Saturday, August 19, 2023

राष्ट्रीय महामार्ग भ्रष्टाचार प्रकरण म्हणजे नितीन गडकरी यांना गोवण्याचा प्रकार-किशोर तिवारी यांचा मोदी शाह यांचे वरती घणाघाती प्रहार - गडकरी यांना षडयंत्र पूर्वक बदनाम करण्याचे पातक

राष्ट्रीय महामार्ग भ्रष्टाचार प्रकरण म्हणजे नितीन गडकरी यांना गोवण्याचा प्रकार-किशोर तिवारी यांचा मोदी शाह यांचे वरती घणाघाती प्रहार - गडकरी यांना षडयंत्र पूर्वक बदनाम करण्याचे पातक

नागपूर दि. १९ ऑगस्ट २३


"ऐन लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजण्याच्या आधी सी.ए.जी. अहवालाचे निमित्त करून एका मागून एक असे राष्ट्रीय महामार्ग भ्रष्टाचार प्रकरणे उकरून काढले जात आहे. यात षडयंत्र पूर्वक महाराष्ट्रातील व विदर्भातील झुझारू नेते नितीन गडकरी यांना बदनाम करण्याचे मोदी शाह यांचे पातक असून गडकरी यांना या प्रकरणात नाहक गोवण्याचा प्रकार आहे", असा घणाघाती प्रहार शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी केला आहे.

गेल्या १५ दिवसापासून सी.ए.जी. अहवालाचे निमित्त करून दिल्ली येथील द्वारका एक्सप्रेस हायवे वर २५३ कोटी रुपये प्रति किलोमीटर अशी प्रचंड रक्कम खर्च केल्याचा ठपका राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण वर ठेवून त्यात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री श्री नितीन गडकरी यांचे वर लक्ष वेधून त्यांनी खूप मोठा भ्रष्टाचार केला आहे, असे देशाला भासविले जात आहे. यात वास्तविकता अशी आहे की द्वारका एक्सप्रेस हायवे ज्या दिल्ली तील अती गजबजलेल्या दाट वस्तीतून जातो, त्या रस्त्याने भूमी अधिग्रहण किंमत ही देशात सर्वात मोठी असून रू. २० ते २५,००० प्रति स्क्वेअर फूट प्रमाणे भूमी अधिग्रहण न्यायालयाने दिलेला दर दिल्ली उच्च न्यायालयाने ग्राह्य  ठरविल्या नंतर ११०.६ कोटी प्रति एकर प्रमाणे भूमी अधिग्रहण खर्च झाला. एकूण २९ किलोमीटर अंतरासाठी १० पदरी रस्त्याचे कामासाठी २३५ कोटी रुपयांचा प्रति किलोमिटर खर्च असा भूमी अधिग्रहण खर्च झाला असताना, ही वास्तविक बाब रेकॉर्ड वरून लपवून ठेवली जात आहे. तसेच इतरही हाइवे  प्रकल्पात घोळ करून नितीन गडकरी त्यांनी खूप मोठा भ्रष्टाचार केला आहे, असे देशाला भासविले जात आहे. हा एक प्रकारे महाराष्ट्र आणि विदर्भातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित मोठे नेतृत्व खलास करण्याचा मोठा कार्यक्रम भाजपा तील कलुशित विचार सरणी चे लोकांनी हाती घेतला आहे. केंद्रात मोदी प्रणित  भाजपा चे पतन झाल्यास सर्व मान्य धडाडीचे नेते म्हणून पंतप्रधान पदी नितीन गडकरी यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याचा केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी दिलेला अहवाल कळताच गडकरी यांना बदनाम करण्याचे मोदी शाह यांचे हे पातक असून गडकरी यांना या प्रकरणात नाहक गोवण्याचा प्रकार असल्याचा घणाघाती प्रहार शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी केला आहे.

सी.ए.जी. चे आता पर्यंत उघड झालेले १८ अहवालापैकी केवळ गडकरी यांचे विभागाशी संबंधीत अहवाल व आरोपच प्रकाश झोतात आणून कोविड काळात झालेला रेमिडिसीविर घोळला, रेल्वेतील खाजगी करणातील खुला गैरव्यवहार, फूड कॉर्पोरेशन मधील घोटाळा, कांहीं उद्योगपतीना 'इंसोलवांसी व बँकरेपसी कोड' चे खाली दिलेली १५.३८ लाख कोटी रुपयांची विशाल कर्ज माफी, आदी सी.ए.जी.ने ठपका ठेवून उघड केलेले गंभीर विषय दाबून फक्त गडकरी यांच्या विभागाशी संबंधित रिपोर्ट प्रकाश झोतात आणून मोदी शहा मजा बघत आहेत ! नागपूरचा रा. स्व. संघ परिवार कसा कचाट्यात येईल, अशी पद्धतशीर बदनाम करणारी यंत्रणा मोदी शहा चालवीत असल्याचा तिवारी यांचा खुला आरोप आहे.

किशोर तिवारी हे गेल्या २५ वर्षापासून विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी व शेतमजूर आणि ग्रामीण भागातील समस्यासह आदिवासी व पददलित लोकांच्या समस्या भुतलावर काम करून मांडीत आहेत. राज्य सरकारच्या शेतकरी मिशन चे ते ८ वर्ष राज्यमंत्री दर्जा प्राप्त अध्यक्ष पदी जबाबदारी सांभाळत असताना, कुणाशीही पर्वा न करता, त्यांनी केंद्र व राज्य सरकारला अनेक सखोल अहवाल सादर करून शेतकऱ्यांच्या अडचणी सरकार दरबारी रेटून प्रवाहा विरूध्द जावून काम केले होते.

गडकरी यांची ज्या प्रकारे विकेट पाडून महाराष्ट्र आणि विदर्भातील मोठे नेतृत्व खलास करण्याचा मोठा कार्यक्रम मोदी शहा यांनी आखला आहे, त्यामुळे तिवारी यांनी मोदी शहा यांचे विरूध्द उघड मोहीम सुरू करून गडकरी यांना पद्धतशीर बदनाम करण्याचे राष्ट्रीय षडयंत्र केले जाते आहे, असा आरोप  तिवारी यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे

किशोर तिवारी हे सध्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे राष्ट्रीय प्रवक्ते असून अनेक विषयावर  सरकारच्या चुकीच्या धोरणावर सातत्याने पाठपुरावा करून राष्ट्रीय स्तरावर आवाज उठवीत आहेत.

नितीन गडकरी, हे एक धडाडीचे नेतृत्व असल्याचे विचार मांडून गडकरी यांना बदनाम करण्याचे षडयंत्र प्रकरणी त्यांनी पक्षीय राजकारणाचे पलीकडे जाऊन खुली भूमिका मांडून आता या विषयावर चर्चा घडवून आणली आहे.

=====================================================================

No comments: