यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी मुली बेपत्ता व मानवी तस्करीची घटनांची सत्य शोधक समिती राळेगावला २४ एप्रिलला भेट देणार -भाजप नेत्यांनी केलेले आरोप अत्यंत गंभीर - किशोर तिवारी
दिनांक - २३ एप्रिल २०२६
यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातून गेल्या सहा महिन्यांत ३४ आदिवासी मुली बेपत्ता झाल्याचा दावा भाजप नेत्यांनी केला असून व या मुलींना परराज्यात विकल्याचा आणि मानवी तस्करीचे गंभीर आरोप केले आहेत . ३४ आदिवासी मुली बेपत्ता झाल्याचा दावा भाजप जिल्हाध्यक्ष प्रफुल चव्हाण आणि आमदार अशोक उईके यांनी केला असल्यामुळे व राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपचे सरकार असल्यामुळे नाशीक व अमरावती नंतर आता याचा संबंध राज्यस्तरीय आहे हे सत्य शोधन करण्यासाठी महिला अधिकार कार्यकर्त्या ,समाज सुधारक प्रसिद्ध लेखक डॉ लीलाताई भेले यांच्या अध्यक्षतेखाली समिती त्यामध्ये आदिवासी महिला नेत्या संध्याताई मडावी ,आदिवासी नेते अंकित नैताम हे येत्या २४ एप्रिल राळेगाव येथे भेट देणार असल्याची माहीती सामाजिक कार्यकर्ते किशोर तिवारी यांनी दिली आहे .
वरील आरोप यवतमाळ जिल्ह्याचे भाजप जिल्हाध्यक्ष प्रफुल चव्हाण हे स्वतः वकील असुन दुसरे आरोप करणारे महाराष्ट्राचे आदिवासी मंत्री डॉ अशोक उईके असुन त्यांचे सहकारी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत त्यामुळे जे काम विरोधकांनी करावे ते काम सरकारचे आदिवासी मंत्री करीत आहेत या घटनेच्या निषेधार्थ आणि तात्काळ कारवाईच्या मागणीसाठी राळेगाव बंद पाळण्यात आला होता व या प्रकरणाशी संबंधित एक संशयास्पद ऑडिओ क्लिप समोर आल्याचा दावा केला जात आहे, ज्यामध्ये मुलींच्या विक्रीचा उल्लेख असल्याचा आरोप करण्यात येत आहेत यामुळे अख्ख्या जिल्ह्यात या घटनेवर गंभीर चिंता व्यक्त केली ज्यात असुन त्यामुळे याप्रकरणी सखोल चौकशीची आवश्यकता असुन यामुळे सत्य शोधक समिती भेट देत आहे अशी माहिती किशोर तिवारी यांनी दिली आहे.
ही सत्य शोधक समिती चौकशी अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी रॉबीन बंसल ,भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण,आदीवासी पिडीत कुटुंब त्यांचे नातलग ,मुख्य आरोपी मजहर कुरेशी यांच्या घरी भेट व दुपारी ३ वाजता कृषी उत्त्पन्न बाजार समिती येथे सर्व पत्रकार यांच्याशी चर्चा करण्यात येणार आहेत अशी माहीती या भेटीचे संयोजक किशोर तिवारी दिली आहे .
==============================================
.jpg)

No comments:
Post a Comment