ज्याप्रमाणे अमरावती जिल्ह्यातील "लव जिहाद" , "धर्मांतर" किंवा "हिंदू मुलींचा छळ" हे भाजपच्या नेत्यांनी केलेले आरोप हे हिंदू मुस्लिम दंगली घडविण्याचा प्रकार आहे असा खुलासा मंत्री दर्जा प्राप्त महाराष्ट्र अल्पसंख्यांय आयोगाचे अध्यक्ष प्यारेखान यांनी करून संपुर्ण प्रकरणाची सत्यता जगासमोर आणली त्याचप्रमाणे यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातून गेल्या सहा महिन्यांत ३४ आदिवासी मुली बेपत्ता झाल्याचा दावा भाजप नेत्यांनी केलेला गंभीर आरोप तसेच एकही मुलीचे परराज्यात विकल्याचा आणि मानवी तस्करीचे झाल्याचे सर्व आरोप बिनबुडाचे असुन खोटे असुन यवतमाळ पोलीस अधीक्षक यांचा माहितीच्या आधारे भाजप आमदार राजू तोडसाम यांनी एक व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रकाशित करून संपूर्ण प्रकरणाची सत्यता जगासमोर आणली मात्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप आमदार राजू तोडसाम यांना आपल्या नागपूर मुक्कामी घरी बोलावून आपण फेसबुक ठेवलेला व्हिडिओ काढा असा आदेश दिला असल्याने सध्या भाजप आमदार राजू तोडसाम यांनी मौन धारण केले असुन असाच निरोप अल्पसंख्यांय आयोगाचे अध्यक्ष प्यारेखान याना मुख्यमंत्र्यानी दिला असल्याचे गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते किशोर तिवारी यांनी केला आहे. .
आपल्या निवेदनात किशोर तिवारी यांनी म्हटले आहे की "सध्या आपल्या महाराष्ट्र राज्यात सत्ताधारी भाजपा चे नेत्यांनी एकच उद्योग उघडला आहे की एखाद्या प्रकरणात चुकूनही एखादा अल्प संख्याक किंवा दलीत व्यक्ती त्या प्रकरणात कथित आरोपी असल्याचे थोडेही समजले की ही नेते बिळातून निघून असल्या प्रकरणात"लव जिहाद" , "धर्मांतर" किंवा "हिंदू मुलींचा छळ" असे बेछूट आरोप करून संपूर्ण अल्प संख्याक किंवा अदिवासी -दलीत समाजाला आरोपी ठरविण्याचे काम करून सांप्रदायिक व जातीय तेढ कसा निर्माण करून हिंदुंना भडकावून मोर्चे , बंद आदी प्रकार करून पोलिस यंत्रणेवर एक प्रकारे दबाव निर्माण करतात. असेच प्रकार अमरावती, नाशिक, नागपूर व आता यवतमाळ जिल्ह्यात सुद्धा समोर आले आहे. हे सर्व खूप किळसवाणे व माणुसकीला काळीमा फासणारे प्रकार आहेत, ज्यात एखाद्या माथेफिरू कथित आरोपी व्यक्ती च्या चुकीची सजा व मिडिया ट्रायल संपूर्ण अल्प संख्याक किंवा आदीवासी समाजाला भोगावी लागत आहे ,राळेगाव येथील प्रकरण सुद्धा असेच अतिरंजित करून चुकीच्या प्रकारे मिडिया मध्ये समोर आण्यात आले .भाजपा नेत्यांचा हा कुटिल धंदा एक प्रकारे चिथावणीचाच प्रकार असून धार्मिक व सामाजिक तणाव बिघडविण्याचे असे प्रकार महाराष्ट्राचे गृहमंत्री आपल्या पोलिसांच्या राजश्रयात करू देत आहेत , ते वेळीच रोखले पाहिजे, अशी आमची मागणी आहे.


No comments:
Post a Comment