प्रेरणा देशभ्रतार यांनी आणले आदिवासी प्रकल्प कार्यालय वठणीवर-लोकमत
पांढरकवडा आदिवासी विकास प्रकल्पात गेल्या अनेक वर्र्षांपासून चुकीचे पायंडे पडले होते. कंत्राटदार, कर्मचारी, अधिकारी यांची जणू साखळीच तयार झाली होती. या साखळीमुळे आदिवासींना त्यांच्या योजनांचा पुरेसा लाभ मिळत नव्हता. आपण येथे रुजू झाल्यानंतर सर्वप्रथम या चुकीच्या पद्धतींचा अभ्यास करून त्या तातडीने थांबविल्या. त्यासाठी सर्वप्रथम येथील कर्मचार्यांचे टेबल बदलवून त्यांना फाईल किती दिवसात निकाली काढाव्या, याचे वेळापत्रक बनवून दिले. त्यामुळे आज या कार्यालयातील साखळी पूर्णत: तुटली आहे. त्याचा चांगला परिणाम योजना आदिवासींपर्यंत पोहोचणे आणि कामाची गती वाढण्यावर झाला आहे. ही स्पष्टोक्ती आहे येथील प्रकल्प अधिकारी तथा सनदी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांची.
थेट आयएएस असलेल्या एसडीओ तथा पीओ प्रेरणा देशभ्रतार यांनी 'लोकमत'शी दिलखुलास बातचित केली. त्या म्हणाल्या, २0 सप्टेंबर २0१२ ला येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी म्हणुन नियुक्ती झाली. वार्षिक १४२ कोटीचे वर बजेट असलेल्या पांढरकवडा आदिवासी प्रकल्पात आदिवासींसाठी अनेक योजना आहेत. केंद्रशासनातर्फेसुध्दा या बजेट व्यतिरिक्त मोठय़ा प्रमाणावर वेगळा निधी दिला जातो. आदिवासींसाठी असलेल्या विविध योजनांचा लाभ त्यांना मिळावा यासाठी आपण सतत प्रयत्नशिल असल्याचे त्यांनी सांगीतले.
कामकाजात गतीमानता यावी, कामकाज पारदर्शक व्हावे यासाठी आपण सर्वप्रथम कर्मचार्यांच्या अंतर्गत बदल्या के ल्या. त्यांना प्रत्येक कामासाठी वेगवेगळी कालर्मयादा ठरवून दिली.चेक, कॅश आणि डी.डी.ची पध्दत पुर्णपणे बंद केली. संबधितांचे पेमेंट सरळ त्यांच्या खात्यात जमा होण्यासाठी ऑनलाइन पध्दत सुरू केली. कामांचा सतत निपटारा करण्याचा व पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न केला.त्यामुळे कामात गतीमानता येण्यास मदत झाली. कर्मचार्यांच्याही समस्या समजाऊन घेतल्या. आदिवासी प्रकल्पाअंतर्गत सुरू असलेल्या आश्रम शाळांची स्थिती निश्चीतच फार काही चांगली नसल्याचे त्यांनी मान्य केले. या शाळांचा दर्जा कसा सुधारेल,याबाबत आपल्या काही योजना असून त्या आपण शासनाकडे सादर केल्याचे त्यांनी सांगीतले. काही आश्रमशाळांच्या व वसतीगृहाच्या इमारतींची अतिशय दयनिय अवस्था झाली आहे. त्यांना संरक्षक भिंती नाहीत त्यामळे आदिवासी विद्यार्थ्यांना विशेषत: विद्यार्थीनींना फार मोठय़ा समस्यांचा सामना करावा लागत आहे याबाबत विचारले असता, याबाबतचा संपुर्ण अहवाल आपण शासनाकडे पाठविला असून लवकरच इमारतींची व्यवस्था करण्यात येईल असे त्यांनी सांगीतले.
आदिवासी विकास प्रकल्पाचे कामकाज सुधारावे, यासाठी आपण अनेक महत्त्वपूर्ण सूचना व प्रस्ताव शासनाकडे सादर केल्याचे प्रेरणा देशभ्रतार यांनी सांगितले.
कंपनीतून प्रशासकीय सेवेत
कंपनीतील अभियंता पदापासून आयएएस व पांढरकवड्यात एसडीओ व पीओ होईपर्यंतचा प्रशासकीय प्रवास प्रेरणा देशभ्रतार यांनी 'लोकमत'पुढे मांडला. त्या म्हणाल्या, प्रशासकीय सेवेत दाखल होण्यापुर्वी आपण पूणे येथील एका कंपनीत उपकरणीकरन अभियंता म्हणुन काही दिवस काम केले. त्यानंतर पुण्यालाच आंतर राष्ट्रीय विमान तळ येथे कस्टम अधिकारी म्हणुन आपली नियुक्ती झाली. परंतु हे दोन्हीही जॉब आपल्याला चॅलेंजिंग वाटले नाही.त्यामुळे आपण प्रशासकीय सेवेचे चॅलेंज स्विकारल्याचे त्या म्हणाल्या. भारतीय प्रशासन सेवेतील २00९ च्या बॅच मधून आय.ए.एस. झालेल्या प्रेरणा देशभ्रतार या इंजिनिअरींग (उपकरणीकीकरण) च्या पदवीधर आहेत.भारतीय प्रशासन सेवा परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर औरंगाबाद येथे आपण प्रोबेशन कालावधी पुर्ण केल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर २४ ऑगष्ट २0१२ रोजी आपली केळापूर उपविभागीय अधिकारी म्हणुन नियुक्ती झाली.
No comments:
Post a Comment